जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे
ग्राहक तक्रार क्रमांक – ८६/२०१४
तक्रार दाखल दिनांक – २७/०६/२०१४ तक्रार निकाली दिनांक – १३/१२/२०१४
श्रीमती रंभाबाई संतोष मासुळे
उ.व., धंदा-घरकाम,
रा.सडगाव, ता.जि. धुळे - तक्रारदार
विरुध्द
१) न्यु इंडिया इन्श्युरन्स कं.लि.
मं.क.क्र.१३०८००, न्यु इंडिया सेंटर,
७ वा मजला, १७-ए, कुपरेज रोड,
मुंबई (नोटीसीची बजावणी मंडळ प्रबंधक
यांचेवर करण्यात यावी)
२) तालुका कृषी अधिकारी, धुळे
३) जिल्हा कृषी अधिकारी, धुळे - सामनेवाले
तडजोड निकालपत्र
सदर प्रकरणातील उभयपक्षांच्या विनंतीनुसार, या मंचात दि.१३-१२-२०१४ रोजी आयोजित केलेल्या लोकन्यायालयामध्ये सदर प्रकरण ठेवण्यात आले आहे. प्रस्तुत प्रकरणातील वाद विषयाबाबत, तक्रारदार व सामनेवाले यांच्यात आपसात सामंजस्याने तडजोड झाली आहे. तक्रारदार व सामनेवाले यांनी संयुक्त तजडजोड पुरसीस दाखल केली असून, त्यातील मजकूर दोन्ही पक्षकारांनी मान्य केला आहे व त्यावर उभयपक्षांच्या स्वाक्षरी आहेत.
सदर पुरसिसनुसार सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या मागणीप्रमाणे संपूर्ण रक्कम अदा केलेली आहे. याचा विचार होता दोन्ही पक्षांममध्ये समझोता झाल्याने सदर तक्रार अर्ज हा अंतिमरित्या निकाली काढण्यात येत आहे.
- तक्रारदार व सामनेवाले यांच्यामध्ये लोकन्यायालयात समझोता झाल्याने अर्ज पूर्णफेड म्हणून निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांक १३/१२/२०१४.
(सौ.के.एस जगपती) (श्री.एस.एस. जोशी)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.