Maharashtra

Gondia

CC/03/56

HEMRAJ Ramchand Banote - Complainant(s)

Versus

New India Insurance Comany ltd. - Opp.Party(s)

Adv. Bapat

23 Sep 2004

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGAON ROAD, GONDIA
 
Complaint Case No. CC/03/56
 
1. HEMRAJ Ramchand Banote
kantktola gondia
gondia
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. New India Insurance Comany ltd.
Motwani chembar
gondia
Maharastra
2. Dena BankaBranch gondia
Gondia
Gondiya
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Smt Deshmukh PRESIDENT
 HON'ABLE MRS. Smt Dighade Member
 HON'ABLE MR. Shri Chopkar Member
 
PRESENT:
 
ORDER

 

(मंचाचे निर्णयान्‍वये सौ. व्‍ही.एन.देशमुख, अध्यक्षा)
                                      -- आदेश --
                            (पारित दिनांक 23 सप्‍टेंबर 2004)
 
अर्जदाराने सदरची तक्रार त्‍याच्‍या मयत म्‍हशीची विमा रकमेसंबंधाने दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे.
अर्जदार हा गरीब शेतकरी असून त्‍याने दुधदुभत्‍याकरिता 1 म्‍हैस आय.आर.डी.पी.योजनेअंतर्गत गैरअर्जदार-2 यांचेकडून कर्जाऊ रक्‍कम घेऊन गैरअर्जदार-1 यांचेकडे विमाकृत केली. गैरअर्जदार-2 बँकेमार्फत विमा रक्‍कम देखील दिनांक 28.01.1998 रोजी भरण्‍यात आली. सदरची म्‍हैस दिनांक 9.2.1999 रोजी मरण पावली. अर्जदाराने  गैरअर्जदार-2 बँकेकडे म्‍हशीच्‍या कानाच्‍या बिल्‍ल्‍यासह सर्व कागदपत्रे विमा कंपनीस पाठविण्‍याकरिता दाखल केली. गैरअर्जदार-2 बँकेने ही सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडे दाखल केली. गैरअर्जदार-1 विमा कंपनीने मात्र काही कागदपत्रांची पूर्तता न झाल्‍यामुळे अर्जदाराचा दावा अर्ज नामंजूर केल्‍याचे परस्‍पर बँकेला कळविले. त्‍याचा दावा अर्ज नामंजूर केल्‍याबाबत अर्जदारास कधीही सूचना देण्‍यात आली नाही अथवा कोणत्‍याही कागदपत्रांची त्‍याच्‍याकडून मागणी देखील करण्‍यांत आली नव्‍हती. अशाप्रकारे दोन्‍ही गैरअर्जदार यांनी अर्जदाराची विमा रक्‍कम मिळवून देण्‍याकरिता केलेल्‍या टाळाटाळीमुळे सेवेतील त्रुटीदायक सदर तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने विमाकृत म्‍हशीची विमा रक्‍कम सव्‍याज मागितली असून तक्रारीच्‍या खर्चादाखल रु.5000/- ची मागणी केली आहे.
आपल्‍या तक्रारीसोबत अर्जदाराने स्‍वतंत्र हलफनामा दाखल केला असून निशाणी क्रं. 4 अन्‍वये एकूण 5 कागदपत्रे मंचासमोर दाखल केली आहेत. सदर कागदपत्रामध्‍ये अर्जदाराने दोनही गैरअर्जदार यांना पाठविलेल्‍या नोटीस, त्‍यांच्‍या पावत्‍या व पोचपावत्‍या यांचा समावेश आहे.
गैरअर्जदार-1 यांनी निशाणी क्रं. 9 अन्‍वये आपले उत्‍तर मंचासमोर दाखल केले असून अर्जदाराने आवश्‍यक ती कागदपत्रे व माहिती न पुरविल्‍यामुळे त्‍याचा दावा अर्ज दिनांक 15.03.2001 रोजी नामंजूर केल्‍याचे मान्‍य केले आहे. सदर नामंजुरीचे पत्र अर्जदारास देखील दिले असून याबाबत त्‍याला माहिती नव्‍हती हे अर्जदाराचे म्‍हणणे अमान्‍य केले आहे. अर्जदाराची विमाकृत म्‍हैस दिनांक 9.2.1999 रोजी मरण पावली. त्‍याबाबतचा दावा अर्ज दिनांक 15.03.2001 रोजी नामंजूर करण्‍यात आला व अर्जदाराने दिनांक 19.9.2003 रोजी मंचासमोर तक्रार दाखल केली. सदरचा कालावधी हा 2 वर्षापेक्षा अधिक असल्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या तरतुदीनुसार कालमर्यादेत बसत नसल्‍यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज केवळ या कारणावरच खारीज करण्‍यात यावा अशी मंचास विनंती केली आहे.
आपल्‍या उत्‍तरापृष्‍ठयर्थ गैरअर्जदार-1 यांनी त्‍यांचे विभागीय व्‍यवस्‍थापक श्री. भरत रामाजी बाराहाते यांचे शपथपत्र मंचासमोर दाखल केले आहे.
गैरअर्जदार-2 देना बँक यांनी निशाणी क्रं. 14 अन्‍वये आपले उत्‍तर मंचासमोर दाखल केले असून अर्जदाराने त्‍याच्‍या बँकेकडून कर्जाऊ रक्‍कम घेऊन म्‍हैस विकत घेतल्‍याचे व ती गैरअर्जदार-1 यांचेकडे विमाकृत केल्‍याचे मान्‍य केले आहे. विम्‍यासंबंधी आवश्‍यक ती कागदपत्रे दाखल करण्‍याची जबाबदारी ही मुख्‍यत्‍वे अर्जदाराचीच असून गैरअर्जदार-2 बँकेचा अर्जदाराच्‍या विमा रकमेशी अथवा संबंधित कागदपत्रांशी कोणताही संबंध प्रस्‍थापित होत नाही अथवा अर्जदाराचा विमा दावा मंजूर होण्‍याकरिता गैरअर्जदार-2 बँकेला जबाबदार ठरविता येणार नाही असे प्रतिपादन केले आहे. गैरअर्जदार-1 विमा कंपनीने मागितलेली आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे अर्जदाराने वेळेत दाखल न केल्‍यामुळे त्‍याचा दावा अर्ज नामंजूर झाला. सदर कागदपत्रे विमा कंपनीस अर्जदारानेच वेळेत पाठविणे जरुरीचे होते. परंतु जी कागदपत्रे अर्जदाराने त्‍यांच्‍या कार्यालयात पाठविली होती, ती विमा कंपनीस त्‍वरित दाखल करण्‍यात आली. विम्‍यासंबंधीचा व्‍यवहार हा विमा कंपनी व अर्जदार यांच्‍या पुरता मर्यादित असून केवळ प्रिमिअम भरण्‍याची जबाबदारी अर्जदारातर्फे गैरअर्जदार-2 बँकेने घेतली होती. सदरचे कृत्‍य हे सद्भावनेने व अर्जदाराला सहकार्य करण्‍याच्‍या हेतूने केलेले असून कोणत्‍याही मोबदल्‍याची आकारणी अर्जदाराकडून करण्‍यात आलेली नाही असे नमूद केले असून अर्जदाराची तक्रार खर्चासहित खारीज करण्‍याची मंचास विनंती केली आहे.
आपल्‍या उत्‍तरापृष्‍ठयर्थ गैरअर्जदार-2 बँकेने निशाणी क्रं. 15 अन्‍वये एकूण 8 कागदपत्रे मंचासमोर दाखल केली आहेत. सदर कागदपत्रांमध्‍ये अर्जदार व गैरअर्जदार यांचेतील पत्रव्‍यवहार, प्रिमिअमची पावती, डिक्‍लेरेशनचे प्रमाणपत्र तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांच्‍या विद्यमान वकिलांचा युक्तिवाद मंचाने ऐकला असता अर्जदाराच्‍या वकिलांनी त्‍याचा विमा दावा अर्ज खारीज केल्‍याबाबत त्‍याला विमा कंपनीने अथवा बँकेने कधीही कळविले नव्‍हते अथवा कोणत्‍या कागदपत्रांची आवश्‍यकता होती ती कागदपत्रे दाखल करण्‍याबाबत देखील कधीही कळविले नव्‍हते असे आपल्‍या युक्तिवादात सांगितले. गैरअर्जदार-1 विमा कंपनीतर्फे त्‍यांच्‍या विद्यमान वकिलांनी अर्जदाराचा दावा अर्ज खारीज केल्‍याची प्रत तक्रारकर्त्‍यास देखील पाठविल्‍याचे मंचाच्‍या निदर्शनास आणून दिले. गैरअर्जदार-2 बँकेतर्फे त्‍यांच्‍या विद्यमान वकिलांनी आवश्‍यक ती कागदपत्रे अर्जदाराने बँकेला न पाठविल्‍याचे मंचाच्‍या निदर्शनास आणून दिले.
अर्जदार व गैरअर्जदार यांच्‍या विद्यमान वकिलांचा तोंडी युक्तिवाद, मंचासमोर दाखल केलेली सर्व कागदपत्रे, शपथपत्रे व विशेषत्‍वाने जाहिरनाम्‍याची प्रत व प्रिमिअमची पावती यांचे बारकाईने वाचन केले असता मंचाचे निकष खालीलप्रमाणे आहेत.-
अर्जदाराने आपल्‍या तक्रार अर्जात विमाकृत मयत म्‍हशीच्‍या कानाचा बिल्‍ला नंबर अथवा विमा कालावधी नमूद केला नसला तरी गैरअर्जदार-2 बँकेने निशाणी क्रमांक 15 अन्‍वये दाखल केलेल्‍या कागदपत्रावरुन पशुवैद्यकीय अधिका-यांच्‍या प्रमाणपत्रात मयत म्‍हशीच्‍या कानाचा बिल्‍ला नंबर 11569 असून विमा रक्‍कम रु.9000/- असल्‍याचे दिसून येते. तसेच जाहीरनाम्‍यामध्‍ये विमा कालावधी देखील 5.1.98 ते 4.1.2002 असा नमूद केल्‍याचे निदर्शनास येते. अर्जदाराची म्‍हैस दिनांक 9.2.1999 रोजी मरण पावल्‍यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार-2 बँकेला त्‍वरित सूचना दिल्‍याचे व आवश्‍यकत ती कागदपत्रे सुपूर्द केल्‍याचे दिसून येते. गैरअर्जदार-1 विमा कंपनीने मात्र अर्जदाराच्‍या आवश्‍यक त्‍या काही कागदपत्राअभावी त्‍याचा विमा दावा अर्ज नामंजूर केल्‍याचे दिनांक 15.03.2001 च्‍या पत्रावरुन निदर्शनास येते. कागदपत्रांचा कोणताही विशेष उल्‍लेख आपल्‍या उत्‍तरामध्‍ये गैरअर्जदार विमा कपंनीने नमूद केला नसला तरी विमा कंपनीनेच गैरअर्जदार-2 बँकेला पाठविलेलया दिनांक 29.01.2001 च्‍या पत्रावरुन त्‍यांनी जाहीरनामा क्रमांक व प्रिमिअमबाबतची माहिती मागविल्‍याचे मंचाच्‍या निदर्शनास येते. या पत्राची प्रत अर्जदारास दिल्‍याबाबत गैरअर्जदार-1 यांचे कथन असले तरी अर्जदारास ही प्रत मिळाल्‍याबाबत कोणताही पुरावा दोनही गैरअर्जदार यांनी मंचासमोर दाखल केलेला नाही. करिता अर्जदाराची तक्रार मुदतबाहय नाही असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार-1 यांनी मागणी केलेल्‍या कागदपत्रावरुन मयत विमाकृत म्‍हशीचा जाहीरनामा व प्रिमिअमची पावती ही कागदपत्रे विमा रकमेच्‍या मंजुरीकरिता आवश्‍यक होती हे मंचाला मान्‍य नाही. सर्वसामान्‍यपणे अशाप्रकारच्‍या जनावरांच्‍या विमा रकमेसंबंधात मुख्‍यत्‍वे जनावराच्‍या कानाचा बिल्‍ला व पशुवैद्यकीय अधिका-यांचे प्रमाणपत्र या कागदपत्रांची प्रामुख्‍याने दखल घेतली जाते. अर्जदाराने आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे गैरअर्जदार-2 बँकेकडे सुपूर्द केलयानंतर सदर कागदपत्रे बँकेने विमा कंपनीकडे त्‍वरित पाठविणे ही बँकेची नैतिक जबाबदारी होती व विमाकर्त्‍याचा विमा दावा अर्ज मंजूर होण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक ते संपूर्ण सहकार्य बँकेने देणे न्‍यायोचित ठरते असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
अर्जदाराने दाखल केलेली सर्व कागदपत्रे ही बँकेच्‍या ताब्‍यात असतांना अर्जदाराने ही कागदपत्रे परस्‍पर विमा कंपनीस देणे आवश्‍यक होते हे बँकेचे कथन परस्‍परविरोधी वाटते. अर्जदाराचा दावा अर्ज मंजूर होण्‍याकरिता गैरअर्जदार-1 व 2 हे सारखेच जबाबदार ठरतात असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. केवळ तांत्रिक त्रुटीकरिता अर्जदारास विमा रकमेपासून वंचित ठेवणे हे अर्जदारावर अन्‍याय करण्‍यासारखे आहे. गैरअर्जदार-2 यांनी दाखल केलेल्‍या प्रिमिअमच्‍या पावतीवरुन विमा रकमेचे आवश्‍यक ते प्रिमिअम बँकेमार्फत भरल्‍याचे मंचाच्‍या निदर्शनास येते.  
वरील सर्व कारणांकरिता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
// अं ति म आ दे श //
1                     अर्जदाराचा  तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2                     गैरअर्जदार-1 व 2 यांनी अर्जदाराची विमा रक्‍कम प्रत्‍येकी रु.4,500/- याप्रमाणे एकूण रु.9,000/- त्‍यावर दिनांक 15 .03.2001 पासून  9%व्‍याजासह आदेश पारित झाल्‍याच्‍या दिनांकापासून 1 महिन्‍याचे  आंत सामुहिकरित्‍या अर्जदाराच्‍या कर्ज खात्‍यात जमा करावेत.
3                     गैरअर्जदार -1 व 2 यांनी अर्जदारास तक्रार खर्चादाखल प्रत्‍येकी रु.500/- याप्रमाणे एकूण  रु.1000/- आदेश पारित झाल्‍याच्‍या दिनांकापासून 1 महिन्‍याच्‍या आत द्यावेत.        
 
 
[HON'ABLE MRS. Smt Deshmukh]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Smt Dighade]
Member
 
[HON'ABLE MR. Shri Chopkar]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.