Maharashtra

Nagpur

CC/184/2019

MRS SUPRIYA JAISWAL - Complainant(s)

Versus

NGDA ELECTROMECHANICAL INDUSTRIES PVT LTD - Opp.Party(s)

SELF

20 Sep 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/184/2019
( Date of Filing : 19 Mar 2019 )
 
1. MRS SUPRIYA JAISWAL
JASMIN 303, SHIV ELITE NEAR ANNABHAU SATHE SMARK, SHANKARPUR ROAD, NAGPUR 441108
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. NGDA ELECTROMECHANICAL INDUSTRIES PVT LTD
BHIWAPURKAR CHAMBERS DR. N BHIWAPURKAR MARG OPP YASHWANT STADIUM, DHANTOLI, NAGPUR 440012
NAGPUR
MAHARASHTRA
2. LG ELECTRONICS INDIA PVT LTD
A WING, 3RD FLOOR D3, DISTRICT CENTRE SAKET, NEW DELHI 110017
NEW DELHI
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 20 Sep 2019
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा – श्री एस.आर. आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्तीने एल.जी. वॉशिंग मशिन (मॉडेल नंबर T1084WFES6B, Sr. No. 806PNWKON929). विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 यांचेकडून दिनांक १०/११/२०१८ ला विकत घेतली. जेव्‍हापासून तक्रारकर्तीने वॉशिंग मशिन चा वापर सुरु केला तेव्‍हापासूनच वॉशिंग क्‍वॉलिटी भयंकर खराब होती. आणि धुतलेल्‍या  कपड्यावर रंगाच्‍या छट्या दिसत होत्‍या. धुतलेल्‍या कपड्याची क्‍वॉलिटी कंपनीने जाहिरातीद्वारे घोषित केल्‍याप्रमाणे  Better than Handwash त्‍याप्रमाणे नव्‍हती. तक्रारकर्त्‍याने एल.जी. सर्व्हिस एल.जी. सपोर्ट इंडिया नंबर 1800-315-9999  (Reference No. RNP 181214082275 & RNP 181209038157) ला कॉल करुन दोनदा तक्रार नोंदविली.
  3. तक्रारकर्तीने त्‍यानंतर एल.जी. सर्व्हिस सोबत त्‍यांचे इमेल आय. डी. नंबर Email
  4. तक्रारकर्तीने लेखी तक्रार एल.जी. कंपनीचे मुख्‍य कार्यालयाला रजिस्‍टर्ड ए.डी. द्वारे दिनांक 15/01/2019 ला पञ पाठवून केली. परंतू तक्रारकर्तीला एल.जी. सर्व्हिस इंडिया कडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. तक्रारकर्तीने वरीलप्रमाणे तक्रार नोंद‍वुनही तक्रारकर्तीने नोंदविलेल्‍या तक्रारीचे निवारण न झाल्‍यामुळे तक्रारकर्तीने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केलेली आहे.
  1. तक्रारकर्तीचे वापरात असलेले दोषपूर्ण वॉशिंग मशिन बदलवुन त्‍याऐवजी नविन वॉशिंग मशिन देण्‍याबाबत विरुध्‍द पक्षाला आदेश द्यावे.
  2. तक्रारकर्तीला झालेल्‍या गैरसोयीबद्दल रुपये 25,000/- देण्‍याचे आदेश व्‍हावे. व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/-  देण्‍याचे आदेशित व्‍हावे.
  1. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत निशानी क्रमांक 2 वर दाखल केलेले दस्‍ताऐवज, नोटीस व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर मंचाने खालिल मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नोंदविले आहे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना मंचामार्फत नोटीस पाठवुनही ते मंचासमक्ष हजर झाले नाही करीता विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2 यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश दिनांक 4/07/2019 ला निशानी क्रमांक 1 वर पारीत करण्‍यात आला.
  3. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 कडून विरुध्‍द पक्ष क्रमांक 2 यांनी निर्मित केलेली वॉशिंग मशिन जिचा मॉडेल नंबर (मॉडेल नंबर T1084WFES6B, Sr. No. 806PNWKON929) हा असून रुपये 36,600/- एवढ्या किंमतीत दिनांक 10/11/2018 ला विकत घेतली. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक 2 वर दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. तक्रारकर्तीने विकत घेतलेल्‍या वॉशिंग मशिन मध्‍ये सुरवातीपासूनच निर्मिती दोष होता व ती व्‍यवस्थित पणे काम करीत नव्‍हती. मशिन द्वारे धुतलेल्‍या  कपड्यामध्‍ये रंगाच्‍या छटा दिसत होत्‍या. तक्रारकर्तीने वॉशिंग मशिन व्‍यवस्थित पणे काम करीत नसल्‍याबाबत तक्रारी विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना केल्‍या. तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक 2 यांना इमेल द्वारे, रजिस्‍टर्ड पोस्‍टाद्वारे तसेच ऑनलाईन तक्रारी केल्‍या परंतू विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीचे तक्रारीचे निवारण केले नाही.
  4. तक्रारकर्तीने मंचाचे अभिलेखावर तज्ञ अहवाल सादर केला असून त्‍यानूसार तक्रारीचे वापरात असलेल्‍या वॉशिंग मशिन मधुन धुतलेल्‍या कपड्याची क्‍वॉलिटी खराब आहे. सदर मशिन मध्‍ये निर्मिती दोष असून त्‍यामध्‍ये  'Lint Cleaner'  नाही आहे असे तज्ञ अहवालात नमुद केले आहे. तक्रारकर्तीने तिच्‍या  वापरात असलेल्‍या वॉशिंग मशिन मधुन धुतलेल्‍या कपड्याचे फोटो अभिलेखावर दाखल केले असून त्‍यामध्‍ये धुतलेल्‍या कपड्यावर रंगाच्‍या  छटा दिसत आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना नोटीस पाठवूनही त्‍यांनी आपल्‍या बचावात जबाब सादर केला नाही. तक्रारकर्तीने वारंवार विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना तक्रार करुनही विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचे निवारण न करता तक्रारकर्तीस दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

आदेश 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. आदेशीत करण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या वापरात असलेली वॉशिंग मशिन तक्रारकर्तीकडून परत घ्‍यावी व तक्रारकर्तीला वॉशिंग मशिन खरेदीपोटी स्विकारलेली रक्‍कम रुपये 36,600/- दिनांक 10/11/2018 पासून द.सा.द.शे. 7 टक्‍के व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्तीला प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावी.
  3. तक्रारकर्तीला मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/-  अदा करावा.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.