Maharashtra

Nagpur

CC/10/529

Rajesh Satyanarayan Malu - Complainant(s)

Versus

Nokiya India Pvt. Ltd. - Opp.Party(s)

Adv. Pankaj Gupta

16 Apr 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/529
 
1. Rajesh Satyanarayan Malu
Radhe Niwas, Bhawsar Chowk, Gandhibagh, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Nokiya India Pvt. Ltd.
Commercial Plaza, Residency Hotel, National Highway No.8, Mahipalpur, New Delhi 37
New Delhi
Delhi
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                     श्री. नरेश बनसोड -    सदस्‍य.
 
 
श्री नरेश बनसोड, सदस्‍य यांचे कथनांन्‍वये.
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 16/04/2012)
 
1.           तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून, वि.प.क्र. 1 ते 3 विरुध्‍द दाखल करुन मागणी केली की, त्‍यांच्‍या दोषपूर्ण मोबाईलची किंमत रु.34,000/-, व्‍याज, नूकसान भरपाई इतर खर्च अशी रु.46,840/- ची मागणी केली. वि.प.क्र. 1 मोबाईलचे उत्‍पादक असून वि.प.क्र. 2 हे मोबाईलचे अधिकृत विक्रेते, वि.प.क्र. 3 सेवा विषयक केंद्र आहे. 27.06.2009 ला तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 2 कडून वि.प.क्र. 1 द्वारे उत्‍पादित एक नोकिया 970 मोबाईल हॅण्‍डसेट, ईएमआय क्र. 54225032052712 रु.34,000/- मध्‍ये खरेदी केला व वारंटी देण्‍यात आली. तक्रारकर्त्‍याने मोबाईल हा खरेदीनंतर 3 दिवसाच्‍या आत वेगवेगळे दोष त्‍यात आढळून आले व नेटवर्क दाखविणे बंद झाले. वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्‍यास मोबाईल संच काम करीत नसल्‍याची सूचना दिली व तक्रारकर्त्‍यास 4, 5 वेळा मोबाईल बदलवून दिला. मोबाईलमध्‍ये दोष निर्माण झाले म्‍हणून वि.प.क्र 3 सोबत संपर्क साधण्‍यास सु‍चविले. 24.07.2009 व 04.03.2010 ला वि.प.क्र.3 कडे दुरुस्‍तीस दिला. तरीहीसुध्‍दा दुरुस्‍त करुन दिला नाही व मोबाईल कंपनीकडे पडलेला आहे. वि.प.क्र 2 व 3 मोबाईल बदलवून देत होते व नविन मोबाईलमध्‍ये त्रास होत असल्‍याने तक्रारकर्त्‍यास नविन मोबाईल दिला नाही, उलट दोषपूर्ण मोबाईल आलटून पालटून देत होते व वारंटी संपण्‍याची वाट पाहत होते.  वि.प.ला नोटीस बजावली, त्‍यांनी उत्‍तर दिले नाही. मोबाईल वि.प.क्र. 2 ते 3 ह्यांचे नागपूरमधील दुकानातून खरेदी केलेला आहे, त्‍यामुळे तक्रार कार्यक्षेत्रात येते व मुदतीत दाखल केली आहे व वि.प.ने दोषपूर्ण मोबाईलची विक्री केली व त्‍यानंतर दिलेली सेवा पूर्णतः दोषपूर्ण होती, त्‍यामुळे नुकसान सहन करावे लागले. तक्रारकर्त्‍याने सोबत खरेदी पावती, जॉब कार्ड, नोटीसच्‍या प्रती, पोच पावती पृ.क्र. 8 ते 16 वर दाखल केले.
 
2.          मंचाने वि.प.ला नोटीस बजावला. वि.प.क्र. 2 ने 29.06.2011 रोजी मंचासमोर अर्ज दाखल करुन म्‍हटले की, तक्रारकर्त्‍याशी आपसी समझोता करावयास तयार आहे, म्‍हणून वेळेची मागणी केली. त्‍यानंतर वि.प.क्र. 2 व तक्रारकर्त्‍यामध्‍ये काहीही कार्यवाही झाल्‍याचा अहवाल न आल्‍याने वि.प.क्र. 2 विरुध्‍द विना लेखी जवाब कारवाई चालविण्‍याचा आदेश 12.10.2010 ला पारित झाला. वि.प.क्र. 1 व 3 ला मंचाने पाठविलेली नोटीस प्राप्‍त झाली. वि.प.क्र. 1 व 2 ला लेखी उत्‍तर दाखल करण्‍याकरीता पूरेपूर संधी दिली. परंतू वि.प.क्र. 1 ते 3 गैरहजर. म्‍हणून तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
 
3.          वि.प.क्र. 1 चे वकिलांनी 21.02.2011 ला उत्‍तर दाखल करण्‍यासाठी वेळ मागितला. संधी देऊनसुध्‍दा उत्‍तर दाखल न केल्‍यामुळे 21.07.2011 एकतर्फी आदेश झाल्‍यानंतर, 08.12.2011 त्‍यांचेविरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश रद्द करुन लेखी उत्‍तर दाखल करण्‍याबाबत अर्ज मंचासमोर दाखल केला. त्‍यावर तक्रारकर्त्‍यांनी विरोध केला. मंचाने वि.प.क्र. 1 चा अर्ज रु.500/- या पूर्व अटीसह मंजूर केला. तक्रारकर्त्‍याचे वकिलांनी 11.01.2012 ला पूरसिस दाखल करुन नमूद केले की, मंचाचे 08.12.2011 चे आदेशानुसार वि.प.क्र. 1 ने कॉस्‍टची रक्‍कम जमा न केल्‍यामुळे त्‍यांचे उत्‍तर तक्रारीत समाविष्‍ट करुन गृहित धरु शकत नाही.
 
4.          मंचाने तक्रारकर्त्‍याचे वकिलांचा युक्‍तीवाद ऐकला. मंचाने तक्रारीसोबत दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले.
 
-निष्‍कर्ष-
5.          तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 1 द्वारे निर्मित मोबाईल वि.प.क्र. 2 कडून खरेदी केला व वि.प.क्र. 3 हे वि.प.क्र. 1 ची सेवा पुरविणारे सेवा केंद्र असल्‍याने, तक्रारकर्ता वि.प.क्र. 1 ते 3 चा ग्राहक ठरतो. 
 
6.          विना उत्‍तर, एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने पारित केल्‍यानंतर, आदेश रद्द करण्‍याबाबत व उत्‍तर दाखल करण्‍याबाबतचा वि.प.क्र. 1 चा अर्ज रु.500/- या पूर्व अटीसह मंजूर केला. परंतू रक्‍कम जमा न केल्‍याबाबत तक्रारकर्त्‍याने पुरसिस दाखल केले. मंचाने पडताळणी केली असता रु.500/- या पूर्व अटीसह अर्ज मंजूर केला होता व वि.प.क्र. 1 ने मंचाचे आदेशानुसार रु.500/- कॉस्‍ट न दिल्‍याचे मंचाचे निदर्शनास आले, त्‍यामुळे राष्‍ट्रीय आयोगाचे खालील आदेशानुसार वि.प.क्र. 1 चे म्‍हणणे तक्रार निकाली काढतांना गृहित धरण्‍यात आले नाही. रामप्रकाश गुप्‍ता वि. श्रीमती रंजना, 2002 सीटीजे 221
“Cost levied for adjournment not paid by O.P. and affidavit of petitioners was not taken on record and district forum adjourned the complaint to 04/09/1999. We do not find any error in the order of state commission for us to exercise our jurisdiction under clause (b) of section of CPA. Appeal dismissed”.
 
तक्रारकर्त्‍याने तक्रारीचे परि. क्र. 2 मध्‍ये नमूद केले की, त्‍यांनी वि.प.क्र. 2 कडून नोकिया 970 मोबाईल हॅण्‍डसेट ईएमआय क्र. 54225032052712 नमूद केलेला आहे. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या 27.06.2009 च्‍या देयकाचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता मंचाचे असे निदर्शनास आले की, सदर मोबाईल हॅण्‍डसेंट नोकिया 970 नसून नोकिया एन 970 आहे व तक्रारीत नमूद ईएमआय क्र. 54225032052712 असून देयकामध्‍ये मोबाईल क्र. आयएमईआय क्र. 354225033164281 असे नमूद आहे. मंचाने वि.प.क्र. 1 चे लेखी बयान गृहित जरीही धरले नाही, त्‍याचे वाचन करण्‍याची तक्रारकर्त्‍यास संधी मिळाली होती. तरीही सुध्‍दा त्‍यातच वि.प.ने सदरहू आक्षेप सुध्‍दा घेतलेले होते. तरीहीसुध्‍दा तक्रारकर्त्‍याने त्‍याबाबत स्‍पष्‍टीकरणे/प्रतिउत्‍तर दाखल केले व पुरसिसद्वारे म्‍हटले की, दाखल प्रतिज्ञापत्र साक्ष पुरावा समजण्‍यात यावा. वरील विवेचनावफन स्‍पष्‍ट झाले की, तक्रारीत नमूद मोबाईल हॅण्‍डसेंट क्र. व मॉडेल, तसेच बिलावर नमूद मोबाईल हॅण्‍डसेंट व मॉडेल पूर्णतः भिन्‍न असल्‍यामुळे त्‍याबाबतची तक्रार ग्राहक सेवेत त्रुटी ठरत नाही व मोबाईल दोषपूर्ण होता असे म्‍हणणे संयुक्‍तीक ठरत नाही. त्‍यामुळे सदर तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. सदर बाब स्‍पष्‍ट असल्‍याने गुणवत्‍तेवर जाण्‍याचा प्रश्‍न नाही.
 
-आदेश-

1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

2)    उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा.

 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.