निकालपत्र (पारित दिनांक 05 मार्च, 2011) व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा. 1. तक्रारकर्ता या विरुध्दपक्ष यांच्या ग्राहक असून सदर ग्राहक तक्रार ही तक्रारकर्ता यांनी अवास्तव विद्युत देयकांच्या संबधात दाखल केली आहे. ..2.. ..2.. 2. सदर ग्राहक तक्रार मध्ये तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताऐवज, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांचे मिटर जुलै-2008 ला बदलविले व नविन मिटर लावले. परंतू मिटर बदलविल्याचा रिपोर्ट जुलै-2010 ला काम्प्युटरमध्ये भरण्यात आला व त्या कालावधीत तक्रारकर्ता यांना 28 महिण्याचे सरासरी 116 युनिट प्रमाणे देयके जारी करण्यात आलीत. 3. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना 3685 युनिटचे रुपये 28,309/- चे एकत्रित बिल नजरचुकीने पाठविले हे त्यांनी लेखी उत्तरात कबूल केले आहे. 4. तक्रारकर्ता यांनी दिनांक 15/10/2010 रोजी अर्ज दिल्यानंतर विरुध्दपक्ष यांनी रुपये 13,450/- चे सुधारीत देयक तक्रारकर्ता यांना दिले व तक्रारकर्ता यांनी त्या देयकाचा भरणा केला. मात्र तक्रारकर्ता यांनी 116 सरासरी युनिट प्रमाणे या 28 महिण्याच्या कालावधीत एकूण रक्कम रुपये 4330/- ही भरली ती रुपये 13,450/- चे देयक देतांना विरुध्दपक्ष यांनी समायोजीत करुन घेतलेली नाही. 5. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना 28 महिण्याचे 116 युनिटचे सरासरी देयक पाठविणे व रुपये 28,309/- चे अवास्तव रक्कमेचे देयक जारी करणे तसेच तक्रारकर्ता यांनी भरलेले रुपये 4,330/- ही रक्कम समायोजीत करुन न घेणे ही विरुध्दपक्ष यांचे सेवेतील न्युनता आहे. असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे. आदेश 1. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी रुपये 4,330/- ही रक्कम तक्रारकर्ता यांच्या पुढील देयकांमध्ये समायोजीत करुन घ्यावी. 2. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांच्या पुढील देयकांमध्ये शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 3,000/- व ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1,000/- ही रक्कम समायोजीत करावी.
| [HONORABLE Smt. Patel] Member[HONORABLE Smt. Potdukhe] PRESIDENT[HONORABLE Shri. Ajitkumar Jain] Member | |