Maharashtra

Sangli

CC/09/2330

Mohan Bapur Nandre - Complainant(s)

Versus

Nikhil Nag.Sah.Pat.Mar.Sangli - Opp.Party(s)

S.M.Vanjole

12 Aug 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/09/2330
 
1. Mohan Bapur Nandre
Tung, Tal.Miraj, Dist.Sangli
2. Sau.Bharati Mohan Nandre
Tung, Tal.Miraj
Sangli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Nikhil Nag.Sah.Pat.Mar.Sangli
362/B, Nikhil Bhavan, Radhakrishna Vasahat, Sangli
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
  Geeta Ghatge MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                      नि.नं. ३३
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
 
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे
 
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २३३०/२००९
----------------------------------------------
तक्रार दाखल तारीखः  ३०/१२/२००९ 
निकाल तारीखः      - १२/०८/२०११
----------------------------------------------
 
१. श्री मोहन बापू नांद्रे
   वय वर्षे ४४, धंदा नोकरी
२. सौ भारती मोहन नांद्रे
   वय वर्षे ३८, धंदा घरकाम
   दोघे रा.मु.पो. तुंग, ता.मिरज जि.सांगली               ..... तक्रारदार
विरुध्‍द
 
१. निखील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. सांगली
    ३६२/बी, निखील भवन, राधाकृष्‍ण वसाहत,
    सांगली तर्फे प्रशासक
 
२. श्री जगन्‍नाथ पांडुरंग माने
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती
    रा. ३६२/बी, निखील भवन, शाहू उद्यानसमोर,
    सांगली
 
३. श्री अर्जुन प्रल्‍हाद घाटूळे
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती
    रा. भारती विद्यापीठ, पेठ भाग, सांगली
 
४. श्री रविंद्र सदाशिव अडके,
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती
    रा.भगीरथ ऑटो, माधवनगर, सांगली
 
५. श्री प्रकाश नारायण नागांवकर
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती
    रा.प्रकाश आर्ट, कोल्‍हापूर रोड, सांगली
 
६. श्री वसंतराव दत्‍तात्रय माळी
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती
    रा.निळकंठनगर, हरिपूर रोड, सांगली
 
७. श्री सुनिल महादेव फुटाणे
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती
    रा.तांदूळ मार्केट मिरज, जि. सांगली
 
८. श्री शिवाजी दत्‍तू पिंपळे
    वय वर्षे सज्ञान, धंदा सुखवस्‍तू
    रा.मु.पो.कसबे डिग्रज, ता.मिरज जि. सांगली
 
९. श्री राजेश आण्‍णा देवर्षी
    वय वर्षे सज्ञान, धंदा सुखवस्‍तू
    रा.मु.पो.समडोळी, ता.मिरज जि. सांगली
 
१०. श्री वसंत आण्‍णा कोळी,
    वय वर्षे सज्ञान, धंदा सुखवस्‍तू
    रा.मु.पो.समडोळी, ता.मिरज जि. सांगली
 
११. सौ बनाबाई आत्‍माराम घनवट
    वय वर्षे सज्ञान, धंदा सुखवस्‍तू
    रा.मु.पो.बागणी, ता.वाळवा जि. सांगली
 
१२. श्री अरुण रामचंद्र यादव
    वय वर्षे सज्ञान, धंदा सुखवस्‍तू
    रा.मु.पो.सांगलीवाडी, ता.मिरज जि. सांगली
 
१३. श्री महावीर आण्‍णा सकळे
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती
    रा.मु.पो.नांद्रे, ता.मिरज जि. सांगली
 
१४. श्री गजानन बाबूराव गावडे
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती
    रा.मु.पो.कसबे डिग्रज, ता.मिरज जि. सांगली                 ..... जाबदार
 
                      तक्रारदार तर्फेः +ìb÷. श्री एस.एम.वंजोळे
                      जाबदार क्र.१,,,,,, ११ व १३ एकतर्फा
                      जाबदार क्र. ४ तर्फे +ìb÷. सौ एम.व्‍ही.पाटील
                      जाबदार क्र.१२ तर्फे +ìb÷. श्री पी.व्‍ही.हरुगडे
                      जाबदार क्र.८,, १० व १४ तर्फे +ìb÷. श्री के.बी.शिंदे
 
   नि का ल प त्र
 
द्वारा- मा. सदस्‍या- गीता घाटगे
 
१.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने बॉण्‍ड अन्‍वये गुंतविलेल्‍या रकमा परत दिल्‍या नाहीत म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार निखिल नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.सांगली  (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे पतसंस्‍था असा केला जाईल) यांचेकडे काही रकमा गुंतविलेल्‍या होत्‍या. यातील दोन्‍ही बॉण्‍डच्‍या मुदती पूर्ण झाल्‍या आहेत.  तक्रारदारांनी गुंतविलेल्‍या रकमांची पतसंस्‍थेकडे मागणी केली असता पतसंस्‍थेने ती देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्‍याला रकमा देवविण्‍यात याव्‍यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्‍वये एकूण ५ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
 
२.    प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र. १,,,,,, ११ व १३ यांचेवर मंचाच्‍या नोटीसीची बजावणी होऊनसुध्‍दा ते प्रस्‍तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्‍यांचेविरुध्‍द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्‍यात आले. 
 
३.    प्रस्‍तुत प्रकरणी जाबदार क्र.४,,, १०, १२ व १४ यांचेवर मंचाच्‍या नोटीसीची बजावणी झालेवर त्‍यांनी विधिज्ञांमार्फत हजर होवून स्‍वतंत्रपणे त्‍यांचे म्‍हणणे प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केले.
जाबदार क्र.४ यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदारांचा तक्रारअर्ज अमान्‍य केलेला आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार ते सदरहू पतसंस्‍थेचे संचालक नव्‍हते. सदरहू पतसंस्‍थेवर सध्‍या प्रशासकाची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. जाबदार क्र.४ हे या पतसंस्‍थेचे संचालक नाहीत. याबाबत त्‍यांनी उपनिबंधक सहकारी संस्‍था मिरज यांचेकडे अर्ज केलेला होता. या अर्जावर सुनावणी होवून जाबदार क्र.४ हे या संस्‍थेचे संचालक नसल्‍याचा निष्‍कर्ष काढण्‍यात आलेला आहे. त्‍यामुळे जाबदार क्र.४ हे तक्रारदारांच्‍या ठेवीसाठी जबाबदार ठरत नाहीत असे त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणे मांडलेले आहे. आणि म्‍हणून तक्रारदारांचा तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी विनंती त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये केली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयर्थ त्‍यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करुन नि.२६ अन्‍वये उपनिबंधक सहकारी संस्‍था मिरज यांचेकडील दि.८/१/२००७ रोजीचे पत्र प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केले आहे. 
      नि.२० अन्‍वये जाबदार क्र.१२ यांनी त्‍यांचे म्‍हणणे दाखल केले. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये देखील त्‍यांनी ते निखिल नागरी सहकारी पतसंस्‍थेचे संचालक नसलेचे नमूद करुन ते संचालक नसल्‍याबाबतचा उपनिबंधक सहकारी संस्‍था मिरज यांचा दाखलाही त्‍यांना मिळालेला आहे असे त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यात नमूद केलेले आहे आणि या कारणामुळे त्‍यांना प्रस्‍तुत प्रकरणी जबाबदार धरणेत येवू नये अशी विनंती त्‍यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये केली आहे. म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठय‍र्थ त्‍यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करुन नि.२३ अन्‍वये उपनिबंधक सहकारी संस्‍था मिरज यांचे दि.१४/३/२००७ रोजीचे पत्र प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केले आहे.
      जाबदार क्र.८,, १० व १४ यांनी त्‍यांचे म्‍हणणे नि.२७ अन्‍वये दाखल केले. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये त्‍यांनी तक्रारदारांचा तक्रारअर्ज व त्‍यातील सर्व कथने अमान्‍य केली आहेत. तसेच अन्‍य जाबदारांप्रमाणेच संस्‍थेची सर्व चौकशी करुन उपनिबंधक मिरज यांनी त्‍यांचा अहवाल सादर केल्‍याचे व त्‍या अहवालामध्‍ये सदरहू जाबदार हे संचालक नसल्‍याचा निष्‍कर्ष काढण्‍यात आल्‍याचे नमूद केले आहे. आणि म्‍हणून त्‍यांनी देखील तक्रारदारांचा तक्रारअर्ज खर्चासहीत नामंजूर करण्‍याची विंनती केली आहे. तक्रारअर्जाचे पृष्‍ठयर्थ त्‍यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
 
४.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार पतसंस्‍थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  
सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र.२ ते १४ यांना  पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने ज्‍या पतसंस्‍थेमध्‍ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्‍थाच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो.
 
५.    प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारअर्जामध्‍ये दोन्‍ही बॉण्‍ड ठेवपावत्‍यांतील रकमेवर आजअखेर कोणतेही व्‍याज मिळालेले नाही, तसेच ठेवीत गुंतविलेल्‍या रकमेपैकी कोणतीही रक्‍कम त्‍यांना मिळालेली नाही असे नमूद केलेले आहे. या बॉण्‍डच्‍या मुदती संपलेल्‍या आहेत.  त्‍यामुळे मुदतीनंतर मिळणा-या रकमा मुदत संपल्‍याच्‍या दुस-या दिवशीपासून १० टक्‍के व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहेत. हे व्‍याजदर मंजूर करीत असताना तक्रारदारांनी गुंतविलेल्‍या रकमांची मागणी करुन देखील पतसंस्‍थेने त्‍या न देवून तक्रारदारांना दूषित सेवा पुरविल्‍याची बाब लक्षात घेणेत आलेली आहे.
 
सबब, मंचाचा आदेश की,
दे
 
१. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना निखिल बॉण्‍ड क्र.३२५ मधील रक्‍कम रु.४०,०००/- (चाळीस हजार फक्‍त) दि.२६/५/२००९ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
२. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना निखिल बॉण्‍ड क्र.३५० मधील रक्‍कम रु.४०,०००/- (चाळीस हजार फक्‍त) दि.१/१२/२०१० पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
३. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.२,०००/- (दोन हजार फक्‍त) अदा करावेत.
 
४. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.२७/९/२०११ पर्यंत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
 
सांगली
दिनांकò: १२/०८/२०११    
                  (गीता सु.घाटगे)                     (अनिल य.गोडसे÷)
                       सदस्‍या                                       अध्‍यक्ष           
                          जिल्‍हा मंच, सांगली                      जिल्‍हा मंच, सांगली.  
       
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /   /२०११
      VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /    /२०११
 
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[ Geeta Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.