View 10893 Cases Against Hospital
Jakir Meherban Pinjara filed a consumer case on 21 May 2014 against Niramay Cancer Hospital & Advance Leproscopi centre in the Dhule Consumer Court. The case no is CC/12/103 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
तडजोड निकालपत्र
(द्वारा- मा.अध्यक्षा - सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) सामनेवाले यांनी वैद्यकिय सेवेत त्रुटी केली म्हणून नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी, तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये सदरची तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(२) सदर प्रकरणी मंचासमोर कामकाज सुरु असतांना दि.२१-०५-२०१४ रोजी तक्रारदार यांनी नि.नं.१६ वर पुरसीस दाखल केली असून, सदरची तक्रार पुढे चालविणे नाही म्हणून निकाली काढण्यात यावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदारांच्या पुरसीस मधील निवेदन खालील प्रमाणे आहे.
जाबदेणार यांनी दिलेल्या सदोष सेवे विरुध्द सदरची तक्रार तक्रारदार यांनी या मा.न्यायमंचात दाखल केलेली आहे. सदरकामी जाबदेणार हे मा.न्यायमंचात हजर झाले असुन त्यांनी त्यांचा खुलासा मा.न्यायमंचात दाखल केलेला आहे. सदरचा खुलासा तक्रारदार यांनी वाचला असुन त्याद्वारे जाबदेणार यांनी तक्रारदार यांचेसाठी घेतलेले प्रयत्न तक्रारदार यांच्या लक्षात आले असुन त्याद्वारे जाबदेणार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नसल्याबाबत तक्रारदार यांची पुर्ण खात्री झाली आहे. त्यामुळे सदरची तक्रारदार ही केवळ गैर समजुतीतुन दाखल केली असल्याने तक्रारदार यांना सदरची तक्रार चालविणे नाही. तरी सदरची तक्रार निकाली काढण्यात यावी.
(३) उपरोक्त पुरसीस मधील नमूद विवेचनाचे अवलोकन करता, तक्रारदारांच्या तक्रारीचे निवारण झाले असून, त्यांना सदर तक्रार यापुढे चालवावयास स्वारस्य नाही असे स्पष्ट होते. त्यामुळे प्रस्तुत तक्रार निकाली काढणे योग्य होईल असे या मंचाचे मत आहे. सबब न्यायाचे दृष्टीने खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
(१) तक्रारदार यांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(२) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांक : २२-०५-२०१४
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.