::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/06/2017 )
माननिय सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, मोबाईल बॅंकीग व्यवहारा संदर्भात विरुध्द पक्षांविरुध्द दाखल केली आहे.
2) त्यानंतर, सदर प्रकरणात दि. 01/04/2017 रोजी विरुध्द पक्षांना नोटीस बजावण्यात आली व विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी त्यांचा लेखी जबाब प्रकरणात दाखल केला.
3) परंतु, तक्रारकर्त्याने दिनांक 05/06/2017 रोजी प्रकरण काढून टाकण्या- साठी अर्ज केला व त्यामध्ये नमुद केले की, “ वि.प. यांनी तक्रारकर्त्याला त्यांचे 10,000/- दहा हजार रुपये परत केले आहेत. तक्रारकर्त्याला प्रकरण पुढे चालविणे नाही, ते काढून टाकण्यात यावे. ”
सबब प्रकरणात, अंतिम आदेश पारित करण्यांत येतो तो पुढीलप्रमाणे . .
:: अंतिम आदेश ::
1. तक्रारकर्त्याची तक्रार, त्यांच्या अर्जाप्रमाणे खारिज करण्यात येते.
2. न्यायिक खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri