(मंचाचा निर्णय : श्री. विजय प्रेमचंदानी - मा. अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
1. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्ताचे तक्रारीतील कथन असे आहे की, तक्रारकर्त्याने दिवाळीचे निमित्याने दि.12.11.2015 रोजी म्हातारे आई-वडिल, पत्नी व मुलांसह तिरुपती-तिरुमल्ला देवस्थान येथे दर्शनासाठी जाण्याचे नियोजन केले. त्यासाठी दि. 13.08.2015 रोजी तक्रारकर्त्याने केरला एक्सप्रेस ट्रेनची टिकीटे काढली. सदर रेलची नागपूर रेल्वे स्टेशन येथे येण्याची नियोजीत वेळ सकाळी / मध्यरात्री 3.57 वाजता होती. त्यामुळे तक्रारकर्त्याने अंदाजे दोन महिन्यांआधी विरुध्द पक्षाला दुरध्वनीव्दारे कळविले की, दि.12.11.2015 रोजी सकाळी 3.05 वाजता तक्रारकर्त्याचे वरील पत्त्यावर (रामेश्वरी पासुन ते रेल्वे स्टेशन) सोडण्यासाठी मोठी कार बुक केली. त्यासाठी लागणारे पैसे वेळेवर द्याल असे विरुध्द पक्षाकडून सांगण्यात आले. आणि गाडी वेळेवर आणावी अशी विनंती केल्यावर विरुध्द पक्षातर्फे काळजी नसावी आम्ही 24 तास सेवा पोहचवतो असे सकारात्मक आश्वासन देण्यात आले. तक्रारकर्त्याने या संदर्भात विरुध्द पक्षाला 7 ते 8 वेळा अंदाजे बुकींगबद्दल आठवणा करुन देण्यांत आली होती. प्रवासाचे एका दिवशी आधी दि.11.11.2015 रोजी तिनदा तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला भ्रमणध्वनीव्दारे कळविले त्यावर पुन्हा त्याने आशावादी उत्तर देऊन बेफीक्री राहावयास सांगितले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला असे सांगितले की, 30 मिनीटे अगोदर कारचे ड्रायव्हरचे नाव आणि नंबर पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे प्रवासाचे दिवशी दि.12.11.2015 रोजी सकाळी 3.15 पर्यंत विरुध्द पक्षाची गाडी आली नाही तेव्हा तक्रारकर्त्याने भ्रमणध्वनीव्दारे विरुध्द पक्षाला संपर्क केला व सांगितले की, गाडी आता पावेतो का आली नाही. रेल्वे स्टेशनला जाण्याची वेळ झाली आहे असे विचारले असतांना विरुध्द पक्षाने केवळ सॉरीसर असे थोडक्यात उत्तर दिले आणि फोन ठेवला. विरुध्द पक्षाने बेजबाबदारीचा परिचय दिला असुन तक्रारकर्त्याला त्रास झाला व परत फोन लावला असतांना प्रतिसाद मिळाला नाही. विरुध्द पक्षाने असा व्यवहारामुळे तक्रारकर्त्याला व त्याचे परिवाराला गैरसोय झाली. व विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रती न्युनतम सेवा दर्शविली असल्याने तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दि.20.11.2015 रोजी नोटीस पाठविला व तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई व विनाशर्ती माफीनामा मागितला असल्याने विरुध्द पक्षाने त्यावर कोणतीही दखल घेतली नाही म्हणून तक्रारकर्त्याने सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक मानसिक त्रासापोटी रु.5,00,000/- व्याजासह देण्याचा आदेश व्हावा. तसेच तक्रारकर्त्यास तक्रारीचा खर्च मिळण्याचा आदेश व्हावा.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरुध्द पक्षाला नोटीस काढण्याचा आदेश पारित करण्यांत आला. विरुध्द पक्ष प्रकरणात हजर झाले परंतु विरुध्द पक्षांनी कोणतेही लेखीउत्तर दाखल केले नाही. म्हणून दि.16.01.2017 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे विरुध्द निशाणी क्र.1 वर विना लेखी जबाब तक्रार पुढे चालविण्याचे आदेश पारित करण्यांत आले.
4. तक्रारकर्त्यातर्फे दाखल तक्रार, दस्तावेज, तसेच तोंडी युक्तिवादावरुन खालील कारणमिमांसेवरुन आदेश पारित करण्यांत येते.
- // कारणमिमांसा // -
5. तक्रारकर्त्याची दाखल तक्रार, शपथपत्र, निशाणी क्र.2 वर दाखल नोटीस व निशाणी क्र.4 वर दाखल रेल्वे आरक्षणाची प्रत वरुन असे सिध्द होते की, तक्रारकर्त्याने दिवाळीचे निमित्याने दि.12.11.2015 रोजी म्हातारे आई-वडिल, पत्नी व मुलांसह तिरुपती-तिरुमल्ला देवस्थान येथे दर्शनासाठी जाण्याचे नियोजन केले. त्यासाठी दि. 13.08.2015 रोजी तक्रारकर्त्याने केरला एक्सप्रेस ट्रेनची टिकीटे काढली. सदर रेलची नागपूर रेल्वे स्टेशन येथे येण्याची नियोजीत वेळ सकाळी / मध्यरात्री 3.57 वाजता होती. त्यामुळे तक्रारकर्त्याने अंदाजे दोन महिन्यांआधी विरुध्द पक्षाला दुरध्वनीव्दारे कळविले की, दि.12.11.2015 रोजी सकाळी 3.05 वाजता तक्रारकर्त्याचे वरील पत्त्यावर (रामेश्वरी पासुन ते रेल्वे स्टेशन) सोडण्यासाठी मोठी कार बुक केली. त्यासाठी लागणारे पैसे वेळेवर द्याल असे विरुध्द पक्षाकडून सांगण्यात आले. आणि गाडी वेळेवर आणावी अशी विनंती केल्यावर विरुध्द पक्षातर्फे काळजी नसावी आम्ही 24 तास सेवा पोहचवतो असे सकारात्मक आश्वासन देण्यात आले. तक्रारकर्त्याने या संदर्भात विरुध्द पक्षाला 7 ते 8 वेळा अंदाजे बुकींगबद्दल आठवणा करुन देण्यांत आली होती. प्रवासाचे एका दिवशी आधी दि.11.11.2015 रोजी तिनदा तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला भ्रमणध्वनीव्दारे कळविले त्यावर पुन्हा त्याने आशावादी उत्तर देऊन बेफीक्री राहावयास सांगितले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला असे सांगितले की, 30 मिनीटे अगोदर कारचे ड्रायव्हरचे नाव आणि नंबर पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे प्रवासाचे दिवशी दि.12.11.2015 रोजी सकाळी 3.15 पर्यंत विरुध्द पक्षाची गाडी आली नाही तेव्हा तक्रारकर्त्याने भ्रमणध्वनीव्दारे विरुध्द पक्षाला संपर्क केला व सांगितले की, गाडी आता पावेतो का आली नाही. रेल्वे स्टेशनला जाण्याची वेळ झाली आहे असे विचारले असतांना विरुध्द पक्षाने केवळ सॉरीसर असे थोडक्यात उत्तर दिले आणि फोन ठेवला. विरुध्द पक्षाने बेजबाबदारीचा परिचय दिला असुन तक्रारकर्त्याला त्रास झाला व परत फोन लावला असतांना प्रतिसाद मिळाला नाही. विरुध्द पक्षाने असा व्यवहारामुळे तक्रारकर्त्याला व त्याचे परिवाराला गैरसोय झाली. व विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रती न्युनतम सेवा दर्शविली असल्याने तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दि.20.11.2015 रोजी नोटीस पाठविला. विरुध्द पक्ष प्रकरणात हजर होऊन त्यांची बाजू मांडली नाही म्हणून प्रकरणात विरुध्द पक्षाविरुध्द लावलेले आरोप सिध्द होत आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला कार पुरवण्याकरीता नोंदणी केली होती म्हणून तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. व विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला वेळेवर कार पुरविली नाही, ही बाब विरुध्द पक्षाची तक्रारकर्त्याप्रती न्युनतम सेवा दर्शवते व सिध्द होते. सबब खालिल प्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे.
- // अंतिम आदेश // -
- तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल तक्रार विरुध्द पक्षांविरुध्द अंशतः मंजूर करण्यांत येते.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्यात यावा.
- विरुध्द पक्षाने वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावी.
- उभय पक्षास सदर आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.