View 8452 Cases Against New India Insurance
MOHAN NATHURAM TARTE filed a consumer case on 12 Feb 2015 against NEW INDIA INSURANCE COMPANY in the Satara Consumer Court. The case no is CC/12/32 and the judgment uploaded on 08 Sep 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 32/2012.
तक्रार दाखल दि.30-12-2013.
तक्रार निकाली दि.12-2-2015.
श्री.मोहन नथुराम तरडे,
रा.बामणोली, ता.जावली, सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
मॅनेजर,
न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी,
शाखा सातारा. जि.सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.एस.व्ही.जाधव.
जाबदारातर्फे– अँड.एन.डी.फडके.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे बामणोली ता.जावळी, जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवासी असून त्यांचे मालकीचा माल ट्रक क्र. एम.एच.11/एम.3413 हा होता. सदर मालट्रक तक्रारदार हे मालवहातुकीसाठी वापरत होते. सदर ट्रकचा वापर हा भाडयाने मालवहातूक करणेसाठी तक्रारदार करत होते. सन 2006-2007 या कालावधीसाठी सदर वर नमूद ट्रकचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविलेला होता. दि.2-3-2007 रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे रोडवर पनवेल शहराजवळ सदर ट्रकचा अपघात हा ट्रक क्र.एम.एच-19-जे-2896 या ट्रकबरोबर झाला होता व आहे. सदर तक्रारदार हे त्यांचे ताब्यातील ट्रक क्र.एम.एच.11-एम.3413 हा वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन चालवीत होता. सदरचा अपघात हा ट्रक क्र.एम.एच-19- जे 2896 च्या ड्रायव्हरचे चुकीमुळे झालेला आहे. अपघातावेळी तक्रारदाराचे ट्रकचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविला होता व आहे व अपघातकाळात विमा अस्तित्वात होता. प्रस्तुत अपघातात तक्रारदाराचे ट्रकचे रक्कम रु.3,00,000/-(रु.तीन लाख मात्र) चे नुकसान झाले होते. प्रस्तुत अपघातात तक्रारदाराचे ट्रकचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने तक्रारदाराने जाबदार कंपनीकडे सदर अपघातात झालेल्या नुकसानभरपाईची मागणी केली होती परंतु जाबदार विमा कंपनीने सदरची नुकसानभरपाई देणेस नकार दिल्यामुळे तक्रारदारानी मे.मंचात सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने सदर कामी जाबदार कंपनीकडून ट्रक क्र.एम-एच-11-एम-3413 चे दि.2-3-2007 रोजी झालेल्या मोटार अपघातातील झालेल्या नुकसानभरपाईची रक्कम रु.3,00,000/- मिळावे, अर्जाचा खर्च जाबदाराकडून वसूल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर कामी केली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.7 चे कागदयादीसोबत नि.7/1 ते 7/19 कडे अनुक्रमे खबरी जबाब, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, विमा पॉलिसी प्रत, पी.एम.रिपोर्ट, तक्रारदाराचे ड्रायव्हींग लायसेन्स, मालट्रकचे आर.सी.बुक, सनग्लास बेळगांव यांचे बिल, विजापूर ऑटोमोबॉईलचे बिल, कृष्णा मोटार वर्क्सची बिले, जाबदाराने तक्रारदाराला पाठवलेल्या नोटीसीचे उत्तर, नि.5 कडे विलंबमाफीचा अर्ज, नि.28 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.29 कडे विलंबमाफीच्या अर्जावरील तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद, नि.31 कडे तक्रारदाराचा पुरावा संपलेची पुरसीस, नि.32 कडे तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद, नि.33 कडे केस लॉ, वगैरे कागदपत्रे सदर कामी दाखल केली आहेत.
4. जाबदारानी सदर कामी नि.11 कडे विलंबमाफीचे अर्जास म्हणणे, नि.12 कडे सदर म्हणण्याचे प्रतिज्ञापत्र, नि.13 चे कागदयादीसोबत नि.13/1 ते 13/9 कडे अनुक्रमे विमा पॉलिसी अटी व शर्तीसह, मोटार क्लेम फॉर्म, लोड डिलिव्हरी चलन, तक्रारदाराने दिलेला लेखी जबाब, सहयाद्री रोडलाईन्स, क्लेम नाकारलेचे पत्र, जादा कैफियत, तक्रारदाराने जाबदारास दिलेली लिगल नोटीस, जाबदाराने तक्रारदाराचे नोटीसीला दिलेले उत्तर, नि.114 कडे जाबदाराने दाखल केलेल्या विमा पॉलिसी अटी व शर्ती, नि.22 चे कागदयादीकडे नि.22/1 कडे एम.ए.सी.पी.नं.322/2007 मधील नोटीस, सदर कामी तक्रारदार श्री.तरडे वकीलपत्रासह हजर झालेचे वकीलपत्र, नि.27 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.27 अ कडे सर्व्हेअर नितीन जोशी यांचे प्रतिज्ञापत्र, नि.29 चे कागदयादीसोबत नि.29/1 ते 29/3 कडे तक्रारदाराचे वाहनाची पॉलिसी अटी व शर्तीसह, अपघातानंतर सर्व्हेअरने केलेला सर्व्हे रिपोर्ट, बिलचेक रिपोर्ट, नि.30 कडे जाबदाराचा लेखी युक्तीवाद, नि.30 कडे मे.राष्ट्रीय आयोगाचा पुढील न्यायनिवाडा दाखल केला आहे.
National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi.
Revision Petition No.1946 of 2013.
Rajendra Kumar V/s. United India Insurance Co.Ltd. वगैरे कागदपत्रे जाबदारांनी दाखल केली आहेत. प्रस्तुत कामी जाबदाराने विलंबमाफीचे अर्जास म्हणणे दिले आहे, परंतु मूळ तक्रारअर्जास म्हणणे दिलेले नाही. प्रस्तुत नि.11 कडील कैफियतीमध्ये जाबदाराने तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, तक्रारदाराला विमा पॉलिसी देताना त्यातील सर्व अटी व शर्ती समजावून सांगितल्या होत्या. सदर ट्रक रद्दीचा फुल लोड भरुन मुंबई वाई असे येत असताना दि.2-3-2007 रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर पनवेलजवळ आला. अपघातावेळी तक्रारदार स्वतः गाडी चालवीत होता. अपघाताच्या ठिकाणचे पाठीमागील काही अंतरावर तक्रारदाराने सदर गाडीत संतोष हणमंत पवार, रा.नांदवळ, ता.कोरेगांव, व तथाकथित 150-200 किलो वजनाचा माल ड्रायव्हर केबीनमध्ये घेऊन त्याबरोबर चंद्रकांत मारुती मांढरे रा.पिराचीवाडी, ता.वाई यांना प्रवासी म्हणून घेतले होते. सदर विमा पॉलिसीतील अटीप्रमाणे व सदर मालवाहू ट्रकला दिलेल्या परमीटप्रमाणे सदर दोन्ही माणसांचा गाडीतील मालाशी कोणताही संबंध नसताना व तथाकथित 150-200 किलो माल नसताना सदरचे वाहन हे फक्त मालवहातुकीसाठीच असल्याने व तक्रारदार स्वतःच मालक असून गाडी चालवत असल्याने त्याने जाणुनबुजून पॉलिसीतील नियम, शर्ती व मोटार वाहन कायदयानुसार दिलेल्या परमीटचा भंग केला आहे. तसेच सदर अपघाताची सरकारमान्य वैध लायसेन्स असणारे सर्व्हेअर यानी स्पॉट सर्व्ह तसेच दुसरे सर्व्हेअरकडून फायनल सर्व्हे, बील चेक रिपोर्ट दाखल केला आहे. या रिपोर्टप्रमाणे दायित्व रक्कम रु.79,989.05 व साल्व्हेजची किंमत रु.3,000/- नमूद करणेत आली आहे. शिवाय तक्रारदाराने दिलेल्या जबाबानुसार गाडीत दोन प्रवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तक्रारदाराने जाबदाराकडे दाखल केलेल्या मोटारक्लेम मधील कागदपत्रांचा विचार करुन असे निष्पन्न झाले की, तक्रारदाराने इतर दोन प्रवासी गाडीत घेतल्याने पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केल्याने सदरचा विमा क्लेम जाबदाराने नामंजूर केला. अशा स्वरुपाचे म्हणणे तक्रारदाराने सदर कामी विलंब माफीचे अर्जास दिले आहे. परंतु जाबदाराने सदरचे म्हणणे विलंबमाफीचे अर्जास दिले आहे, त्यांनी मूळ तक्रारअर्जास म्हणणे दिलेले नाही.
4. वर नमूद तक्रारदार व जाबदारांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंचाने सदर तक्रारीचे निराकरणार्थ पुढील मुददयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय? होय.
2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली आहे काय? होय.
3. तक्रारदार विमा क्लेम मिळणेस पात्र आहेत काय? होय.
4. अंतिम आदेश काय? शेवटी नमूद केलेप्रमाणे
विवेचन-
5. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारांनी त्यांचे मालकीचे मालट्रक एम-एच-11-एम-3413 चा विमा जाबदार विमा कंपनीकडे सन 2006-2007 या कालावधीसाठी उतरवला होता. म्हणजेच तक्रारदार व जाबदारांचे दरम्यान विमा करारपत्र झालेले असून सदर कामी नि.13/1 कडे विमा पॉलिसी दाखल आहे, म्हणजेच तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवा देणार आहेत हे निर्विवादपणे सिध्द होते म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
6. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराचे मालकीचा मालट्रक एम-एच-11-एम-3413 या वाहनाला दि.21-3-2007 रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे रोडवर पनवेल शहराजवळ अपघात झाला. सदर अपघातात दुसरा ट्रक एम-एच-19-जे-2896 बरोबर झालेला होता. प्रस्तुत अपघातातील ट्रकला झालेली नुकसानभरपाई रक्कम रु.3,00,000/-(रु.तीन लाख मात्र) मिळणेसाठी तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडे मोटार क्लेम फॉर्म योग्य त्या कागदपत्रांसह दाखल केलेला होता परंतु जाबदार विमा कंपनीने सदरचा तक्रारदाराचा नुकसानीचा क्लेम तक्रारदाराने सदर मालट्रकमधून प्रवासी वाहतूक केल्याने विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग केला असल्याने नाकारला आहे. मात्र सदर कामी सदर ट्रकमध्ये प्रवास करणा-या दोन्ही प्रवाशापैकी एक प्रवासी त्याचे 150 ते 200 किलो मालासोबत संतोष हणमंत पवार होते तर चंद्रकांत मारुती मांढरे हा अनोळखी इसम असलेला उल्लेख मोटार क्लेम फॉर्ममध्ये असला तरीही सदर प्रवाशांकडून भाडयासाठी प्रवासी भाडे घेतलेली बाब जाबदाराने सिध्द केलेली नाही. प्रस्तुत कामी सदरची बाब सिध्द झालेली नाही असे असतानाही जाबदाराने अकारण खोटे कारण दाखवून तक्रारदाराचा नुकसानभरपाई विमा क्लेम फेटाळला आहे. म्हणजेच तक्रारदाराला जाबदाराने सदोष सेवा पुरवली आहे ही बाब निर्विवाद सत्य असून आम्ही मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारांचे मालकीच्या मालट्रकमधून दोन प्रवासी भाडयाने प्रवास करीत होते व ट्रकचा उपयोग प्रवासी वाहतूक करणेसाठी तक्रारदार करीत होते ही बाब जाबदाराने सिध्द केलेली नाही. याउलट एम.ए.सी.पी.322/2007 हा मे.मोटार अँक्सीडेंट क्लेम्स ट्रॅब्यूनलकडे दाखल केलेला होता. सदर कामी जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराना नुकसानभरपाई देणेचे आदेश झालेले आहेत. तसेच सदर मालट्रकमध्ये जे प्रवासी घेतले होते व त्यांचेकडून प्रवासीभाडे घेतलेले होते ही बाब जाबदारानी सिध्द केलेली नाही, तसेच प्रस्तुत ट्रकचा अपघात सदर प्रवाशांमुळे घडून आला आहे ही बाबही जाबदारानी सिध्द केलेली नाही, त्यामुळे तक्रारदारांनी जरी जबाबात दोन प्रवासी गाडीत होते असे म्हटले असले तरीही सदरचे स्टेटमेंट पुराव्याचा कायदा कलम 13(4) नुसार पुराव्यात वाचता येणार नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. तसेच सदरचा तक्रारदाराने दिलेला जबाब कोणासमोर लिहून दिला याचा काही उलगडा होत नाही, तसेच सदर कामी नि.7/1 कडील खबरी जबाबातही ट्रकमध्ये दोन प्रवासी होते असे नमूद असले तरीही प्रस्तुत खबरी जबाब हा मे.मंचासमोर सिध्द झालेशिवाय तो पुराव्यात वाचता येणार नाही, तसेच जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराने मालट्रकमध्ये भाडयाने प्रवासी घेतले होते ही बाब सिध्द केलेली नाही. प्रस्तुत कामी तक्रारदार हे जाबदार विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे. सदर कामी जाबदाराने नि.29/2 कडे फायनल सर्व्हे रिपोर्ट दाखल केला असून नि.27/अ कडे सर्व्हेअर नितीन जोशी यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे परंतु सर्व्हेअर यांचा रिपोर्ट हा फायनल रिपोर्ट मानणे किंवा सदर रिपोर्टनुसारच नुकसानभरपाई देणे ही बाब मंचावर बंधनकारक नाही. तक्रारदारानी खर्चाची बिले नि.7/8 ते नि.7/18 कडे दाखल केली आहेत. सदर खर्चाची बिले विचारात घेता प्रस्तुत तक्रारदारांचा ट्रक दुरुस्तीसाठी बरीच रक्कम खर्च झालेची वस्तुस्थिती लक्षात येते. सबब प्रस्तुत कामी तक्रारदाराना जाबदारानी ट्रकचे नुकसानीपोटी रक्कम रु.2,80,000/-(रु.दोन लाख ऐंशी हजार मात्र) अदा करणे न्यायोचित होईल असे आम्हांस वाटते. सदर बाबतीत आम्ही मे.वरिष्ठ न्यायालयांचे खालील नमूद न्यायनिर्णय व त्यातील दंडकांचा विचार केला आहे-
i) 2014 (2)All MR (JOURNAL) 61
Consumer Disputes Redressal Commission Maharashtra State- Mumbai.
Smt.Savitri Dattatraya Powar & Ors. V/s. National Insurance Co.Ltd.
Head Note- Consumer Protection Act 1986, S.2-13- Insurance claim- Repudiation- claim towards damage to the insured vehicle- repudiated- Ground that private vehicle was used to carry passengers on rental basis- Insurance company relied on statements of certain persons recorded by police- However such statements were not tendered in evidence as per S.13(4) of act- Held, such bare statements cannot be relied upon to repudiate the insurance claim- Repudiation amounts to deficiency in service- Insurance Company directed to settle insurance claim at 75% of insured declared value (IDV)of vehicle.
ii) SPUREME COURT OF INDIA – 2009 law suit (SC)1035
New Indian Insurance Co.Ltd. V/s. Pradeep Kumar-
Head Note- Consumer Protection Act 1986 Sec.21(b) Insurance Act, 1938- Sec.64 UM (2) deficiency in service- accident with insured truck- surveyors report- complaint not satisfied with investigations- National Commission dismissed revision petition- assessment of loss by approved surveyor is pre requisite for payment of settlement of claim of twenty thousand rupees or more by insurer- but surveyors report is not last and final used- It is not that sacrosanct that it cannot be departed from- it is not conclusive- approval surveyors report may be basis or foundation for settlement of claim by insurer in respect of loss suffered by insured but surely such report is neither binging upon insurer nor insured claim of complainant has been accepted by consumer for a as it was duly supported by original vouchers, bills & receipts- Insurance company would have been well advised in not spending public money unnecessarily on avoidable and wholly frivolous litigations such as this appeal dismissed-
8. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-
-आदेश
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराना मालट्रकचे नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.2,80,000/-(रु.दोन लाख ऐशी हजार मात्र) अदा करावेत.
3. जाबदारानी तक्रारदाराना सदर अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) अदा करावेत.
4. सदर आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावे.
5. सदर आदेशाचे पालन जाबदारानी विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
6. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.12-2-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.