DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR | New Administrative Building | 5th Floor, Civil Lines, | Nagpur-440 001 | 0712-2548522 |
|
|
Complaint Case No. CC/151/2017 | ( Date of Filing : 18 Mar 2017 ) |
| | 1. Smt. Tai Shankarrao Nagmote | R/o. Katol, Tah. Katol Dist. Nagpur Presently C/o. Shri Ashok Shankarrao Nagmote, 47, Mahatma Gandhi Nagar, Nagpur 440034 | Nagpur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Nilprabha Sahakari Pat Sanstha Maryadit Narsala, Nagpur, Through President Shri Faiji Sheikh | Office- C/o. Rasika Paunrkar, Plot No. 121, 122, Mahlginagar, Near Mahlginagar Water Tank, Hudkeshwar Road, Nagpur | Nagpur | Maharashtra | 2. Shri Faiji Sheikh, President Nilprabha Sah. Pat San. Maryadit | R/o. 103, Beldar Nagar, Narsala Road, Dighori, Nagpur | Nagpur | Maharashtra | 3. Shri Sanjay Shripat Dhargave, Director, Nilprabha Sah. Pat Sanstha Maryadit | R/o. 103, Beldar Nagar, Narsala Road, Dighori, Nagpur | Nagpur | Maharashtra | 4. Shri Gopal Namdeorao Mate, Secretary, Nilprabha Sah. Pat Sanstha Maryadit | R/o. Plot No. 11, Sainagar, Opp. to PMBS College, Gonhi Sim, Umrer Road, Nagpur | Nagpur | Maharashtra | 5. Ku. Swati Madhusudan Thakre/ Sau. Swati Gopal Mate, Agent, Nilprabha Sah. Pat Sanstha Maryadit | R/o. Plot No. 11, Sai Nagar, Opp. To PMBS College, Gonhi Sim, Umrer Road, Nagpur | Nagpur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
|
BEFORE: | | | HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT | | HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER | | HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER | |
|
PRESENT: | Adv. B.C. Kakde, Advocate for the Complainant 1 | | ADV. PRAKASH D. RANDIVE, Advocate for the Opp. Party 1 | | ADV. PRAKASH D. RANDIVE, Advocate for the Opp. Party 1 | |
Dated : 26 May 2023 |
Final Order / Judgement | आदेश मा. अध्यक्ष, श्री. अतुल डी. अळशी यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीत नमूद केले की, विरुध्द पक्ष 1 ही रजि. नं. एन.जी.पी./ अे.आर.एन. /आर.एस.आर. /सी.आर. /780 /2004 अन्वये नोंदणीकृत पत संस्था असून विरुध्द पक्ष 2 ते 4 हे त्या अधिनस्त कार्यरत असून वि.प. 5 ही वि.प. 1 ची एजंट आहे. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष 5 मार्फत विरुध्द पक्षाच्या संस्थेत खालील तक्ताप्रमाणे मुदत ठेव अंतर्गत रक्कम गुंतवणूक केली होती .
परिशिष्ट –अ अ.क्रं. | पावती क्रं. | दिनांक | कालावधी | ठेवीची रक्कम | दर | परिपक्वता तिथी | परिपक्वता राशी | -
| -
| 10.04.2015 | -
| - ,000/-
| 12% | 10.05.2016 | - ,660/-
| -
| -
| 10.04.2015 | -
| - ,00,000
| 12% | 10.05.2016 | - ,13,000
| -
| -
| 27.04.2015 | -
| - ,00,000
| 13% | 27.05.2016 | - ,28,137
| -
| -
| 27.04.2015 | -
| - ,00,000
| 13% | 27.05.2016 | - ,14,068
| 5 | -
| 27.04.2015 | -
| - ,40,000
| 13% | 27.05.2016 | - ,59,696
| | | एकूण मुदत ठेव राशी रु.6,22,000/- परिपक्वता देय रक्कम रु.7,07,561/- | | | | | | | | | |
अशा प्रकारे तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाकडे रुपये 6,22,000/- एवढी रक्कम गुंतवणूक केलेली होती. उपरोक्त परिशिष्टाप्रमाणे तक्रारकर्तीची मुदत ठेवीतील रक्कम परिपक्व झालेली ती रक्कम मिळण्याकरिता तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाकडे अनेक वेळा विनंती करुन सुध्दा विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला परिपक्व रक्कम अदा न केल्यामुळे विरुध्द पक्षाला दि. 20.01.2017 रोजी वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली होती. सदरच्या नोटीसची विरुध्द पक्षाने दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन तक्रारीत मागणी केली की, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीची मुदत ठेवीतील परिपक्व झालेली रक्कम रुपये 7,07,561/- द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याजासह देण्याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश द्यावा. - विरुध्द पक्ष 1 ते 3 यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्त होऊन ही ते आयोगा समक्ष हजर न झाल्यामुळे वि.प. 1 ते 3 विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि. 22.10.2018 रोजी पारित करण्यात आला.
- विरुध्द पक्ष 4 व 5 यांनी प्राथमिक आक्षेप नोंदवून आपला लेखी जबाब एकत्रित दाखल केला असून तक्रारीतील सर्व कथन अमान्य केलेले आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, तक्रारकर्तीच्या भावाला श्रीकृष्ण को-ऑप. बॅंक लि. नरसाळा-शाखेचा 2 धनादेश देऊन रक्कम अदा केली होती. तक्रारकर्तीने कधी ही विरुध्द पक्षाशी संपर्क साधलेला नसून त्यांची कोणत्याही दस्तावेजावर स्वाक्षरी नसल्यामुळे तक्रारकर्तीची रक्कम देण्यास विरुध्द पक्ष 2 व 3 हे जबाबदार आहेत. म्हणून त्यांच्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
- तक्रारकर्तीने दाखल केलेले दस्तावेज, वि.प. 4 व 5 चा लेखी जबाब व उभय पक्षांच्या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर आयोगाने निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
- तक्रारकर्ती विरुध्द पक्षाची ग्राहक आहेत काय ? होय.
- विरुध्द पक्षानी तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित
व्यापारी प्रथेचा अवलंब केला काय ? होय 3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे निष्कर्ष - मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष 1 यांच्याकडे परिशिष्ट अ प्रमाणे रक्कम गुंतविलेली होती व सदरची रक्कम ही परिपक्वता तिथी नंतर व्याजासह मिळणार होती हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ती विरुध्द पक्षाची ग्राहक असल्याचे दिसून येते. तक्रारकर्तीने गुंतवणूक केलेली रक्कम परिपक्व झाल्यानंतर ही विरुध्द पक्षाने परिपक्व रक्कम परत केली नाही. तसेच सदरची रक्कम परत मिळण्याकरिता विरुध्द पक्षाकडे दि.15.06.2016 रोजी अर्ज केला होता हे नि.क्रं. 16(1) वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. त्याचप्रमाणे तक्रारकर्तीने अनेक वेळा विनंती करुन ही विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाला दि. 20.01.2017 ला वकिला मार्फत नोटीस पाठविली होती. सदरची नोटीस विरुध्द पक्षाला प्राप्त होऊन ही विरुध्द पक्षाने नोटीसची दखल घेतली नाही अथवा तक्रारकर्तीची परिपक्वता रक्कम ही परत केली नाही ही विरुध्द पक्ष 1 च्या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्याचे स्पष्टपणे दिसून येते असे आयोगाचे मत आहे.
- विरुध्द पक्ष क्रं. 1 ही सहकारी पत संस्था असून विरुध्द पक्ष क्रं. 2 ते 4 हे त्यातील पदाधिकारी असून विरुध्द पक्ष क्रं. 5 ही एंजट म्हणून कार्य करीत होती, त्यामुळे विरुध्द पक्ष 2 ते 5 हे तक्रारकर्तीला दिलेल्या दोषपूर्ण सेवेसाठी वैयक्तिकरित्या जबाबदार नसल्यामुळे त्यांच्या विरुध्द कोणताही आदेश नाही.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्ष 1 तक्रारकर्तीला परिशिष्ट अ प्रमाणे गुंतवणूक केलेली मुदत ठेव रक्कम परिपक्व रुपये 7,07,561/- व त्यावर तक्रार दाखल दिनांक 29.07.2017 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याजासह रक्कम तक्रारकर्तीला अदा करावी.
- विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक करिता नुकसान भरपाई म्हणून 15,000/- व तक्रारीचा खर्च प्रत्यकी रुपये 10,000/- द्यावे.
- विरुध्द पक्ष 2 ते 5 विरुध्द कोणताही आदेश नाही.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्तीला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
| |
|
| [HON'BLE MR. ATUL D. ALSI] | PRESIDENT
| | | [HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS] | MEMBER
| | | [HON'BLE MR. SUBHASH R. AJANE] | MEMBER
| | |