जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/218. प्रकरण दाखल तारीख - 01/10/2009 प्रकरण निकाल तारीख –10/05/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सूवर्णा देशमूख, - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य संजय पि. ग्यानोबा वाघमोडे वय, 38 वर्षे, धंदा शेती, रा. पाचपिंपळी ता.बिलोली जि.नांदेड अर्जदार विरुध्द. 1. निर्मल सिडस प्रा.लि. रजिस्ट्ररर्ड व अडमिनिस्ट्रेटिव्ह कार्यालय, पोस्ट बॉक्स नंबर 63, भाडगोल रोड, पाचोरा जि. जळगांव. गैरअर्जदार 2. गंगावार कृषी सेवा केंद्र,बिलोली ता. बिलोली जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.एस.शिंदे. गैरअर्जदार क्र.1 तर्फे - अड.पी.एस.भक्कड गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील - कोणीही हजर नाही निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, पाटील, अध्यक्ष ) गैरअर्जदार यांनी भेसळयूक्त बियाणे पूरवून सेवेत ञूटी केली म्हणून अर्जदारास नूकसान भरपाईपोटी रु.85,000/- 12 टक्के व्याजाने गैरअर्जदाराकडून मिळावेत तसेच मानसिक ञासाबददल रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.5000/- मिळावेत म्हणून ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हे पाचपिंपळी ता. बिलोली येथे दर वर्षी प्रमाणे मी बटाईत शेती केली आहे. अर्जदार हा शेत गट नंबर 1/ब/1 मध्ये 81 आर शेत जमीन आहे व येथे शेती करतात. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 कंपनीचे नावीन्य-6 कापसाचे बियाणे गंगावार कृषी सेवा केंद्र म्हणजे गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून तीन बँग खरेदी केल्या.पावती क्र.3044 असून लॉट नंबर 7767 असा आहे. या बियाण्याची लागवड दि.29.6.2009 रोजी केली. बियाण्याची लागवड केली पण ते बियाण्याची उगवन झालेली नाही. अर्जदाराने तालूका कृषी अधिकारी बिलोली व गट विकास अधिकारी पंचायत समिती बिलोली यांच्याकडे दि.21.07.2009 रोजी पञाद्वारे तक्रार केली. त्यांनी दि.27.07.2009 रोजी अर्जदाराच्या शेतात येउन पंचनामा केला. पंचनाम्याप्रमाणे अर्जदाराच्या शेतातील बियाण्याची उगवण ही 80 टक्के झाली पण त्यातील 60 टक्के वाढ ही चांगली नाही असा अहवाल दिला.अर्जदाराने शेतीची मशागत करुन बियाणे, खतांचा वापर करुन, शेतात पेरणीसाठी मजूर लाऊन या सर्वावर खर्च करुन कापसाची लागवड केली पण उगवण झाली नाही. अर्जदार हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. सदर बियाण्याची उगवण न झाल्यामूळे त्यांचे वर उपासमारीची वेळ आली आहे या सर्व प्रकारास गैरअर्जदार जबाबदार आहेत. अर्जदाराने गैरअर्जदारांना दि.18.08.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीस गैरअर्जदार क्र.2 यांना मिळाली परंतु त्यांनी त्यांचे काहीही उत्तर दिले नाही. अर्जदाराने मशागत, खते, लागवडीस लावलेल्या मजूराचा खर्च मिळून एकूण रु.30,000/- खर्च झाला. उत्पन्न चांगले न झाल्यामूळे अर्जदाराचे रु.85,000/- चे नूकसान झाले. म्हणून अर्जदाराने गैरअर्जदार यांचे विरुध्द मागणी प्रमाणे आदेश व्हावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांना मंचाची नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.