Maharashtra

Nagpur

CC/13/423

Shri Romit s/o Rajendra R. Jaiswal - Complainant(s)

Versus

Nokia India Pvt Ltd. sp Infocity - Opp.Party(s)

Hitesh N. Verma

28 Apr 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/13/423
 
1. Shri Romit s/o Rajendra R. Jaiswal
Aged about 27 years r/o 188@0 Gaddigodam Chowk Above Kashmimr Beer, Kamptee Road, Nagpur
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Nokia India Pvt Ltd. sp Infocity
Industrial Plot No 243, Udyog Vihar, Phasei Dundaahera
Gurgaon
Haryana
2. Nokia Service Centre
c/o Milaps Electronics 2nd floor Sanskrutik Sankul Jhansi Rani Chowk Sitabuldi Nagpur
Nagpur
Maharastra
3. Phone Care Mobile Shoppee
Sales& Services Shop No 102 Fortaleza Opp Sunshine Court Kalyani Nagar Pune
Pune
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
PRESENT:Hitesh N. Verma , Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

        (मंचाचा निर्णय : श्री. मनोहर चिलबुले - अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)
 
                         -// आ दे श //-
 (पारित दिनांकः 28/04/2014)
 
1.          तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केलेल्‍या तक्रारीचे थोडक्‍यात कथन असे की, ...
 
            प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्त्‍याने स्‍वतःच्‍या उपयोगासाठी विरुध्‍द पक्ष क्र.1 नोकिया इंडिया प्रा.लि. निर्मित मोबाईल हॅन्‍डसेट NOKIA N28 Distinctive IMEI No. 356237047022783 बिल क्र. 1021 दि.06.04.2011प्रमाणे रु.22,994/- किंमतीस विरुध्‍द पक्ष क्र.3 फोन केअर मोबाईल शॉपी, पुणे यांचेकडून खरेदी केला. सदर हॅन्‍डसेटची मुळ वारंटी 1 वर्षाची म्‍हणजे दि. 05.04.2012 पर्यंत होती. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.2 नोकिया सर्व्हिस सेंटर, व्‍दारा मिलाप्‍स इलेक्‍टॉनिक्‍स, सिताबर्डी नागपूर यांचेकडे दि. 22.02.2012 रोजी पावती क्र. 10036 प्रमाणे रु.1414/- भरुन सदर वारंटी पुढील 1 वर्षासाठी म्‍हणजे दिनांक 05.04.2013 पर्यंत वाढवून घेतली.
 
2.          तक्रारदाराच्‍या वरील मोबाईल हॅन्‍डसेट मध्‍ये बिघाड झाल्‍यामुळे त्‍याने तो दुरुस्‍तीसाठी विरुध्‍द पक्ष क्र.1 च्‍या अधिकृत दुरुस्‍ती केंद्रात अक्षय नोकिया केअर सेंटर, शिवाजी नगर पूणे येथे दुरुस्‍तीसाठी दिला. त्‍यानंतर तक्रारकर्ता नागपूर येथे राहावयास आल्‍यावर सदर हॅन्‍डसेट विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे नागपूर येथे वेळोवेळी दि. 22.02.2012, 03.11.2012 आणि शेवटचा दि. 05.11.2012 रोजी दुरुस्‍तीसाठी दिला. तेंव्‍हापासून सदर हॅन्‍डसेट संयुक्‍तपणे व पृथकपणे विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 च्‍या ताब्‍यात आहे.
 
3.          वरील प्रमाणे पुणे आणि नागपूर येथील सर्व्हिस सेंटरमध्‍ये हॅन्‍डसेट दुरुस्‍त करुनही तो अपेक्षित क्षमतेप्रमाणे कार्य करीत नव्‍हता व त्‍यांत वारंवार एक किंवा दुसरा बिघाड निर्माण होत होता. त्‍यामुळे तक्रारकत्‍याने शेवटी सदर हॅन्‍डसेट दि. 05.11.2012 रोजी बदलून मिळण्‍यासाठी विरुध्‍द पक्ष क्र. 2 च्‍या स्‍वाधीन केला. त्‍यानंतर वेळोवेळी पाठपुरावा करुनही विरुध्‍द पक्षाने हॅन्‍डसेट बदलून दिला नाही. सदर हॅन्‍डसेट विरुध्‍द पक्ष क्र. 2 चे स्‍वाधीन केला तेंव्‍हा त्‍यांनी तपासून घेतला आणि त्‍यांत कोणताही दोष नसल्‍याची खात्री करुनच विरुध्‍द पक्ष क्र.1 कडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्‍यासाठी स्विकारला. मात्र त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्र.2 ने तक्रारकर्त्‍यास कळविले कि, विरुध्‍द पक्ष क्र.1 ने त्‍यांना कळविले कि, हॅन्‍डसेट टॅम्‍पर्ड असल्‍यामुळे वारंटी लाभ देता येत नाही. विरुध्‍द पक्षाची सदर कृती बेकायदेशीर व ग्राहकांना लुबाडण्‍याची असून सेवेतील न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार व अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे आणि त्‍यांस विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 संयुक्‍त व पृथकपणे जबाबदार आहेत.
4.          तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांना आपले वकीलांमार्फत दि. 06.02.2013 रोजी रोजी कायदेशिर नोटीस पाठविली, ती मिळूनही विरुध्‍द पक्षांनी पुर्तता केली नाही म्‍हणून सदर तक्रारीत खालील प्रमाणे मागणी केली आहे
1. मोबाईल हॅन्‍डसेटची किंमत                   रु.   22,994/-
      2. शारीरीक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु. 1,00,000/-
3. तक्रारीचा खर्च                              रु. 50,000/-
                                              --------------
एकुण नुकसानभरपाई                                 रु. 1,72,994/-
 
5.          तक्रार दाखल झाल्‍यानंतर मंचामार्फत विरुध्‍द पक्षांना नोटीस पाठविण्‍यांत आली. सदर नोटी मिळून ते अधिवक्‍त्‍यांमार्फत हजर झाले परंतु लेखी जबाब दाखल केला नाही व तक्रारीतील कथनाचे खंडन केले नाही म्‍हणून प्रकरण विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 विरुध्‍द लेखीजबाबाशिवाय चालविण्‍यांत आले. मंचाचे विचारार्थ घेण्‍यांत आलेले मुद्दे  व त्‍यावरील निष्‍कर्ष आणि त्‍याबाबतची कारण मिमांसा खालिल प्रमाणे.
           
            मुद्दे                                            निष्‍कर्ष
      1) विरुध्‍द पक्षाने सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार किंवा
         अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला आहे काय ?         होय.
      2) तक्रारकर्ता रक्‍कम परत मिळण्‍यांस तसेच झालेल्‍या
         मानसिक शारीरिक त्रासाची भरपाई घेण्‍यांस
         पात्र आहे काय ?                                    अंशतः
3) अंतिम आदेश काय ?                          अंतिम आदेशाप्रमाणे
 
           
-         // कारणमिमांसा // -
 
6.          निर्मित मोबाईल हॅन्‍डसेट विरुध्‍द पक्ष क्र.3 फोन केअर मोबाईल शॉपी, पूणे यांचेकडून रु.22,994/- ला NOKIA N28 Distinctive IMEI No. 356237047022783 बिल क्र. 1021 दि.06.04.2011 रोजी विकत घेतल्‍याबाबतच्‍या बिलाची प्रत दस्‍तावेजांच्‍या यादीसोबत दस्‍त क्र.1 वर दाखल केलेली आहे. तसेच सदर माबाईल हॅन्‍डसेटची वारंटी पुढील एक वर्षासाठी रु.1,414/- बिल क्र.10036 दि.22.02.2013 रोजी देऊन विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे वाढविल्‍याबाबत बिलाची प्रत दाखल केलेली आहे. तसेच सदरचा मोबाईल नादुरुस्‍त झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे दि.05.11.2012 रोजी दुरुस्‍तीस दिल्‍याबाबत सर्व्‍हीस जॉबशिटची प्रत दस्‍त क्र.3 वर दाखल आहे. तसेच अधिवक्‍ता श्री. हितेश वर्मा यांचेमार्फत विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांना दिलेल्‍या नोटीसची प्रत दस्‍त क्र.4 वर आणि सदर नोटीस पाठविल्‍याबाबत स्‍पीड पोस्‍टची पावती दस्‍त क्र.5 वर दाखल केली आहे. तसेच सदर नोटीस विरुध्‍द पक्ष क्र.2 ला मिळाल्‍याबाबतची पोच देखिल दाखल केली आहे.मुद्दा क्र.1 व 2 नुसारः- सदरच्‍या प्रकरणात तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 नोकीया इंडिया प्रा.लि.
7.          वरील सर्व दस्‍तावेजांवरील तक्रारीत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 निर्मीत मोबाईल हॅन्‍डसेट विरुध्‍द पक्ष क्र.3 कडून विकत घेतला आणि सदर हॅन्‍डसेटची वारंटी विरुध्‍द पक्ष क्र.2 कडून एक वर्षाच्‍या कालावधीकरीता वाढवून घेतली हे सिध्‍द होते. तसेच सदर मोबाईल हॅन्‍डसेट नादुरुस्‍त झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे दुरुस्‍ती करीता दिला परंतु तो पूर्णपणे दुरुस्‍त किंवा बदलवुन तक्रारकर्त्यास देण्‍यांत आलेला नाही ही बाब देखिल सिध्‍द होते. विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्त्‍याचे नोटीसला पाठविलेले उत्‍तर तक्रारकर्त्‍याने दाखल केले आहे, त्‍यात विरुध्‍द पक्ष क्र. 2 ने असे म्‍हटले आहे की, विरुध्‍द पक्ष क्र.1 ने त्‍यास कळविले की, सदर मोबाईल हॅन्‍डसेट ‘फिजिकली डॅमेज’, झाल्‍यामुळे वारंटी लाभ मिळण्‍यांस तक्रारकर्ता पात्र नाही. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे असे आहे की, त्‍याने सदरचा मोबाईल हॅन्‍डसेट विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे बदलवून मिळण्‍यांस दि.05.11.2012 रोजी दिला त्‍यावेळी तो विरुध्‍द पक्ष क्र.2 ने तपासणी करुन घेतला होता व त्‍यात विरुध्‍द पक्ष म्‍हणतात तसा ‘फिजिकली डॅमेज’, असा कोणताही दोष नव्‍हता. त्‍यांचे पुढे असे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्त्‍याला नादुरुस्‍त मोबाईलच्‍या बदली दुसरा मोबाईल द्यावा लागू नये म्‍हणून विरुध्‍द पक्षाने ‘फिजिकली डॅमेज’, चा खोटा बचाव घेतलेला आहे व ही सेवेतील न्‍यूनता आहे.
8.          तक्रारकर्त्‍याचे वरील कथन विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी लेखी जबाब दाखल करुन नाकारलेले नाही किंवा विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे बदलवून मिळण्‍यांसाठी तक्रारकर्त्‍याने दिलेला हॅन्‍डसेट ‘फिजिकली डॅमेज’, होता असा कोणताही पुरावा सादर केलेला नाही. म्‍हणून विरुध्‍द पक्षांचे नोटीसमधील कथनास कोणताही आधार नाही आणि त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीतील शपथेवर केलेले कथन खोटे ठरविण्‍यासाठी कोणतेही संयुक्तिक कारण नाही.
9.          तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 कडून निर्मीत मोबाईल हॅन्‍डसेट त्‍यांचे अधिकृत विक्रेता असलेल्‍या विरुध्‍द पक्ष क्र.3 कडून खरेदी केले होते आणि त्‍यात वारंवार झालेला बिघाड पूर्णपणे दुरुस्‍त होऊ न शकल्‍यामुळे सदरचा महागडा हॅन्‍डसेट पूर्ण नियमीत कार्य करीत नसल्‍यामुळे बदलवुन मिळण्‍यासाठी विरुध्‍द पक्ष क्र.2 मार्फत विरुध्‍द पक्ष क्र.1 कडे पाठविला परंतु सदरचा नादुरुस्‍त मोबाईल स्विकारुन देखिल त्‍या ऐवजी विरुध्‍द पक्ष क्र.1 ने नवीन मोबाईल हॅन्‍डसेट तक्रारकर्त्‍यास दिलेला नाही, ही ग्राहकाप्रती सेवेतील न्‍यूनता आहे तसेच अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब आहे.
10.         तक्रारकर्त्‍याचा वारंटी पिरीएडमध्‍ये असलेला नादुरुस्‍त मोबाईल विरुध्‍द पक्ष क्र.2 मार्फत विरुध्‍द पक्ष क्र.1 कडे सादर करुन त्‍यांनी तो बदलवून नवीन मोबाईल हॅन्‍डसेट देणे अपेक्षित असतांना नवीन हॅन्‍डसेट दिला नाही व जुना हॅन्‍डसेट देखिल स्‍वतःजवळ ठेवून घेतला आहे. त्‍यामुळे सदर मोबाईल हॅन्‍डसेटची किंमत रु.22,994/- मिळण्‍यांस तक्रारकर्ता पात्र आहे, याशिवाय शारीरिक व मानसिक त्रासासाठी रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.3,000/- मिळण्‍यांस तक्रारकर्ता पात्र आहे असे मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.1 व 2 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविले आहे. 
 
            वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.      
     
                        - // आदेश //-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2)    विरुध्‍द पक्षांना निर्देश देण्‍यांत येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला मोबाईल    हॅन्‍डसेटची किंमत रु.22,994/- परत करावी.
3)    विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासाबाबत  रु.5,000/- व तक्रारीचा खर्चापोटी रु.3,000/- अदा करावे.
4)    विरुध्‍द पक्षांनी आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्‍याचे तारखेपासून 30      दिवसांचे आंत करावी.
5)    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.
6)    तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
 
 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.