जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 398/2008. प्रकरण दाखल दिनांक – 22/12/2008. प्रकरण निकाल दिनांक –26/06/2009. समक्ष - मा. श्री.सतीश सामते. अध्यक्ष प्र. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. शेख चॉंदपाशा पि. शेख इब्राहीम, वय, 45 वर्षे, धंदा मजुरी अर्जदार रा. शिवनगर, नांदेड जि. नांदेड. विरुध्द व्यवस्थापक, न्यू इंडिया एशुरन्स कंपनी मर्यादित, गैरअर्जदार लाहोटी कॉम्प्लेक्स, वजिराबाद, नांदेड अर्जदारा तर्फे. - अड.गिरीश बी. विर गैरअर्जदारा तर्फे - अड.एस.व्ही. राहेरकर. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार न्यू इंडिया एशुरन्स कंपनीच्या सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदारांनी गैरअर्जदाराकडून जनता वैयक्तीक अपघात विमा क्र. 160901/47/07 रु.1,00,000/- साठी घेतले होते. त्यांचा कालावधी दि.17.1.2003 ते 16.1.2008 असा होता. यासाठी अर्जदार यांनी एकदाच प्रिमियम भरला होता. अर्जदार दि.20.1.2006 रोजी सायकलवरुन जात असताना खाली पडून अपघात होऊन त्यांचे डाव्या डोळयाला गंभीर दूखापत झाली. सरकारी दवाखान्यात इलाज केला परंतु त्यांचे डाव्या डोळयाचे कायमचे अपंगत्व आले व दृष्टी गेली. तक्रारदाराने अपघातावीषयी शिवाजी नगर पोलिस स्टेशन नांदेड येथे तक्रार दाखल केली. अपघात नंबर 2/2006 नोंदवून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.गैरअर्जदाराने तक्रादाराचा अर्ज व नूकसान भरपाई फेब्रवारी, 2007 मध्ये नाकारली. गैरअर्जदार हे अर्जदारास विम्याची रक्कम देण्यासाठी वैयक्तीकपणे जबाबदार आहेत. कोणतेही कारण नसताना त्यांनी त्यांचा अर्ज फेटाळला म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, रु.100,000/- व त्यावर 12 टक्के व्याज गैरअर्जदाराकडून त्यांना मिळावे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराना दिलेली पॉलिसी जनता वैयक्तीक अपघात पॉलिसी असून पॉलिसी ही नियम व अटी व अपवाद यांना बांधील आहे. सदर पॉलिसीच्या अटीप्रमणे अपघात झाला असेल तरच ही पॉलिसी ही लागू होते तसेच एखादयाला अपघातामध्ये मार लागला असेल तर सदरील जखम किंवा मार यामुळे पॉलिसी काळामध्हये 100 टक्के अंपगत्वे आले असेल तरच तरतूदी प्रमाणे कंपनी काही देवू लागते. पॉलिसीच्या कलम (b) If such injury shall within one clander year of its occurrence be he sole and direct cause of the total and irrecoverable loss of sight of both eyes, or total and irrecoverable loss of use of hands or two feet or one hand and one foot, or for such loss of sight of one eye and such loss of use of one hand one foot the capital sum insured stated in the schedule hereto. (c) If such injury shall withinone clander year of its occurrence be the sole and direct cause of the total and irrecoverable loss of slight of one eye or total and irrecoverable loss of use of a hand or a foot fifty per cent (50 %) if the capital sum schedule insured in the hereto. पण प्रस्तूतच्या प्रकरणामध्ये अर्जदार हे 75 टक्के दृष्टीहीन झालेले आहे त्यामूळे पॉलिसीच्या अटी प्रमाणे नूकसान भरपाई दिल्या जात नाही. त्यामूळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा दावा नामंजूर केलेला आहे. अर्जदाराने त्यांला झालेल्या अपघाता बददल कोणतीही फिर्याद दिलेले नाही किंवा अपघाताची दिनांक नाही. अर्जदार हे स्वच्छ हाताने मंचासमोर आलेले नाहीत. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दाखल केलेल्या सदभावना हॉस्पीटल, नांदेड येथे दि.14.12.2005 रोजी उपचार घेतले व त्यानंतर पूढे दि.15.12.2005 ते 22.12.2005 पर्यत गणपती नेञालय जालना येथे उपचार घेतले. अपघाताचे कारण व दि.20.1.2006 असे दर्शविले आहे जे की चूक आहे. गैरअर्जदाराचा दूसरा आक्षेप असा आहे की, अर्जदाराचा अर्ज हा मूदत बाहय आहे. म्हणून अर्जदाराची तक्रार ही खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार यांचा दावा मूदतीत आहे काय ? होय. 2. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अपघात हा दि.21.1.2006 रोजी झाला व यानंतर तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे फेब्रवारी,2007 मध्ये गैरअर्जदाराने दावा फेटाळला. या दिनांकासंबंधी गैरअर्जदार कोणत्याही दिनांकाचा उल्लेख करीत नाहीत म्हणून ही दिनांक ग्रहीत धरल्यास येथून दोन वर्षाचा अवधी तक्रार दाखल करण्यास अर्जदारास मिळतो. अर्जदाराने दि.22.12.2008 रोजी आपली तक्रार दाखल केलेली आहे म्हणजे तक्रार ही दोन वर्षाचे ओत आहे म्हणून तक्रार मूदतीत येते. म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र.2 ः- अर्जदाराने त्यांचे डाव्या डोळयाला दि.20.1.2006 रोजी अपघाताने दूखापत झाली असे म्हटले आहे पण अपघात कशामूळे झाला त्यांना कोणी टक्कर वगैरे मारली का असा उल्लेख केलेला नाही. पोलिस स्टेशन शिवाजी नगर येथे गून्हा नंबर 2/2006 नोंदविला आहे. यात सायकल स्लीप होऊन पडला असा उल्लेख आहे. एफ.आय.आर. दि.21.6.2006 चे आहे. अपघात कधी झाला या तारखेची नोंद यात दिसत नाही. घटनास्थळ पंचनाम्याची दि.21.1.2006 अशी आहे. यात अपघात झाला हे सिध्द होईल असा काही पूरावा नाही. डोळयाला अंपगत्व आले या बददल फॉर्म बी व अपेडेक्स वन Government of India Department of Social Welfare Medical Certificate for the BLIND दाखल केलेले आहे. यावर अर्जदाराच्या डाव्या डोळयाला 75 टक्के अंपगत्व आले आहे असे म्हटले आहे. यावीषयी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले गेलेले आहेत. यात पॉलिसीच्या रुल प्रमणे एखादा हात, पाय, डोळा यांला कायमचे अंपगत्व आले असेल व त्यामूळे त्यांला काहीच करता येत नसेल तर पॉलिसीची अर्धी रक्कम त्यांना मिळू शकते. दोन डोळे, हात, पाय यांना कायमचे अपंगत्व आले असेल तर पॉलिसीच्या बी नियमाप्रमाणे पूर्ण रक्कम मिळते. यात अर्जदाराने जे प्रमाणपञ दाखल केलेले आहे यात 75 टक्के दृष्टी गेलेली आहे असे म्हटले आहे, यात पॉलिसीच्या नियमाप्रमाणे अर्धी रक्कम मिळू शकत नाही. यासाठी गैरअर्जदारांनी त्यांचे कंपनीचे पॉलिसी रुल्स दाखल केलेले आहेत. अर्जदाराने सदभावना हॉस्पीटल, नांदेड येथे दि.14.12.2005 रोजी व गणपती नेञालय, जालना येथे दि.15.12.2005 ला उपचार घेतल्या संबंधी कागदपञ दाखल केलेले आहे. त्यांचे डाव्या डोळयाला उपचार केलेले आहेत. यांचा अर्थ डाव्या डोळयाला याआधी पासून दूखापत असताना 2005 नंतर म्हणजे एक महिन्याने एफ.आय.आर. दिलेले आहे. म्हणजे खरे कारण अर्जदार हे लपवून ठेवत आहेत. 75 टक्के दृष्टी गेली म्हणजे त्या डोळयाने थोडे काही तरी अंधूक दिसते असा त्यांचा अर्थ होतो. सबब पॉलिसीच्या नियमाप्रमाणे नूकसान भरपाई देय नाही. हे गैरअर्जदाराचे म्हणणे योग्यच आहे असे दिसून येते. वरील सर्व बाबीचे अवलोकन केले असता गैरअर्जदारांनी निर्णय घेण्यात किंवा त्यांचे सेवेत ञूटी केल्याचे सिध्द होत नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) सदस्या अध्यक्ष (प्र.) जे.यु, पारवेकर लघुलेखक. |