Maharashtra

Thane

CC/09/254

श्री अजित के लिलानी - Complainant(s)

Versus

Nokia India Pvt. Ltd. - Opp.Party(s)

स्‍वतः

22 Mar 2016

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/09/254
 
1. श्री अजित के लिलानी
बॅरेक नं 137/12 रुम नं 2 साधुबेला स्‍कुल अँड गल्‍स् कॉलेजजवळ, उल्‍हास नगर 1 421001
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. Nokia India Pvt. Ltd.
4F, Tower A & B, Cyber City, Sector 25 A, Gurgaon 122 002.
Haryana
2. M/s. Vishesh, Prop Nitin B. Shah
3, Ganesh Building, Near Traffic Police Office, Mohammad Ali Chowk, Kalyan (w)
3. Bright Point India Pvt. Ltd.
(Nokia Service Centre), Phonuinex House, 3rd Floor, 'C' wing, 462, Senpati Bapat Marg, Lower Parel (w), Mumbai.
4. M/s. Popular Electrovision
(Nokia Service Centre), 4 Abedin Apartment, Near World of Titan, Murad Road, Kalyan(w).
5. M/s. Cell Care
(Nokia Sevice Centre), Shop no.4, Sai Palace, Next to Madhyban Hotel, Goal Maidan, Ulhasnagar 421 002
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated The 22 Mar 2016

                  न्‍यायनिर्णय   

               (द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्‍य)

  1.         सामनेवाले क्र. 1 ही हरयाणा येथील नोकिया मोबाईल उत्‍पादक कंपनी आहे. सामनेवाले क्र. 2 हे कल्‍याण येथील मोबाईल विक्रेते आहेत. सामनेवाले क्र. 3 ते 5 हे सामनेवाले क्र. 1 यांची सर्व्‍हीस सेंटर्स आहेत. तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 1 यांनी उत्‍पादित केलेला मोबाईल सामनेवाले क्र. 2 यांजकडून विकत घेतल्‍यानंतर, सदर मोबाईल विक्री पश्‍चात सदोष सेवा सुविधा दिल्‍याबाबत प्रस्‍तुत वाद निर्माण झाला आहे.
  2.          तक्रारदारांच्‍या तक्रारीमधील कथनानुसार त्यांनी सामनेवाले क्र. 2 यांजकडून सामनेवाले क्र. 1 यांनी उत्‍पादित केलेला नेाकीया मॉडेल 6233 हा मोबाईल रु. 7200/- या किंमतीस दि. 08/05/2008 रोजी विकत घेतला. सदर मोबाईलसाठी 1 वर्ष आणि चार्जर व हेड फोनसाठी 6 महिने वॉरंटी तसेच 3 महिने एएमसी देण्‍यात देण्‍यात आली होती. तक्रारदारांनी सदर मोबाईल वापरण्‍यास चालू केल्‍यानंतर मोबाईलची बॅटरी काही वेळातच संपून पुन्‍हा पुन्‍हा चार्जिंग करावे लागत असल्‍याने, सामनेवाले क्र. 2 यांचेकडे याबाबत विचारण केली असता, आणखी थोडे दिवस मोबाईल वापरुन हा दोष निवारण न झाल्‍यास नोकीया केअर सर्व्‍हीस सेंटरमध्‍ये जाण्‍यास सांगितले. यानंतर बॅटरी त्‍वरीत संपू लागल्‍याने सामनेवाले क्र. 4 यांचेकडे दि. 31/07/2008 रोजी मोबाईल व बॅटरी दुरुस्‍तीसाठी जमा केली. सामनेवाले क्र. 4 यांनी दुरुस्‍तीनंतर मोबाईल दि. 14/08/2008 रोजी तक्रारदारांना दिला. तक्रारदारांनी मोबाईल वापरणे चालू केल्‍यानंतर पुन्‍हा तोच दोष चालू राहिला व तक्रारदारांना मोबाईल वापरणे अशक्‍य झाल्‍याने दि. 18/10/2008 रोजी सामनेवाले क्र. 5 यांचेकडे मोबाईल जमा केल्‍यानंतर सामनेवाले क्र. 5 यांनी दि. 01/11/2008 रोजी दुरुस्‍तीपश्‍चात  तक्रारदारांना मोबाईल परत केला. तथापि, तोच दोष वारंवार होत राहिल्‍याने सामनेवाले क्र. 3 यांचेकडे दि. 18/11/2008 रोजी जमा केला व  दुरुस्‍तीअंती तक्रारदारांना  मोबाईल परत केला. तथापि, तोच दोष वारंवार होत राहिल्‍याने पुन्‍हा दि. 17/12/2008 रोजी सामनेवाले क्र. 5 यांचेकडे त्‍याच दोष निवारणासाठी जमा केला. तथापि, सामनेवाले क्र. 5 यांनी सदोष बॅटरी व मोबाईल दुरुस्‍त करु शकले नाहीत. त्‍यामुळे सदर मोबाईल दि. 17/12/2008 पासून सामनेवाले क्र. 5 यांचेकडे पडून आहे. सामनेवले क्र. 3 ते 5 मोबाईल दुरुस्‍त करु न शकल्‍याने व मोबाईल उत्‍पादनामध्‍येच दोष असल्‍याने तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 2 ते 5 यांना नोटीस पाठवून नादुरुस्‍त मोबाईलऐवजी नविन मोबाईल मिळावा किंवा मोबाईलची किंमत रु. 7,200/- परत मिळावी, नुकसान भरपाई रु. 1 लाख मिळावी अशी मागणी केली. तथापि, सामनेवाले क्र. 1 ते 5 यांनी कोणताच प्रतिसाद न दिल्‍याने प्रस्‍तुत तक्रार  दाखल करुन नादुरुस्‍त मोबाईल बदलून तशाच प्रकारचा नविन मोबाईल मिळावा, अथवा, रु. 7,200/-, 18% व्‍याजासह मिळावेत, रु. 1 लाख नुकसान भरपाई मिळावी, प्रवास खर्च रु. 5000/-, तक्रार खर्च रु. 5,000/- मिळावा अशा मागण्‍या केल्‍या आहेत.
  3.            सामनेवाले क्र. 2 ते 4 यांना तक्रारीची नोटीस प्राप्‍त होऊनही त्‍यांनी लेखी कैफियत दाखल न केल्‍याने सामनेवाले क्र. 2 ते 4 यांच्‍या कैफियतीशिवाय तक्रार पुढे चालविण्‍यात आली. सामनेवाले क्र. 5 यांना पाठविलेली नोटीस त्‍यांना प्राप्‍त होऊनही त्‍यांनी कैफियत दाखल न केल्‍याने त्‍यांच्‍याविरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आले.  
  4.         सामनेवाले क्र. 1 यांनी लेखी कैफियत दाखल करुन तक्रारदारांच्‍या मागण्‍या फेटाळतांना प्रामुख्‍याने असे नमूद केले की, तक्रारदारांना विकलेल्‍या मोबाईलमध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा उत्‍पादन अथवा अन्‍य प्रकारचा दोष नव्‍हता. तर तक्रारदारांनी योग्‍यरित्‍या मोबाईल हाताळता नसल्‍याने त्‍यामध्‍ये दोष निर्माण झाले. तक्रारदारांनी मोबाईल घेतल्‍यापासून वापरला असल्‍याने त्‍यामध्‍ये उत्‍पादनाचा दोष असता तर तक्रारदार मोबाईल वापरु शकले नसते. मोबाईलच्‍या उत्‍पादनामध्‍ये दोष असल्‍याबाबत, तक्रारदारांनी कोणत्‍याही स्‍वरुपातील पुरावा अथवा तज्ञाचा अहवाल दाखल न केल्‍याने तक्रारदारांचे म्‍हणणे ग्राहय धरता येणार नाही. सबब तक्रारदारांचे सर्व आक्षेप हे चुकीचे, खोडसाळ असल्‍याने तक्रार फेटाळण्‍यात यावी.
  5.              तक्रारदारांनी रिजॉईंडर अॅफिडेव्‍हीट हेच पुरावा शपथपत्र समजण्‍यात यावे अशी पुरसिस दाखल केली. तसचे लेखी युक्‍तीवाद दाखल केला. सामनेवाले क्र. 1 यांनी लेखी कैफियत व पुरावा शपथपत्र दाखल केले. तथापि, दीर्घ काळ संधी मिळूनही लेखी युक्‍तीवाद दाखल केला नाही त्‍यामुळे त्‍यांच्‍या लेखी युक्‍तीवादाशिवाय प्रकरण पुढे चालविण्‍यात आले. तसेच तोंडी युक्‍तीवादाचे वेळी ते गैरहजर राहिले त्‍यांमुळे तक्रारदारांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.  उभय पक्षांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे वाचन मंचाने केले. त्‍यावरुन प्रस्‍तुत  प्रकरणात खालीलप्रमाणे निष्‍कर्ष निघतातः
    1.          सामनेवाले क्र. 1 यांनी उत्‍पादित केलेला नोकीया मोबाईल मॉडेल क्र. 6233/-, तक्रारदारांना रु.  7,200/- या किंमतीस सामनेवाले क्र. 2 या मोबाईल विक्रेत्‍याकडून विकत घेतल्‍याची बाब, तसेच, खरेदीपश्‍चात काही दिवसांत सदर मोबाईल सामनेवाले क्र. 1 यांचे नोकीया केअर सेंटर सामनेवाले क्र. 3 ते 5 यांचेकडे दुरुस्‍तीसाठी दिल्‍याची बाब सामनेवाले यांनी नाकारलेली नाही. तसेच दि. 31/07/2008 ते दि. 17/12/2008 दरम्‍यान तक्रारदारांनी 5 वेळा आपला मोबाईल एकाच प्रकारच्‍या दोषासाठी सामनेवाले क्र. 1 यांच्‍या वेगवेगळया 3 सेंटर्समध्‍ये म्‍हणजे सामनेवाले क्र.  3 ते 5 यांचेकडे दुरुस्‍तीसाठी देऊनसुध्‍दा तक्रारदारांचा मोबाईल/बॅटरी दुरुस्‍त झालेली नाही. याबाबी तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम 13(2) अंतर्गत तरतुदीअन्‍वये दाखल केलेल्‍या पुराव्‍यानुसार स्‍पष्‍ट होते.
      1.          सामनेवाले क्र. 1 यांनी उत्‍पादित केलेला नोकीया मॉडेल क्र. 6233 रु. 7,200/- किंमतीस दि. 08/05/2008 रोजी सामनेवाले क्र. 2 यांजकडून तक्रारदारांनी विकत घेतल्‍याची बाब अविवादीत आहे. तथापि, दि. 08/05/2008 रोजी सदर मोबाईल विकत घेतल्‍यानंतर काही दिवसांतच सदर मोबाईलची बॅटरी काही वेळातच डिस्‍चार्ज होत असल्‍याची तक्रार सामनेवाले क्र. 2 या विक्रेत्‍यास केली व सामनेवाले क्र. 2 यांच्‍या सूचनेनुसार तक्रारदारांनी सदर दोषपूर्तीसाठी सामनेवाले क्र. 1 यांच्‍या अधिकृत सेवा केंद्र सामनेवाले क्र. 5 यांचेकडे दि. 31/07/2008 रोजी मोबाईल प्रथमतः जमा केल्‍याचे उपलब्‍ध कागदपत्रांवरुन दिसून येते. यानंतर सामनेवाले क्र. 1 यांच्‍या सामनेवाले क्र. 3,4 व 5 यांच्‍या सेवा केंद्रामध्‍ये अनेकवेळा  त्‍याच समस्‍यापूर्तीसाठी मोबाईल व बॅटरी जमा केली असता सामनेवाले क्र. 1 यांच्‍या सर्व्‍हीस सेंटरतर्फे तक्रारदारांच्‍या मोबाईलमधील दोष निवारणाकरीता कोणतेही सकारात्‍मक उपाय केल्‍याचे उपलब्‍ध कागदपत्रांवरुन दिसून येत नाही. त्‍यामुळे तक्रारदारांचा मोबाईल/बॅटरीमधील दोष खरेदी दि. 08/05/2008 पासून दि. 17/12/2008 पर्यंत तसाच राहिल्‍याचे दिसून येते व सदर मोबाईलचा वापर तक्रारदारांना तक्रार दाखल करेपर्यंत करता आला नाही.

(क)        तक्रारदारांनी दि. 08/05/2008 रोजी मोबाईल खरेदी केल्‍यानंतर दि. 31/07/2008 ते दि. 17/12/2008 या 4 महिन्‍यांच्‍या कालावधीमध्‍ये 5 वेळा सदर मोबाईल व बॅटरी दुरुस्‍तीसाठी देऊनही सामनेवाले 1 यांच्‍या सेवा संस्‍थामध्‍ये सदर नादुरुस्‍त मोबाईल/बॅटरी दुरुस्‍त करणेकामी कोणतीही सकारात्‍मक कार्यवाही केल्‍याचे, तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन दिसून येत नाही. तसेच सामनेवाले क्र. 1 यांनी दाखल केलेल्‍या लेखी कैफियतीवरुन तसेच पुरावा शपथपत्रावरुन दिसून येत नाही. म्‍हणजेच तक्रारदारांना दि. 17/12/2008 पर्यंत व त्‍यानंतर तक्रार दाखल करेपर्यंत सदर मोबाईल वापराचा उपभोग घेता आला नाही ही बाब सुस्‍पष्‍ट होते.

 (ड)     तक्रारदारांच्‍या तक्रारीमधील मागणीनुसार त्‍यांनी मोबाईल उत्‍पादनामध्‍ये मूलभूत दोष असल्‍याने नविन मोबाईल मिळावा अशी मागणी केली आहे. सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांची मागणी दि. 26/02/2010 रोजीच्‍या पत्रान्‍वये मान्‍य केली आहे. म्‍हणजेच तक्रारदारांना विकण्‍यात आलेल्‍या मोबाईलमध्‍ये उत्‍पादनाचाच दोष होता हे मान्‍य केले आहे. तथापि, दि. 26/02/2010 नंतर सामनेवाले क्र. 1 यांनी कोणतीच कार्यवाही केली नाही हे दिसून येते.

 

(इ)        तक्रारदारांच्‍या मागणीसंदर्भात खालील न्‍यायनिर्णयाचा संदर्भ देणे उचित होईल असे मंचास वाटते.

मा. कर्नाटक राज्‍य आयोगाने Bell Agro Machine Ltd. Vs. Venuappa Pundappa Chavalor 2006(CPJ) 9 या प्रकरणात खालीलप्रमाणे न्‍यायतत्‍व नमूद केले आहेः

      ‘‘Manufacturing defect explicit by the fact that it was sent for repair 3 times within warranty.”

 

उ)    मा. दिल्‍ली राज्‍य आयोगाने Kinetic Motors Co. Ltd. Vs. Shiv Charan Negi. IV (2007) CPJ 167  या प्रकरणामध्‍ये खालीलप्रमाणे न्‍यायिक तत्‍त्‍व विषद केले आहेः

      When defect did not get removed even after  various     repairing analysis under section 13 is not applicable.”   

                      

        मा. राज्‍य आयोगाचे उपरोक्‍त न्‍यायिक तत्‍त्‍व विचारात घेतल्‍यास तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम 13 मधील तरतुदीनुसार वॉरंटी कालावधीदरम्‍यान मोबाईल वारंवार दुरुस्‍तीसाठी सामनेवाले क्र. 3 ते 5 यांचेकडे दिल्‍याबाबतचा पुरेसा पुरावा दाखल केला आहे व सदर पुरावाच मोबाईलच्‍या उत्‍पादनामध्‍ये दोष असल्‍याचे दर्शवित असल्‍याने तज्ञ अहवाल दाखल केला नसल्‍याचा सामनेवाले क्र. 1 यांचा आक्षेप फेटाळण्‍यात येतो.

         उपरोक्‍त चर्चेवरुन व निष्‍कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

 

              आ दे श

 

  1. तक्रार क्र. 254/2009 अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. सामनेवाले क्र. 1 यांनी उत्‍पादित केलेला मोबाईल तक्रारदारांना विकून कसूरदार सेवा दिल्‍याचे जाहिर करण्‍यात येते.
  3. सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांना नोकीया मॉडेल क्र. 6233 हा नविन सिलबंद मोबाईल दि. 30/04/2016 रेाजी किंवा तत्‍पूर्वी दयावा. सदर मोबाईलचे उत्‍पादन बंद केले असल्‍यास मोबाईलची किंमत रु. 7,200/- दि. 10/05/2016 पूर्वी तक्रारदारांना अदा करावी. सदर आदेशाची पूर्तता नमूद कालावधीमध्‍ये न केल्‍यास दि. 11/05/2016 पासून आदेशपूर्ती होईपर्यंत 15% व्‍याजासह सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांना अदा करावी.
  4. सामनेवाले क्र. 3 ते 5 या सामनेवाले क्र. 1 यांच्‍या अधिकृत सर्व्‍हीस सेंटरनी तक्रारदारांचा मोबाईल दुरुस्‍तीबाबत कोणतीही सकारात्‍मक कार्यवाही न करुन तसेच सामनेवाले क्र. 5 यांनी तक्रारदारांचा मोबाईल गेली 7 वर्षे स्‍वतःकडे अनधिकृतरित्‍या ठेवून घेऊन तक्रारदारांना नाहक त्रास दिल्‍याने सामनेवाले क्र. 3 व 4 यांनी प्रत्‍येकी रु. 2500/- व सामनेवाले क्र. 5 यांनी रु. 5,000/-नुकसान भरपाई दि. 10/05/2016 रोजी किंवा तत्‍पूर्वी तक्रारदारांना दयावेत.
  5. तक्रारदारांनी वर्ष 2009 मध्‍ये तक्रार दाखल करुन गेली 7 वर्षे

तक्रारीचा अचूक पाठपुरावा करतांना त्‍यांना शारिरीक, मानसिक  त्रास झाला. शिवाय स्‍वतःचा नोकरी धंदा सोडून वेळोवेळी मंचामध्‍ये हजेरी लावली. त्‍याकामी त्‍यांना खूपच प्रवासखर्च, शिवाय आर्थिक नुकसानीची झळ सोसावी लागल्‍याने, सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांना रु. 10,000/- दि. 10/05/2016 रोजी किंवा तत्‍पूर्वी तक्रारदारांना दयावेत. सदर आदेशाचे पालन नमूद कालावधीमध्‍ये न केल्‍यास, दि. 11/05/2016 पासून आदेश पूर्तीपर्यंत 9% व्‍याजास‍ह संपूर्ण रक्‍कम अदा करावी.

  1. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब/विनाशुल्‍क देण्‍यात याव्‍यात.
  2.    संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती असल्‍यास तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.           

 

 

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.