Maharashtra

Nagpur

CC/709/2018

SHRI. SURAJ BHOJRAJ MODAK - Complainant(s)

Versus

NEW JAN VIKAS CONSULTANCY PVT. LTD., THROUGH SHRI. PRADNYNESH BHUJADE - Opp.Party(s)

ADV. A.D. BHAVE

06 Feb 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/709/2018
( Date of Filing : 30 Nov 2018 )
 
1. SHRI. SURAJ BHOJRAJ MODAK
R/O. PLOT NO. 97, NALANDA NAGAR, BHAGWAN NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. NEW JAN VIKAS CONSULTANCY PVT. LTD., THROUGH SHRI. PRADNYNESH BHUJADE
PLOT NO. 197, 1ST FLOOR, BHAGAT BHAVAN, MEDICAL CHOWK, UNTKHANA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI. PRADNYNESH BHUJADE, PROP.-NEW JAN VIKAS CONSULTANCY PVT. LTD.
R/O. PLOT NO. 197, 1ST FLOOR, BHAGAT BHAVAN, MEDICAL CHOWK, UNTKHANA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 06 Feb 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- एस.आर. आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचेकडुन त्‍यांचे मालकीचे जमिनीमध्‍ये  पाडलेल्‍या लेआऊट मधील प्‍लॉट नंबर २१, एकुण क्षेञफळ १६४० चौ.फुट, मौजा शिरुल हा रुपये १,९६,८००/- एवढ्या किंमतीमध्‍ये विकत घेण्‍याचा करार विरुध्‍द पक्षाशी ५० रुपये किंमतीच्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर दिनांक २९/०२/२००८ ला केला. तक्रारकर्त्‍याने करारणाम्‍याच्‍या तारखेपर्यंत संपूर्ण रक्‍कम रुपये १,९६,८००/- विरुध्‍द पक्षाला दिले. करारणामा तक्रारकर्ता व विरुध्‍दपक्षकार यांचे सी.ई.ओ. श्री मिलींद मेश्राम यांच्‍या स्‍वाक्षरीने करण्‍यात आला. तक्रारकर्त्‍याने दिनांक ३१/०७/२००७ रोजी धनादेशाव्‍दारे रुपये २५,०००/- शेअर रक्‍कम म्‍हणून विरुध्‍द पक्षाला दिली.
  2. कराराप्रमाणे विक्रीपञ नोंदणीकरीता लागणारे आवश्‍यक कागदपञे नगर रचना विभागाकडुन नकाशा मंजूरी प्राप्‍त करणे, गैरकृषी करणे, कच्‍चा रोड टाकणे ही सर्व जबाबदारी विरुध्‍द पक्षाची होती. तसेच करारानूसार जर खरेदी करणा-यास विक्रीचा करारनामा रद्द करावयाचा असल्‍यास किंवा विक्रीदाराकडुन कोणताही अडथळा निर्माण झाल्‍यास, खरेदीदारास त्‍याने दिलेली रक्‍कम विक्रीदार परत करतील.
  3. विरुध्‍द पक्षाने करार तारखेपासुन विक्रीपञाला लागणारे आवश्‍यक दस्‍ताऐवज उपलब्‍ध करुन दिले नाही व तक्रारकर्त्‍यास विक्रीपञ सुद्धा करुन दिले नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला वकीलामार्फत दिनांक २५/५/२०१८ रोजी कायदेशीर नोटीस पाठविली व त्‍याव्‍दारे प्‍लॉट चे विक्रीपञ करुन देण्‍याबाबत विनंती केली. तसेच विरुध्‍द पक्षकार विक्रीपञ करुन देण्‍यास असमर्थ असेल तर प्‍लॉट खरेदीपोटी दिलेली संपूर्ण रक्‍कम १५ टक्‍के व्‍याजासह परत करण्‍याबाबत सुचित करण्‍यात आले. विरुध्‍द पक्षाला तक्रारदाराने पाठविलेली नोटीस दिनांक ३०/०५/२०१८ ला प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्षाने नोटीस चे पालन केले नाही व उत्‍तरही दिले नाही. करीता तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. मा. मंचाने विरुध्‍द पक्षाला तक्रारकर्त्‍याचे नावाने प्‍लॉट नंबर २१ चे विक्रीपञ करुन द्यावे किंवा बयाणा रक्‍कम रुपये १,९६,८००/-, १५ टक्‍के व्‍याजासह रक्‍कम घेतल्‍याचे तारखेपासुन रक्‍कम मिळेपर्यंत तक्रारकर्त्‍यास देण्‍यात यावे.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास शेअर रक्‍कम रुपये २५,०००/-, १५ टक्‍के व्‍याजासह परत करण्‍याचे आदेश देण्‍यात यावे.
  3. मानसिक व शारिरीक ञासाकरीता व तक्रारीचा खर्च तक्रारकर्त्‍याला देण्‍याचे आदेशीत करावे.  
  1. विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली व ती प्राप्‍त होऊनही विरुध्‍दपक्ष मंचासमक्ष हजर झाले नाही करीता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक २८/०८/२०१९ ला पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवज व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर खालिल मुद्दे विचारात घेतले व त्‍यावरील कारणमिमांसा खालिलप्रमाणे नमुद आहे.

        अ.क्र.                  मुद्दे                                                                       उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                      होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?           होय
  3. काय आदेश ?                                                               अंतिम आदेशाप्रमाणे 

 

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचेकडुन त्‍यांचे मालकीचे जमिनीमध्‍ये  पाडलेल्‍या लेआऊट मधील प्‍लॉट नंबर २१, एकुण क्षेञफळ १६४० चौ.फुट, मौजा शिरुल हा रुपये १,९६,८००/- एवढ्या किंमतीमध्‍ये विकत घेण्‍याचा करार विरुध्‍द पक्षाशी ५० रुपये किंमतीच्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर दिनांक २९/०२/२००८ ला केला. तक्रारकर्त्‍याने करारणाम्‍याच्‍या तारखेपर्यंत संपूर्ण रक्‍कम रुपये १,९६,८००/- विरुध्‍द पक्षाला दिले. तसेच विरुध्‍द पक्ष यांनी सदर मिळकत अकृषक करुन देऊन विकसनाबाबत सेवा देण्‍याचा करार केला आहे. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. तसेच मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या M/s Narne Construction Pvt. Ltd. Vs. Union of India and Ors. Etc. II (2012) CPJ 4 (SC)  या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्‍तुत प्रकरण चालविण्‍याचे अधिकार आहे.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन प्‍लॉट विक्रीपोटी रक्‍कम स्विकारलेली असतांनाही तक्रारकर्त्‍याला करारातील अटी व शर्ती प्रमाणे सदर लेआऊट मधील प्‍लॉट चे कायदेशीर रित्‍या विक्रीपञ करुन दिलेले नाही ही विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील ञुटी असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसुन येते. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन शेअर रक्‍कम रुपये २५०००/- घेतली होती. तक्रारकर्त्‍याने सदरची रक्‍कम विरुध्‍द पक्षाला दिनांक ३१/०७/२००७ रोजी अदा केली आहे व सदरची तक्रारकर्त्‍याची मागणी मुदतीमध्‍ये नसल्‍यामुळे नाकारण्‍यात येत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे. 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीकपणे आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला वादातील भुखंड क्रमांक २१ चे कायदेशीर विक्रीपञ करुन द्यावे व विक्रीपञाचा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.

किंवा

विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना तांञिक अडचणीमुळे तक्रारकर्त्‍यास कायदेशीर विक्रीपञ करुन देणे शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन प्‍लॉट चे विक्रीपोटी स्विकारलेली रक्‍कम रुपये १,९६,८००/- तक्रारकर्त्‍याला अदा करावी व त्‍यावर दिनांक २९/०२/२००८ पासुन द.सा.द.शे. १४ टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावी.

  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  2. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.