Maharashtra

Chandrapur

CC/21/208

Shri.Waman Tatoba Katkar - Complainant(s)

Versus

New Mahakali Coal Mines Authority Karmachary Sahakari Patsanstha Ltd.Chandarpur Through Manager - Opp.Party(s)

R. H. Sheikh

06 Jul 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/21/208
( Date of Filing : 15 Nov 2021 )
 
1. Shri.Waman Tatoba Katkar
Navegaon Singada,Tah.Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. New Mahakali Coal Mines Authority Karmachary Sahakari Patsanstha Ltd.Chandarpur Through Manager
Mahakali colory,Cantin chowk,Uco bank samor,Chandrapur,Tah.Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 06 Jul 2022
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

           (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)                  

      (पारीत दिनांक ०६/०७/२०२२)

 

                       

                       

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे  कलम ३५ सह कलम ३८ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता हे महाकाली कॉलरी मध्‍ये स्‍टोईंग मजदूर म्‍हणून नोकरीवर होते. दिनांक ३०/०६/२०१७ रोजी ते सेवानिवृत्‍त झाले. विरुध्‍द पक्ष ही पतसंस्‍था असून तक्रारकर्ता कोड क्रमांक १६६७९६८० अन्‍वये विरुध्‍द पक्षाचे सभासद आहे. तक्रारकर्ता यांनी दिनांक १९/११/१९९८ रोजी रुपये ४०,०००/- कर्ज घेतले व दिनांक १५/१२/२००० रोजी पूर्ण परतफेड केली व त्‍यानंतर दिनांक १५/१२/२००० रोजी  रुपये ५०,०००/- कर्ज घेतले व त्‍याची परतफेड दिनांक ३०/०१/२००६ रोजी केली. त्‍यानंतर दिनांक ४/४/२००७ रोजी पतसंस्‍थेकडून तक्रारकर्त्‍याने रुपये ९०,०००/- कर्ज घेतले व त्‍याची परतफेड दिनांक १/२/२०११ रोजी पूर्ण केली. तक्रारकर्त्‍याने दिनांक १०/०३/२०११ रोजी रुपये १,५०,०००/- कर्ज घेतले व त्‍याची सुध्‍दा परतफेड तक्रारकर्त्‍याने केली. तक्रारकत्‍याने जेव्‍हा-जेव्‍हा विरुध्‍द पक्षाकडून कर्ज घेतले तेव्‍हा- तेव्‍हा शेअर्सची रक्‍कम कपात होऊन तक्रारकर्त्‍याची रक्‍कम रुपये ६५,०००/- झाली. सदर रकमेची मागणी विरुध्‍द पक्षाकडे केली असता विरुध्‍द पक्ष यांनी रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली म्‍हणून दिनांक १८/८/२०२१ रोजी वकीलामार्फत विरुध्‍द पक्ष यांना नोटीस पाठवून रकमेची मागणी केली असता दिनांक १०/०२/२०१० रोजी कांताप्रसाद देवीदास यांनी मध्‍यम मुदती कर्ज घेतले असून त्‍यांची जमानत म्‍हणून तक्रारकर्ता यांनी जमानतदार म्‍हणून सही केली असल्‍यामुळे व कर्जदार कांताप्रसाद यांचेकडे कर्ज बाकी असल्‍यामुळे जमानतदाराचे सभासदत्‍व रद्द करता येत नाही असे नमूद करुन विरुध्‍द पक्ष यांनी रक्‍कम देण्‍यास नकार दिला. सबब तक्रारीचे कारण सतत घडत आहे. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या शेअर्सची रक्‍कम रुपये ६५,०००/- व त्‍यावर ९ टक्‍के व्‍याजासहीत रक्‍कम परत करावी व तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्‍कम रुपये २०,०००/- तसेच तक्रारीचा खर्च रुपये १५,०००/- विरुध्‍द पक्ष यांना द्यावेत.
  3. तक्रारकर्त्‍याची तक्रार स्‍वीकृत करुन विरुध्‍द पक्षाला आयोगामार्फत नोटीस काढण्‍यात आले. विरुध्‍द पक्ष यांना नोटीस तामील होऊनसुध्‍दा प्रकरणात उपस्थित न राहिल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाविरुध्‍द दिनांक ५/४/२०२२ रोजी प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.  
  4. तक्रारकर्त्‍याची तक्रार, दस्‍तावेज, शपथपञ व युक्तिवाद यावरुन  न्‍यायनिर्णयासाठी आयोगाने खालिल कारणमीमांसा व निष्‍कर्षे विचारार्थ घेण्‍यात आले. 
  1. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले आहे की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष संस्‍थेकडून तीन वेळा कर्ज घेतले व त्‍याची परतफेड केलेली आहे व त्‍यानुसार निघालेल्‍या शेअर्सची रककम रुपये ६५०००/- झाला असता तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रकमेची मागणी केली तेव्‍हा विरुध्‍द पक्ष यांनी रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली परंतु तक्रारीत दाखल दस्‍त क्रमांक ४ ची कायदेशीर नोटीस वकीलामार्फत विरुध्‍द पक्ष यांना पाठविल्‍यावर विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारीत दाखल दस्‍त क्रमांक ७ चे उत्‍तर तक्रारकर्त्‍याला पाठवून नोटीसमध्‍ये नमूद केले की, दिनांक १०/०२/२०२० रोजी श्री कांताप्रसाद देवीदास यांनी त्‍यांचेकडून मुदत ठेव कर्ज घेतले होत त्‍याचा जमानतदार म्‍हणून तक्रारकर्ता यांनी सही केली होती परंतु श्री कांताप्रसाद देवीदास यांचे कर्ज बाकी असल्‍यामुळे जमानतदाराचे सभासदत्‍व रद्द करता येत नाही तसेच तक्रारकर्ता हे सेवानिवृत्‍त झाल्‍यामुळे त्‍याचे जागी दुसरा जमानतदार नियुक्‍त करावी अशी पतसंस्‍थेने श्री कांताप्रसाद देवीदास यांना मौखीक सूचना देऊनही त्‍यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या जागी दुसरा जमानतदार नियुक्‍त न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे भाग भांडवल नियमानुसार परत करता येणार नाही. आयोगाच्‍या  मते जरी विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या नोटीसचे उत्‍तर वरीलप्रमाणे दिलेले असले तरी उपरोक्‍त नोटीसमधील इसम श्री कांताप्रसाद देवीदास यांना विरुध्‍द  पक्ष यांनी किती कर्ज देऊ केले किंवा किती कर्ज बाकी आहे किंवा पतसंस्‍थेच्‍या कोणत्‍या नियमानुसार विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचे भाग भांडवल देण्‍यास नकार दिला याबाबत विरुध्‍द पक्ष हे प्रकरणात स्‍वतः उपस्थित होऊन त्‍याचे उत्‍तर व संबंधीत दस्‍त  दाखल न केल्‍यामुळे आयोगासमोर काहीही खुलासा झालेला नाही. सबब आयोगाच्‍या मते तक्रारकर्त्‍याचे भाग भांडवल (शेअर्स) ची रक्‍कम रुपये ६५,०००/- नाकारुन विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ताप्रति दिलेली न्‍युनता आहे असे स्‍पष्‍ट होत असल्‍यामुळे आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र. २०८/२०२१ अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍यांचे शेअर्स (भाग भांडवल) ची रक्‍कम रुपये ६५,०००/- परत द्यावी.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्‍कम रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- द्यावे.
  4. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.