Maharashtra

Nagpur

CC/152/2017

Shri Ashok Shankarrao Nagmote - Complainant(s)

Versus

Nilprabha Sahakari Pat Sanstha Maryadit Narsala, Nagpur, Through President Shri Faiji Sheikh - Opp.Party(s)

Adv. B.C. Kakde

26 May 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/152/2017
( Date of Filing : 18 Mar 2017 )
 
1. Shri Ashok Shankarrao Nagmote
R/o. 47, Mahatma Gandhi Nagar, Nagpur 440032
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Nilprabha Sahakari Pat Sanstha Maryadit Narsala, Nagpur, Through President Shri Faiji Sheikh
Office- C/o. Rasika Panurkar, Plot No. 121, 122, Mahlgi Nagar, Near Mahlginagar Water Tank, Hudkeshwar Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Shri Faiji Sheikh, President Nilprabha Sah. Pat San. Maryadit
R/o. 103, Beldar Nagar, Narsala Road, Dighori Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Shri Sanjay Shripat Dhargave, Director, Nilprabha Sah. Pat Sanstha Maryadit
R/o. 103, Beldar Nagar, Narsala Road, Dighori, Nagpur
Nagpur
Maharashtra
4. Smt. Rasika Panurkar, Cashier Nilprabha Sah.Pat Sanstha Maryadit
R/o. Plot No. 121, 122, Mahlginagar, Near Mahlginagar Water Tank, Hudkeshwar Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
5. Shri Gopal Namdeorao Mate, Secretary, Nilprabha Sah. Pat Sanstha Maryadit
R/o. Plot No. 11, Sai Nagar, Opp. to PMBS College, Gonhi Sim, Umrer Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
6. Ku. Swati Madhusudan Thakre/ Sau. Swati Gopal Mate, Agent, Nilprabha Sah. Pat Sanstha Maryadit
R/o. Plot No. 11, Sai Nagar, Opp. to PMBS College, Gonhi Sim, Umrer Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:Adv. B.C. Kakde, Advocate for the Complainant 1
 ADV. PRAKASH D. RANDIVE, Advocate for the Opp. Party 1
 ADV. PRAKASH D. RANDIVE, Advocate for the Opp. Party 1
Dated : 26 May 2023
Final Order / Judgement

 

आदेश

 

मा. अध्‍यक्ष, श्री. अतुल डी. अळशी यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीत नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 ही रजि. नं. एन.जी.पी./ अे.आर.एन. /आर.एस.आर. /सी.आर. /780 /2004 अन्‍वये  नोंदणीकृत पत संस्‍था असून विरुध्‍द पक्ष 2 ते 5 हे त्‍या अधिनस्‍त कार्यरत असून वि.प. 6 ही वि.प. 1 ची एजंट आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 6 मार्फत विरुध्‍द पक्षाच्‍या संस्‍थेत खालील तक्‍ताप्रमाणे मुदत ठेव अंतर्गत रक्‍कम गुंतवणूक केली होती .

परिशिष्‍ट –अ

अ.क्रं.

पावती क्रं.

दिनांक

कालावधी

ठेवीची रक्‍कम

दर

परिपक्‍वता तिथी

परिपक्‍वता राशी

  1.  
  1.  

28.05.2015

  1.  
  1. ,00,000

12%

28.06.2016

  1. ,13,000
  1.  
  1.  

28.05.2015

  1.  
  1. ,50,000

12%

28.06.2016

  1. ,69,500

 

 

एकूण मुदत ठेव राशी रु.2,50,000/- परिपक्‍वता देय रक्‍कम रु. 2,82,500

         

 

अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रुपये 2,50,000/- एवढी रक्‍कम गुंतवणूक केलेली होती. उपरोक्‍त परिशिष्‍टाप्रमाणे तक्रारकर्त्‍याची मुदत ठेवीतील रक्‍कम परिपक्‍व झालेली ती रक्‍कम मिळण्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे विनंती केली असता विरुध्‍द पक्ष 2 ते 4 तर्फे श्रीकृष्‍ण को-ऑप. बॅंक, शाखा –नरसाळा, नागपूर या बॅंकेचे रुपये 50,000/- चे दोन चेक चेक क्रं. 061462 व 061467 , दि. 08.07.2016 व दि. 18.07.2016 या तारखेचे दिले होते आणि पावती क्रं. 0943 च्‍या रक्‍कमे मधून रुपये 30,000/- नगद स्‍वरुपात अदा केली होती व उर्वरित रक्‍कम धनादेशाद्वारे अदा करणार होते. परंतु विरुध्‍द पक्षाद्वारे देण्‍यात आलेला धनादेश अपूर्ण रक्‍कम अभावी अनादरित झाला. तक्रारकर्त्‍याने अनेक वेळा विरुध्‍द पक्ष 2 ते 5 कडे मुदत ठेवीतील परिपक्‍व झालेली 0944 ची रक्‍कम व 0943 ची उर्वरित रक्‍कम असे एकूण रक्‍कम रुपये 2,52,500/- परत करण्‍याबाबत विनंती करुन सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची रक्‍कम अदा न केल्‍यामुळे दि. 20.01.2017 रोजी विरुध्‍द पक्षाला वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली होती. सदरच्‍या नोटीसची विरुध्‍द पक्षाने दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन तक्रारीत मागणी केली की, विरुध्‍द पक्ष यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याची मुदत ठेवीतील परिपक्‍व झालेली रक्‍कम रुपये 2,52,500/- द.सा.द.शे.18 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा.

  1.        विरुध्‍द पक्ष 1 ते 4 यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे वि.प. 1 ते 4 विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 22.10.2018 रोजी पारित करण्‍यात आला.

 

  1.        विरुध्‍द पक्ष 5 व 6 यांनी प्राथमिक आक्षेप नोंदवून आपला लेखी जबाब एकत्रित दाखल केला असून तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीतील सर्व कथन अमान्‍य केलेले आहे. त्‍यांनी पुढे नमूद केले की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला श्रीकृष्‍ण को-ऑप. बॅंक लि. नरसाळा-शाखेचा  2 धनादेश देऊन रक्‍कम अदा केली होती. तक्रारकर्त्‍याने कधी ही विरुध्‍द पक्षाशी संपर्क साधलेला नसून त्‍यांची कोणत्‍याही दस्‍तावेजावर स्‍वाक्षरी नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची रक्‍कम देण्‍यास विरुध्‍द पक्ष 2 व 3 हे जबाबदार आहेत. म्‍हणून त्‍यांच्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे. 

 

  1.        तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तावेज, वि.प. 5 व 6 चा लेखी जबाब  व उभय पक्षांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

 

  1.    तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?              होय.
  2.   विरुध्‍द पक्षानी तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित

व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला काय ?                                       होय

3)   आदेश काय ?                                               अंतिम आदेशाप्रमाणे

 

       निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष  क्रं. 1  कडे परिशिष्‍ट अ प्रमाणे रक्‍कम गुंतविलेली होती व सदरची रक्‍कम ही परिपक्‍वता तिथी नंतर व्‍याजासह मिळणार होती हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्त्‍याने गुंतवणूक केलेली रक्‍कम परिपक्‍व झाल्‍यानंतर परत मिळण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाकडे विनंती केली असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला परिपक्‍व झालेल्‍या रक्‍कमेतून रुपये 30,000/- नगदी स्‍वरुपात अदा केले व उर्वरित रक्‍कम धनादेशा द्वारे अदा करण्‍याकरिता दि. 08.07.2016 व 18.07.2016 या तारखेचे धनादेश क्रं. 061462 व 061467 हे श्रीकृष्‍ण को-ऑप बॅंक, शाखा –नरसाळा, नागपूर या बॅंकेचे दोन चेक दिले होते. परंतु सदरचे दोन्‍ही धनादेश हे अपूर्ण रक्‍कम अभावी अनादरित झाले. त्‍यानंतर ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची परिपक्‍व असलेली रक्‍कम रुपये 2,52,500/- परत केली नाही. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने अनेक वेळा विनंती करुन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या मागणीकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला  दि. 20.01.2017 ला वकिला मार्फत नोटीस पाठविली होती. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने नोटीसची दखल घेतली नाही अथवा तक्रारकर्त्‍याची परिपक्‍वता रक्‍कम रुपये 2,52,500/- परत केली नाही  ही विरुध्‍द पक्ष क्रं. 1 च्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते असे आयोगाचे मत आहे.  
  2.      विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ही सहकारी पत संस्‍था असून विरुध्‍द पक्ष क्रं. 2 ते 5 हे त्‍यातील  पदाधिकारी  असून‍ विरुध्‍द पक्ष  क्रं. 6 ही एंजट म्‍हणून कार्य करीत होती,  त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 2 ते 6 हे तक्रारकर्त्‍याला दिलेल्‍या दोषपूर्ण सेवेसाठी वैयक्तिकरित्‍या जबाबदार नसल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द कोणताही आदेश नाही.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1  ने तक्रारकर्त्‍याला  मुदत ठेवीतील पावती क्रं. 0944 ची परिपक्‍व झालेली रक्‍कम व पावती क्रं. 0943 मधील उर्वरित रक्‍कम असे एकूण रक्‍कम रुपये 2,52,500/- व त्‍यावर  तक्रार दाखल दि. 29.03.2017 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.

  

  1. विरुध्‍द पक्ष 1 ने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून 15,000/- व तक्रारीचा खर्च प्रत्‍यकी रुपये 10,000/- द्यावे.

 

  1.  विरुध्‍द पक्ष क्रं. 2 ते 6 विरुध्‍द कोणताही आदेश नाही.

 

  1.  उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला  तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.