जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/38 प्रकरण दाखल तारीख - 03/02/2009 प्रकरण निकाल तारीख – 18/12/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या पांडूरंग पि. सटवाजी खाचेवाड वय, सज्ञान, धंदा शेती, रा. चीखली ता.कंधार जि. नांदेड अर्जदार विरुध्द. 1. श्री ओम कृषी एजन्सी, नवा मोंढा, नांदेड ता. जि. नांदेड. 2. ग्रीन गोल्ड सिडस लि. गैरअर्जदार गट क्र.65, नारायणपूर शिवार, वाळूज ता. गंगापूर, जि.औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.पी.एस.हिंगोले. गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - अड.शिवराज पाटील. गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील - वगळण्यात आले. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या ) गैरअर्जदार सिडस कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार यांचे शेत जमीन मौजे चीखली येथे असून शेत जमीन सर्व्हे नंबर 76 आहे.अर्जदाराने दि.27.5.2008 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादीत केलेले सिग्मा बी.टी.कापूस बियाणे, ज्वार, तूर, गोल्ड नमस्कार-जी,गोल्ड-70 बी.टी. कापूस इत्यादी बि बियाणे एकूण रु.9040/- चे गैरअर्जदार क्र.1 यांच्या दूकानातून खरेदी केले. त्यांची पावती नंबर 1808 व 1809 असा आहे. अर्जदाराने त्यांच्या शेतात वरील वाणांची रितसार लागवड केली. सर्व प्रकारची काळजी घेतल्यानंतर अर्जदाराच्या नोव्हेंबर 2008 मध्ये असे लक्षात आले की गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून खरेदी केलेले संकरित कापूस जात गोल्ड नमस्कार –जी व सिग्मा बी.टी. यांच्या वाढी मध्ये फरक असल्याचे दिसून आले. 10 टक्केच बोंड आले होते 90 टक्के बोंड लागली नसल्याचे आढळून आले. अर्जदाराने त्याबाबत दि.17.1.1.2008 रोजी पंचायत समिती कंधार यांना तक्रार दिली. कृषी अधिकारी कंधार यांनी दि.21.11.2008 रोजी स्थळ पाहणी पंचासमक्ष केली व दि.4.12.2008 रोजी अहवाल दिला. त्या अहवालात अर्जदाराचे रु.60,000/- ते रु.70,000/- नूकसान झाल्याचे सांगितले. त्या अहवालावरुन गैरअर्जदार क्र.1 कडे नूकसान भरपाईची मागणी केली असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अर्जदाराने दि.15.01.2009 रोजी वकिलामार्फत गैरअर्जदार क्र.1 यांना रजिस्ट्रर्ड पोस्टाने नोटीस पाठविली पण गैरअर्जदार क्र.1 ने नोटीसचे उत्तर दिले नाही. म्हणून अर्जदाराने तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदार क्र.1 यांनी बोगस बियाणे विक्री केल्यामूळे त्यांना रु.70,000/- नूकसान भरपाई तसेच मानसिक, शारीरिक ञास दिल्याबददल रु.25,000/- मिळावेत तसेच दावा खर्च म्हणून रु.1000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराने या तक्रारीमध्ये कंपनीला पार्टी केलेले नाही जे की आवश्यक होते. सदर बियाणे विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे ते बियाणे त्यांनी उत्पादित केलेले नाही. त्यामूळे बियाण्याच्या तक्रारी बाबत त्यांना दोषी ठरवू नये. त्यांच्या सेवेत कोणतीही ञूटी नाही. म्हणून सदर तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांना सदर बियाणे विक्री केल्याबददल फक्त कमीशन मिळते. बियाण्यामधील दोषा बाबत कंपनी जबाबदार आहे. गैरअर्जदार क्र.1 यांना पंचनामा करतेवेळी कृषी अधिकारी यांनी कोणतीही नोटीस दिलेली नव्हती त्यामूळे सदर पंचनामा गैरअर्जदाराच्या विरुध्द वाचता येणार नाही. पंचनामा दि.21.11.2008 यावर कंपनीच्या प्रतिनीधीच्या सही नाहीत किंवा गैरअर्जदाराची सूध्दा सही नाही. सदर बियाणे हे सक्षम प्राधीकरणाकडे चाचणी अंती प्रमाणीत केल्यावरच विक्री करण्यात आलेले आहेत.अर्जदाराला रु.60000/- ते रु.70000/- चे उत्पन्न कसे झाले असते यांचे विवरण दिलेले नाही. अर्जदाराची तक्रार व अधिका-याचा पंचनामा यामध्ये बरीच तफावत आहे म्हणून अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांना मंचाने नोटीस पाठविली पण ती नोटीस त्यांना तामील झाल्या बाबत रिपोर्ट आला नाही. अर्जदार यांना गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्द स्टेप्स घेण्याकरिता संधी देऊन सूध्दा गैरअर्जदार क्र.2 बददल स्टेप्स घेतली नाही त्यामूळे सदर प्रकरण हे गैरअर्जदार क्र.2 विरुध्द बंद करण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार गैरअर्जदारांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचे दूकानातून बियाणे घेतले होते त्याबाबत पावती दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादीत केलेले बियाणे गैरअर्जदार क्र.1 कडून खरेदी केले होते व ते स्वतःच्या शेतात पेरले होते पण त्या बियाण्याची उगवण झाली पण कापसाची बोंडे लागली नाही. अर्जदार यांनी बियाणे खरेदीची पावती, सातबाराचा उतारा, फोटो, तसेच कृषी अधिकारी यांना गट विकास अधिकारी कंधार यांनी दिलेले पञ व इतर कागदपञे दाखल केलेली आहेत. अर्जदार यांचा अर्ज शपथपञ व त्यांनी दाखल केलेले बियाणे खरेदीचे कागदपञ दाखल केले आहेत. गैरअर्जदार क्र.1, यांनी त्यांचे लेखी जवाबामध्ये बियाणे विक्री केले होते हे मान्य केले आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मते आहे. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांनी कापूस बियाणे ओम कृषी एजन्सी यांचेकडून खरेदी केलेले आहेत. ओम कृषी एजन्सी हे कंपनीने उत्पादीत केलेले बियाणे विक्री करण्याचे काम करतात. अर्जदार यांचेकडून रक्कम घेऊन बियाण्याची विक्री अर्जदार यांना केलेली आहे. अर्जदार यांची बियाण्यांच्या उत्पादन क्षमतेवीषयी काही तक्रार असल्यास त्यांची जबाबदारी विक्रेत्यावर येत नाही. त्यामूळे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केली नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादित केलेले कापसाचे बियाणे गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून खरेदी केलेले होते. सदरचे बियाणे अर्जदार यांनी त्यांच्या शेतामध्ये पेरलेले आहे. सदर बियाण्याची उगवण होऊन कापसाचे पिक तिन ते चार फूट वाढले परंतु त्यांना बोंडे आली नाहीत अशी अर्जदार यांची तक्रार आहे. त्या अनुषंगाने अर्जदार यांनी बियाणे खरेदीची पावती, स्थळ पाहणी अहवाल व अर्जदार यांचे शेतातील कापूस पिकाचे फोटो या अर्जाचे कामी दाखल केलेले आहेत. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी गैरअर्जदार क्र.1 यांना प्रथमतः पक्षकार म्हणून सामील केलेले आहे. त्यानंतर अर्जदार यांनी मूळ अर्जामध्ये दूरुस्ती करुन ग्रीन बोल्ड सिडस लि. गट क्र.65, नारायणपूर शिवार, वाळूज, ता. गंगापूर जि. औरंगाबाद या बियाणे उत्पादित कंपनीला सदर अर्जाचे कामी गैरअर्जदार नंबर 2 पक्षकार म्हणून सामील करुन घेण्यासाठी अर्ज दिलेला आहे. सदर अर्ज मंजूर झालेला आहे. त्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीसची बजावणी होण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत अगर गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्द जाहीर समन्सने नोटीस देणे बाबत कोणत्याही प्रकारचा अर्ज या मंचामध्ये दिलेला नाही. त्यामूळे गैरअर्जदार क्र.2 ही बियाण्यांची उत्पादीत कंपनी या अर्जाचे कामी पक्षकार म्हणून सामील केलेनंतर सदर कंपनीला या अर्जाची नोटीस तामील झालेली नाही. मूळतः सदर अर्जाचे कामी अर्जदार यांची बियाणे बाबत तक्रार असेल तर बियाणे उत्पादीत केलेल्या कंपनीने या कामी हजर राहणे आवश्यक व गरजेचे असे आहे. परंतु अर्जदार यांनी त्या बाबत कोणतीही प्रयत्न केलेले नाहीत. अर्जदार व त्यांचे वकील मंचातर्फे नेमलेल्या दि.14.07.2009, 05.08.2009, 18.08.2009, 10.09.2009, 30.09.2009, 15.10.2009, या तारखांना गैरहजर राहीलेले आहेत. गैरअर्जदार क्र.2 यांना समन्स मिळणेसाठी कोणतेही स्टेप्स घेतलेले नाहीत म्हणून गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्द प्रकरण दि.15.10.2009 रोजी बंद करण्यात आले. त्यानंतर नेमलेल्या दि.30.10.2009 रोजी, दि.12.11.2009, 25.11.2009, व 08.12.2009 या तारखांना ही अर्जदार व त्यांचे वकिल गैरहजर राहीलेले आहेत. सदर अर्जाचे कामी गैरअर्जदार क्र.2 ही बियाणे उत्पादीत कंपनी आवश्यक पक्षकार होती परंतु सदर कंपनीला नोटीस देणे बाबत अर्जदार यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. मूळ उत्पादक कंपनी समोर आल्याशिवाय बियाण्यातील दोषा बाबत कोणतेही आदेश करणे योग्य व संयूक्तीक ठरणारे नाही. त्यामूळे अर्जदार यांचा अर्ज नामंजूर करणेस पाञ आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ,गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे,शपथपञ व त्यांचे तर्फे केलेला यूक्तीवाद यांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटकणकर अध्यक्ष सदस्या जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |