सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्रमांक 16/2011 तक्रार दाखल झाल्याचा दि. 06/05/2011
तक्रार निकाल झाल्याचा दि. 15/06/2011
निलेश घनःश्याम सावंत
वय 20 वर्षे, धंदा – व्यवसाय,
मु.पो.माजगाव (वरची आळी)
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
1) नोकिया इंडीया प्रा.लिमिटेड
रेडीसन कॉम्प्लेक्स कमर्शीअल प्लाझा,
महीपुलपूर, नवी दिल्ली – 110 037
2) नोकीया केअर,
खलप टेलिकॉम, दुकान नं.89,
वैश्य भवन, गवळीतिठा, ता. सावंतवाडी,
जि.सिंधुदुर्ग
3) शाह मोबाईल सर्व्हीसेस
शॉप नं.115, 116, इंदिरा गांधी शॉपिंग कॉम्प्लेक्स,
सावंतवाडी, 416 510. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
तक्रारदारातर्फेः- व्यक्तीशः
विरुद्ध पक्ष क्र.2 तर्फे श्री आनंद शिरसाट.
विरुध्द पक्ष क्र.1 व 3 गैरहजर.
(मंचाच्या निर्णयाद्वारेश्री महेंद्र म. गोस्वामी, अध्यक्ष)
आदेश नि.1 वर
(दि.15/06/2011)
1) तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडून खरेदी केलेला मोबाईल हँडसेट वॉरंटी कालावधीमध्ये नादुरुस्त झाल्यामुळे हँडसेट बदलून मिळण्यासाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2) सदर तक्रारीचे नोटीस विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना पाठवण्यात आले. त्यानुसार विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांना नोटीस बजावणी झाली असून विरुध्द पक्ष क्र.2 खलप टेलिकॉम तर्फे आनंद शिरसाट हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी तक्रारदारास नवीन मॉडेलचा उच्च प्रतीचा हँडसेट बदलून देत असल्याचे मंचासमोर स्पष्ट केले. त्यानुसार आज प्रकरण विरुध्द पक्ष क्र.2 ने म्हणणे देण्यासाठी ठेवले आहे.
3) आज मंचासमोर तक्रारदार व विरुध्द पक्ष क्र.2 चे प्रतिनिधी श्री आनंद बा. शिरसाट हजर आहेत. मंचासमोर मान्य केल्यानुसार विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारदारास नवीन नोकिया कंपनीचा हँडसेट मॉडेल क्र.2700 दिला असून सदर हँडसेट मिळालेबाबतचा अर्ज तक्रारदाराने नि.11 वर दाखल केला व प्रकरण निकाली करणेची विनंती केली. त्यानुसार आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
- आदेश -
1) तक्रारदाराने दिलेल्या नि.11 वरील अर्जाद्वारे तक्रारदारास नवीन हँडसेट मिळालेचे कारणावरुन सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) तक्रारदाराने त्याचे ताब्यातील जुना वादग्रस्त हँडसेट विरुध्द पक्ष क्र.2 ला 7 दिवसांचे आत परत करावा व विरुध्द पक्ष क्र.2 ने तक्रारदारास नवीन हँडसेटच्या संबंधी पावती व वॉरंटीसबंधीचे कागदपत्रे दयावीत.
3) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 15/06/2011
सही/- सही/-
(वफा खान) (महेन्द्र म.गोस्वामी)
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग