Maharashtra

Nagpur

CC/11/334

Shri Shailendra Bhomraj Chhajed - Complainant(s)

Versus

Nikhar Travels Through Director Shri Sudhir Sampatlal Parakh - Opp.Party(s)

Adv. P.K. Katariya

23 Feb 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/334
 
1. Shri Shailendra Bhomraj Chhajed
Golchha Marg, Sadar,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Nikhar Travels Through Director Shri Sudhir Sampatlal Parakh
2nd floor, VCA Complex, Near Gate No. 8, VCA Chowk, Civil Lines
Nagpur 440001
Maharashtra
2. Chairman, Pears International Tours and Travels Ltd.
1002, Rohit House, 3, Tolstoy Marg,
New Delhi
New Delhi
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv. P.K. Katariya, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

मंचाचे निर्णयान्‍वये सौ. जयश्री येंडे, सदस्‍या.
 
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 23/02/2012)
1.                 तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे फ्लाईट तिकिटांची आणि सिंगापूरची सर्वोत्‍तम हॉटेल सिटी क्‍लब पी.आय.टी. लिमिटेडची बुकींग केली. गैरअर्जदार क्र. 1 ने गैरअर्जदार क्र. 2 मार्फत सिंगापूरच्‍या सिटी क्‍लब पी.आय.टी. लिमिटेडची बुकींग करुन दिली. सदर बाबी संदर्भातील शुल्‍क तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार यांना अदा केले. ठरल्‍याप्रमाणे तक्रारकर्ता आपल्‍या पत्‍नीसोबत दि.22.02.2011 रोजी सिंगापूर येथे हॉटेल सिटी क्‍लब पी.आय.टी. लिमिटेडची येथे ठरलेल्‍या वेळेप्रमाणे पोहोचला असता सदर हॉटेलच्‍या मॅनेजरने सदर हॉटेलमध्‍ये रुम खाली नसल्‍याचे सांगितले. त्‍यामुळे तक्रारकर्ता त्‍याच्‍या पत्‍नीसह जवळच्‍या निकृष्‍ट हॉटेल ‘हॉटेल क्‍लासिक’मध्‍ये नॉन-व्‍हेज हॉटेलमध्‍ये पर्याय नसतांना थांबावे लागले व इतर ठिकाणी नाश्‍ता, दुपारचे व रात्रीचे जेवण, चहा पाण्‍याकरीता जावे लागले. त्‍याकरीता तक्रारकर्त्‍यास बराच पैसा खर्च करावा लागला व सोबत मानसिक त्रासही सहन करावा लागला. तक्रारकर्त्‍याने सदर बाबीसंदर्भात गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे तक्रार करुनही त्‍यांनी त्‍याची दखल घेतली नाही. ही गैरअर्जदार यांनी शुल्‍क घेऊन कराराप्रमाणे ठरलेल्‍या हॉटेलमध्‍ये ठरलेल्‍या सुविधेसह व्‍यवस्‍था न करुन सेवेतील कमतरता दिली, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार दाखल केलेली आहे व तक्रारकर्त्‍याला आलेला खर्च रु.20,000/- हा 24 टक्‍के व्‍याजासह परत मिळावा, मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.4,70,000/- व नोटीसचा खर्च रु.10,000/- मिळावे अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
2.          सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविली असता गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी लेखी उत्‍तर दाखल केले.
3.          गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्‍यांनी सिंगापूर दौ-याचे आयोजन केल्‍याची मान्‍य केले आहे. परंतू तक्रारकर्त्‍याचे इतर आरोप अमान्‍य केले. गैरअर्जदार क्र. 1 यांचे मते ते बुकींग एजंट आहेत. त्‍यांनी सदर दौ-या संदर्भात गैरअर्जदार क्र. 2 यांच्‍याशी संपर्क साधून तक्रारकर्त्‍याचा दौरा निश्चित करुन दिला. तसेच त्‍या संबंधाज तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र. 2 यांच्‍यामध्‍ये चर्चा घडवून आणली. चर्चेनुसार दौरा निश्चित करण्‍यात आला व दि.02.02.2011 रोजी दौ-याची निश्चिती तक्रारकर्त्‍याला गैरअर्जदार क्र. 2 यांनी कळविली. तसेच त्‍यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या चर्चेनुसार गैरअर्जदार क्र. 2 यांनी सिंगापूरची सर्वोत्‍तम हॉटेल सिटी क्‍लब पी.ई.टी.लिमिटेडचे बुकींग केले. त्‍यानुसार गैरअर्जदार क्र. 2 कडे गैरअर्जदार क्र. 1 मार्फत रक्‍कम वळती करण्‍यात आली. तक्रारकर्ता पत्‍नीसोबत सिंगापूर गेला असता पुढे काय घडले याची माहिती गैरअर्जदार क्र. 1 यांना देण्‍यात आली नाही. तक्रारकर्त्‍याने सरळ गैरअर्जदार क्र. 2 सोबत संपर्क साधला. तक्रारकर्ता नागपूरला परत आल्‍यानंतर त्‍याने सदर बाबी संदर्भात गैरअर्जदार क्र. 1 यांना सांगितल्‍यावर सदर तक्रार गैरअर्जदार क्र. 2 यांना ई-मेलद्वारे कळविण्‍यात आली. वास्‍तविक सिंगापूर दौ-याची पूर्ण व्‍यवस्‍था गैरअर्जदार क्र. 2 मार्फत करण्‍यात आली होती. त्‍यासंबंधातील खर्च तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 2 यांना दिलेला होता. याचा उल्‍लेख तक्रारीत तक्रारकर्त्‍याने केलेला आहे. तक्रारकर्त्‍याने केलेली मागणी ही अवास्‍तव असून, त्‍यांच्‍या सेवेत कोणतीही त्रुटी नाही, म्‍हणून तक्रार खारीज करण्‍याची मागणी केलेली आहे.
 
4.          गैरअर्जदार क्र. 2 यांच्‍या कथनानुसार, तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍या पत्‍नीला आवश्‍यक पक्षकार म्‍हणून सामिल केलेले नाही. गैरअर्जदार क्र. 2 च्‍या कथनानुसार, तक्रारकर्त्‍याने प्रवासासंदर्भात गैरअर्जदार क्र. 1 यांचेशी करार केला होता. सिंगापूर येथे असतांना गैरअर्जदाराद्वारे संबंधित व्‍यक्‍तींचा फोन क्रमांक दिलेला होता. त्‍याचा तक्रारकर्त्‍यास दिलेल्‍या कागदपत्रात उल्‍लेख आहे. परंतू तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍या व्यक्‍तींशी संपर्क साधला नाही. तक्रारकर्त्‍याने तेथील सोई सुविधांचा संपूर्ण लाभ घेतलेला आहे. वास्‍तविक तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 1 सोबत सिंगापूर दौ-याचे आयोजन केले. संपूर्ण रक्‍कमही गैरअर्जदार क्र. 1 यांना दिलेली आहे. गैरअर्जदार यांचा कुठल्‍याही संदर्भात प्रत्‍यक्ष व्‍यवहार हा तक्रारकर्त्‍याशी केलेला नव्‍हता. गैरअर्जदार क्र. 2 यांनी सिंगापूर येथील हॉटेल सिटी क्‍लबमध्‍ये रुम आधीच आरक्षीत केली होती. दि.22.02.2011 रोजी तक्रारकर्ते सदर हॉटेलमध्‍ये पोहोचले असता सदर हॉटेलमधील 3 रुमचे ए.सी.चे युनिट खराब झाल्‍याने दुसरी जागा उपलब्‍ध नसल्‍याने हॉटेल प्रबंधकांनी तक्रारकर्त्‍यांची गैरसोय होऊ नये म्‍हणून त्‍याच दर्जाच्‍या सदर हॉटेलच्‍या बाजूच्‍या हॉटेल क्‍लासिक मध्‍ये तक्रारकर्त्‍याची व्‍यवस्‍था करुन देत असल्‍याचे सांगून तक्रारकर्त्‍यास सदर रुम बघून घेण्‍यास सांगितले. तक्रारकर्त्‍यास सदर रुम पसंत पडल्‍यामुळे व तक्रारकर्त्‍याच्‍या निर्णयाने सदर हॉटेलमध्‍ये तक्रारकर्त्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. तक्रारकर्त्‍याने नाश्‍ता हॉटेल सिटी क्‍लबमध्‍येच घेतला. हॉटेल सिटी क्‍लब व हॉटेल क्‍लासिक दोन्‍ही हॉटेल बजट हॉटेल असून तक्रारकर्त्‍याचे बुकींगसुध्‍दा बजट हॉटेलमध्‍ये होते. तसेच गैरअर्जदार क्र. 1 द्वारे गैरअर्जदार क्र. 2 यांना असे कळले की, संपूर्ण दौ-याच्‍या खर्चाबद्दल तक्रारकर्त्‍याने केवळ 200 डॉलरचा भरणा गैरअर्जदार क्र. 1 कडे केलेला होता. तक्रारकर्त्‍याने ही बाब तक्रारीत जाणूनबुजून नमूद केली नाही. तसेच तक्रारकर्ता जैन समाजाचा शुध्‍द शाकाहारी आहे याची कुठलीही माहिती तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 2 यांना दिली नाही. तसेच दुपारचे जेवण, चहापाणी यागोष्‍टी गैरअर्जदार क्र. 2 यांनी दिलेल्‍या पॅकेजमध्‍ये समाविष्‍ट नव्‍हत्‍या. तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र. 2 यांचा ग्राहक नाही. सदर तक्रार खोटी असून ती खारीज करण्‍याची मागणी गैरअर्जदार क्र. 2 यांनी केलेली आहे.
 
5.          सदर प्रकरण युक्‍तीवादाकरीता आल्‍यावर, तक्रारकर्त्‍यांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केला. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचा युक्‍तीवाद त्‍यांच्‍या वकिलांद्वारे ऐकला. तसेच मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
-निष्‍कर्ष-
6.          प्रकरणातील एकंदर वस्‍तूस्थितीचा विचार करता, मंचाचे असे निदर्शन आले की, तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या व पत्‍नीच्‍या नावाचे तिकिटांचे आणि सिंगापूर हॉटेल सिटी क्‍लब पी.ई.टी.चे बुकींग केले होते. गैरअर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 2 मार्फत सिंगापूरच्‍या सदर सिटी क्‍लब हॉटेलचे बुकींग तक्रारकर्त्‍यास करुन दिले. त्‍याकरीता लागणारे शुल्‍क तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 1 यांना अदा केले होते, ही बाब दस्‍तऐवज क्र. 20 वरील तक्रारकर्त्‍याचे शपथपत्रावरुन व गैरअर्जदार क्र. 2 यांचे लेखी उत्‍तर दस्‍तऐवज क्र. 12 वरुन स्‍पष्‍ट होते.
 
7.          तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा महत्‍वाचा मुद्दा हा आहे की, गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्‍यांचे कराराप्रमाणे व माहिती पत्रिकेत नमूद केल्‍याप्रमाणे सिंगापूर येथील वास्‍तव्‍याकरीता तेथील हॉटेल सी.टी.क्‍लब पी.आय.टी.लिमिटेड हॉटेलमध्‍ये व्‍यवस्‍था करुन दिली नाही. तक्रारकर्त्‍याने सदर हॉटेलमध्‍ये कंफरमेंशन व्‍हाऊचर दाखवूनही सदर हॉटेलमध्‍ये त्‍यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या राहण्‍याची व्‍यवस्‍था करुन दिली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास दुस-या हॉटेलमध्‍ये थांबावे लागले. गैरअर्जदार क्र. 2 यांचे मते सदर हॉटेलमध्‍ये वातानुकुलीत यंत्रणा (एअर कंडीशन) ही खराब झाल्‍यामुळे, तक्रारकर्त्‍याची व्‍यवस्‍था त्‍याच दर्जाच्‍या दुस-या हॉटेलमध्‍ये करण्‍यात आली. परंतू तक्रारकर्ता हा ठरलेल्‍या वेळेप्रमाणे त्‍याच्‍या पत्‍नीसोबत 22.02.2011 रोजी सिंगापूर येथे सदर हॉटेलमध्‍ये गेला असता तेव्‍हा तसे कारण संबंधित हॉटेलच्‍या मॅनेजरने सांगितल्‍याचे दाखल दस्‍तऐवजावरुन दिसून येत नाही. त्‍यामुळे गैरअर्जदार यांचे हे म्‍हणणे या मंचाला मान्‍य करता येत नाही. पर्यायाने गैरअर्जदार क्र. 1 यांनी ठरलेल्‍या हॉटेलमध्‍ये राहण्‍याची व्‍यवस्‍था केलेली नव्‍हती ही गैरअर्जदार क्र. 1 यांची कृती सेवेतील कमतरता आहे.
 
8.          एखाद्या व्‍यक्‍तीने आपल्‍या पत्‍नीसोबत परदेशातील कार्यक्रम ठरविल्‍यानंतर वेळेवर झालेल्‍या फेरबदलामुळे त्‍याला होणा-या मानसिक त्रासाचे गांभिर्य निश्चितच गंभीर आहे. तसेच तक्रारकर्ता हा जैन समाजाचा असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विशिष्‍ट हॉटेल बुक केले होते. ही बाबसुध्‍दा लक्षात घ्‍यायला पाहिजे. तक्रारकर्त्‍याने आपल्‍या कथनामध्‍ये म्‍हटले की, त्‍याला नाश्‍ता व जेवणाकरीता, चहापाण्‍याकरीता दुस-या हॉटेलमध्‍ये जावे लागले. परंतू दस्‍तऐवजावरील पावतीवरुन तक्रारकर्ता व त्‍याच्‍या पत्‍नीने नाश्‍ता हॉटेल सिटी हब हॉटेलमध्‍ये घेतल्‍याचे दिसून येते. तसेच ठरलेल्‍या कराराप्रमाणे सदर हॉटेलमध्‍ये एक दिवसाचे वास्‍तव्‍य व सकाळचा नाश्‍ता ठरलेला होता हे दाखल दस्‍तऐवजावरुन(पृष्‍ट क्र. 44) दिसून येते. त्‍याप्रमाणे नाश्‍त्‍याची सोय गैरअर्जदार यांनी सदर हॉटेलमध्‍ये केल्‍याचे दिसून येते.
 
9.          इतर बाबतीत गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपला करार पूर्ण केलेला दिसून येतो व त्‍याबाबतीत तक्रारकर्त्‍यांची तक्रारही दिसून येत नाही. प्रकरणातील सादर केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन तक्रारकर्त्‍याचा व्‍यवहार हा गैरअर्जदार क्र. 1 यांचेशी झालेला दिसून येतो. तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र. 2 यांचा प्रत्‍यक्ष व्‍यवहार झाल्‍याचे दाखल दस्‍तऐवजावरुन दिसून येत नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या नुकसानीकरीता गैरअर्जदार क्र. 2 यांना जबाबदार धरता येणार नाही. वरील विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.  
 
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदार क्र. 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला नुकसान  भरपाईबाबत रु.10,000/- द्यावे व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.3,000/- द्यावे.
3)    गैरअर्जदार क्र. 2 यांचेविरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.
4)    सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 यांनी आदेशाची प्रत     मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.  
 
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.