Maharashtra

Dhule

CC/11/165

youraj Dharma mali - Complainant(s)

Versus

Nirmal Seeds PVt .LTD Pachora - Opp.Party(s)

A M dushane dhule

11 Jul 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/11/165
 
1. youraj Dharma mali
AT Post warud
...........Complainant(s)
Versus
1. Nirmal Seeds PVt .LTD Pachora
At Post Pachora
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 HON'ABLE MR. S.S. Joshi MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.

 

मा.अध्‍यक्षा-  श्रीमती.व्‍ही.व्‍ही.दाणी 

मा.सदस्‍या - श्रीमती.एस.एस.जैन

मा.सदस्‍य  -  श्री.एस.एस.जोशी

                                  ----------------------------------------                          ग्राहक तक्रार क्रमांक    - १६३/२०१३,

                               १६४/२०१३, १६५/२०१३ व १६६/२०१३.

                               तक्रार दाखल दिनांक - ०६-०९-२०११

                                  तक्रार निकाली दिनांक  - ११-०७-२०१३

 

श्री.प्रकाश धर्मा माळी.            ----- तक्रारदार. (त.क्र.१६३/१३)

उ.व.४६ वर्षे,धंदा-शेती.                

रा.मु.पो.वारुड,

ता.शिंदखेडा,जि.धुळे.

 

()श्री.विवेक पंडित कोतकर.        ----- तक्रारदार. (त.क्र.१६४/१३)

उ.व.४९ वर्षे,धंदा-शेती.

()रितेश पंडित कोतकर.              

उ.व.३८ वर्षे,धंदा-शेती.

()अविनाश बाळकृष्‍ण वाणी (कोतकर)                  

उ.व.३० वर्षे,धंदा-शेती.

(स्‍वत:करिता व तक्रारदार नं.१ व २ तर्फे)

राहणार-मु.पो.वारुड,ता.शिंदखेडा,जि.धुळे.

 

श्री.युवराज धर्मा माळी.           ----- तक्रारदार. (त.क्र.१६५/१३)

उ.व.४२ वर्षे,धंदा-शेती.                

रा.मु.पो.वारुड,

ता.शिंदखेडा,जि.धुळे.

 

श्री.दिलीप धर्मा माळी.            ----- तक्रारदार. (त.क्र.१६६/१३)

उ.व.५२ वर्षे,धंदा-शेती.                

रा.मु.पो.वारुड,

ता.शिंदखेडा,जि.धुळे.

              विरुध्‍द

 

निर्मल सिड्स प्रा.लि.पाचोरा.          ----- सामनेवाले. (त.क्र.१६३/१३,

पोस्‍ट बॉक्‍स नंबर ६३,भडगांव रोड,    १६४/१३, १६५/१३ व १६६/१३.)

पाचोरा,जि.जळगांव.       

        

न्‍यायासन

(मा.अध्‍यक्षाः श्रीमती.व्‍ही.व्‍ही.दाणी)

(मा.सदस्‍याः श्रीमती.एस.एस.जैन)

(मा.सदस्‍य: श्री.एस.एस.जोशी)

 

उपस्थिती

(तक्रारदारा तर्फे वकील श्री.ए.एम.दुसाने)

 (सामनेवाले तर्फे वकील श्री.एल.पी.ठाकूर)

--------------------------------------------------------------------

निकालपत्र

(द्वाराः मा.अध्‍यक्षा - श्रीमती.व्‍ही.व्‍ही.दाणी)

 

(१)       उपरोक्‍त नमूद चारही तक्रारदारांच्‍या तक्रारीचे स्‍वरुप, वाद विषय आणि मागणी एक सारखीच आहे.   तसेच त्‍यातील सामनेवाले हे ही एकच असून, त्‍यांनी प्रत्‍येक तक्रारीत घेतलेला बचावही सारखाच आहे.  त्‍यामुळे या चारही तक्रार अर्जांचा निकाल संयुक्‍त निकालपत्रान्‍वये देण्‍यात येत आहे.   

 

(२)       तक्रारदारांनी, सामनेवाले यांनी निकृष्‍ट दर्जाचे मुगाचे बियाणे दिल्‍याने, नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.

 

(३)      तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी दि.०१-०६-२०११ रोजी सामनेवाले कंपनीचे मुग जात एन-४३ या संकरीत बियाण्‍याची पाच पाकीटे विकत घेतले.  त्‍यानंतर सदर बियाण्‍यांची पेरणी त्‍यांचे शेतात केल्‍यानंतर, पिकाची योग्‍य उगवण झालेली नाही.  त्‍या बाबत जिल्‍हास्‍तरीय तक्रार निवारण समिती यांचेकडे तक्रार केली.   समितीने तसा पंचनामा करुन सदर बियाणे निकृष्‍ट दर्जाचे आहे व उत्‍पादना अभावी      शेतक-याचे मोठया प्रमाणात नुकसान होईल असे शेतक-याचे लक्षात आणून दिले.  यावरुन तक्रारदारांचे बियाणे निकृष्‍ट दर्जाचे असल्‍याने, एकरी ३ क्‍वींटल मुगाचे उत्‍पन्‍न या प्रमाणे पाच एकरात एकूण १५ क्‍वींटल अपेक्षीत उत्‍पन्‍न आले नाही.  त्‍यामुळे एकूण रक्‍कम रु.१,००,०००/- इतक्‍या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

 

(४)            सामनेवाले यांनी त्‍यांचा लेखी जबाब देऊन सदर अर्ज नाकारला आहे.  त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, सदरचे बियाणे निकृष्‍ट दर्जाचे नाही.  तसेच सामनेवाले हे या मे.कोर्टाच्‍या स्‍थळ सिमेत राहत नसून, तक्रारदाराने सदर बियाणे हे पाचोरा येथून खरेदी केले आहे.  म्‍हणजेच या मे. कोर्टाच्‍या स्‍थळ सिमेबाहेर कारण घडलेले आहे.  म्‍हणून या मे.कोर्टासमोर सदरचा अर्ज चालविण्‍याचे अधिकार क्षेत्र नाही.  तसेच तक्रारदाराने सामनेवाले यांचे बिजोत्‍पादन कार्यक्रमामध्‍ये सहभाग घेऊन तसा करारनामा सामनेवाले यांना करुन दिलेला आहे, व या करारनाम्‍यातील अटी शर्ती प्रमाणे बियाण्‍यापासून येणारे उत्‍पादन हे या सामनेवाले यांना बियाणे म्‍हणून देण्‍याचे कबूल केले आहे.  सबब या करारनाम्‍याप्रमाणे तक्रारदार हे या कायद्याप्रमाणे ग्राहक होत नाही.  या  कारणांनी सदरची तक्रार खर्चासह रद्द करण्‍याची मागणी केली आहे. 

 

(५)       याकामी तक्रारदार यांनी शपथपत्र आणि कागदप‍ञे दाखल केली आहेत.  सामनेवाले यांनी त्‍याचा जबाब व शपथपत्र दाखल केले आहे.  सदर प्रकरणी दाखल कागदपत्रे पाहता तसेच उभयपक्षांच्‍या विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकला असता, आमच्‍यासमोर खालील मुद्दा उपस्थित होतो व त्‍याचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत. 

 

मुद्दा :

  निष्‍कर्षः

(अ)तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, ग्राहक संरक्षण कायदा कलम    ११ प्रमाणे या मंचाचे कार्यक्षेत्रात आहे काय ?

: नाही.

(ब)आदेश काय ?

: अंतिम आदेशा प्रमाणे

 

 

विवेचन

(६)     मुद्दा क्र. ‘‘’’   तक्रारदार यांनी बियाणे खरेदी केल्‍याच्‍या पावत्‍या दाखल केल्‍या आहेत.  सदर पावत्‍यांचे निरीक्षण करता, यामध्‍ये तक्रारदारांचे नांव   प्रकाश धर्मा माळी, विवेक पंडित कोतकर, युवराज धर्मा माळी व दिलीप धर्मा माळी   असे असून, पावतीवर दि.०१-०६-२०११ रोजी मुग एन-४३ हे बियाणे खरेदी केल्‍याची नोंद आहे.  या पावतीवर, सामनेवाले निर्मल सिड्स प्रा.लि. पाचोरा, असे नांव नमूद असून सदर पावती ही फक्‍त बिजोत्‍पादक कामाकरिता वैध, असे लिहिलेले आहे. 

 

          या पावत्‍यांवरुन असे दिसते की, तक्रारदार यांनी खरेदी केलेले बियाणे हे बिजोत्‍पादनाकरिता खरेदी केलेले आहे.  हे बियाणे सामनेवाले निर्मल सिड्स प्रा.लि. पाचोरा, जि.जळगांव येथून खरेदी केलेले दिसत आहे.  याचा अर्थ तक्रारदार यांनी बियाणे हे जळगांव जिल्‍हा येथून खरेदी केल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे.   सामनेवाले कंपनी ही तालूका पाचोरा जि.जळगांव येथे कार्यरत आहे.  त्‍यामुळे या बाबत उद्भवना-या तक्रारी या तेथील न्‍यायक्षेत्र म्‍हणजेच जळगांव ग्राहक मंच या कार्याक्षेत्रात येत आहेत. 

 

          तक्रारदार हे धुळे येथे राहत आहेत. त्‍यामुळे तक्रार हे धुळे न्‍यायमंचाच्‍या स्‍थळ सिमेत येत असल्‍याने, ही तक्रार दाखल करण्‍याचे न्‍यायक्षेत्र धुळे मंचास येत आहे असे तक्रार अर्जात नमूद केले आहे.  परंतु ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे, ज्‍या ठिकाणी सामनेवाले राहतात, अथवा त्‍यांची शाखा आहे व त्‍या ठिकाणी त्‍यांचा व्‍यवसाय केला जातो त्‍या ठिकाणच्‍या ग्राहक मंचास कार्यक्षेत्र येत आहे.  या बाबत आपण ग्राहक संरक्षण कायदा कलम ११ चा विचार करणे योग्‍य होईल.    

         

    ग्राहक संरक्षण कायदा कलम ११   :  

(2)     A complainant shall be instituted in a District Forum within the local limits of whose jurisdiction.

(a)      the opposite party or each of the opposite parties, where there are more than one, at the time of the institution of the complaint, actually and voluntarily resides or [carries on business or has a branch office or] personally works for gain, or

(b)     any of the opposite parties, where there are more than one, at the time of the institution of the complaint, actually and voluntarily resides, or [carries on business or has a branch office],or personally works for gain, provided that in such case either the permission of the District Forum is given, or the opposite parties who do not reside, or [carry on business or have      a branch office],or personally work for gain, as the case may be, acquiesce in such institution, or 

(c)     the cause of action, wholly or in part, arises.

 

          या कलमा प्रमाणे, कोणतेही प्रकरण त्‍याच जिल्‍हा ग्राहक मंचाच्‍या ठिकाणी चालू शकते, ज्‍या ठिकाणी सामनेवाले राहतात व व्‍यवसाय करतात.  किंवा ज्‍या ठिकाणी त्‍यांची शाखा आहे व त्‍या शाखेत कारण घडले असेल त्‍याच ठिकाणी प्रकरण दाखल करता येते.  परंतु ज्‍या ठिकाणी तक्रारदार राहतात किंवा व्‍यवसाय करतात, त्‍या ठिकाणी प्रकरण दाखल करता येत नाही.  सदर प्रकरणात सामनेवाले यांची धुळे येथे शाखा नाही.  तसेच बियाणे हे धुळे येथून खरेदी केलेले नाही.  सामनेवाले यांचे कार्यालय हे ता.पाचोरा,जि.जळगांव येथे आहे व त्‍या ठिकाणाहून बियाणे खरेदी केलेले आहे.  त्‍यामुळे सदर तक्रार अर्ज हा धुळे मंचाच्‍या कार्यक्षेञामध्‍ये दाखल करण्‍यास पात्र नाही.  याचा विचार होता वरील प्रकरण चालविण्‍याचे प्रांतीय अधिकार क्षेत्र “territorial jurisdiction” या मंचास नाही.  या कायदेशीर मुद्यावर, सदर तक्रारदाराने दिलेला अर्ज दाखल करुन घेता येत नाही असे आमचे मत आहे.  जरुर तर तक्रारदार हे योग्‍य त्‍या कार्यक्षेत्र असलेल्‍या मंचात तक्रार दाखल करु शकतात.   म्‍हणून मुद्दा क्र. चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी देत आहोत. 

 

()       या कमी मंचामार्फत खालील न्‍यायनिवाडयांचा आधार घेण्‍यात आला आहे.

 

·        Civil Appeal No.1560 of 2004 Order Dated Oct.20,2009 (S.C.)

                             Sonic Surgical Vs National Insurance Company Ltd.

·        AIR 2000 Supreme Court 579

H.V.Jayaram Vs Industrial Credit and Investment Corporation of India Ltd. & Anr.

·        II (2011) CPJ 88 (NC)

                    Neha Singhal  Vs  Unitech Limited.   And

          Abhishek Singhal  Vs  Unitech Limited

·        I (2012) CPJ 81

          Saluja Ford  Vs  Hira Lal Thakur & Ors.

·        II (2004) CPJ 36 (NC)

Arup Kumar Bhattacharya Vs Kundu Tirtha Special & Anr.

 

 

 

·        1997 (1) Bom. C.R. (Cons.) 1 (N.C.D.R.C. New Delhi)

          Rajaram Com Producers Punjab Ltd Vs Suryakant Nitin Kumar      

               Gupta.

 

या न्‍यायनिवाडयामध्‍ये खालील मार्गदर्शक तत्‍व नमूद केले आहे. 

 

The State Commission has held that part of cause of action had arisen at Rajanand Gaon as the various complainants were entitled to receive the share certificate at that place.  Thus according to the State Commission the matter falls under Clause (c ) of the above referred sub-section.  The learned counsel for the respondents has been unable to satisfy us that how receipt or non receipt of share certificate at a certain place gives cause of action to the applicant.  When a Company goes public and various applicants from different places apply for shares it does not mean that the cause of action will accrue to the applicants at the places they reside or are expected to receive the share certificates.  The applications for the shares will be deemed to have been accepted at the place where the Company has its registered office or from where the shares are to be dispatched.  Post Office will be deemed to be acting as agent for share holders for delivery of shares to them.   As noticed above, the petitioner Company has its registered office at Chandigarh while its place of work is at Mandsaur (M.P.).   It has  no branch office at Rajanand Gaon.

     The District Forum has assumed jurisdiction mainly on the ground that complainants were residing at Rajanand Gaon.  Section 11 does not lay down that the complainant can file a complaint at the place where he is residing.

 

          वर उल्‍लेख केलेल्‍या न्‍यायनिर्णयात तक्रारदार हे राजनांदगावचे होते व त्‍या ठिकाणी त्‍यांना शेअर्सचे प्रमाणपत्र मिळणार होते.  कंपनीचे रजिष्‍टर्ड ऑफीस हे चंदीगड येथे होते व कामकाजाचे क्षेत्र हे मंदसौर (एम.पी.) येथे होते.  कंपनीची शाखा ही राजनांदगावला नव्‍हती.  या राष्‍ट्रीय आयोगाच्‍या निकालानुसार सदर प्रकरण चालविण्‍याचे कार्यक्षेत्र राजनांदगाव होऊ शकत नाही.  प्रस्‍तुत प्रकरणात सामनेवाले यांची धुळे येथे शाखा नसून धुळे येथून बियाणे दिलेली नाही.   त्‍यामुळे धुळे मंचास हे प्रकरण चालविण्‍याचे प्रांतीय अधिकार नाही.   

 

()    मुद्दा क्र. ‘‘’’ वरील सर्व कारणांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

 

()       सदर निकालपत्राची मुळ प्रत तक्रार क्र.१६३/२०१३ मध्‍ये ठेवून, साक्षांकीत प्रती अनुक्रमे तक्रार क्र. १६४/२०१३, १६५/२०१३ व १६६/२०१३ मध्‍ये ठेवण्‍यात याव्‍यात.

 

आदेश

 

·        तक्रारदारांचे तक्रार अर्ज, अनुक्रमे १६३/२०१३, १६४/२०१३, १६५/२०१३ व १६६/२०१३ खारीज करण्‍यात येत आहे.

 

धुळे.

दिनांकः ११/०७/२०१३

 

 

 

 

          (श्री.एस.एस.जोशी)  (सौ.एस.एस.जैन)   (सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी)

              सदस्‍य         सदस्‍या           अध्‍यक्ष

           जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्‍ट्र राज्‍य)

                  

 

 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER
 
[HON'ABLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.