तक्रारदार - स्वतः
आदेश - मा. एम.वाय.मानकर, अध्यक्ष, ठिकाणः बांद्रा (पू.)
तक्रार दाखलकामी आदेश.
1. तक्रारदारांना तक्रार दाखलकामी ऐकण्यात आले.
2. तक्रार व सोबत दाखल करण्यात आलेली कागदपत्रे पाहण्यात आली. तक्रारदार यांच्या पाल्यांनी सामनेवाले यांच्या शाळेमध्ये आयबी डिप्लोमा अभ्याय क्रमाकरीता प्रवेश घेतला होता व त्याकरीता रू. 14,57,000/-, फिस म्हणून भरण्यात आली. परंतू तक्रारदार यांच्या पाल्याला फेब्रवारी 2015 मध्ये शाळेनी पत्र पाठवून त्याला आयबी डि.पी. च्या परिक्षेस प्रवेश नाकारण्यात आल्याचे कळविले. संचिकेवरून तक्रारदार यांच्या पाल्याला चाचणीमधील कामगीरी, विलंबाने सादर केलेले सबमीशन्स, तसेच वाडःमय चौर्याचे कारणामूळे प्रवेश नाकारल्याचे दिसून येते. सबब, तक्रारदारनी भरलेली संपूर्ण फिस नुकसान भरपाईसह परत मागीतली आहे.
3. उपरोक्त बाबीवरून हे स्पष्ट होते की, तक्रारदारांनी त्या फिसकरीता शिक्षण संस्थेविरूध्द दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे ही तक्रार चालविण्याचा अधिकार या मंचास प्राप्त होत नाही. त्याकरीता आम्ही मा. राष्ट्रीय आयोगानी इन्स्टीटयूट ऑफ होटल मॅनेजमेंट आणि इतर विरूध्द श्री. अजय कुमार प्रसाद व इतर रिट पिटीशन नं. 627/2015 निकाल तारीख 20/11/2015 व एस. के. चौधरी एज्युकेशनल ट्रस्ट विरूध्द प्रदिप कुमार चप्परवाला रिट पिटीशन नं. 3993/2011 निकाल तारीख 26/06/2015 चा आधार घेत आहोत.
4. तक्रारदार यांनी त्यांच्या निवेदनाच्या पृष्ठर्थ मा. राष्ट्रीय आयोग रिट पिटीशन नं. 3169/2015 पिन्सीपल श्री. चैतन्य एज्युकेशनल इन्स्टीटयूशन विरूध्द गोव्रिंद प्रसाद रथ निकाल तारीख 07/01/2016 चा आधार घेतला आहे.
5. तक्रारदारानी दाखल केलेल्या न्यायनिवाडयामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ दिलेला नाही. आम्ही आधार घेतलेल्या न्यायनिवाडयामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयानी दिलेल्या न्यायनिवाडयाचा संदर्भ न्यायनिवाडयामध्ये दिलेला आहे.
6. तक्रारदार हे आपल्याअधिकारासाठी मा. दिवाणी न्यायालयात किंवा मा. न्यायाधिकरणाकडे दाद मागु शकतात. सबब खालील आदेश.
आदेश
- तक्रार क्र 132/2016 ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 (3) प्रमाणे फेटाळण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
- अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
npk/-