Maharashtra

Akola

CC/13/126

Ms.Leben Laborataries Pvt. Ltd.Akola through Haresh Nitilal Shaha - Complainant(s)

Versus

New Madhuram Cement Products - Opp.Party(s)

Rajiv Patil

14 Jan 2016

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/13/126
 
1. Ms.Leben Laborataries Pvt. Ltd.Akola through Haresh Nitilal Shaha
MIDC, Akola
Akola
M S
...........Complainant(s)
Versus
1. New Madhuram Cement Products
MIDC,Phase IV, Akola
Akola
M S
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'BLE MR. Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

मा. अध्‍यक्षा, सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला :-

 

     ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्‍वये तक्रारदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-

      तक्रारकर्ता कंपनी औषध तयार करण्‍याचा व्‍यवसाय करते व ज्‍याकरिता त्‍यांची वर नमूद केलेल्‍या पत्‍त्‍यावर वेअर हाऊस व कॉर्पोरेट कार्यालय आहे.  श्री. हरेश नितीलाल शहा या कंपनीचे कमर्शियल डायरेक्‍टर असून त्‍यांना कंपनीने ही तक्रार दाखल करण्‍याकरिता योग्‍य ते अधिकार दिलेले आहेत.

     तक्रारकर्त्‍याच्‍या फॅक्‍टरीच्‍या वेअर हाऊसमध्‍ये तक्रारकर्त्‍याला सिमेंट ब्‍लॉक पेवर्स लावायचे होते.  ज्‍याकरिता विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्ता व त्‍यांचे आर्किटेक्‍ट श्री. संदीप दोशी यांची भेट घेतली.  त्‍यावेळी विरुध्‍दपक्षाने त्‍यांना विरुध्‍दपक्षाद्वारे निर्मित केलेले सिमेंट ब्‍लॉक पेवर्स हे उत्‍कृष्‍ठ दर्जाचे असून ते अनेक वर्षे टिकतात असे सांगितले.  सबब, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला नोव्‍हेंबर 2011 मध्‍ये सिमेंट ब्‍लॉक पेवर्स देण्‍याकरिता ऑर्डर दिली.  यानंतर विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला नोव्‍हंबर व डिसेंबर 2011 मध्‍ये एकूण ₹ 1,47,758/- या रकमेचे पेवर्सचा पुरवठा केला.  तक्रारकर्त्‍याने सदर पेवर्स हे पेवर्स फिटींग कामातले तज्ञ श्री. प्रकाश उंबरकर यांच्‍याकडून त्‍यांच्‍या वेअर हाऊसमध्‍ये लावून घेतले.  मात्र 9 ते 10 महिन्‍याच्‍या अवधीतच संबंधित पेवर्स तुटायला सुरुवात झाली व पेवर्स जेथे लावले होते त्‍या रस्‍त्‍याला देखील नुकसान पोहोचले.  याबाबत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला या घटनेची तात्‍काळ माहिती दिली व विरुध्‍दपक्षाने स्‍वत: येऊन खराब झालेल्‍या पेवर्सची पाहणी करावी अशी विनंती केली.  मात्र विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीला कोणताही प्रतिसाद न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष द्वारा पुरविलेले पेवर्स काढून टाकले व त्‍यानंतर मे. कौशल टाईल्‍स, एम.आय.डी.सी. फेज-4, शिवनी कुंभारी रोड, प्‍लॉट क्रमांक एम-13, अकोला यांचेकडून नवीन पेवर्स विकत घेऊन ते श्री. उंबरकर यांचेकडून त्‍यांच्‍या वेअर हाऊसमध्‍ये लावून घेतले.  संबंधित नवीन पेवर्स लावून घेतल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याचे आर्किटेक्‍ट श्री. संदीप दोशी यांनी पुन्‍हा एकदा विरुध्‍दपक्षाला या परिस्थितीची माहिती दिली व स्‍वत: येऊन खराब झालेल्‍या पेवर्सची पाहणी करावी अशी विनंती केली.  मात्र विरुध्‍दपक्षाने या विनंतीला देखील कोणताही प्रतिसाद दिला नाही.

   अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला चांगल्‍या दर्जाच्‍या पेवर्स देण्‍याची हमी देऊन अतिशय खराब दर्जाचे पेवर्स पुरविल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला 9 ते 10 महिन्‍यामध्‍ये संबंधित पेवर्स काढून टाकून त्‍या ठिकाणी नवीन पेवर्स बसवून घ्‍यावे लागले.  यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला दिनांक 13-02-2013 रोजी या सर्व घटनेची माहिती पुन्‍हा एकदा रजिस्‍टर्ड पत्राने देऊन विरुध्‍दपक्षाला अशी विनंती केली की, त्‍यांनी खराब झालेले पेवर्स घेऊन जावे व नवीन पेवर्सची किंमत तसेच जुन्‍या व नवीन पेवर्सची फिटींग ची रक्‍कम ही तक्रारकर्त्‍याला दयावी.  मात्र हे पत्र विरुध्‍दपक्षाला प्राप्‍त झाल्‍यानंतर देखील विरुध्‍दपक्षाने आजतागायत या बाबीची दखल घेतली नाही.  सबब, तक्रारकर्त्‍याची विनंती की, तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर करावी. 1)  विरुध्‍दपक्षाने नोव्‍हेंबर व डिसेंबर 201 या कालावधीमध्‍ये ₹ 1,47,758/- या रकमेला विकलेले व संपूर्णपणे खराब झालेले पेवर्स विरुध्‍दपक्षाने परत घ्‍यावे व या पेवर्सची रक्‍कम तक्रारकर्त्‍याला परत करावी.  2) तसेच विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला खराब पेवर्स विकल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला त्‍यानंतर मे. कौशल टाईल्‍स यांच्‍याकडून तशाच प्रकारचे पेवर्स ₹ 1,77,052/- या - ₹ 1,47,758/- = ₹ 29,306/- ही रक्‍कम दयावी. 3) विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला विकलेल्‍या पेवर्सची फिटींग करुन घेण्‍याकरिता तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या खर्चाची रक्‍कम ₹ 64,978/- ही विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला दयावी.  4)   विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला विकलेले खराब पेवर्स काढून घेण्‍याकरिता व तक्रारकर्त्‍याने विकत घेतलेल्‍या नवीन पेवर्स टाईल्‍सची फिटींग करुन घेण्‍याकरिता तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या खर्चाची रक्‍कम ₹ 1,13,364/- ही विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला दयावी.  5) विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूण पेवर्स पुरवून जो अनुचित व्‍यापार केला व जी दोषपूर्ण सेवा दिली, त्‍यातून तक्रारकर्त्‍याला उद्भवलेल्‍या आर्थिक,  शारीरिक  व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई म्‍हणून विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला ₹ 1,00,000/- ही रक्‍कम दयावी.  6)  अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास दोषपूर्ण पेवर्स टाईल्‍स विकल्‍याबाबत व इतर विविध कारणांकरिता वर नमूद केल्‍याप्रमाणे एकूण ₹ 4,55,406/- ही रक्‍कम दर साल दर शेकडा 18 टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला देण्‍यात यावी.  7) तसेच तक्रारकर्त्‍याला तक्रारीचा खर्च म्‍हणून ₹ 20,000/- विरुध्‍दपक्षाकडून देण्‍याचा आदेश व्‍हावा. 

          सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 39 दस्‍तऐवज पुरावे म्हणून  जोडण्‍यात आले आहेत.

विरुध्‍दपक्षचा लेखी जवाब :-

            विरुध्दपक्ष यांनी प्रस्तुत प्रकरणात लेखी जबाब दाखल केला असून, त्यानुसार त्यांनी तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करीत असे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या तक्रारीतील मजकुरावरुन हे स्‍पष्‍ट दिसते की, तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार पेवर्स हे त्‍यांच्‍या वेअरहाऊसकरिता विकत घेतले होते.  सबब, हे स्‍पष्‍ट दिसते की, व्‍यवसायाकरिता त्‍याने पेवर्स विकत घेतले आहे. सबब, तक्रारकर्ता कोणतीही तक्रार विदयमान मंचासमक्ष दाखल करु शकत नाही.

       विरुध्‍दपक्ष हे सिमेंट ब्‍लॉक पेवर्स निर्मित करते.  सबब, विरुध्‍दपक्षाकडे तकारकर्ता आले त्‍यांना विरुध्‍दपक्ष निर्मित करीत असलेले सर्व प्रकारचे पेवर्स दाखविण्‍यात आले.  तकारकर्त्‍याने सर्व प्रकारचे पेवर्स, त्‍याची गुणवत्‍ता इत्‍यादीचा विचार करुन पेवर्स विरुध्‍दपक्षाकडून विकत घेण्‍याचे ठरविले व त्‍याप्रमाणे 60 एम.एम. चे पेवर्स विकत घेतले.  पेवर्स विकत घेतांना तक्रारकर्त्‍याने असे कळविले होते की, त्‍यांना ते पेवर्स त्‍यांच्‍या वेअरहाऊस मध्‍ये जाण्‍याच्‍या रस्‍त्‍यावर व त्‍याच्‍या आजुबाजूच्‍या परिसरात बसवायचे आहे.  हया विरुध्‍दपक्षाने ते निर्मित करीत असलेल्‍या पेवर्स बाबतीत कोणतीही व कशाही प्रकारची हमी दिलेली नव्‍हती.  सबब, तक्रारकर्त्‍याचे हे म्‍हणणे की, हा विरुध्‍दपक्षाने चांगल्‍या दर्जाची गॅरंटी दिली होती हे स्‍पष्‍टपणे खोटे आहे.  तसे म्‍हणणे त्‍यांनी फक्‍त हे प्रकरण दाखल करण्‍याचे उद्देशाने नमूद केले आहे.

     विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या मागणीनुसार त्‍यांना पेवर्स दिले.  तक्रारकर्त्‍याचे वेअर हाऊस वर कॉर्पोरेट ऑफीस जेथे आहे ती जागा काळया मातीची आहे.  सबब, पेवर्स बसविण्‍याअगोदर या जमिनीची लेव्‍हल जरुरीचे  होते.   त्‍या जमिनीची विशेष देखभाल करुन त्‍यावर धुम्‍मस इत्‍यादी करुन जागेला मजबूत करणे पेवर्स लावण्‍याअगोदर जरुरीचे असते व होते.  पेवर्स बसविण्‍याअगोदर आवश्‍यक ती विशेष योग्‍य देखभाल, लेव्‍हलिंग, धुम्‍मस इत्‍यादी न केल्‍यामुळे वाहनांच्‍या वजनाने जमीन खालीवर झाली.  जे नुकसान झाले असेल ते त्‍या कारणाने झाले.  निर्मिती दोषामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही.  तक्रारकर्त्‍याने रस्‍त्‍याच्‍या व्‍यतिरिक्‍त आजुबाजूला सुध्‍दा हया विरुध्‍दपक्षाकडून घेतलेले पेवर्स बसविले व ते पेवर्स आज रोजी सुध्‍दा बरोबर आहे व तुटलेले नाही. यावरुन हे स्‍पष्‍ट होते की, पेवर्सच्‍या निर्मीतीमध्‍ये कोणतेही निर्मिती दोष नाही. वापराचा व बसविण्‍याचा दोष असल्‍याकारणाने नुकसान होवू शकते.

    तक्रारकर्त्‍याने असे नमूद केले आहे की, त्‍यांनी मेसर्स कौशल टाईल्‍स कडून रक्‍कम ₹ 1,77,052/- चे पेवर्स विकत घेतले.  जेव्‍हा विरुध्‍दपक्षाचे पेवर्सची किंमत तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍यानुसार सुध्‍दा ₹ 1,47,758/- होती.  तेव्‍हा इतकी जास्‍त रक्‍कम देवून पेवर्स घेण्‍याची काहीही आवश्‍यकता नव्‍हती.  हयावरुन असे दिसते की, एक तर जास्‍त किंमत नमूद करुन पेवर्स तक्रारकर्त्‍याने घेतले किंवा कौशल टाईल्‍स कडून घेतलेले पेवर्स वेगळया दर्जाचे आहे. जेव्‍हा दुसरे पेवर्स पाहिले तेव्‍हा हया विरुध्‍दपक्षास असे जाणवले की, ते पेवर्स 800 एम.एम. स्‍पेसिफिकेशनचे आहे.  सबब, हे दिसते की, फक्‍त या विरुध्‍दपक्षाकडून रक्‍कम वसूल होण्‍याच्‍या उद्देशाने मागण्‍या प्रकरणात नमूद केल्‍या आहेत.   कोणत्‍याही हक्‍कास बाधा न येता, पुनश्‍च नमूद करण्‍यात येते की, ते दुस-याकडून घेतलेले पेवर्स सुध्‍दा काळी माती, जड वाहनांचा वर्दळ व वर नमूद केलेल्‍या इतर कारणाने, तुटलेले आहेत.  यावरुन हे स्‍पष्‍ट होते की, पेवर्समध्‍ये कोणतेही दोष नाही. जे काही दोष आहे, ते जागेमध्‍ये काळया माती व इतर कारणांमुळे आहे. 

      तक्रारकर्त्‍याची एकूण अवाढव्‍य रक्‍कम ₹ 4,55,406/- ची मागणी व व्‍याज स्‍पष्‍टपणे दर्शविते की, तक्रारकर्ते स्‍वच्‍छ हाताने विदयमान मंचासमक्ष आलेला नाही.  विरुध्‍दपक्ष इतक्‍या मोठया रकमेची मागणी पाहून अवाकच झाले आहेत. 

      सबब, हया सर्व बाबींवरुन हे स्‍पष्‍ट होते की, तक्रार ही खर्च व अधिकचा खर्च रक्‍कम ₹ 10,000/- बसवून खारीज करण्‍यात यावी.  विरुध्‍दपक्ष सदय परिस्थितीत प्रकरणाची संपूर्ण माहिती गोळा करु शकले नसल्‍याकारणाने या जवाबामध्‍ये दुरुस्‍ती, अधिकचा जवाब इत्‍यादी दाखल करण्‍याचे आपले अधिकार राखून ठेवीत आहेत.   

::  का णे      नि ष्‍क र्ष  ::

          या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, सोबत दाखल केलेले सर्व दस्‍तऐवज, विरुध्‍दपक्षाचा लेखी जवाब, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्‍तर, तक्रारकर्ते यांचा लेखी युक्‍तीवाद, उभयपक्षांचा तोंडी युक्‍तीवाद व उभयपक्षाने दाखल केलेले न्‍यायनिवाडे यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्‍कर्ष कारणे देवून नमूद केला.

     तक्रारकर्ते यांनी सदर तक्रारीत, विरुध्‍दपक्षाने त्‍यांना खराब दर्जाचे पेवर्स विकल्‍यामुळे नुकसान भरपाईची मागणी केली आहे तर विरुध्‍दपक्षाने सदर बाब नाकारुन तक्रारकर्ते कंपनी व्‍यवसाय करते व सदर पेवर्स हे त्‍यांच्‍या वेअरहाऊसकरिता विकत घेतले होते.  त्‍यामुळे व्‍यवसायाकरिता विरुध्‍दपक्षाकडील पेवर्स विकत घेतल्‍यामुळे तक्रारकर्ते ग्राहक या संज्ञेत बसत नाही, असा आक्षेप नोंदविला.  सदर प्रकरणात विवादीत पेवर्सच्‍या दर्जाबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, अमरावती यांचेकडील तपासणी अहवाल दाखल आहे. 

     युक्‍तीवादादरम्‍यान विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्ते यांनी विवादीत पेवर्स हे व्‍यवसायाकरिता विरुध्‍दपक्षाकडून विकत घेतल्‍यामुळे ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाअंतर्गत चालविता येणार नाही, या आक्षेपावर जोरदार युक्‍तीवाद करुन खालील न्‍यायनिवाडे दाखल केले.

  1. IV (2013) CPJ 475 (NC)  H & R Johnson (India) Ltd., & Ors. Vs. Lourdes Society Snehanjali Girl’s Hostel & Ors.

 

  1. III (1993) CPJ 333 (NC)   M/s. Kusumam Hoteld Pvt. Ltd.  Vs. M/s. Neycer India Ltd.,

 

  1. 2010 DGLC (AHC) 1931 (Supreme Court )  Birla Technologies Ltd., Vs. Neutral Glass and Allied Industries Ltd.,

 

  1. I(2010) CPJ 4 (SC) Economic Transport Organization Vs. Charan Spinning Mills (P) Ltd., & Anr.  

 

  1. State Consumer Disputes Redressal Commission UT Chandigarh

First Appeal No. 179/2012  Empire Packages (Pvt. Ltd., Chandigarh Vs.  Specific Ceramics Limited, Noida, Uttar Pradesh.

 

  1. II (1999) CPJ 167 Fineskin Leathers & Supplies Co. Pvt. Ltd., Vs. New India Assurance Co. Ltd.,  

          तक्रारकर्ते यांचा यावर असा युक्‍तीवाद आहे की, तक्रारकर्ते कंपनीने हे पेवर्स त्‍यांच्‍या फॅक्‍टरीच्‍या वेअर हाऊसमध्‍ये लावण्‍याकरिता घेतले.  तक्रारकर्ते यांचा व्‍यवसाय हा औषधे निर्मितीचा असून त्‍यामध्‍ये पेवर्सचा उपयोग त्‍याच्‍या व्‍यवसायाकरिता कोणत्‍याही प्रकारे होत नाही.  त्‍यामुळे ही तक्रार ग्राहक मंचासमोर निकालात काढता येऊ शकते.  तक्रारकर्ते यांनी त्‍यांची भिस्‍त खालील न्‍यायनिवाडयांवर ठेवली.

I – 2005 – CPJ-27 (National Commission ) Harsolia Motors Vs. National Insurance Co. Ltd.,

 

         मंचासमोर पहिला प्रश्‍न असा आहे की, पूर्ण वाद मुद्दे तपासण्‍याआधी हे पाहणे गरजेचे आहे की, तक्रारकर्ते/मे. लेबेन लेबॉरेटरीज प्रा. लि. कंपनीने विवादीत पेवर्स हे त्‍यांच्‍या व्‍यवसायाच्‍या अनुषंगाने विरुध्‍दपक्षाकडून विकत घेतले होते कां?  तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्‍या न्‍यायनिवाडयातील तथ्‍ये हातातील प्रकरणात जसेच्‍या तसे लागू पडत नाही.  परंतु, विरुध्‍दपक्षाने दाखल केलेल्‍या वरील न्‍यायनिवाडयांपैकी  State Consumer Disputes Redressal Commission UT ( Chandigarh )  First Appeal No. 179/2012  निकाल तारीख 01-02-2013 Empire Packages      ( Pvt. ) Ltd., Vs. Specific Ceramics Ltd., & Other   या निवाडयात मा. आयोग यांनी खालीलप्रमाणे सदर मुद्दा मांडला आहे.  जसे की, The first question, that falls for consideration, is, as to whether, the tiles, in question, were  purchased by the appellant/complainant Company, for commercial purpose, or not.  No doubt, such a specific objection, was taken by Opposite Party No. 1,  in its written version, that since the tiles purchased by the complainant, which is a Private Limited Company, for laying the same in its factory premises, it did not fall within the definition of a consumer, but the same was neither touched, nor adjudicated by the District Forum.   In paragraph number 1 of the complaint, the  General Manager of the Complainant Company, clearly stated that the Complainant is a Private Limited Company, and manufacturing corrugated boxes and packaging materials, at Village mahiwala.  Admittedly, the tiles were purchased by the complainant, which is a Private  Limited Company, for fixing the same, in its factory premises.  It is also an admitted case of the complainant  Company is a manufacturer of corrugated boxes and packaging materials, it is running a commercial activity, on a large scale, for commercial purpose  to gain huge profits.  The tiles, in question, as is proved from the evidence, on record, were purchased by the complainant, for fixing the same, in the factory premises i.e. commercial purpose.  There is not even a fleeting reference, in the complaint, to that effect, that the tiles were purchased by the complainant Company, for any purpose, other than commercial.  According to Section 2 (1) (d) (i) of the Act, the Consumer does not include a person, who obtains such goods for resale or for any commercial purpose.  Since, in the instant case, the complainant Company purchased the tiles for fixing the same, in its factory premises, in which the corrugated tiles and packaging materials are manufactured,  on large scale, for commercial purpose, to gain huge profits, it did not fall within the definition of a consumer.  In Economic Transport Organization Vs. Charan Spinning Mills. (P) Ltd., & Anr. I (2010) CPJ 4 (SC) the Constitution Bench of the Hon’ble Supreme Court held that if the goods are purchased or the services are availed of, by the complainant for any commercial purpose, then he does not fall within the definition of a consumer, and consequently, the consumer complaint will not be maintainable, in such cases.  In Birla Techonologies Ltd., Vs. Neutral Glass and Allied Industries Ltd.,  2011 (1) SCC-525 and Sanjay D. Ghodawat Vs.  R.R.B. Energy Ltd., IV (2010) CPJ 178 (NC) a case decided by a Full Bench of the National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi, similar principle of law, was laid down.  In M/s. MCS Computer Services (P) Ltd., Vs. M/s. Allena Auto Industries Pvt. Ltd., Revision Petition No. 3517 of 2007, decided on 14-03-2012, it was in clear-cut terms, held by the National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi, that the respondent/complainant, being a Private Limited Company and the commercial activity being carried out by it, could not be said to be for earning its livelihood, by way of self employment.  It was further held that the Private Limited Company, had to act through somebody and the question of livelihood and self employment would not arise.  The principle of law, laid down, in the aforesaid cases, is fully applicable to the instant case.  It is, therefore, held that since the complainant Company did not fall within the definition of a consumer, the consumer complaint was not maintainable.  

           वरील तथ्‍ये हातातील प्रकरणात जसेच्‍या तसे लागू पडतात म्‍हणून मंचाने बाकी मुद्दे न तपासता विरुध्‍दपक्षाचा आक्षेप गृहित धरला आहे.  अशाप्रकारे मंच हया निष्‍कर्षाप्रत आले की, तक्रारकर्ते/कंपनीने वादातील पेवर्स विरुध्‍दपक्षाकडून त्‍यांच्‍या व्‍यवसायाच्‍या फॅक्‍टरी वेअर हाऊस मध्‍ये लावण्‍याकरिता विकत घेतल्‍यामुळे ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाअंतर्गत चालविता येणार नाही.  मात्र, तक्रारकर्ते सदर तक्रार सक्षम न्‍यायालयात दाखल करु शकतील व त्‍याकरिता विरुध्‍दपक्षाने दाखल केलेल्‍या 2010 DGLS (AHC) 1931 ( Supreme Court ) Birla Technologies Ltd., Vs. Neutral Glass and Allied Industries Ltd.,  या निवाडयातील निर्देश  (B) Limitation Act – Section 14- Law of Limitation – Suit for damages or compensation qua defect in goods or deficiency in service – Exclusion of period – Period spend in prosecuting under Consumer Act – Dismissal of consumer complaint – National Commission observed that if respondent/complainant choose to file a suit for relief claimed in proceedings before Consumer Forum/Commission, they can do so according to law and in such case, they can claim benefit of Section 14 of  Limitation Act to exclude the period spend in prosecuting proceedings under Consumer Act, while computing the period of limitation for the suit – This observation remained un-assailed, Court refrained from interfering there with. ( Paras 10 & 11 )  यानुसार तकारकर्ते यांनी या न्‍यायमंचासमक्ष व्‍यतीत केलेला कालावधी मुदत कायदयानुसार सुट मिळण्‍यास पात्र राहील. सबब, अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे,  

अं ति म   आ दे श

  1.       तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्‍यात येऊन त्‍यांना योग्‍य त्‍या
  2. सक्षम न्‍यायालयात दाद मागण्‍याची मुभा देण्‍यात येत आहे व त्‍याकरिता तक्रारकर्ते यांनी या न्‍यायमंचासमक्ष व्‍यतीत केलेला कालावधी मुदत कायदयानुसार सुट मिळण्‍यास पात्र राहील .
  3.       न्‍यायीक खर्चाबाबत कोणतेही आदेश पारित नाही.
  4.       उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी.

 

 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'BLE MR. Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.