Complaint Case No. CC/418/2019 | ( Date of Filing : 30 Jul 2019 ) |
| | 1. DR. SURYABHANJI MOTIRAM SATPUTE | AT POST VADHAMNA, TAH HINGNA, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. NEW SANSKRUTI LAND DEVELOPERS AND BUILDERS THROUGH PARTNER SHRI BHAGWAT SHRAWAN MESHRAM | PLOT NO 309 AND 310, GHAR SANSAR NAGAR, BHANDARA ROAD, KAPSI KHURD, NAGPUR OR ROVAL COMPLEX, FIRST FLOOR, DATTAWADI, MAIN ROAD, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | (आदेश पारित व्दारा- श्री एस.आर.आजने , मा. सदस्य) - तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
- विरुध्द पक्षाचा न्यु संस्कृती लॅंड डेव्हलपर्स अॅन्ड बिल्डर्स या नावाने भूखंड खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारकर्ता हा मुक्काम पोस्ट वडधामणा, तह. हिंगना, जिल्हा नागपूर येथील रहिवासी असून तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचे मौजा व्याहाड, पटवारी हलका क्रमांक ५१, शेत क्रमांक ६०,६१ मधील भूखंड क्रमांक ६ व ७, एकूण क्षेञफळ २००० चौरस फुट व ३००० चौरस फुट असे एकूण ५००० चौरस फुट चे दोन भूखंड एकूण रुपये ७,००,०००/- इतक्या रकमेत विकत घेण्याचा करार विरुध्द पक्षाशी दिनांक ३१/७/२०१५ रोजी केला. तक्रारकर्त्याने भूखंड क्रमांक ६ व ७ चे खरेदीपोटी करारनाम्याचे दिवशी विरुध्द पक्षाला बयाणापोटी धनादेश क्रमांक ११८३०४ अन्वये रुपये ३,५०,०००/- अदा केले. व उर्वरीत रक्कम ६ महिण्यात रुपये ५८,३३३/- दरमहा प्रमाणे किस्तीत अदा करण्याचे ठरले.
- बयाणपञ झाल्यानंतर तक्रारकर्त्याने महसूल खात्यात व इतर सरकारी कार्यालयात जावून चौकशी केली असता सदरचे शेत विरुध्द पक्षाचे नावाचे नसून ते शेतमालकाचे नावाचे आहे, असे निदर्शनास आले. सदरची बाब तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाचे निदर्शनास आणून देताच विरुध्द पक्षाने सदर शेताची त्याचे नावाचे विक्री करुन घेतल्यानंतर तक्रारकर्त्याचे नावाचे भूखंडाची विक्री लावून देण्याचे आश्वासीत केले. परंतु विरुध्द पक्षाने शेतजमिनीची विक्री स्वतःचे नावाने केली नाही व तक्रारकर्त्याने बयाणा रकमेची मागणी केली असता ती परत केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक ६/१२/२०१८ रोजी विरुध्द पक्षास आपल्या वकीलामार्फत नोटीस पाठविली व त्याव्दारे भूखंड क्रमांक ६ व ७ चे रीतसर विक्रीपञ नोंदणीकृत करुन नमूद भूखंडाचा प्रत्यक्ष ताबा, कब्जा व मालकी देण्याबाबत विनंती केली किंवा बयाणा रक्कम रुपये ३,५०,०००/- १८ टक्के व्याजासह परत करण्याची विनंती केली. परंतु विरुध्द पक्षाला नोटीस प्राप्त होवूनही त्याने नोटीसची दखल घेतली नाही. करिता तक्रारकर्त्याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केलेली आहे.
- विरुध्द पक्षाला निर्देश देण्यात यावे की, विरुध्द पक्षाने मौजा व्याहाड, पटवारी हलका क्रमांक ५१, शेत क्रमांक ६०,६१ मधील भूखंड क्रमांक ६ व ७, एकूण क्षेञफळ २००० चौरस फुट व ३००० चौरस फुट असे एकूण ५००० चौरस फुटाचे विक्रीपञ तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून द्यावे व त्याचा प्रत्यक्ष ताबा कब्जा व मालकी द्यावी किंवा तक्रारकर्त्याने बयाणापोटी दिलेली रक्कम रुपये ३,५०,०००/- ही १८ टक्के व्याजासहीत दिनांक ३१/७/२०१५ पासून तक्रारकर्त्यास देण्याचा आदेश करावा.
- मानसिक व शारीरिक ञासाकरिता व तक्रारीचा खर्च देण्याचे आदेशीत करावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना मंचामार्फत आर.पी.ए.डी. व्दारे नोटीस पाठविण्यात आले व ती प्राप्त होवूनही विरुध्द पक्ष मंचासमक्ष हजर झाले नाही. करिता विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक ३१/१०/२०१९ रोजी पारीत करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्तावेज व लेखी युक्तिवाद यांचे वाचन केल्यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्यात यावे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्ष - तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा - तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचे मौजा व्याहाड, पटवारी हलका क्रमांक ५१, शेत क्रमांक ६०,६१ मधील भूखंड क्रमांक ६ व ७, एकूण क्षेञफळ २००० चौरस फुट व ३००० चौरस फुट असे एकूण ५००० चौरस फुट चे दोन भूखंड एकूण रुपये ७,००,०००/- इतक्या रकमेत विकत घेण्याचा करार विरुध्द पक्षाशी दिनांक ३१/७/२०१५ रोजी केला. तक्रारकर्त्याने भूखंड क्रमांक ६ व ७ चे खरेदीपोटी करारनाम्याचे दिवशी विरुध्द पक्षाला बयाणापोटी धनादेश क्रमांक ११८३०४ अन्वये रुपये ३,५०,०००/- अदा केले. व उर्वरीत रक्कम ६ महिण्यात रुपये ५८,३३३/- दरमहा प्रमाणे किस्तीत अदा करण्याचे ठरले. तक्रारकर्त्याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्तावेजाचे अवलोकन केल्यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे.
- विरुध्द पक्ष यांनी सदर मिळकत अकृषक करुन देऊन विकसनाबाबत सेवा देण्याचा करार केला आहे. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या M/s Narne Construction Pvt. Ltd. Vs. Union of India and Ors. Etc. II (2012) CPJ 4 (SC) या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्तुत प्रकरण चालविण्याचे अधिकार आहे.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून भूखंड विक्रीपोटी रुपये ३,५०,०००/- स्विकारुन करारानुसार तक्रारकर्त्याला भूखंडाचे रीतसर विक्रीपञ नोंदणीकृत करुन दिले नाही किंवा तक्रारकर्त्याकडून भूखंड विक्रीपोटी स्विकारलेली रक्कम रुपये ३,५०,०००/- तक्रारकर्त्याने मागणी करुनही व्याजासह परत केली नाही. ही विरुध्द पक्षाची तक्राकर्त्याप्रती ञुटीपूर्ण सेवा असून अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करणारी कृती आहे, असे मंचाचे मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्ष क्रमांक यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारकर्त्याला मौजा व्याहाड, पटवारी हलका क्रमांक ५१, शेत क्रमांक ६०,६१ मधील भूखंड क्रमांक ६ व ७, एकूण क्षेञफळ २००० चौरस फुट व ३००० चौरस फुट असे एकूण ५००० चौरस फुटाचे रीतसर विक्रीपञ तक्रारकर्त्याकडून उर्वरीत रक्कम रुपये ३,५०,०००/- स्विकारुन करुन द्यावे व त्याचा प्रत्यक्ष ताबा, कब्जा व मालकी द्यावी. तक्रारकर्त्याने विक्रीपञाचा खर्च सोसावा.
किंवा विरुध्द पक्षाला काही तांञिक कारणास्तव तक्रारकर्त्याला विक्रीपञ करुन देणे शक्य नसल्यास विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून भूखंड विक्रीपोटी स्विकारलेली एकूण रक्कम रुपये ३,५०,०००/-, द.सा.द.शे. १८ टक्के व्याजासह तक्रारकर्त्याला प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत अदा करावे. - विरुध्द पक्षाला निर्देश देण्यात येते की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारीरिक ञासाकरिता रुपये ३०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २०,०००/- अदा करावा.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत विरुध्द पक्षाने करावी.
- उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्ते यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |