जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 244/2008. प्रकरण दाखल तारीख - 09/07/2008 प्रकरण निकाल तारीख - /11/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य गोवर्धन लच्छीराम राठोड वय 35 वर्ष, धंदा मजूरी अर्जदार रा. विष्णपूरी,वीघापीठासमोर, ता.जि.नांदेड विरुध्द. 1. निवासी, अंध विद्यालय वसरणी, ता.जि.नांदेड तर्फे मुख्याध्यापक किंवा अधिकृत व्यक्ती 2. समाज कल्याण अधिकार गैरअर्जदार कार्यालय, जिल्हा परीषद,प्रागंण स्टेशन रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. दिलीप मनाठकर गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - अड.डी.जी.गोधमगांवकर गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील - अड.कांबळे वाय.सी. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार यांचे सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हे शिकारा तांडा ता. मुखेड जि. नांदेड येथील रहीवासी आहेत. त्यांनी आपल्या मूलाचे शालेय शिक्षण करणे शक्य नव्हते. यानंतर मजूरीसाठी विष्णूपूरी येथे आले व आपल्या मूलाला शिक्षण देण्याच्या उददेशाने त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचे आश्रम शाळेत जून,2007 मध्ये पहिल्या वर्गात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. गैरअर्जदार क्र.1 यांचें जाहीरातीप्रमाणे मूलाच्या राहण्याची सोय, दैनदिन जेवण, चहा पाणी नाष्टेची सोय, चांगलया प्रतिचे शिक्षण व मूलावर चांगलया प्रतीचे संस्कार करण्याची हमी त्यांनी दिली आहे. गैरअर्जदार क्र. 2 हे तया आश्रम शाळेवर देखभाल करतात व यासर्व योजनेचा खर्च हे शासन भागविते. अर्जदाराचा मूलगा डिसेंबर 2007 मध्ये आजारी झाल्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 ने त्यांस दवाखान्यात दाखविले नाही. त्यांचा इलाज केला नाही. अर्जदार हे दि.24.1.2008 रोजी त्यांचे मूलास पाहण्यास गेले असताना सूनिलची प्रकृती बीघडली होती व वरील गैरअर्जदारांनी केलेला हलगर्जीनपणा त्यांचे निदर्शनास आला. गैरअर्जदार क्र. 1 याचे परवानगीने सूनिल यांस शासकीय रुग्णालय येथे दाखवले असता तो ब-याच दिवसापासून आजारी आहे व त्यामूळे त्यांची प्रकृती बीघडली आहे असे सांगितले व यानंतर इजाल चालू असताना दि.29.1.2008 रोजी त्यांच्या मूलाचा मृत्यू झाला. हे सर्व गैरअज्रदार क्र.1 यांच्या हलगर्जीपणामूळे झाले व गैरअर्जदार क्र. 2 यांनी त्यावर व्यवस्थित लक्ष दिले नाही. त्यामूळे अर्जदाराचे अतोनात नूकसान झाले व हातचा मूलगा गेला. त्यासाठी नूकसान भरपाई म्हणून रु,3,00,000/- त्यांना मिळावेत, तसेच मानसिक ञासाबददल रु.10,000/- त्यावर 18 टक्के व्याज व दावा खर्च ही दयावा अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. अर्जदार यांनी केलेले आरोप खोटे आहे व काल्पनिक गोष्टी प्रमाणे रचले आहे. अर्जदार आणि गैरअर्जदार यांचेत सूवीधा देण्या बाबत कोणताही करार नाही. कोणताही फायदा व्हावा असा उददेश गैरअर्जदार यांचा नाही. मूलाचा शाळेतील प्रवेश हे सामाजिक कर्तव्य आहे नफा हा उददेश नाही. अर्जदार हे विष्णूपूरी येथे राहत नसून शिकारा तांडा येथे राहतात तेथे त्यांची मालमत्ता आहे. अर्जदाराने स्वतःचे त्यांची दोन्ही मूले त्यांच्या शाळेत शरीक केली आहेत. प्रवेश देताना कोणतीही अट नव्हती किंवा शासकीय सोयी व सवलती ज्या सर्वाना देण्यात येतात त्या या मूलाना दिलेल्या आहेत. अर्जदाराने दि.24.1.2008 रोजी स्वतःच्या दोन्ही मूलास त्यांची आई म्हणजे आजी आजारी असून तिला मूलास बघण्याची इच्छा असल्याने नेत आहे असे कारण सांगून शाळेत विद्यार्थी हालचाज रस्टि्ररवर लिहून मूलाना नेले. मूलगा आजारी होता हे त्यांचे म्हणणे खोटे आहे. गैरअर्जदार क्र.1 हे शाळेवर कामकाज करणारे कर्मचारी आहेत. व ते नेहमी शाळेस भेट देत असतात. त्यांना शाळेमध्ये कोणताही निष्काळजीपणा आढळला नाही व उलट त्यांना चांगल्या कामाबददल प्रशंसा पञ दिलेले आहे. सूनिल व कपील हे अर्जदाराची दोन्ही मूले आजारी नव्हते.वैद्यकीय इलाजाचा प्रश्नच येत नाही. मूलाने पोट, छातीस ञास किंवा त्यांना कोणतेही दुखणे होते हे कधीही सांगितले नाही. ही तक्रार त्यांनी आर्थिक शोषण करण्यासाठी करीत आहेत. अर्जदार हा मूलगा नेण्यास आले नव्हते तर ते मूलाला भेटण्यासाठी आले होते. म्हणून अर्जदाराचा अर्ज खोटा असल्याकारणाने खर्चासह फेटाळण्यात यावा अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांनी आपले लेखी म्हणणे वकिलामार्फत दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी दिलेला लेखी जवाब हा जवळपास तोच लेखी जवाब गैरअर्जदार क्र. 2 यांचा आहे व ते गैरअर्जदार क्र. 2 यांना मान्य आहे. अर्जदार यांचा मूलगा शाळेत आजारी होता असा कोणताही उल्लेख आलेला नाही. त्यामूळे अर्जदाराच्या मूलास इलाज करण्याचा प्रश्नच उदभवत नाही व तसे असेल तर अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे तक्रार केलेली नाही किंवा कळविले नाही असे केले असते तर गैरअर्जदार क्र. 1 यांना इलाज करण्याबददल सूचना त्यांनी दिली असती. अर्जदाराचा मूलगा सूनिल हा आजारी नव्हता केवळ कोणाच्या तरी सांगण्यावरुन चूक व खोटया माहीतीच्या आधारे तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांच्या परवानगीने सूनिल यांचा मूखेड येथील शासकीय रुग्णालय येथे नेऊन त्यांची प्रकृती दाखवली हे गैरअर्जदार यांना मान्य नाही. सूनिलची आजी आजारी आहे म्हणून त्यांनी त्यांना नेले आहे व शाळेच्या हालचाल रजिस्ट्ररवर तशी नोंद केलेली आहे व यानंतर सूनिलचा मृत्यू दि.29.1.2008 रोजी झालेला आहे. गैरअर्जदार यांच्या खात्यातर्फे मयत सूनिल गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे मूलासाठी अनूदान रक्कम दिल्यास त्या मोबदल्यात शिकत होता. दैनदिन कामासाठी अनूदानाची रक्कम नव्हती. त्यामूळे हे त्यांना मान्य नाही. सबब अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आपआपले शपथपञ पूरावा म्हणून दाखल केले आहे. सर्व पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय होय 2. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय नाही. 3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचे शाळेत त्यांचा मूलगा सूनिल यांस प्रवेश घेतला असे म्हटले आहे व गैरअर्जदार क्र. 1 यांनी जून 2007 नंतर त्यांस प्रवेश दिला हे मान्य केले आहे. गरीब, अंध व लोकांसाठी शासन ही योजना चालवित आहे. व शासनच यासाठी पूर्ण खर्च करते. गैरअर्जदार क्र. 1 हे शाळा चालविते त्याबददल त्यांना शासनाकडून अनूदान व खर्चासाठी रक्कम मिळते म्हणून जे लाभार्थी मूले आहेत त्यांचे सोयीसाठी हे सर्व केलेले आहे ते लाभार्थी ग्राहक ठरतात म्हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2(ड) प्रमाणे ते ग्राहक आहेत. म्हणून मूददा क्र. 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र. 2 ः- गैरअर्जदार क्र. 1 यांचे जाहीरातीप्रमाणे त्यांनी मूलाची जबाबदारी घेऊन त्यांला शाळेत प्रवेश दिलेला आहे. व सर्व जबाबदारी ते उलचणार ते जरी खरे असले तरी त्यांचा मूलगा शाळेत शिकतो त्यांनी ही वेळोवेळी आपल्या मूलास भेटून सर्व काही व्यवस्थित आहे किंवा नाही व त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. एकदा मूलाला प्रवेश दिला की, आई वडिलांची जबाबदारी संपली असे होणार नाही. जून,2007 मध्ये मूलाला प्रवेश दिला व दि.24.1.2008 रोजी त्यांनी मूलाला घेऊन गेले व दि.29.1.2008 रोजी सूनिलचा मृत्यू झाला म्हणजे एवढया अल्पवेळेत त्यांचे मूलाचा मृत्यू णला यांस फार तर जूना आजार होता असे म्हणता येणार नाही कारण सहा महिन्यापूर्वी त्यांने प्रवेश घेतला. मृत्यूचा दाखला अर्जदाराने दाखल केलेला आहे व मेडीकल प्रमाणपञावर मृत्यूचे कारण Cardic-Respisatory arrest and Pulmonary edema असे दिलेले आहे. छातीचे फरती नाही. गैरअर्जदाराने प्रवेश फॉर्म दाखल केलेला आहे. यात प्रवेशाची दि.2.7.2007 अशी आहे. अपेन्डीक्स वन यावर सूनिल राठोड अंध असल्या बददलचे प्रमाणपञ दाखल केलेले आहे. त्यामूळे त्यांला त्या शाळेत प्रवेश दिला. विद्यार्थ्याचे हजेरीपट व रजिस्ट्रर या प्रकरणात दाखल केलेले आहे. याशिवाय दि.24.2.2008 रोजी घेतलेल्या जवाब श्री.पी.व्ही. शिरभाते संगीत शीक्षक, श्री. पाटील. एस. पी., श्री.जोजार आर. एल. श्री. ठेले पी.बी. श्री. बी.जी. केंद्रे, लिपीक, या सर्वाचे जवाब पूरावा खातर दाखल केलेले आहेत. यात सर्वानी दि.24.1.2008 रोजी मूलाचे वडील गोवर्धन राठोड हे दूपारी 2 वाजता मूलाना आजीची भेट घायची म्हणून घेऊन गेलेले आहेत असा उल्लेख केलेला आहे. विद्यार्थ्याचे आवकजावक नोंदवही या रजिस्ट्ररचा उतारा गैरअर्जदारांनी दाखल केलेला आहे. यावर दि.24.1.2008 रोजी सूनिल व कपील राठोड यांना स्वतः वडील गोवर्धन राठोड हे दूपारी 2 वाजता आजीस भेटण्यासाठी गावाकडे घेऊन जात आहे अशा प्रकारची रजिस्ट्रर मध्ये नोंद करुन व सही करुन मूलाला नेल्याचा नोंदीचा पूरावा दाखल केलेला आहे. यासर्व पूराव्यावरुन असे निदर्शनास येते की, अर्जदार यांनी स्वतः आपल्या दोन्ही मूलानां रजिस्ट्ररवर नोंद केल्याप्रमाणे आजीस भेटण्यासाठी म्हणून नेलेले आहे. रजिस्ट्रर वर कूठेही मूलगा आजारी असल्याबददल उल्लेख केलेला नाही. शिवाय सूनिल राठोड हा ब-याच दिवसापासून आजारी होता याबददलचा कोणताही वैद्यकीय पूरावा दाखल केलेला नाही. वेळोवेळी त्यांनी शाळेत जाऊन सूनिलची विचारपूस केली या बददलचाही पूरावा नाही. केवळ सहा महिन्यामध्ये सूनिल ला जूना आजार असू शकतो हे शक्य नाही. अर्जदाराने तक्रार समाजकल्याण अधिकारी गैरअज्रदार क्र. 2 यांचेकडे केली आहे ती दि. 02.02.2008 रोजीची आहे म्हणजे सूनिलच्या मृत्यूनंतरची आहे. जे वर्तमानपञातील बातम्या दिल्या नंतरच्या आहेत. अर्जदारानी त्यांचा मूलगा सूनिल आजारी असल्या बददलचे शाळेतील त्यांचे सोबतची मूल किंवा स्टॉफ पैकी कोणाचीही साक्ष पूरावा म्हणून दाखल केलेली नाही. उलट गेरअर्जदार क्र. 2 यांनी या संबंधी चौकशी करुन चौकशी अहवाल दाखल केलेला आहे. यात त्यांनी शाळेच्या स्टॉममधील सर्व शिक्षक , स्वयंपाकी, लिपीक यांचे जबान्या घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी मूलाची आजी आजारी आहे व मूलाना गावाकडे घेऊन जात आहे असे सांगितले व मूलगा कोणत्याही प्रकारे आजारी नव्हता असे सांगितले आहे. दि.3.2.2008 रोजी अर्जदाराच्या वकिलानी दि. रोजी अर्जदाराचा मूलगा मरण पावला असे सांगितले आहे. या चौकशी अहवालावरहफन घेतलेल्या जवाबावरुन व साक्षीपूराव्यावरुन असे स्पष्ट दिसते की, मूलाला दि.24.1.2008 रोजीला अर्जदाराला घेऊन गेले म्हणजे या दिनांकाच्यानंतर तो मूलगा आजारी पडला असण्याची शक्यता आहे व तो गंभीर होऊन मृत्यू पावला. यांला गैरअर्जदार क्र.1 हे जबाबादार असल्याबददलचा कोणताही पूरावा उपलब्ध न झाल्याकारणाने त्यांना दोषी मानता येणार नाही किंवा चूक धरता येणार नाही. मूलगा जर गंभीर आजारी असता तर 24 तारखेलाच अर्जदाराने आपल्या मूलास वैद्यकीय मदतीसाठी कोणत्या तरी डॉक्टरकडे नेले असते. त्या दिनांकाचे औषधोउपचार कागदपञ अर्जदाराने दाखल केलेले नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2. दावा खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सोसावा. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |