अर्जदार स्वतः गैर अर्जदार एकतर्फा. मा.अध्यक्षानुसार दिलेले निकालपत्र. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे. 1. तक्रारदाराने सा.वाले क्र.1 यांनी तंयार केलेला व सा.वाले क्र.3 यांचे कडून घेतलेला मोबाईल हॅन्डसेट सदोष निघाला म्हणून तो त्यांनी परत घ्यावा व त्याचे पैसे व्याजासहीत परत करावेत, हॅन्डसेट दुरुस्तीला टाकल्यानंतर 40 दिवस त्याला वापरता आला नाही त्याबद्दल दररोज रु.100/- प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.50 हजार द्यावी, व त्याचा झालेला खर्च रु.50 हजार मिळावा यासाठी सदरची तक्रार केली आहे. 2. तक्रारदाराने सा.वाले 1 कंपनीने तंयार केलेला नोकीया E 71 हॅन्डसेट सा.वाले क्र.3 यांचे कडून दिनांक 11/05/2009 रोजी रु.19,369/- ला विकत घेतला. त्याचा इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंन्टिटी (आयएमईआय) असा आहे. 3. तक्रारदाराची तक्रार की, सदारचा हेंन्डसेट घेतल्यानंतर थोडयाच दिवसात त्यात समस्या सुरु झाल्या. त्याची बटण बरोबर काम देत नव्हती. फोन मध्येच बंद पडत होता. त्याचा डिस्प्लेपण बरोबर नव्हता म्हणून त्यांनी 22/05/2009 रोजी सा.वाला क्र.2 यांचेकडे त्याबद्दल तक्रार केली. त्यांनी सॉप्टवेअर पुन्हा बसवून दिले. परंतु समस्या दूर झाली नाही. तक्रारदाराने सा.वाले क्र.1 यांना दिनांक 27/05/2009 रोजी मेल पाठविला. व हँन्डसेटच्या समस्याबद्दल कळविले. दिनांक 29/05/2009 रोजी नोकीया कॉन्टॅक्ट सेंटरला कळविले की, त्यांच्या टेक्नीशियनने आधुनिक सॉप्टवेअर बसवून दिले. तरीपण हँन्डसेटची समस्या दूर झाली नाही. त्यांनी तक्रारदाराल सांगीतले की, हँन्डसेट त्यांचा दिल्ली येथील सेंटरला पाठवावा लागेल. त्याला तो परत मिळवयास 10 दिवसा लागतील. व हँडसेट दिल्लीला पाठविण्यात आला. 10 दिवसांनी तो परत मिळाला. मात्र त्यातील समस्या दूर झालेल्या नव्हत्या. 4. मोबाईली हँन्डसेट प्रतिसाद देत नव्हता, व डिस्प्लेचीही समस्या तशीच होती. म्हणून दिनांक 13/06/2009 रोजी तक्रारदाराने नोकिया केअरला (सा.वाले क्र.2) पुन्हा तो हँन्डसेट दुरुस्तीसाठी दिला. त्याचा जॉबसिट क्रमांक 581504867/090613/3 असा होता. दोन दिवसानंतर त्यांनी तो हँडसेट तक्रारदाला दिला. मात्र समस्या दूर झाली नव्हती. दिनांक 20 जून 2009 रोजी तकारदाराने सा.वाले क्र.2 यांना पुन्हा कळविले की, हँन्डसेट बरोबर काम देत नाही. त्यावेळचा जॉबसिट क्रमांक 581504837/090620/24 असा होता. त्यावेळीही त्यांनी तो हँन्डसेट त्यांचे दिल्ली येथील ऑफीसला पाठवावा लागेल असे सांगीतले. त्यांनी असेही सांगीतले की, कदाचीत मेमरी कार्डमुळे हँन्डसेटमध्ये समस्या असेल. म्हणून त्यांनी वेगळी जॉबसिट क्रमांक 581504867/090620/26 मेमरी कार्ड तपासण्याबाबत तंयार केली. 10 दिवसानंतर तक्रारदाराला तो हँन्डसेट मिळाला. त्यावेळेस सा.वाले क्र.2 यांनी सांगीतले की, हँन्डसेटचा मदरबोर्ड बदलला आहे. त्यामुळे आता समस्या येणार नाही. त्यांनी नविन मेमरीकार्ड दिले. तक्रारदाराने तो हँन्डसेट थोडे दिवस वापरला परंतु तो बरोबर काम देत नव्हता असे त्याच्या लक्षात आले. 5. हँन्डसेट मधील समस्या दूर करण्याचा प्रयत्न करुनही त्या दूर होत नव्हत्या म्हणून तक्रारदाराने सा.वाले क्र.2 यांना तो हँन्डसेट बदलून देण्यास सांगीतला. मात्र त्या बाबतचा निर्णय त्यांचे दिल्ली येथील सेंटर घेईल असे त्यांनी सांगीतले. व तो हँन्डसेट त्यांच्याकडे म्हणजे सा.वाले क्र.2 कडे देण्यास सांगीतले. त्यांनी त्याबाबतची जॉबसिट क्रमांक 581504867/090806/95 ची तंयार केली. 10 दिवसानंतर तो हँन्डसेट तक्रारदाराला परत मिळाला. सा.