जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्र. 150/2008. प्रकरण दाखल तारीख. –16/04/2008. प्रकरण निकाल तारीख. –16/07/2008. समक्ष - मा.श्री.सतीश सामते. - अध्यक्ष (प्र.) श्रीमती सुजाता पाटणकर, - सदस्या तुकाराम दशरथ लोणे अर्जदार. रा. लहान ता. अर्धापूर, जि.नांदेड. विरुध्द. 1. न्यून्हेम्स इं.प्रा.लि. हैद्राबाद 10-1-127/1, मसाब टॅक, हैद्राबाद. 2. श्री गोदावरी कृषि विकास केंद्र, गैरअर्जदार अंजुमन लाईन दुकान नं.13, वजिराबाद, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील – स्वतः गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.दिलीप मनाठकर. निकालपत्र (द्वारा - मा.श्री.सतीश सामते,अध्यक्ष (प्र.) गैरेअर्जदार यांच्या व्यापारी अनूचित सेवेबददल व भेसळयूक्त बियाणे बाबत सदरची अर्जदाराची तक्रार आहे. अर्जदार हे लहान ता. अर्धापूर येथील शेतकरी आहेत व त्यांनी त्यांच्या मूलांच्या नांवे म्हणजे राहूल तूकाराम लोणे यांचे नांवे असलेली एक हेक्टर 44 आर बागायती जमिनीत गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून दि.23.1.2008 रोजी मधूबाला टरबूज बियाणे खरेदी केले होते. ते बियाणे दि.25.1.2008 रोजी शेतामध्ये लागवड केली व यानंतर कृषी तज्ञाच्या सल्ल्याने लागणारे खते, औषधी, फवारणी योग्य पेरणी केली. बियाणे कमकूवत उगवत असल्याबददल दूकानदाराला कल्पना दिली असता त्याने औषधी फवारणीचा सल्ला दिला व अर्जदाराने त्यानुसार फवारणी केली. यानंतर 50 दिवसानंतर वेली व फूले येऊ लागली व फळधारणा होऊ लागली परंतु फळाचा आकार लांबट होण्याऐवजी गोल होत राहिला याचीही कल्पना संबंधीत दूकानदाराला दिली. यानंतर गैरअर्जदारांनी सांगितले प्रमाणे करुन देखील काहीच उगवत नसलयाने गैरअर्जदार क्र.2 यांनी प्रत्यक्ष टरबूज प्लॅन्ट पाहणीची विनंती केली. यानंतर सूध्दा दूकानदार किंवा बियाणे कंपनीचा कोणताही सक्षम अधिकारी पिकाची पाहणी करण्याकरिता आला नाही. अर्जदाराच्या कूटूंबाची उपासमारीची वेळ आली आहे. शेवटी जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परीषद नांदेड यांच्याकडे लेखी स्वरुपात बियाणे भेसळयूक्त असल्याबददल तक्रार केली. याप्रमाणे शेतकी अधिकारी अर्धापूर यांनी प्रत्यक्ष त्यांच्या शेतात येऊन पाहणी केली व पंचनामा केला. अर्जदार यांचे कमीत कमी रु.1,00,000/- चे नूकसान झाले आहे तरी त्यांना गैरअर्जदाराकडून योग्य ती नूकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. गैरअर्जदारांनी पहिला आक्षेप असा घेतला आहे की, अर्जदाराच्या नांवाने कोणतीही जमीन नाही. जी जमीन कआहे ती राहूल तूकाराम लोणे यांच्या नांवाने आहे व पुसग्याच्या शेत जमीनीत पेरलेल्या किंवा झालेलया नूकसानीची मागणी करण्याचा अधिकार त्यांना नाही. अर्जदार यांनी खरेदी केलेले बियाणे हे स्वतःसाठी नसून इतरासाठी असल्याने अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होऊ शकत नाही. त्यामुळे सदरील मंचात हे प्रकरण चालणार नाही. गैरअर्जदार क्र.2 हे गैरअर्जदार क्र.1 यांचे अधिकृत विक्रेते आहेत. दि.23.1.2008 रोजी मधूबाला टरबूज बियाणे विकले आहे. गैरअर्जदार यांनी बियाण्याची लागवड करण्या बाबत माहीती सांगितलेली नाही. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे बियाण्याची लागवड केल्याप्रमाणे ते चांगल्या प्रकारे उगवले, वाढही झाली फळे लागली हे मान्य केलेले आहे. त्यामुळे मधूबाला टरबूज बियाणे हे चांगल्या प्रतीचे होते भेसळयूक्त मूळीच नव्हते. अर्जदाराने पिकाची योग्य काळजी घेतली नाही व वेळोवेळी खते किंवा औषध फवारणी केलेली नाही. गैरअर्जदार क्र.1 या कंपनीचे बियाणे जमिनीत पेरल्यानंतर 40 ते 50 दिवसानंतर फळधारणा होऊन टरबूज लांबट ऐवजी गोल आले असे म्हणणे खोटे ठरते. कारण फळाचा आकार जमिनीच्या प्रतीवर व शेतक-याने केलेल्या मशागतीवर अवंलबून असतो. गैरअर्जदारांनी पिकाची पाहणी कधीही केलेली नाही.अर्जदाराने आपल्या तक्रारीत रु.1,00,000/- मागणी केलेली आहे. परंतु अर्जदाराचे कोणते नूकसान झाले व कशा पध्दतीने झाले यांचा हीशोब सांगितलेला नाही. अर्जदाराने गैरअर्जदारांना सूचना दिली नाही किंवा कृषी अधिकारी पंचायत समिती अर्धापूर यांनी दिृ11.4.2008 रोजी जो पंचनामा केला त्याची सूचनाही दिली नाही. कृषी विकास अधिकारी जिल्हा परीषद यांच्या मार्फत तज्ञ कमिटी अहवाल पंचायत समितीने मागितला नाही. अर्जदाराने जाणूनबूजून कृषी अधिकारी जिल्हा परषिद किंवा गैरअर्जदाराच्या समक्ष पिकाची पाहणी न करता पंचायत समिती कडून अहवाल करुन घेतला. गैरअर्जदार क्र.1 यांनी उत्पादित केलेले बियाणे लॉट नंबर 568 यांची टेस्ट रिपोर्ट व बियाण्याची पडताळणी करुनच बाजरात विक्री केलेली आहे. फळाचा आकार हा मशागत, पाणी यावर अवलंबून असतो. त्यामुळे अर्जदाराची मागणी खोटी असल्या कारणाने खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी आपली साक्ष श्री. विष्णू रामभाऊ तांदळे बियाणे विक्री अधिकारी व रामजी बाबाराव कदम मालक गोदावरी कृषी विकास यांचे शपथपञ दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय नाही. 2. गैरअर्जदार यांच्या व्यापारी पध्दतीत अनूचित प्रकार आढळतो का नाही. 3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदारयांनी गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून मधूबाला टरबूज बियाणे लॉट नंबर 568 चे खरेदी केल्याबददल पूरावा म्हणून त्यांचे बिल दाखल केले आहे. या बिलावरुन बियाणे हे तूकाराम लोणे म्हणजेच अर्जदार यांनी खरेदी केले आहे असे दिसते. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्याने बियाणे त्यांच्या मूलाच्या म्हणजे राहूल तूकाराम लोणे यांच्या शेतामध्ये पेरले असे म्हटले आहे. अर्जदाराने स्वतःच्या नांवाचा असलेला 7/12 किंवा त्यांच्या मूलांच्या नांवाने असलेल्या शेताचा 7/12 दोन्हीही या प्रकरणात दाखल केलेले नाही. शिवाय 7/12 वर मधूबाला टरबूज बियाणाचा पेरा केला यांची नोंद आली असती परंतु ते दाखल न केल्यामुळे नक्की कोणाच्या शेतात बियाणे पेरले यांचा उलगडा होत नाही. अर्जदार हे आपल्या मूलाच्या नांवाने असलेल्या शेतात बियाणे पेरले असे तक्रार अर्जात उल्लेख करतात. गैरअर्जदार क्र.2 यांनी दिलेली पावतीही अर्जदार यांच्या नांवावर आहे तसेच जो पंचनामा केलेला आहे तो अर्जदार यांच्या नांवाने असलेल्या शेतात भेट दिली असता असा उल्लेख केला, अर्जदारांनी शेतीचा 7/12 दाखल केलेला नाही यामूळे सर्व अवस्था ही संभ्रमात टाकणारी आहे. म्हणून अर्जदाराच्या नांवाने शेती नसल्या कारणाने किंवा त्यांच्या मूलाच्या नांवाने शेती असल्या कारणाचा स्पष्ट पूरावा नसल्या कारणाने अर्जदार हे सेक्शन 2 (1) (डि) प्रमाणे ग्राहक होऊ शकत नाही. मूददा क्र.2 ः- अर्जदाराने जो पंचनामा दाखल केलेला आहे त्या पंचानाम्यावर कृषी अधिकारी गूणवत्ता निरिक्षक म्हणून सही केलेली आहे. या पंचनाम्यावर त्यांच्या कार्यालयाचा शिक्का किंवा कृषी अधिका-याचे नांव लिहीलेले नाही. एखादया शेतक-यास त्यांच्या बियाण्याच्या भेसळी बाबत तक्रार दाखल करावयाची असल्यास त्यांने आपली तक्रार जिल्हा कृषी अधिकारी तक्रार निवारण समिती यांच्याकडे तक्रार केली पाहिजे. या बाबत गैरअर्जदार यांचे वकिल यांनी आक्षेप नोंदविला आहे की, अर्जदाराने जो पंचनामा दाखल केलेला आहे हा जिल्हा कृषी अधिकारी तक्रार निवारण समितीचा पंचनामा नसल्या कारणाने ग्राहय धरला जाऊ नये. जिल्हा कृषी अधिकारी तक्रार निवारण समिती यांनीच पंचनामा करणे आवश्यक आहे शिवाय समितीच्या सर्व सदस्यांनी उपस्थित राहून पंचनामा त्यांच्या समोर केला पाहिजे असा यूक्तीवाद गैरअर्जदारांच्या वकिलांनी केला तो यूक्तीवाद आम्ही ग्राहय धरुन केलेला पंचनामा हा जिल्हास्तरीय समितीने केलेला नसल्यामुळे त्यांस पूरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाही. याशिवाय बियाणे भेसळयूक्त आहे असे म्हणण्याचे असेल तर त्या लॉट नंबरमधील बियाणे घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवून त्यांची चाचणी घेणे आवश्यक होते या प्रकरणात असे झालेले नाही. केवळ पंचनामा दाखल आहे. व यात ही अर्जदार यांनी काय केले यांचेच जास्त उल्लेख करण्यात आलेले आहे. नक्की पिकाची काय परिस्थिती होती यांचा परिस्थिती नमूद करण्यात आलेली नाही. फक्त फळाचा आकार हा लांबट नसून गोल आहे असे दिसते एवढेच म्हटले आहे. फळाचा आकार हा जमिनीची मशागत, खते औषधी, फवारणी यावर अवंलबून असतो फळ लांबट आले पाहिजे याबददल कोणताही पूरावा अर्जदाराने दिलेला नाही. वरील सर्व परिस्थितीजन्य पूरावावरुन गैरअर्जदार यांनी त्यांच्या सेवेत अनूचित प्रकार अवलंबला नाही हे स्पष्ट होते. म्हणून अर्जदार यांचा दावा खारीज करण्यात येतो. वरील सर्व बाबीवरुन आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो. 2. खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सोसावा. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. (श्रीमती सुजाता पाटणकर ) (श्री.सतीश सामते) सदस्या अध्यक्ष (प्र.) |