आदेश (पारीत दिनांक :23 फेब्रुवारी, 2012 ) श्री मिलींद रामराव केदार यांचे कथनानुसार ग्रा.सं.कायदा,1986 चे कलम 12 अंतर्गत तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे : 1. त.क. यांची प्रतिज्ञालेखावरील मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांचे मालकीचा बालाजी जिनिंग फॅक्टरी या नावाने हिंगणघाट, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथे CC-99-2011 कापसावर प्रक्रिया करणारा कारखाना आहे. त.क.यांनी त्यांचे कारखान्यात काम करणा-या एकूण 26 कामगारांचा विमा एकत्रितरित्या वर्कमन कॉम्पेन्सेशन पॉलिसी अंतर्गत विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून काढला असून, पॉलिसीचा क्रमांक-160601/36/09/00000001 असा होता व पॉलिसीचा कालावधी दिनांक 01.04.2009 ते 31.03.2010 चे मध्यरात्री पर्यंत वैध होता व त्यामुळे त.क.वि.प.चे ग्राहक आहेत. 2. त.क.यांनी पुढे असे नमुद केले की, दिनांक 22.02.2010 चे रात्री त्यांचे कारखान्यात कामगार कापसाचे ढिग रचण्याचे कार्य करीत असताना, 0.45 वाजता बमबमसिंग नावाचे कामगाराचे अंगावर कापसाची एक गंजी कोसळून, त्यात दबून गुदमरुन मृत्यू झाला. सदर माहिती त.क.यांना मिळताच सदर कामगारास कुटीर रुग्णालय, हिंगणघाट येथे 01.20 वाजता दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासणी करुन मृत्यू झाल्याचे निदान केले. सदर घटनेची माहिती पोलीसांना दिली असता त्यांनी पंचनामा केला व डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. 3. त.क.यांनी सदर घटनेची माहिती वि.प.विमा कंपनीस दिनांक 23.02.2010 रोजी दुरध्वनीद्वारे दिली. मार्च-2010 मध्ये वि.प.विमा कंपनीचे चौकशी अधिकारी यांनी कारखान्यास भेट देऊन, दस्तऐवजाची मागणी केली, त्याप्रमाणे त.क.यांनी संबधित सर्व दस्तऐवज दिनांक 26.03.2010 रोजी सादर केलेत. 4. दरम्यानेचे काळात त.क.यांनी मृतक कामगाराचे परिवारास नुकसानभरपाई पोटी रुपये-3,16,580/- कामगार न्यायालयात जमा केले व सदर बाब वि.प.विमा कंपनीस दिनांक 28.05.2010 रोजीचे पत्रान्वये कळवून नुकसान भरपाईचे रकमेची मागणी केली. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा त.क.यांनी दिनांक 17.06.2010 रोजी पत्र वि.प.यांना पाठविले. 5. वि.प.विमा कंपनीने त.क.यांना दिनांक 10.06.2010 रोजीचे पत्राद्वारे “ Deceased died due to his negligence and after working hours and also the deceased was absent on muster dated 22.02.10 and 23.02.10” असे कळवून विमा क्लेम फाईल बंद केल्याचे कळविले. CC-99-2011 6. या संदर्भात त.क.यांचे असे म्हणणे आहे की, मस्टर रोलचे बारकाईने अवलोकन केलेंडर असता दिनांक 22.02.10 रोजी मृतक उशिरा आल्यामुळे सुरुवातीस त्याची गैरहजेरी लावण्यात आली व नंतर तो आल्यानंतर हजेरी लावण्यात आली. वि.प. दिनांक 10.06.2010 रोजीचे पत्रात नमुद करतात की, मृतक हा त्याचे निष्काळजीपणामुळे मरण पावला व एकीकडे म्हणतात की, मृतक दिनांक 22.02 व 23.02.10 रोजीचे मस्टररोलवर गैरहजर होता, त्यामुळे वि.प.चे म्हणण्यात तथ्य दिसून येत नाही. तसेच मृतकास घटनेचे दिवशी डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यामुळे, मृतक दिनांक 23.02.2010 रोजी हजेरीपटावर उपस्थित राहण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. यावरुन सिध्द होते की, वि.प.विमा कंपनी विमा क्लेम देण्यास टाळाटाळ करीत असून, त.क.यांना दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
7. म्हणून त.क.यांनी, वि.प.विमा कंपनीस दिनांक 01.02.2011 रोजी रजिस्टर नोटीस देऊन नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु वि.प.विमा कंपनीने क्लेम संबधाने कोणतीही कार्यवाही न केल्याने शेवटी प्रस्तुत तक्रार वि. जिल्हा न्यायमंचात दाखल केली असल्याचे त.क.नमुद करतात. त.क.यांनी तक्रारीचे विनंती कलमात प्रार्थना केली की, मृतका संबधाने कामगार न्यायालयात जमा केलेली रक्कम रुपये-3,16,560/- रक्कम दिनांक 28.05.2010 पासून द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह देण्याचे वि.प.यांना आदेशित व्हावे तसेच त.क.यांना झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासा बद्यल रुपये-1.00 लक्ष व प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-25,000/- वि.प.कडून देण्याचे आदेशित व्हावे. 8. वि.प. विमा कंपनी तर्फे न्यायमंचा समक्ष लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर अभिलेखातील पान क्रं 36 ते 40 वर दाखल करण्यात आला. त्यांचे लेखी जबाबा प्रमाणे त.क.यांनी त्यांचे तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे 26 कामगारांचा विमा व त्याचा कालावधी बाब मान्य केली. दिनांक 22.02.2010 रोजी त.क.चे कारखान्यात बमबमसिंग कामगाराचा कापसाची गंजी रचित असताना झालेला मृत्यू, पोलीस स्टेशनला दिलेला रिपोर्ट, पोलीस पंचनामा इत्यादी बाब माहिती अभावी नाकबुल केल्यात. तसेच त.क.यांनी, मृतका संबधाने कामगार न्यायालयात नुकसान भरपाई पोटी जमा केलेली रक्कम रुपये-3,16,560/- बाबतची माहिती नसल्याने सदर बाब अमान्य केली. परंतु त.क.यांनी या संबधाने दिनांक 28.05.2010 रोजीचे पत्र पाठविल्याची बाब मान्य केली. CC-99-2011 9. वि.प.विमा कंपनी तर्फे असेही नमुद करण्यात आले की, त.क. यांना विमा क्लेम पॉलिसीचे अटी व शर्ती प्रमाणे देय नाही. वि.प.यांनी त.क.यांना दिनांक 10.06.2010 रोजीचे पत्र पाठविल्याची बाब मान्य केली. त.क.यांनी दाखल केलेल्या मस्टररोल मध्ये (Absent) असे नमुद केलेले आहे, त्यामुळे घटनेचे दिवशी मृतक बमबमसिंग हा मस्टररोल नुसार गैरहजर होता आणि म्हणून विमा क्लेम देय होत नाही. मृतकाचे मृत्यू संबधीची बाब माहिती अभावी अमान्य केली. त्यांचेकडून सेवेमध्ये कोणतीही त्रृटी नाही. 10. त.क.यांची दिनांक 01.02.2011 ची नोटीस मिळाल्याची बाब मान्य केली. त.क.यांची तक्रार डब्ल्यु.सी. कायदयाचे कक्षेत येत असल्यामुळे वि.जिल्हा न्यायमंचास अधिकारक्षेत्र येत नाही. कारण विमा हा डब्ल्यु.सी. कायदया नुसार उतरविलेला असून त्याचे अधिकार हे कामगार न्यायालयासच आहेत. त.क.यांनी तक्रारीत केलेली मागणी अमान्य आहे. सबब त.क.यांची तक्रार खर्चासह खारीज व्हावी, असा उजर वि.प.विमा कंपनी तर्फे घेण्यात आला. 11. त.क.यांनी पान क्रं-9 वरील यादी नुसार एकूण 12 दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये विमा पॉलिसीची प्रत, मृतकाचा शव विच्छेदन अहवाल प्रत, त.क. आणि वि.प.विमा कंपनी मध्ये झालेल्या पत्र प्रती, मस्टर रोलची प्रत, त.