सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 56/2010
तक्रार दाखल झाल्याचा दि.07/08/2010
तक्रार निकाल झाल्याचा दि.03/11/2010
सौ.सुचिता चंद्रशेखर नाईक
वय- 38 वर्षे, धंदा – नोकरी,
स्वरुप, खासकिलवाडा,
सावंतवाडी, ता. सावंतवाडी,
जिल्हा सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
1) नोकिया केअर मॅनेजर,
नोकिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,
5 एफ टॉवर, ए अँड बी,
सायबर ग्रीन, डी. एल. एफ. सायबर,
सीटी सेक्टर, 25/ए, गुडगाव- 122 002
2) नोकिया केअर,
खलप टेलिकॉम, शॉप नं.8 व 9,
वैश्य भवन, गवळी तिठा, सावंतवाडी
3) बाळकृष्ण मेडिकल स्टोअर्स,
गांधी चौक, सावंतवाडी,
जिल्हा सिंधुदुर्ग.
4) दि मॅनेजर,
नोकिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,
4 था मजला, कमर्शियल प्लाझा,
रेडीसन हॉटेल कॉम्प्लेक्स,
राष्ट्रीय मार्ग क्र.8,
महिपूलपूर – नवी दिल्ली – 03. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदार - व्यक्तीशः उपस्थित.
विरुध्द पक्ष क्र.2 तर्फे – विधिज्ञ श्री पी.जी. पई
विरुद्ध पक्ष क्र.1,3,4 तर्फे- कोणीही नाही.
आदेश नि.1 वर
(दि.03/11/2010)
1) तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडून खरेदी केलेला मोबाईल हँडसेट वॉरंटी कालावधीमध्ये बिघाड होऊन त्यातील दोष दुरुस्त करुन न दिल्यामळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2) सदर तक्रारीचे नोटीस विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांना बजावण्यात आले. त्यानुसार विरुध्द पक्ष क्र.3 हे मंचासमोर हजर होऊन त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.8 वर दाखल केले.
2) दरम्यान तक्रारदार व विरुध्द पक्षकार यांच्या दरम्यान आपसी तडजोड होऊन तक्रारदारास त्यांनी खरेदी केलेल्या मोबाईल हँडसेटची किंमत व नुकसान भरपाई रु.3000/- तक्रारदारास देण्यात आले. त्यामुळे सदरचे प्रकरण काढून टाकावे, अशी विनंती करणारा अर्ज तक्रारदाराने आज नि.19 वर प्रकरण बोर्डावर घेऊन दाखल केला. त्यामुळे आम्ही सदरचे प्रकरण निकाली काढण्याच्या दृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराने नि.19 वर दाखल केलेल्या अर्जानुसार तक्रारदाराचे तक्रार प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
3) प्रकरण नस्तीबध्द करण्यात येते.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 03/11/2010.
सही/- सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग