नि. 38
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 3/2010
-----------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 01/01/2010
तक्रार दाखल तारीख : 02/01/2010
निकाल तारीख : 20/06/2013
-----------------------------------------------------------------
1. बाबासो देवाप्पा वसगडे
वय वर्षे 62, धंदा– नोकरी
2. सौ मंगल बाबासो वसगडे
वय वर्षे 52, धंदा– घरकाम
3. रामदास बाबासो वसगडे
वय वर्षे 22, धंदा– शिक्षण
4. उध्दवकुमार बाबासो वसगडे
वय वर्षे 19, धंदा– शिक्षण
सर्व रा. कसबे डिग्रज, ता.मिरज जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. निखिल नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
मुख्य शाखा सांगली, शाहू उद्यानजवळ,
राधाकृष्ण वसाहत. सांगली तर्फे प्रशासक
2. श्री जगन्नाथ पांडुरंग मारे,
निखिल भवन, राधाकृष्ण वसाहत, सांगली
3. श्री वसंत दत्तात्रय माळी,
1106, निळकंठ नगर, हरीपूर रोड, सांगली
4. श्री अर्जुन प्रल्हाद घाटुळे,
विजयनगर, मिरज रोड, सांगली
5. श्री रविंद्र सदाशिव आडके
केमिस्ट भवनजवळ, गणेशनगर, सांगली
6. श्री प्रकाश नारायण नागावकर
प्रकाश आर्ट, कोल्हापूर रोड, सांगली
7. श्री सुनिल महादेव फुटाणे,
तांदुळ मार्केट, मिरज
8. श्री शिवाजी दत्तू पिंपळे
कसबे डिग्रज, ता.मिरज जि. सांगली
9. श्री गजानन बाबूराव गावडे
कसबे डिग्रज, ता.मिरज जि. सांगली
10. श्री राजेश आण्णा देवर्षी,
गाळा नं.9, कृष्णात्रय कॉम्प्लेक्स,
वखारभाग, सांगली
11. श्री महावीर आण्णा सकळे
मु.पो. नांद्रे, ता.मिरज जि. सांगली
12. श्री वसंत आण्णा कोळी,
पवनकुमार प्रिंटर्स, शास्त्री रोड, सांगली ..... जाबदार
तक्रारदारतर्फे – अॅड ए.बी.जवळे
जाबदार क्र.5 तर्फे – अॅड एच.आर.पाटील
जाबदार क्र.1 ते 4, 6, 8 ते 12 – एकतर्फा
जाबदार क्र.7 – वगळले
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. तक्रारदार यांनी प्रस्तुती तक्रार जाबदारांनी मुदत संपल्यानंतरही मुदत ठेव पावतीमध्ये गुंतविलेली रक्कम परत केली नाही म्हणून या मंचासमोर दाखल केली आहे.
2. सदरचे तक्रारीचा थोडक्यात तपशील असा -
तक्रारदाराने जाबदार क्र.1 ते 12 या पतसंस्थेमध्ये स्वतःसह, पत्नी-मुलांच्या नांवे मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक केलेली होती. त्याचा तपशील खालीलप्रमाणे -
अ.क्र. |
पावती क्र. |
रक्कम रु. |
ठेवलेली तारीख |
परतीची तारीख |
1 |
3345 |
15000 |
19/10/2004 |
19/04/2005 |
2 |
3638 |
5000 |
29/01/2005 |
28/04/2005 |
3 |
3616 |
12000 |
13/12/2004 |
03/05/2005 |
4 |
3348 |
5000 |
12/10/2004 |
02/06/2005 |
5 |
3817 |
1500 |
19/04/2005 |
03/06/2005 |
6 |
3615 |
4000 |
06/12/2004 |
03/06/2005 |
7 |
3650 |
1000 |
21/02/2005 |
07/04/2005 |
सदर गुंतवणूकीची मुदत संपल्यानंतर तक्रारदाराने जाबदारकडे वेळोवेळी करुनही जाबदारांनी रक्कम दिलेली नाही. ठेवपावत्यांची रक्कम विहीत मुदतीत न देणे ही सेवेतील त्रुटी आहे असे तक्रारदाराचे म्हणणे असून ठेव पावत्यांची व्याजासह रक्कम व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व प्रकरण खर्च रु.5,000/- इ. मागण्या प्रस्तुत अर्जात जाबदारांनी केल्या आहेत. मूळ तक्रारअर्जातील जाबदार क्र.7 यांना नि.33 वरील आदेशानुसार तक्रारदार यांनी वगळले आले आहे.
3. आपले म्हणणेचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने अर्जासोबत स्वतःचे शपथपत्रासह नि.5 वर एकूण 8 कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. जाबदार क्र. 1 ते 4, 6, 8 ते 12 यांनी आपले म्हणणे सादर केले नसलेने तसेच उपस्थिती दर्शविली नसलेने नि.क्र.1 वर त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आलेला आहे.
5. जाबदार क्र.5 यांनी नि.20 वर आपले लेखी कथन सादर केले आहे. त्यामध्ये तक्रारदाराच्या तक्रारीतील सर्व मुद्दे फेटाळून लावले आहेत. आपण संचालक कधीही नव्हतो असे कथन केले आहे. जाबदार क्र.5 संचालक नसलेबाबत उपनिबंधक सहकारी संस्था मिरज यांनी दि.8/7/2007 रोजी आदेश केला आहे. त्यामुळे जाबदार क्र.1 संस्थेच्या कोणत्याही कामकाजाची कोणतीही जबाबदारी जाबदार क्र.5 यांचेवर येत नाही. सबब, जाबदार क्र.5 यांना वगळण्यात यावे असे म्हणणे जाबदार क्र.5 यांनी मांडलेले आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, लेखी म्हणणे, कागदोपत्री पुरावे यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आलेला आहे.
अ.क्र. |
मुद्दे |
उत्तरे |
1 |
तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत का ? |
होय |
2 |
जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? |
होय |
3 |
काय आदेश ? |
खालीलप्रमाणे |
- कारणमिमांसा -
मुद्दा क्र.1 ते 3
1. तक्रारदाराने मुदत ठेवीमध्ये रक्कम गुंतविलेली होती त्याबाबत नि.क्र. 35 सोबत रक्कम भरलेल्या ठेवपावत्यांच्या सत्यप्रती जोडलेल्या आहेत. यावरुन तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक-सेवादार नाते निर्माण झाल्याचे स्पष्ट होते.
2. जाबदार क्र.1 ते 12 यांनी (जाबदार क्र.7 वगळून) तक्रारदाराच्या मुदत ठेवीची मुदत पूर्ण होऊनसुध्दा तक्रारदाराच्या रकमेची परतफेड केलेली नाही ही सेवेतील त्रुटी आहे असे स्पष्टपणे दिसून येते.
3. जाबदार क्र.5 यांनी नि.क्र.22 सोबत उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज यांचा दि.8/3/2007 रोजीचा आदेश दाखल केला आहे. त्यामध्ये जाबदार क्र.5 हे जाबदार क्र.1 संस्थेचे संचालक असल्याचे निदर्शनास येत नाही असे नमूद करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे जाबदार क्र.5 यांनी आपले लेखी म्हणणे देऊन आपण जाबदार क्र.1 संस्थेचे संचालक नव्हतो असे कथन केले असून ते मंचाला मान्य करावे लागत आहे. त्यामुळे तक्रारदाराने क्र.5 वर त्यांना केलेले जाबदार म्हणून वगळण्यात येत आहे.
4. जाबदार क्र.1 ही संस्था असून जाबदार क्र.2 ते 12 तिचे संचालक आहेत. संस्थेची पूर्ण आर्थिक जबाबदारी, त्यातील व्यवहार हे संचालक मंडळामार्फत होत असतात. त्यामुळे तक्रारदाराने गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह वैयक्तिक अथवा संयुक्तपणे देणेची जबाबदारी जाबदार क्र.1 ते 12 (जाबदार क्र.5 व 7 वगळून) आहे. त्याप्रमाणे मानसिक शारिरिक त्रासापोटी नुकसान तसेच प्रकरण खर्चापोटी तक्रारदारास रक्कम मिळणे क्रमप्राप्त आहे असे मंचाला वाटते. सबब आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदार क्र.1 ते 12 (जाबदार क्र.5 व 7 वगळून)यांनी वैयक्तिक वा संयुक्तरित्या ठेवपावती क्र.3345, 3616, 3348, 3817, 3615, 3650 ची पावतीमध्ये नोंद केलेल्या व्याजासह होणारी ठेवरक्कम ठेवसमाप्ती तारखेपासून द.सा.द.शे.8.5 टक्के व्याजदराने तक्रारदारास अदा करावी.
3. शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.5,000/- जाबदार क्र.1 ते 12 (जाबदार क्र.5 व 7 वगळून) यांनी वैयक्तिक वा संयुक्तपणे तक्रारदारास अदा करावेत.
4. जाबदार क्र.1 ते 12 (जाबदार क्र.5 व 7 वगळून) यांनी वैयक्तिक वा संयुक्तपणे तक्रारदार यांना प्रकरण खर्चापोटी रुपये 2,000/- अदा करावेत.
5. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी निकाल जाहीर झालेल्या तारखेपासून 45 दिवसांत
करावी.
6. जाबदार यांनी विहीत मुदतीत आदेशाची पुर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 20/06/2013
( वर्षा शिंदे ) ( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या सदस्य अध्यक्ष