जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/147 प्रकरण दाखल तारीख - 02/07/2009 प्रकरण निकाल तारीख – 23/10/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य प्रो.प्रा.नवरंग ट्रेडर्स, अर्जदार. अब्दुल जलील पि.अब्दुल रज्जाक, वय वर्षे धंदा- व्यवसाय, रा.फत्तेबुरुज, बर्की चौक, नांदेड. विरुध्द. 1. शाखाधिकारी, न्यु.इंडिया इन्शुरन्स कंपनी लि, गैरअर्जदार. विभागीय ऑफिस कार्यालय, लाहोटी कॉम्प्लेक्स, नांदेड. 2. शाखाधिकारी, न्यु.इंडिया इन्शुरन्स कं.लि,मुख्य शाखा कार्यालय, 87, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.एस.व्ही.राहेरकर. निकालपञ (द्वारा-मा.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार न्यु.इंडिया इंशुरन्स कंपनी लि यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात, त्यांचे नवरंग ट्रेडर्स या नावाखाली जुना मोंढा येथे सुतळी व दोरखंड व्यवसायाचे दुकान आहे. दुकानाच्या सुरक्षिततेसाठी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे दि.12/03/2009 रोजी पॉलिसी क्र.160900/48/08/34/00000305 ही पॉलिसी रु.3,00,000/- साठी घेतली होती. दि.09/03/2009 च्या रात्री म्हणजे दि.10/03/2009 रोजी अर्जदाराच्या दुकानास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली व ती माहीती मिळाल्यावर अर्जदार व त्यांचे मुले दुकानाजवळ गेले असता मोठी आग लागल्याचे दिसले, फायर ब्रिगेडने आग विझवली या नंतर अर्जदाराने रितसर पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावर त्यांनी स्पॉट पंचनामा केला. यामध्ये 8x13 दुकानाचे पंचनामा केला ज्यामध्ये अर्धवट जळालेल्या दो-या,सुतळया,टायर रस्सी, पत्रावळी,डब्बे, नॉयलॉन मोठी रस्सी, व्हील चेअर, इलेक्ट्रॉनिक काटा, शटरचा पत्रा जळाल्याचे दिसुन आले. तसेच कांऊंटरमधील रक्कम रु.10,000/- हे देखील जळालेले आहेत. नुकसानीचा आढावा घेतला असता, तीन ते साडेतीन लाखाचे नुकसान झाल्याचे दिसुन आले. गैरअर्जदार यांना याबाबत सुचना दिल्यानंतर गैरअर्जदार यांनी सर्व्हेअर पाठविले व त्यांनी पुर्तता करण्यास सांगितल्याप्रमाणे त्यानुसार अर्जदाराने क्लेम, पोलिस पंचनामा, दुकानाचे लायसन्स, स्टॉक स्टेटमेंट, नुकसानी पुर्वीचे लॉस स्टेटमेंट व कोटेशन तसेच पर्चेसिंग ट्रेडींग कंपनीचे अकाऊंट व 2006 ते 2007, 2007 ते 2008 तसेच दि.01/04/2008 ते दि.09/03/2009 पर्यंतचे अकाऊंट मागीतले आहे तसेच फायर ब्रिगेटचा रिपोर्ट, एम.एस.ई.बी.चा रिपोर्ट इ. कागदपत्र दिले याप्रमाणे अर्जदाराने मागणी प्रमाणे सर्व कागदपत्र यानुसार आणि पाहणीनंतर मोबदला दिला जाईल असे अर्जदारांना सांगण्यात आले. गैरअर्जदाराने दि.09/06/2009 रोजी गैरअर्जदार यांचेकडुन विमा रक्कम मंजुर झाली आहे व अर्जदारास रु.1,18,282/- चा चेक मिळेल असे सांगण्यात आले हे पाहून अर्जदारास आश्चर्य वाटले जास्तीचे नुकसान झाले असतांना एवढी कमी रक्कम का ? देता अशी विचारणा केली असता, तेवढीच रक्कम मिळेल तेवढया रक्कमे पेक्षा जास्त रक्कम मिळणार नाही असे त्यांना सांगण्यात आले. गैरअर्जदारांनी विमा रक्कम कमी देण्या मागे काय हेतु आहे. सर्व्हेअरने कशामुळे अशा प्रकारचा अभिप्राय दिला याबाबत शंका निमार्ण होते. यामध्ये उत्तर प्रतीउत्तर हे चालु राहीले शेवटी नाईलाजास्तव अर्जदाराने ही तक्रार मा.मंचात घेऊन आले. याप्रमाणे अर्जदाराची विनंती आहे की, विम्याची रक्कम रु.3,00,000/- व नुकसान भरपाई बददल रु.50,000/- आणि दावा खर्चापोटी रु.10,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराचा अर्ज हा प्रिमॅच्युअर्ड आहे व सेवेत न्युनता नाही. त्यामुळे अर्जदारास तक्रार दाखल करण्यास कारण नाही करीता फिर्याद खारीज करावी. गैरअर्जदाराने अर्जदाराचा क्लेम सर्व्हे रिपोर्टप्रमाणे मंजुर केला आहे. त्याप्रमाणे रु.1,18,282/- अर्जदारांना देण्याचे ठरविलेले आहे. परंतु त्यापुर्वी अर्जदाराने कंपनीकडे येऊन आवश्यक ती कागदपत्रे म्हणजे त्यांच्या क्लेम बाबतचे पुर्णतः रक्कम मिळाले बाबतची पावती फुल अण्ड फायनल स्टेटमेंट व्हावचर देणे आवश्यक होते. परंतु कंपनीकडे न जाता सरळ अर्जदाराने फिर्याद दाखल केली. अर्जदाराकडुन दुकानास आग लागल्या बाबतची सुचना प्राप्त झाल्याबरोबर गैरअर्जदार कंपनीने लॉस असेस करण्यासाठी तज्ञ व्यक्ती म्हणुन सर्व्हेअर श्री.मनोहर राम नारायणजी तोतला यांची नियुक्ती केली. त्याप्रमाणे त्यांनी जाय मोक्यावर जाऊन सर्व्हे करुन सर्व्हे रिपोर्ट व लॉस ऑफ स्टॉक याचा अहवाल सादर केला तो खालील प्रमाणे आहे. Also the total weight of loss statement items is 5484 kgs. & value Rs. 316700/- hence rate/kg is arrived Rs.57.74 say Rs.58/- kg. Loss =2184 x 58 = Rs.127252/- Add loss of patravali Rs. 4500/- ----------------------- Rs.131752/- ----------------------- ASSESSMENT ON FFF As per trading account the valuation of FFF is Rs.20500/- Complete FFF is burnt. Valuation of FFF is Rs.20000/- The electronic scale is completely burnt. Needs new replacement. The insured had submitted the quotation, assessed as under : 150 kg Electronic scale Rs.14000/- Less dep.@ 50% Rs. 7000/- Assessment on off Rs. 7000/- II Thus total assessment = I+II= Rs.131752/- +7000 = Rs.138752/- Add fire extinguishing charges Rs. 500/- Rs.139252/- Less salvage @ Rs. 5/kg of 2194 kgs. Rs. 10970/- Rs.128282/- Less excess as per policy Rs. 10000/- Net Liability Rs.118282/- गैरअर्जदार कंपनीने सर्व्हे रिपोर्टच्या आधारे अर्जदाराला नुकसानी बाबत भरपाई मंजुर केली आहे. गैरअर्जदार कंपनीने दिलेली पॉलिसी शॉपकिपरस इंशुरन्स पॉलिसी अशी असुन त्यामध्ये विमा बाबत काय काय बाबी समाविष्ट होतात त्याचे वर्णन दिलेले आहे. अर्जदाराने खरेदी पावतीवर असलेली रक्कम ही लॉस स्टेटमेंट मध्ये वाढवून व जास्तीची दाखवलेली आह. अर्जदाराच्या दुकानात जितका माल मावेल त्यापेक्षा दुप्पट माल लॉस स्टेटमेंट मध्ये दाखवले आहे. एकुण जळालेल्या मालाचे वजन 2170 कीलो ग्रॅम होते. सर्व्हेअरने सर्व्हे करत असतांना अर्जदाराला खाते उता-याची मागणी केली. यानतर त्यांनी खाते उतारा तयार करुन दिले. सदरच्या रिपोर्टच्या अनुषंगाने कुठलाही पुरावा दिलेला नाही. अर्जातील परिच्छेद क्र. 4 यामध्ये अर्जदाराच्या दुकानातील रु.10,000/- कांऊटरमध्ये जळाले व सदरील नुकसान पॉलिसीमध्ये समाविष्ट नाही आणि रुपये तीन लाख ते साडेतीन लाखाच्या मालाचे नुकसान झाले असे पोलिसांनी चुकीचा पंचनामा केला आहे. निव्वळ नुकसान किती झाले तेवढे पॉलिसीच्या नियमात बसत असेल तर कंपनी देऊ लागते. त्यामुळे किती रक्कमेची पॉलिसी घेतली होती ही बाब गौन आहे. गैरअर्जदाराने स्टॉक स्टेटमेंट तसेच नुकसानी पुर्वीचे स्टेटमेंट अकाऊंट सर्व्हेअरला सर्व्हेच्या वेळेस त्यांनी सांगीतल्यानंतर करुन दिले आहे. अर्जदाराचे म्हणणे चुकीचे व खोटे असुन फिर्याद ही ठोस पुराव्या शिवाय कागदपत्रा शिवाय दाखल केलेली आहे. म्हणुन त्यांच्या मागणीसाठी ते पात्र नाहीत सबब तक्रार ही खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे. अर्जदाराने पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील प्रमाणे मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र.1 ः- अर्जदार यांनी त्यांचे दूकानात आग लागल्या बददल वर्तमान पञाचे कटींग,फोटोज, फायर ब्रिग्रेडचे प्रमाणपञ, एफ.आय.आर. घटनास्थळाचा पंचनामा इत्यादी कागदपञ दाखल केलेली आहेत. यासोबत पॉलिसी व पॉलिसीचे नियम हे ही दाखल केलेले आहेत. आग लागली याबददल दूमत नाही. गैरअर्जदार हे सर्व्हेअरनी लॉस असेस केल्याप्रमाणे रु.1,18,282/- ची रक्कम पॉलिसी नंबर 160900/48/08/34/00000305 एवढी रक्कम देण्यास तयार आहेत. तसे फूल अन्ड फायनल सेंटलमेंट व्हायचर देखील त्यांनी अर्जदारास पाठविले आहे परंतु अर्जदारास ही रक्कम मान्य नाही. सर्व्हे रिपोर्टमध्ये सर्व्हेअर यांनी 2006-07, 2007-08, व दि.1.4.2008 ते 9.3.2009 या वर्षीची सरासरी काढून नूकसान गृहीत धरले आहे. अर्जदार यांनी त्यांचे दूकानात आग लागली त्यावेळी सर्व फाईल व कागदपञ जळून गेल्याचे कारणे त्यांनी खरेदी केलेल्या संबंधीत व्यापा-याकडून शेवटच्या कालावधीतील बिले हस्तगत करुन ती सर्व्हेअर यांना दिलेली आहेत. परंतु ही बिले सर्व्हेअरनी गृहीत न धरता सरासरी आधारावर लॉस असेस केलेला आहे. यात दूकानाचा आतील भाग त्यामधील मॅजनीग फलोअर व पहिला मजला हया 1400 सीएफटी क्षेञफळात किती माल बसू शकतो हे अंदाजे माल काढलेला आहे. याप्रमाणे त्यांनी 2194 क्विंटल ची नूकसान भरपाई गृहीत धरले आहे व ती सरासरी 58 च्या रेटने पञावळी सह रु.1,31,752/- गृहीत धरले आहे. इलेक्ट्रानिक स्केल 14020 वर 50 टक्के डिप्रिसियेशन धरुन ते 7000 धरले आहे. दूकानामध्ये नायलॉन रस्सी, सूतळी, पञावळी, पीपी रस्सी अशा प्रकारचा माल होता व हा माल आगीत ताबडतोब जळणारा आहे. त्यामूळे मागे काही शिल्लक राहीले असेल अशी शक्यता नाही व पूर्ण माल भस्मसात झाला हे फोटोवरुन दिसून येते. समजा कमी अधीक काही माल अर्धवट जळाला असेल तर ते अर्धवट जळालेले दोरखंड परत विक्री होऊ शकत नाहीत. त्यामूळे पूर्णच मालाचे नूकसान झाले असेच म्हणावे लागेल. बिलाप्रमाणे दूकानामध्ये एकंदर रु.3,77,622/- चा माल होता. आग ही दि.9.3.2009 रोजी लागली. खरेदी कालावधी हा दि.8.1.2009 ते 9.3.2009 पर्यतचा आहे. यातील बरीचशी बिले लोकलमधून खरेदी केलेली आहेत व काही बिले ही बाहेरगांवचे देखील आहेत. ज्यादिवशी इन्शूरन्स पॉलिसी काढली त्यादिवशी रु.3,00,000/- चा माल दूकानात होता व यानंतर दूकानातील खरेदी विक्री ही चालूच होती. म्हणजे काही खरेदीचा माल वाढला तर त्या कालावधीत विक्री देखील झालेली आहे. म्हणून साधारणतः रु.3,00,000/- चे आसपासचा माल असू शकतो व त्या कालावधीत 25 टक्के विक्री धरल्यास तेवढा माल स्टाकमधून कमी देखील होऊ शकतो कारण दूकानाचा व्यापार चांगला असल्याकारणाने विक्री ही झालीच असणार म्हणजे अर्जदाराने खरेदी केलेली पूर्ण बिले जरी घेतली तरी विक्री ही त्यातून कमी केल्यानंतरच जो माल शिल्लक राहतो तेवढेच नूकसान समजावे लागेल. दूकानाचे क्षेञफळ कमी जरी असले तरी त्यातील उंची व पहिला मजला लक्षात घेता जेवढया रक्कमेचे इन्शूरन्स केलेले आहे तेवढा माल दूकनात बसू शकतो. किंबहूना विमा देताना गैरअर्जदार यांनी रु.3,00,000/- चा माल दूकानात बसू शकतो हे गृहीत धरुनच त्यांना विमा पॉलिसी दिलेली असणार त्यामूळे आता एवढा माल दूकानात बसू शकत नाही असा आक्षेप त्यांना घेता येणार नाही. दूकानातील माल हा पूर्णतः नवा माल भरलेला आहे. त्यामूळे त्यावरती डिप्रिसियेशन सर्व्हेअरना धरता येणार नाही. नवीन मालाची किंमत पूर्णतः गृहीत धरावी लागेल. अर्जदार जर कूठलेच बिल दाख्ल करुन शकले नसते तर सर्व्हेअरनी सरासरीच्या आधारावर काढलेली सरासरी यांचा आधार घेऊन लॉस असेस करता आला असता परंतु अर्जदारांनी खरेदीची पूर्ण बिले दाखल केलेली आहे व गैरअर्जदार यांनी या प्रकरणात ही बिले खोटी आहेत किंवा विचारात घेण्याजोगी नाही असे कूठेही म्हटलेले नाही. उलट गैरअर्जदार असे म्हणतात की कोणत्याही कागदपञाशिवाय तक्रार दाखल केलेली आहे तेव्हा सर्व्हेअरला ही बिले लक्षात घेणे आवश्यक होते परंतु तसे झालेले नाही. म्हणून आमच्या मते खरेदीची एकूण बिले रु.3,77,000/- ची बिले त्या कालावधीत दूकानात 25 टक्के विक्री झालेली असे गृहीत धरले तर रु.2,82,750/- एवढी रक्कम होईल. यातून साल्व्हेज रु.11,000/- व पॉलिसी एक्सेसचे रु.10,000/- अशी एकूण रु.21,000/- वजा केले तर रु.2,61,750/- मिळण्यास अर्जदार पाञ आहेत. ही रक्कम न देऊन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली आहे. गैरअर्जदार यांनी इलेक्ट्रानिक्स काटयाची ठरविलेली रक्कम ही योग्य असून त्यांना रु.7,000/- काटयाबददल देणे योग्य होईल. यात गैरअर्जदार यांनी एकूण रु.14,000/- च्या बिलात 50 टक्के डिप्रिसिऐशन करुन अर्धी रक्कम दयावे असे सर्व्हे रिपोर्टमध्ये म्हटले आहे पण आमच्या मते त्यांना 50 टक्के डिप्रिसिऐशन कमी केले ती योग्य आहे. त्यामूळे अर्जदार हे इलेक्ट्रानिक्स काटयापोटी रु.7,000/- मिळण्यास पाञ आहेत असे आमचे मत आहे. तसेच अर्जदाराची दूसरी मागणी अशी आहे की, त्यांचे कांऊटरमध्ये रु.10,000/- होते ती रक्कम सूध्दा त्यांना हवी आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या दूकानामधील कांऊटरचा इन्शूरन्स काढलेला आहे. पण कांऊटर मधील रक्कमेपोटी रु.3,000/- गैरअर्जदार यांनी मान्य केलेली रक्कम ही पॉलिसी प्रमाणे आमच्या मते योग्य आहे. त्यामूळे अर्जदार यांना गैरअर्जदार यांच्याकडून एकूण रक्कम रु.2,71,750/- मिळण्यास पाञ आहेत. रक्कमेमध्ये तफावत कमी असती तर अर्जदारानी सर्व्हे रिपोर्टप्रमाणे मंजूर रक्कम अर्जदाराने मान्य केली असती पण रक्कममध्ये फार तफावत असल्याकारणाने सेंटलमेंट क्लेमवर सही करु दिली नाही व ती रक्कम मान्यही केली नाही. हे कारण देखील अर्जदाराची नूकसान जास्त झाले हे दर्शविण्यासाठी पूरेशे आहे. गैरअर्जदार यांनी रु.1,18,000/- एवढी रक्कम देण्याची तयारी दर्शविली होती त्यामूळे प्रकरणात दाखल असलेले बरीचशी कागदपञे यांचा ऊहापोह करण्याची आवश्यकता वाटत नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार कंपनीने हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना विमा पॉलिसी नंबर 160900/81/08/0000002979 या अंतर्गत नूकसान भरपाईपोटी रु.2,71,750/- व त्यावर आग लागल्याचे दिनांकापासून दोन महिन्याचेनंतर म्हणजे दि.9.5.2009 पासून 9 टक्के व्याज दराने पूर्ण रक्कम देईपर्यत व्याजासह दयावेत. 3. तसेच मानसिक ञासापोटी रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु,2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्य गो.प.निलमवार, लघूलेखक. |