जोपर्यत संबंधीत बियाणे प्रयोगशाळेमध्ये पाठवून त्यांची तपासणी होत नाही तोपर्यत बियाण्यांचे दोष आहे ही बाब सिध्द होत नाही. अर्जदाराने किंवा कृषी अधिका-याने किंवा समितीने सदरचे बियाणे प्रयोगशाळेमध्ये तपासणीकरिता पाठविलेले नाही, कृषी अधिका-याने किंवा समितीने कोणतेही शास्ञोक्त कारण न देता आपला अभिप्राय दिला आहे जे कायदयास अमान्य आहे. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्हामध्ये तज्ञ व्यक्तीची सिड समिती स्थापन केलेली आहे व सिड कमिटीने पण संपूर्ण कारणे लिहून आपला अभिप्राय देणे गरजेचे आहे. सदर प्रकरणामध्ये अर्जदाराने दाखल केलेला अहवाल कायदयाप्रमाणे वाचता येत नाही. त्यामध्ये बियाण्यामध्ये दोष आहे असे कूठेही म्हटलेले नाही. कृषी विकास अधिकारी व तालूका कृषी अधिकारी यांनी अर्जदार यांचे शेतामध्ये जाण्याआधी गैरअर्जदार यांना सूचना दिलेली नाही. अर्जदाराने बियाणे गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून दि.29.6.2009 रोजी विकत घेतलेले आहे व सदरचे बियाणे त्यांनी केव्हा लागवन केली यांची नेमकी तारीख दिलेली नाही. तसेच पंचनामा दि.27.07.2009 रोजी करण्यात आलेला दिसतो. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे बियाण्याची उगवण ही 80 टक्के झालेली आहे म्हणजे बियाणे हे चागल्या प्रतीचे आहेत. सदरील बियाणे हे 15 मे ते 30 जून पर्यत लागवण करणे जरुरीचे आहे त्याबददलची माहीती शेतक-यांनी दिलेली आहे. गैरअर्जदाराने दिलेल्या सूचनाचे अर्जदाराने पालन केलेले नाही. त्यामूळे उगवणीमध्ये फरक पडू शकतो. त्यासाठी बियाणे बरोबर नाही असा आरोप करता येणार नाही. कृषी विकास अधिका-याने त्या बाबत आपल्या अहवालात काहीही म्हटलेले नाही, मोघम पंचनामा व अहवाल गैरअर्जदाराच्या विरुध्द वापरता येऊ शकत नाही. अर्जदाराने सन 2008-09 चा 7/12 मंचा समोर दाखल केलेला नाही. त्यामूळे जमिनीमध्ये पेरल्याचा पूरावा नाही. तसेच 7/12 मध्ये अर्जदाराचे नांव वहितीदाराच्या रकान्यात दाखविलेले नाही. अर्जदाराचे रु.85,000/- चे नूकसान झाले ही बाब खोटी आहे. तसेच अर्जदाराने शेतावर रु.30,000/- खर्च केला ही बाब गैरअर्जदार यांना अमान्य आहे. सदरील बियाणे बागायती जमिनीसाठी 5 x 4 फूट साईजच्या जागेत व जिरायती जमिनीसाठी 4 x 3 फूट अंतरावर लागवड करावयास पाहिजे अर्जदाराने तक्रारीमध्ये कोणत्या लॉट क्रमांकचे बियाणे पेरले या बाबीचा उल्लेख केलेला नाही तसेच त्या बाबतचा उल्लेख पंचनाम्यामध्ये पण करण्यात आलेला नाही. अर्जदाराने लिहीलेला लॉट क्रमांक 7767 चूकीचा आहे सदरच्या लॉट क्रमांकाचे बियाणे गैरअर्जदाराने उत्पादित केलेले नाहीत, गैरअर्जदाराने उत्पादित केलेले लॉट क्र.84476,75072, व 76428 असे आहेत. गैरअर्जदार क्र.1 यांनी सदरील बियाणे उत्पादन केल्यानंतर अतिउच्च प्रतीच्या प्रयोगशाळेत तज्ञ व्यक्तीकडून तपासून घेतलेले आहे. बियाणे खोलवर गेल्यावर बियाण्याची उगवण कमी होऊ शकते. विपरीत हवामान व आंतरिक व बाहय कारणासाठी तसेच चूकीच्या व्यवस्थापनामूळे देखील बियाण्याची उगवण कमी होऊ शकते.कृषी विकास अधिकारी यांचा अहवाल हा तज्ञांचा अहवाल म्हणता येणार नाही. म्हणून तक्रार ही खोटी असल्याकारणाने ती खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ,तसेच गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपला पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी दि.29.6.2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांनी उत्पादित केलेल्या कंपनीच्या नाविन्य-6 या कापसाच्या बियाण्याचे 3 बँग गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून खरेदी केल्या आहेत. उत्पादक कंपनी गैरअर्जदार क्र.1 आहे ते विकत घेतल्याबददलची पावती नंबर 3044 दाखल केलेली आहे. दि.21.07.2009 रोजी तहसिलदार बिलोली यांचेकडे तक्रार केली म्हणजे एकच महिन्यामध्ये बियाण्याच्या उगवणी बददल तक्रार केली. यानंतर दि.27.07.2009 रोजी तालूका कृषी विकास अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी स्थळ पाहणी करुन पंचनामा केला. तो पंचनामा या प्रकरणात दाखल आहे. पंचनाम्यानुसार अर्जदार यांचे शेतात रॅडंम पध्दतीने पाहणी केली असता कापसाच्या बियाण्याची उगवण 80 टक्के झाल्याचे दिसून येते एवढेच म्हटले आहे. म्हणजे अर्जदाराच्या शेतामध्ये बियाण्याची उगवण ही झाली आहे, म्हणजे बियाण्यामध्ये दोष असल्याचे किंवा भेसळ आहे असे म्हणता येत नाही. अर्जदाराने आपल्या तक्रारीत बियाणे भेसळयूक्त असल्या बददलचे म्हटले आहे. त्यांचा या पंचनाम्यात कूठेही उल्लेख नाही. तसेच गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी म्हणण्यात यावर आक्षेप घेतलेला आहे. पंचनाम्यामध्ये भेसळ हा शब्द कूठेही आलेला नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी उत्पादित केलेले बियाणे शेतक-यांनी आपल्या शेतात लावले व एक महिन्यातच तक्रार केली. गैरअर्जदाराच्या मते अर्जदाराने ज्या लॉट नंबरचा उल्लेख केलेला आहे तो लॉट नंबरच त्यांचा नाही, त्यांचा लॉट नंबर हा 84476,75072, व 76428 आहे. पंचनाम्याप्रमाणे कापसात भेसळ नाही व असे असले तरी गैरअर्जदार यांचे लेखी म्हणण्यामध्ये तो लॉट मधील बियाणे यांचे सॅम्पल घेऊन शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवीणे आवश्यक होते असे असताना बियाणे प्रयोगशाळेत पाठविले गेले नाहीत. कापसाच्या नाविन्य-6 या जातीच्या बियाण्याची उगवण झालेली आहे. ही उगवण कमी जास्त होण्यास अनेक कारणे असू शकतात. याप्रमाणे बियाण्याची लागवड ही करतेवेळेस पाऊस पडला असला पाहिजे, यांची व्यवस्थित मशागत होणे, खताचे प्रमाण योग्य प्रमाणात देणे इत्यादी बाबी आवश्यक आहेत. बियाणे जर जमिनीत खोलवर पेरले तरी ते वर येत नाहीत. अंतर योग्य प्रमाणात ठेवणे हे देखील आवश्यक आहे. भेसळयूक्त बियाणे असल्यास दोन प्रकारचे कापसाची उगवण होते. त्यांस भेसळ म्हणतात. यात तो काही प्रकार दिसून येत नाही. अर्जदारांनी त्यांचे शेतात कापूस लावल्या बददलचा 7/12 दाखल केलेला असला तरी त्यांचे तक्रारीप्रमाणे लागवड ही 2009 मध्ये केली म्हणजे वर्ष 2008-09 चा पेरा केलेला आवश्यक आहे. वर्ष 2006-07 चा पेरा दाखवतात. अर्जदाराने तक्रार केल्याबददलचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. गैरअर्जदाराने शासनाचे परिपञक दाखल केलेले आहे. याप्रमाणे बियाण्याचा लॉट नंबर व रिलीज ऑर्डर हे अतीशय आवश्यक आहे. पावतीवर जो लॉट नंबर आहे त्याप्रमाणे सिड नाही. त्यांचा लॉट नंबर हे वेगवेगळे आहेत. परिपञकाप्रमाणे शेतक-यांची तक्रार आल्यानंतर काय काय गोष्टी आवश्यक आहेत व तक्रारीची तपासणी करीत असताना कोणत्या गोष्टी बघीतल्या पाहिजे या सर्व यात दिलेल्या आहेत. या सूचनाचे पालन केल्या गेलेले नाही. तसेच तक्रार ही जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे करायला पाहिजे पण अर्जदाराने तक्रार ही तालूका कृषी अधिकारी व गट विकास अधिकारी यांचेकडे केलेली आहे. त्यांनी त्यांची तक्रार जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे न पाठविता स्वतःच पंचनामा केलेला आहे, जिल्हास्तरीय असलेल्या सर्व कमिटीच्या लोकांनी शेतामध्ये जाऊन पंचनामा केला पाहिजे. शेतावर जाण्यापूर्वी गैरअर्जदार यांना नोटीस किंवा सूचना देणे आवश्यक आहे. वरील सर्व प्रकरणावरुन असे वाटते की, गैरअर्जदार यांनी उत्पादित केलेले बियाणे हे भेसळयूक्त किंवा दोषयूक्त आहेत हे अर्जदार सिध्द करु शकलेले नाहीत. मा. राज्य आयोग दिल्ली इंडो अमेरिकन हायब्रीड सिडस व इतर विरुध्द विजयकूमार शंकरराव व इतर यात बियाणे बददलची तक्रार होती. बियाणे हे भेसळयूक्त नाही ते फक्त 10 टक्केच उगवले, रिपोर्टमध्ये क्वॉलिटी किंवा भेसळी बददल काहीही म्हटलेले नाही त्यामूळे योग्य त्यापूराव्याअभावी अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला हे सिध्द होऊ शकले नाही. म्हणून तक्रार फेटाळण्यात येते. 2007 CPJ 148 (NC) Indo American Hybrid Seeds & anr. Vs. Vijaykumar Shankarrao & anr. Consumer Protection Act, 1986 -- Sections 2(1) (r ) -- Seeds – Defective – Sale of -- Evidence – Seeds produced by OP – Purchased from M/s Soni Foods, not made party in complaint against OP – Crop growth not upto expectations -- Report of agricultural authorities indicating only 10 % of crop propely developed – No word in report against or about quality of seeds supplied – Variation in yield dependent on external considerations like climate, sticides, etc. – No evidence on record indicatiang seeds to be of non-standard quality – Court to be led by evidence and proof on subject – In absence of evidence, unfair practice not proved. I (2007) CPJ 258 मा. राज्य आयोग महाराष्ट्र यात महाराष्ट्र स्टेट सिडस कार्पो. लि व इतर विरुध्द नरेंद्र मोतीरामजी बूरुडे व इतर याही प्रकरणात योग्य उगवण झाली नाही म्हणून तक्रार दाखल आहे. यात 15 ते 20 टक्के ची उगवण झाली होती. पंचनामा पंचायत समितीने केला आहे. उगवण ही समाधानकारक आहे असे म्हटले आहे. त्यामूळे त्यात काही दोष नाही. म्हणून अपील अलॉऊ केले आहे. I (2007) CPJ 266 (NC) मा. राष्ट्रीय आयोग दिल्ली यात महाराष्ट्र हायब्रीड सिडस कंपनी लि. विरुध्द गौरी प्रिदेन्ना व इतर यात दोषयूक्त बियाणे पूरवले परंतु पूराव्याअभावी तसेच प्रयोगशाळेत बियाणे पाठविले असता ते 99 टक्के शूध्द आहेत, त्यामूळे सेवेत ञूटी नाही असे म्हणून रिव्हीजन पिटीशन अलॉऊ केले आहे. 2007 NCJ 202 (NC) मा. राष्ट्रीय आयोग दिल्ली यात दोषयूक्त बियाणे पूरवले या बददल पूरावा नाही. लॅबोरटरी रिपोर्ट 99.6 टक्के शूध्दता दर्शविते त्यामूळे गैरअर्जदार जबाबदार नाहीत असे म्हटले आहे. वरील सर्व बाबीचे अवलोकन कले असता अर्जदार हे बियाणे निकृष्ट असल्याबददल सिध्द करु शकलेले नाहीत म्हणून आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. निकालाच्या प्रति पक्षकारांना देण्यात याव्यात. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जयंत पारवेकर, लघूलेखक |