वाले क्र.2 यांनी सांगीतले की, त्यांच्या दिल्ली येथील सेंटरने मदरबोर्ड दुरुस्त करुन दिल्याने आता समस्या येणार नाही. मात्र हँन्डसेटमधील समस्या दूर झालेल्या नव्हत्या. 6. तक्रारदाराने बंगलोर येथील नोकीया केअर लाईनला बरेच फोन केले. व हँन्डसेटच्या समस्येबद्दल कळविले. परंतु काही उपयोग झाला नाही. नोकीया केअर लाईन यांनी कळविले की, हँन्डसेट बदलून देण्याची त्यांचे धोरण (पॉलिशी) नाही. तक्रारदाराचे म्हणणे की, सदोष मोबाईल हँन्डसेट देवून तो बदलून न देणे ही सा.वाले यांची सेवेत न्यूनता आहे. त्यामुळे त्याला बराच मानसिक त्रास झाला, त्याचा बराच वेळ वाया गेला. काम सोडून त्याला सा.वाले क्र.2 यांचे ऑफीसमध्ये थांबावे लागत आहे. म्हणून सदरची तक्रार करुन तक्रारदाराने वर नमुद केलेल्या मागण्या केल्या आहेत. 7. सा.वाला यांना या तक्रारीची नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही. म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 8. तक्रारदाराने त्याच्या तक्रारीच्या पृष्ठयर्थ त्याचे शपथपत्र, व खालील कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केले आहेत. अ) मोबाई विकत घेतल्याबाबतचा इनव्हाईस. ब) सा.वाले व तक्रारदार यांनी एकमेकांना पाठविलेले मेल. क) दि.13/06/2009,20/06/2009 व 6/08/2009 च्या जॉबसिटच्या प्रती. ड) तक्रारदाराने सा.वाले क्र.1 यांना वकीलांमार्फत दि.17/11/2009 रोजी पाठविलेल्या नोटीसीची कॉपी. 9. आम्ही तक्रारदाराचे म्हणणे ऐकले व कागदपत्रं वाचली. कागदपत्रावरुन असे सिध्द होते की, तक्रारदाराने सा.वाले क्र.1 यांनी तंयार केलेला नोकिया हँन्डसेट सा.वाले क्र.3 यांचेकडून रु.19,369/- ला विकत घेतला होता. मात्र घेतल्यानंतर थोडयाच दिवसात तो सदोष आहे हे त्यांच्या लक्षात आले. मोबाईल हँन्डसेट प्रतिसाद देत नव्हता व त्याचा डिस्प्ले बरोबर नव्हता ( Power- phone locks up, not responding,, Display –contrast issue) तो ब-याचवेळा दुरुस्तीला देवूनही सा.वाले क्र.1 व 2 यांना त्यातील दोष दूर करता आले नाही. म्हणजेच त्यात निर्मिती दोष होता. अशा परिस्थितीत तो हँन्डसेट बदलून देण्याची जबाबदारी सा.वाले क्र.1 ची होती. ती त्यांनी पार पाडली नाही. ही त्यांची सेवेतील न्यूनता आहे. त्यामुळे साहाजिकच तक्रारदाराला मानसिक त्रास झाला, त्याच्या वेळेचा अपव्यय झाला व त्याला सा.वाले क्र.2 यांच्या ऑफीसमध्ये जाण्यायेण्यासाठी खर्च करावा लागला हे मान्य करण्यासारखे आहे. त्यासाठी नुकसान भरपाई देण्यास सा.वाले क्र.1 जबाबदार आहेत. सा.वाले क्र.2 यांनी हँन्डसेट दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. त्यांच्या सेवेत न्यूनता दिसत नाही. तसेच सा.वाले क्र.3 यांचेकडून तो हँन्डसेट जरी घेतलेला आहे तरी त्यात निर्मिती दोष असल्यामुळे तक्रारदाराला नुकसान भरपाई देण्याची त्यांची जबाबदारी नाही. ती सा.वाले क्र.1 ची आहे. तक्रारदाराने मागीतलेली भरपाई ही अवाजवी व अयोग्य वाटते. मंचाचे मते खालील न्यायाचे हिताचे दृष्टीने योग्य आहे. म्हणून मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्र. 07/2011(जुना क्र.61/2010) अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराला हँन्डसेटची किंमत रु.19,369/- परत करावी व त्यावर द.सा.द.शे. 6 दराने सदरची तक्रार दाखल दिनांक 26/03/2010 पासून संपूर्ण रकम देईपर्यत व्याज द्यावे. 3. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराला रु.5000/- नुकसान भरपाई द्यावी व या अर्जाच्या खर्चापोटी रु.3000/- द्यावेत. 4. सा.वाले क्र.2 व 3 यांचे विरुध्दची तक्रार रद्द करण्यात येत आहे. त्यांनी स्वतः खर्च सोसावा. 5. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |