Maharashtra

Nagpur

CC/51/2019

SHRI INDRAJEET JAGAN NANNAWARE - Complainant(s)

Versus

NIRDESHAK, SHRI VIJAY ANANDRAO SHELKE, VYANKATESH ASSET MAXIMISER PVT LTD. - Opp.Party(s)

ADV YASHRAJ KINKHEDE

18 May 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/51/2019
( Date of Filing : 18 Jan 2019 )
 
1. SHRI INDRAJEET JAGAN NANNAWARE
BEHIND MANEKA DEVI MANDIR, INDIRA NAGAR , MUL ROAD, TAH AND DIST CHANDRAPUR
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. NIRDESHAK, SHRI VIJAY ANANDRAO SHELKE, VYANKATESH ASSET MAXIMISER PVT LTD.
VYANKATESH CITY 1, SHIRUR, BUTIBORI, WARDHA ROAD, NAGPUR 441122 INFRATECH HOUSE, SHILPA CO OP. SOCIETY MAIN ROAD, MANISHNAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. BRANCH MANAGER SOU SANDHYA SANJAY GUJJEWAR ,VYANKATESH ASSET MAXIMIER PVT LTD., CHANDRAPUR OFFICE THROUGH SHRI D. V. RAMTEKES RESIDENCE,
BESIDE DR GADEGAON HOSPITAL, VIVEK NAGAR, MUL ROAD, CHANDRAPUR 442401
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV YASHRAJ KINKHEDE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 18 May 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. अध्‍यक्ष, श्री. संजय वा. पाटील यांच्‍या आदेशान्‍वये –

 

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत तक्रार दाखल केली असून तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे .

 

अ.    तक्रारकर्ता हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 हे विकसक आहेत आणि विरुध्‍द पक्ष 1 चे मुख्‍य कार्यालय नागपूर येथे असून त्‍याची शाखा चंद्रपूर येथे आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांच्‍या मिळकतीबाबतचे माहितीपत्रक (Brochure) बघितले आणि तक्रारकर्ता हा फर्म लॅन्‍ड विकत घेण्‍याच्‍या विचारात असल्‍यामुळे त्‍यांनी विरुध्‍द पक्षाकडून भूखंड घेण्‍याचे ठरविले व त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांच्‍या सोबत दि. 20.01.2014 रोजी विक्रीबाबतचा  करारनामा  केलेला आहे.

 

आ.    तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या प्रोजेक्‍ट साईटवर जाऊन पाहणी केली असता त्‍यांच्‍या लक्षात आले की, सदरहू मिळकती मध्‍ये कोणत्‍याही प्रकारचे विकसनाचे काम करण्‍यात आलेले  नाही आणि ती केवळ पडित जमीन असल्‍याचे आढळून आले. तक्रारकर्त्‍याने सदरहू मिळकतीचा 7/12 मिळविला आणि त्‍यानंतर त्‍यांच्‍या लक्षात आले की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची फसवणूक केलेली आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या कार्यालयास दि. 07.12.2014 रोजी भेट दिली, तेव्‍हा श्री. विजय शेळके यांनी सर्व तक्रारकर्त्‍यांना भेटण्‍याची वचन दिले. परंतु विरुध्‍द पक्षाने पुढे कुठलीही कार्यवाही केली नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने दि. 29.03.2016 रोजी  विरुध्‍द पक्षाला नोटीस पाठविली.  

 

इ.    त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने जिल्‍हा ग्राहक मंच, चंद्रपूर येथे दि. 31.07.2017 रोजी तक्रार दाखल केली आणि सदरहू तक्रारी मध्‍ये विरुध्‍द पक्षाने दि.18.11.2017 रोजी जबाब दाखल केला आणि शेवटी जिल्‍हा ग्राहक मंच, चंद्रपूर यांनी सदरहू तक्रार दि.17.07.2018 रोजी खारीज केली.  त्‍यानंतर मा. राज्‍य आयोगाने तक्रारकर्त्‍याचे अपील मंजूर करुन तक्रारकर्त्‍याला जिल्‍हा ग्राहक मंच, नागपूर यांच्‍याकडे तक्रार दाखल करण्‍याची परवानगी दि. 28.11.2018 च्‍या आदेशाप्रमाणे दिली.  त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने वर्तमान तक्रार या आयोगात दाखल केली.

 

ई.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाने सदरहू माहितीपत्रका द्वारे खोटी आश्‍वासने दिली असून त्‍यांनी सदरहू भूखंडाचे विकसन केलेले नाही आणि अनुचित व्‍यापारी प्रथांचा अवलंब केला. विरुध्‍द पक्षाने सदरहू जमीनीसाठी अकृषक वापराकरिता आवश्‍यक परवानगी मिळविलेली नाही आणि तक्रारकर्त्‍याला भूखंडाचा ताबा दिलेला नाही अशा प्रकारे सेवेत त्रुटी केली म्‍हणून तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर करावी अशी विनंती केली.

 

उ.       तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला भूखंडा पोटी दिलेली रक्‍कम रुपये 60,000/-,  18 टक्‍के व्‍याजासह परत मिळण्‍याचा आदेश द्यावा. तसेच नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 1,00,000/- आणि मानसिक त्रासापोटी रुपये 3,00,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 10,000/- देण्‍याचा आदेश द्यावा अशी मागणी केली आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्ष क्रं.1 व 2 यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍यात आलेले आहे. विरुध्‍द पक्ष 2 यांना नोटीस मिळाल्‍याबाबतची पोस्‍टाची पोच पावती अभिलेखावर दाखल केलेली आहे आणि सदरहू पोच-पावतीवर डायरेक्‍टर, व्‍यंकटेश असेटस्  मॅग्‍झीमायझर प्रा.लि. असा शिक्‍का मारल्‍याची नोंद आहे आणि तक्रारकर्त्‍याने सर्विस अॅफिडेव्‍हीट सुध्‍दा तक्रार क्रमांक 37/2019 मध्‍ये दाखल केलेला आहे.

 

  1.       तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे अवलोकन केल्‍यावर आम्‍ही खालील मुद्दे विचारार्थ घेतले व त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

    अ.क्रं.      मुद्दे                                                            उत्‍तर

  1. .    तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?     होय

 

  1.   विरुध्‍द पक्षाने सेवेत त्रुटी केली काय ?                            होय

 

  1.   विरुध्‍द पक्षाने  अनुचित व्‍यापारी प्रथांचा अवलंब

केला आहे काय ?                                                       होय

iv          काय आदेश ?                        अंतिम आदेशाप्रमाणे

                                                    निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत –तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी आपल्‍या युक्तिवादात असे कथन केले की, विरुध्‍द पक्षाने 4 पानांचे रंगीत Brochure जाहीर (प्रसिध्‍द) केले होते आणि त्‍यामध्‍ये ले-आऊटचा  नकाशा आणि भूखंडा मध्‍ये देण्‍यात येणा-या निरनिराळया सुविधांची माहिती दिलेली आहे आणि सदरहू मिळकत ही ताडोबा अभयारण्‍याच्‍या जवळ असल्‍यामुळे ती विकसित करुन देण्‍याचे वचन दिले होते आणि अनेक ग्राहकांकडून भूखंडा पोटी रक्‍कम स्‍वीकारलेली आहे. परंतु सदरहू मिळकतीवर विरुध्‍द पक्षाचा मालकी हक्‍क नसतांना ही सदरहू मिळकतीबाबत व्‍यवहार केलेला आहे आणि  कोणत्‍याही प्रकारचे विकसनाचे कार्य केलेले नाही. विरुध्‍द पक्षाने अशा प्रकारे अनेक लोकांची फसवणूक केलेली आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याला विक्रीपोटी दिलेल्‍या रक्‍कमेवर जास्‍तीत जास्‍त व्‍याज आणि जास्‍तीत जास्‍त नुकसान भरपाई मिळावी असे नमूद केले. तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी आपल्‍या कथनाच्‍या समर्थनार्थ खालील न्‍यायनिवाडयांचा आधार घेतलेला आहे.

 

J. VICTOR VS. K. SELVARAJ & Other Appeal No. A-2007/685..

 

MEHTA BUILD CON. LTD. VS. KANTA RANI, & ORS. III (2012) CPJ 24 (NC)

 

NEW GENERATION REAL ESTATE PRIVATE LTD. VS. RAMESH CHANDER KHURANA & Others I (2015)CPJ 567 (NC)

 

SMT SHUBHANGI SHRIKANT JATKAR VS. NISARG HERBALS PVT.LTD. STATE CONSUMER COMMISSION NAGPURC.C.NO 10/4

 

  1.    वर्तमान प्रकरणातील कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून आले की,  मा. राज्‍य आयोगाच्‍या परिक्रमा खंडपीठ नागपूर यांनी दि. 28.11.2018 रोजी आदेश पारित करुन तक्रारकर्त्‍याला या न्‍यायमंचासमक्ष नविन तक्रार दाखल करण्‍याची परवानगी दिलेली आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍या सोबत विक्रीचा करारनामा दि.20.01.2014 रोजी केला आणि तक्रारकर्त्‍याने करारनाम्‍याच्‍या पूर्वी रुपये 27,000/- दिले आहे आणि पावत्‍याप्रमाणे दिनांक 23.08.2014 पर्यंत एकूण रक्‍कम रुपये 60,000/-  दिलेली असल्‍याचे  दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तसेच  विरुध्‍द पक्षाने सदरहू मिळकत विकसित करुन देण्‍याचे वचन दिलेले आहे आणि त्‍याबाबतची सेवा देण्‍याचे कबूल केले आहे. म्‍हणून मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या .M/s. Narne Construction P. Ltd. Etc.  Vs. Union of India and ors. Etc.  II (2012) CPJ 4 (SC) या न्‍यायनिवाडयाप्रमाणे वर्तमान प्रकरण चालविण्‍याचा जिल्‍हा ग्राहक आयोगास अधिकार आहे. तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी वर नमूद केलेल्‍या न्‍यायनिवाडयांचा योग्‍य प्रकारे आधार घेतलेला आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून भूखंड विक्रीपोटी रक्‍कम स्‍वीकारली आणि त्‍याबाबतचा विक्रीचा करारनामा ही केलेला आहे, त्‍यानंतर ही विरुध्‍द पक्षाने सदरहू मिळकतीचे विकसन केले नाही ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी आहे.  तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची फसवणूक करुन अनुचित व्‍यापारी प्रथांचा अवलंब केल्‍याचे दिसून येते. म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रमांक 1 ते 3 वर होकारार्थी उत्‍तर नोंदवित आहोत.

 

  1.      वर्तमान प्रकरणातील  वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्त्‍याला शारीरिक, मानसिक व  आर्थिक नुकसानीकरिता रक्‍कम रुपये 50,000/- आणि तक्रारीच्‍या खर्चाकरिता रुपये 10,000/- मंजूर करणे योग्‍य आहे (just and reasonable compensation) तसेच तक्रारकर्त्‍याने मोठी रक्‍कम गुंतवणूक करुन ही त्‍यांना स्‍थावर मालमत्‍ता मिळालेली नाही. स्‍थावर मालमत्‍तेच्‍या किंमती खूप मोठया प्रमाणात वाढत असतात म्‍हणून तक्रारकर्त्‍याला मोबदल्‍या पोटी दिलेल्‍या रक्‍कमेवर 14 टक्‍के दराने व्‍याज देणे वाजवी आहे असे आमचे मत आहे.

 

वरील कारणास्‍तव आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.

                                                                                      अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे आणि त्‍यांनी अनुचित व्‍यापार प्रथांचा अवलंब केला असल्‍याचे घोषित करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तीकरित्‍या तक्रारकर्त्‍याला रक्‍कम रुपये 60,000/- द्यावे आणि सदरहू रक्‍कमेवर दिनांक 23.08.2014 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 14 टक्‍के दराने व्‍याजसह रक्‍कम  तक्रारकर्त्‍याला अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तीकरित्‍या तक्रारकर्त्‍याला शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व आर्थिक नुकसानीकरिता रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तीकरित्‍या करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.