क.यांनी वि.प.यांना दिलेल्या नोटीसची प्रत, पोस्टाची पावती, मृतका संबधाने अकस्मात मृत्यू खबरी, घटनास्थळ पंचनामा, मरणान्वेषण प्रतिवृत्त इत्यादी दस्तऐवजाचा समावेश आहे. त.क.यांनी पान क्रं 43 वर लेखी पुरसिस दाखल करुन नमुद केले की, त्यांना पुराव्या दाखल शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल करावयाचा नाही. 12. वि.प. विमा कंपनीने लेखी जबाबा व्यतिरिक्त इतर कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाहीत. 13. त.क.यांची प्रतिज्ञालेखा वरील तक्रार, वि.प. विमा कंपनीचा प्रतिज्ञालेखावरील लेखी जबाब, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज याचे सुक्ष्म वाचन केल्या नंतर मंचा समक्ष निर्णयान्वित होण्या करीता खालील मुद्ये उपस्थित होतात. अक्रं मुद्या उत्तर (1) प्रस्तुत तक्रार चालविण्याचे वि.न्यायमंचास अधिकार क्षेत्र येते काय ? नाही. CC-99-2011 (2) त.क.यांना विमा क्लेम संबधाने नुकसान भरपाईची रक्कम न देऊन वि.प. विमा कंपनीने दोषपूर्ण सेवा दिली आहे काय? जर होय, तर, त.क. काय दाद मिळण्यास पात्र आहे? काय आदेश? अंतीम आदेशा नुसार :: कारणे व निष्कर्ष :: मुद्या क्रं-1 व 2 14. प्रस्तुत प्रकरणात वि.प.विमा कंपनीने आक्षेप घेतला की, त.क.यांची तक्रार डब्ल्यु.सी. कायदयाचे कक्षेत येत असल्यामुळे वि.जिल्हा न्यायमंचास अधिकारक्षेत्र येत नाही. कारण विमा हा डब्ल्यु.सी. कायदया नुसार उतरविलेला असून त्याचे अधिकार हे कामगार न्यायालयासच आहेत त्यामुळे त.क.यांनी तक्रारीत केलेली मागणी अमान्य आहे. 15. त्यामुळे सर्वप्रथम या आक्षेपावर विचार होणे आवश्यक आहे. त.क.यांचे तक्रारी नुसार त्यांचे मालकीचे बालाजी जिनिंग फॅक्टरी हिंगणघाट, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथील कारखान्यात काम करणा-या एकूण 26 कामगारांचा विमा एकत्रितरित्या वर्कमन कॉम्पेन्सेशन पॉलिसी अंतर्गत विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून काढला असून, पॉलिसीचा क्रमांक-160601/36/09/00000001 असा होता व पॉलिसीचा कालावधी दिनांक 01.04.2009 ते 31.03.2010 चे मध्यरात्री पर्यंत वैध होता. 16. त.क.यांनी पुढे असे नमुद केले की, दिनांक 22.02.2010 चे रात्री त्यांचे कारखान्यात कामगार कापसाचे ढिग रचण्याचे कार्य करीत असताना, 0.45 वाजता बमबमसिंग नावाचे कामगाराचे अंगावर कापसाची एक गंजी कोसळून, त्यात दबून गुदमरुन मृत्यू झाला. सदर घटने बद्यल पोलीसांनी पंचनामा केला व डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. 17. त.क.यांनी सदर घटनेची माहिती वि.प.विमा कंपनीस दिनांक 23.02.2010 रोजी दुरध्वनीद्वारे दिली. मार्च-2010 मध्ये वि.प.विमा कंपनीचे चौकशी अधिकारी यांनी कारखान्यास भेट देऊन, दस्तऐवजाची मागणी केली, त्याप्रमाणे त.क.यांनी संबधित सर्व दस्तऐवज दिनांक 26.03.2010 रोजी सादर केलेत. दरम्यानेचे काळात
CC-99-2011 त.क.यांनी मृतक कामगाराचे परिवारास नुकसानभरपाई पोटी रुपये-3,16,580/- कामगार न्यायालयात जमा केले व सदर बाब वि.प.विमा कंपनीस दिनांक 28.05.2010 रोजीचे पत्रान्वये कळवून नुकसान भरपाईचे रकमेची मागणी केली. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. 18. वि.प.विमा कंपनीने त.क.यांना दिनांक 10.06.2010 रोजीचे पत्राद्वारे “ Deceased died due to his negligence and after working hours and also the deceased was absent on muster dated 22.02.10 and 23.02.10” असे कळवून विमा क्लेम फाईल बंद केल्याचे कळविले. 19. या संदर्भात वि.प.विमा कंपनीने आपले लेखी जबाबामध्ये प्रमुख आक्षेप घेतला की, त.क.यांची तक्रार डब्ल्यु.सी. कायदयाचे कक्षेत येत असल्यामुळे वि.जिल्हा न्यायमंचास अधिकारक्षेत्र येत नाही. कारण विमा हा डब्ल्यु.सी. कायदया नुसार उतरविलेला असून त्याचे अधिकार हे कामगार न्यायालयासच आहेत. त.क.यांनी तक्रारीत केलेली मागणी अमान्य आहे. सबब त.क.यांची तक्रार खर्चासह खारीज व्हावी. 20. त.क.यांचे तक्रारी नुसार त्यांनी सदर मृतक कामगाराचे नुकसान भरपाई पोटी रुपये-3,16,580/- कामगार न्यायालयात जमा केले. त्यामुळे त.क.यांनी सदर कामगार न्यायालयातच आपली बाजू मांडावयास हवी होती वा त्यानंतर अपिलीय न्यायालयात अपिल करावयास हवे होते, परंतु त.क.यांनी तसे केले नाही व जिल्हा ग्राहक न्यायमंचात प्रस्तुत तक्रार दाखल केली. त.क.यांचे तक्रारी नुसार त्यांचे कारखान्यातील एकूण 26 कामगारांचा विमा एकत्रितरित्या वर्कमन कॉम्पेन्सेशन पॉलिसी अंतर्गत विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून काढला होता. त्यामुळे वि.प.विमा कंपनीचे आक्षेपा नुसार त.क.यांची तक्रार वर्कमेन कॉम्पेन्सेशन कायदयाचे कक्षेत येत असल्यामुळे, त्या संबधाने जिल्हा ग्राहक न्यायमंचास अधिकार क्षेत्र येत नाही या म्हणण्यात तथ्य दिसून येते. कारण सदर विमा पॉलिसी ही एकत्रित कामगारांची वर्कमन कॉम्पेन्सेशन कायदया अंतर्गतच काढण्यात आली होती आणि सदर कायदया नुसार अधिकारक्षेत्र हे कामगार न्यायालयासच येते. 21. उपरोक्त विवेचना वरुन, प्रस्तुत पॉलिसी ही मूळातच वर्कमन कॉम्पेन्सेशन कायदया अंतर्गत काढलेली असल्याने व मृतक कामगाराचे नुकसान भरपाई संबधाने कामगार न्यायालयाने त.क.यांना आदेशित केलेले आहे. अशास्थितीत वि.जिल्हा ग्राहक न्यायमंचास सदर प्रकरणी अधिकारक्षेत्र येत नसल्याने, प्रकरणातील इतर
CC-99-2011 कोणत्याही मुद्याचे गुणदोषावर विचार न करता, प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, या निष्कर्षाप्रत प्रस्तुत न्यायमंच आलेले आहे. त.क. सक्षम न्यायालयात जाऊत तेथे आपली दाद मागू शकतील, या संबधीचे त्यांचे सर्व हक्क अबाधित ठेवण्यात येत आहेत. 22. वरील सर्व विवेचना वरुन, वि.जिल्हा न्यायमंच, प्रस्तुत प्रकरणात खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) त.क.ची तक्रार खारीज करण्यात येते. 2) खर्चा बद्यल कोणतेही आदेश नाहीत. 3) त.क.ला योग्य वाटल्यास ते सक्षम न्यायालयात जाऊन तेथे आपली दाद मागू शकतील. या संबधीचे त्यांचे सर्व अधिकार अबाधित ठेवण्यात येत आहेत. 4) उभय पक्षांना सदर आदेशाची प्रमाणित प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी. 5) मंचामध्ये मा.सदस्यांकरीता दिलेले (ब) व (क) फाईल्सच्या प्रती तक्रारकर्त्याने घेवून जाव्यात. ( रामलाल भ. सोमाणी ) अध्यक्ष ( सौ.सुषमा प्र.जोशी ) ( मिलींद रामराव केदार) सदस्या सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वर्धा
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |