Maharashtra

Satara

MA/24/2

UMA MAHESH DAVARI - Complainant(s)

Versus

NILAM DATTATRAY SURYWANSHI - Opp.Party(s)

ADV. UMESH SHINDE

04 Mar 2024

ORDER

Consumer Disputes Redressal
Commission, Satara
 
Miscellaneous Application No. MA/24/2
( Date of Filing : 26 Feb 2024 )
In
 
1. UMA MAHESH DAVARI
FLAT NO. G-2, GROUND FLOOR, ISHIKA PRIDE, PLOT NO. 26, SURVEY NO. 96A/2B, GODOLI, TAL-DIST-SATARA
SATARA
MAHARASHTRA
...........Appellant(s)
Versus
1. NILAM DATTATRAY SURYWANSHI
FLAT NO. G-1, GROUND FLOOR, ISHIKA PRIDE, PLOT NO. 26, SURVEY NO. 96A/2B, GODOLI, TAL-DIST-SATARA
SATARA
MAHARASHTRA
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. BHARATI S. SOLAWANDE PRESIDENT
 HON'BLE MS. MANISHA H. REPE MEMBER
 HON'BLE MRS. ROHINI B. JADHAV MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 04 Mar 2024
Final Order / Judgement

तक्रारदार यांचे दि. 22/02/2024 चे विलंब माफीचे अर्जावरील आदेश

 (दि. 04/03/2024 रोजी पारीत)

द्वारा मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्‍यक्ष

 

1.    तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणेस 6 वर्षे उशिर झाला असल्याने सदरचा झालेला विलंब माफ होवून मिळावा म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे.

 

2.    तक्रारदाराचे कथनानुसार, तक्रारदाराने वादातील फ्लॅट हा सन 2018 साली खरेदी केला आहे.  परंतु सन 2016 पासून तक्रारदाराचे पायावर उपचार सुरु होते, त्यामुळे तकारदारास चालता येत नव्हते.  तदनंतर 2020 साली कोव्हीडचा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय सन 2019 ते 2021 पर्यंत बंद होते.  तक्रारदार यांना त्यांचे फ्लॅटमधील त्रुटीसंदर्भातील माहिती ही सदर फ्लॅटची व्हॅल्युएटर यांनी पाहणी केल्यानंतर त्याचा अहवाल दि. 25/01/2024 रोजी प्राप्त झाल्यानंतर समजली.  सबब, तक्रार दाखल करणेस झालेला उशिर माफ होवून मिळावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

 

3.    सदरकामी तक्रारदारांचे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले.  तक्रारदाराचे कथनानुसार, तक्रारदाराने वादातील फ्लॅट हा सन 2018 साली खरेदी केला.  परंतु सन 2016 पासून तक्रारदाराचे पायावर उपचार सुरु असल्यामुळे तसेच 2020 साली कोव्हीडच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने तक्रारदारास फ्लॅटमधील त्रुटींबाबत समजून आले नाही.  तसेच तक्रारदारास त्यांचे फ्लॅटमधील त्रुटीसंदर्भातील माहिती ही सदर फ्लॅटची व्हॅल्युएटर यांनी पाहणी केल्यानंतर व त्यांचा अहवाल दि. 25/01/2024 रोजी प्राप्त झाल्यानंतर समजली, त्यामुळे तक्रारदारास मुदतीत तक्रार दाखल करता आली नाही असे तक्रारदाराचे कथन आहे.  सदर कथनाचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने शपथपत्र दाखल केले आहे.  तक्रारदाराचे सदर कथन विचारात घेता, तक्रारदाराने फ्लॅटची पाहणी व्हॅल्युएटरकडून करुन घेतल्यानंतर व त्याचा अहवाल तक्रारदारास मिळाल्यानंतर तक्रारदारास त्रुटींबाबत समजून आले ही बाब स्पष्ट होते.  त्यामुळे तक्रार दाखल करण्यास दि.25/1/2024 रोजी कारण घडले असे या आयोगाचे मत आहे.  तक्रारदाराने सन 2018 मध्ये जरी फ्लॅट खरेदी केला असला तरी दि. 25/1/2024 रोजी त्यास फ्लॅटमधील त्रुटींबाबत समजून आले.  त्यामुळे सदर तक्रारीस सन 2018 पासून सातत्याने कारण घडत आहे असे या आयोगाचे मत आहे.  सबब, तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  या सर्व कारणांचा विचार करता, तक्रारदारास तक्रार दाखल करणेस विलंब झालेला नसल्याने तक्रारदाराने दाखल केलेला प्रस्तुतचा विलंब माफीचा अर्ज निकाली काढण्यात येतो व मूळ तक्रार दाखल करुन घेण्यात येते.  जाबदारास नोटीस काढण्यात यावी.       

 

 

 
 
[HON'BLE MRS. BHARATI S. SOLAWANDE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. MANISHA H. REPE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. ROHINI B. JADHAV]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.