अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक :एपीडीएफ/१३२/२००८
तक्रार अर्ज दाखल दिनांक : २८/०६/२००५
तक्रार निकाल दिनांक :२५/११/२०११
श्री. बिनॉय जॉर्ज, ..)
राहणार :- बी3/२६, सिध्देश्वरनगर, ..)
विश्रांतवाडी, पुणे – ४११ ०१५. ..)...तक्रारदार
विरुध्द
1. नोकीया इंडिया प्रा. लि., ..)
पहिला मजला, 573 डी लिंक चेंबर्स, ..)
जे.एम्. रोड, पुणे. ..)
2. ब्राईट पॉईंट इंडिया प्रा. लि., ..)
१०१, १०२, १०३, टाईम्स स्क्वेअर, ..)
पहिला मजला, पुणे सातारा रोड, ..)
स्वारगेट, पुणे – ४११ ००९. ..)
3. शॉपर्स स्टॉप लि., ..)
गोदरेज इटेर्निया, बी विंग, ..)
वाकडेवाडी, पुणे – ४११ ००५. ..)...जाबदार
********************************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
प्रस्तूतचे प्रकरण सन 200५ मध्ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/१८२/२००५ असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/१३२/२००८ असा नोंदविण्यात आला आहे.
सदरहू प्रकरण मंचाकडे सन 2008 पासून प्रलंबित असल्यामुळे प्रकरण चालविण्याचे आहे अथवा नाही याबाबत तक्रारदारांचे निवेदन येणेसाठी प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदारांना मंचाने नोटीस काढली असता तक्रारदार नोटीस मिळूनही मे. मंचासमोर हजर राहिले नाहीत. सबब सदरहू प्रकरण चालविण्यामध्ये तक्रारदारांना स्वारस्य नाही या निष्कर्षाअंती प्रस्तूतचा तक्रार अर्ज काढून टाकण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक – २५/११/२०११