Maharashtra

Ratnagiri

CC/10/41

Smt. DeepPrabha Arun Shirke. - Complainant(s)

Versus

New India Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

Adv. D. M. Dhavte.

25 Jan 2011

ORDER


DISTRICT CONSUMER FORUM RATNAGIRIDCF, Collectorate Campus, Ratnagiri
Complaint Case No. CC/10/41
1. Smt. DeepPrabha Arun Shirke.Flat No. 7, IndraPrasth Appt. ChiplunRatnagiriMaharashtra2. Shri Amit Arun ShirkeFlat No. 7, IndraPrasth Appt.RatnagiriMaharashtra3. Shri Sagar Arun ShirkeFlat No. 7, IndraPrasth Appt.RatnagiriMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. New India Insurance Co. Ltd.2nd floor, Chinchnaka, Shivaji Nagar, Chiplun, Tal.ChiplunRatnagiriMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. M. M. Goswami ,PRESIDENTHONABLE MRS. Smita Desai ,MEMBER
PRESENT :

Dated : 25 Jan 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

नि.49
मे.जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,रत्‍नागिरी यांचेसमोर
तक्रार क्रमांक : 40/2010
तक्रार दाखल झाल्‍याचा दि.17/08/2010.       
तक्रार निकाली झाल्‍याचा दि.25/01/2011.
श्री.महेंद्र म.गोस्‍वामी, अध्‍यक्ष
श्रीमती स्मिता देसाई, सदस्‍या
                                                          
1.श्रीमती दिपप्रभा अरुण शिर्के
2.श्री.अमित अरुण शिर्के
3.श्री.सागर अरुण शिर्के
सर्व रा.फलॅट नं.7, इंद्रप्रस्‍थ अपार्टमेंट,
पारकर कॉम्‍प्‍लेक्‍स समोर, चिपळूण,
ता.चिपळूण, जि.रत्‍नागिरी.                                       ... तक्रारदार
विरुध्‍द
युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि.,                            ... सामनेवाला
दिपक लॉज बिल्‍डींग, एस.टी.स्‍टँडसमोर,
चिपळूण, ता.चिपळूण, जि.रत्‍नागिरी.
                                             तक्रारदारतर्फे   : विधिज्ञ श्री.डी.एम.धावते
                                      सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.ए.ए.फणसेकर
-----------------------------------------------------------------------------------------------
                                                                      नि.55
 
तक्रार क्रमांक : 41/2010
तक्रार दाखल झाल्‍याचा दि.17/08/2010.       
तक्रार निकाली झाल्‍याचा दि.25/01/2011.
 
1.श्रीमती दिपप्रभा अरुण शिर्के
2.श्री.अमित अरुण शिर्के
3.श्री.सागर अरुण शिर्के                                         ... तक्रारदार
सर्व रा.फलॅट नं.7, इंद्रप्रस्‍थ अपार्टमेंट,
पारकर कॉम्‍प्‍लेक्‍स समोर, चिपळूण,
ता.चिपळूण, जि.रत्‍नागिरी.
 
विरुध्‍द
न्‍यू इंडिया ऍश्‍योरन्‍स कंपनी लि.,                                ... सामनेवाला
दुसरा मजला, चिंचनाका, शिवाजीनगर,
चिपळूण, ता.चिपळूण, जि.रत्‍नागिरी.
 
                                             तक्रारदारतर्फे   : विधिज्ञ श्री.डी.एम.धावते
                                            सामनेवालेतर्फे: विधिज्ञ श्री.एम.बी.भाटवडेकर
          
-: ए क त्रि त  नि का ल प त्र :-
द्वारा : मा.अध्‍यक्ष, श्री.महेंद्र म.गोस्‍वामी
1.     तक्रारदार क्र.1 चे पती व तक्रारदार क्र.2 व 3 यांचे वडील नामे अरुण दत्‍तात्रय शिर्के यांनी तक्रार क्र.40/2010 मधील विरुध्‍द पक्षाच्‍या युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कं.लि. यांचेकडून अपघात विमा पॉलिसी घेतली होती. तसेच त्‍यांनी तक्रार क्र.41/2010 मधील विरुध्‍द पक्षाच्‍या न्‍यू इंडिया ऍश्‍युरन्‍स कं.लि. यांचेकडून देखील अपघात विमा पॉलिसी काढली होती, परंतु विमाधारकाचा अपघाती सर्पदंशाने मृत्‍यु होवूनदेखील विम्‍याची रक्‍कम उपनिर्देशीत दोन्‍ही विमा कंपन्‍यांनी मयताचे वारसांना अदा न केल्‍यामुळे सदरच्‍या तक्रारी विद्यमान मंचासमोर दाखल करणेत आल्‍या आहेत. 
2.    तक्रार क्र.40/2010 व तक्रार क्र.41/2010 ची थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार क्र.1 चे पती व तक्रारदार क्र.2 व 3 चे वडील यांनी अनुक्रमे युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कं.लि. व न्‍यू इंडिया ऍश्‍युरन्‍स कं.लि. यांचेकडून अपघात विमा पॉलिसी घेतलेल्‍या असून त्‍या पॉलिसींचे क्रमांक अनुक्रमे  16139/42/07/01/00000004 व 152203/47/07/51/00000001 असे आहेत. विमाधारक अरुण दत्‍तात्रय शिर्के हे दि.22/11/2007 रोजी त्‍यांचे मूळ गांवी खोपड येथे भाताची झोडणी करत असताना त्‍यांच्‍या उजव्‍या पायाच्‍या पोटरीस विषारी सापाने दंश केला. त्‍यामुळे त्‍यांचेवर लागलीच डॉ.जबले यांचेमार्फत उपचार करण्‍यात आले. तथापी, ते औषधोपचारास प्रतिसाद देत नसल्‍याने त्‍यांना कॉटेज हॉस्‍पीटल कामथे येथे हलविण्‍यात आले, परंतु त्‍यांचा दि.23/11/2007 रोजी पहाटे 4.00 वाजता दुर्देवी मृत्‍यु झाला. पतीच्‍या आकस्‍मीक निधनामुळे तक्रारदारांना प्रचंड मानसिक धक्‍का बसल्‍यामुळे या घटनेबाबत तात्‍काळ माहिती विमा कंपनीला देण्‍यात आली नाही व सर्पदंशाने मृत्‍यु झाल्‍यामुळे पोलीस स्‍टेशनला वर्दी दिली नाही व मृतदेहाचे शवविच्‍छेदन केले नाही, त्‍यानंतर मृत्‍यु प्रमाणपत्र वगैरे प्राप्‍त झालेवर दि.27/06/2008 रोजी उपनिर्देशीत दोन्‍ही तक्रार प्रकरणांतील विमा कंपन्‍यांना रजिस्‍टर पोस्‍टाव्‍दारे क्‍लेम फॉर्म, मूळ पॉलिसी व मूळ कागदपत्रे पाठविण्‍यात आली. त्‍यासोबत डॉ.जबले हॉस्‍पीटल यांचा दाखला, वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्‍हा रुग्‍णालय कामथे यांचा दाखला, सरपंच व पोलीस पाटील यांचे प्रमाणपत्र दोन्‍ही विमा कंपन्‍यांकडे सादर केले. परंतु, तक्रार क्र.40/2010 मधील विरुध्‍द पक्षाच्‍या विमा कंपनीने दि.18/08/2008 चे पत्रान्‍वये तक्रारदारांचा विमा दावा नामंजूर केल्‍याचे कळविले. तर तक्रार क्र.41/2010 मधील विरुध्‍द पक्षाच्‍या विमा कंपनीने दि.17/07/2008 रोजीच्‍या पत्राव्‍दारे तक्रारदारांचा विमा दावा नामंजूर करीत असल्‍याचे कळविले.
3.    उपनिर्देशीत दोन्‍ही तक्रार प्रकरणांतील विमा कंपन्‍यांनी तक्रारदारांचा विमा दावा नामंजूर करताना पोलिसांत वर्दी दिली नाही, शववि‍च्‍छेदन केले नाही, पंचनामा केला नाही अशी कारणे दाखवून तक्रारदारांचा विमा दावा फेटाळला असल्‍यामुळे व विमा कंपन्‍यांनी चूकीच्‍या पध्‍दतीने विमा दावा फेटाळला असल्‍यामुळे आपणास 18% व्‍याजासह व नुकसानभरपाईच्‍या खर्चासह विमा रक्‍कम मिळावी अशी मागणी तक्रारदारांनी उपरोक्‍त दोन्‍ही तक्रारींत केली आहे. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारींसोबत नि.4 वरील दस्‍तऐवजाचे यादीसोबत पॉलिसीची प्रत, विरुध्‍द पक्षाच्‍या विमा कंपनीशी केलेल्‍या पत्रव्‍यवहाराची प्रत, पोस्‍टाची रसिद पावती व पोचपावती, विमा कंपन्‍यांनी विमा दावा फेटाळल्‍याचे पाठविलेले पत्र, वैद्यकीय प्रमाणपत्रे, मृत्‍युचा दाखला, सरपंच व पोलीस पाटील यांचे दाखले इत्‍यादी कागदपत्रे झेरॉक्‍स स्‍वरुपात प्रकरणांत दाखल केली.  
4.    उपनिर्देशीत दोन्‍ही तक्रार प्रकरणांची नोटीस विरुध्‍द पक्षाच्‍या दोन्‍ही विमा कंपन्‍यांना पाठविण्‍यात आली त्‍यानुसार विमा कंपनी ही त्‍यांचे वकिल प्रतिनिधीमार्फत मंचात हजर होवून तक्रार क्र.40/2010 मध्‍ये नि.20 वर लेखी म्‍हणणे दाखल केले. तर तक्रार क्र.41/2010 मधील विमा कंपनीने नि.36 वर आपले लेखी म्‍हणणे दाखल केले. तक्रार क्र.40/2010 मधील युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कं.लि. यांनी त्‍यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यात तक्रारदाराच्‍या तक्रारीवर आक्षेप घेवून विमाधारकाचा मृत्‍यु सर्पदंशाने झाला नसून तक्रारदारांनी विलंबाने अपघाताची माहिती विमा कंपनीला दिली तसेच शवाची शल्‍यचिकित्‍सा करुन घेतली नाही त्‍यामुळे विमाधारकाचा मृत्‍यु नेमका कशामुळे झाला हे स्‍पष्‍ट झालेले नाही. त्‍याप्रमाणे वैद्यकीय अधिकारी कामथे हॉस्‍पीटल यांनी दिलेला दाखला हा कायदेशीर नसून विश्‍वासाहार्य नाही. त्‍यामुळे विमा कंपनीने दि.18/08/2008 चे पत्राव्‍दारे तक्रारदारांचा विमा दावा फेटाळला असून विमा करारातील शर्ती व अटीनुसार शवाचे शवविच्‍छेदन करणे आवश्‍यक असून क्‍लेम नाकारल्‍याच्‍या तारखेपासून बारा महिन्‍यांच्‍या आत तक्रार दाखल करावयास पाहिजे होती, परंतु तक्रारदारांनी अडीच वर्षांनंतर तक्रार दाखल केल्‍यामुळे तक्रार फेटाळण्‍याची विनंती केली. तर तक्रार क्र.41/2010 मधील विरुध्‍द पक्षकार दि न्‍यू इंडिया ऍश्‍युरन्‍स कं.लि. यांनी तक्रारदाराच्‍या तक्रारीवर आक्षेप घेवून तक्रारदारांनी कागदपत्रांची पूर्तता केली नसल्‍यामुळे दि.31/03/2008 रोजी नुकसानभरपाई देण्‍याची जबाबदारी विमा कंपनीवर नसल्‍याचे कळविण्‍यात आले असून तक्रारदार विमा पॉलिसीची रक्‍कम मिळण्‍यास पात्र नसल्‍याने तक्रार फेटाळण्‍याची विनंती केली. 
5.    विरुध्‍द पक्षाच्‍या विमा कंपनीने त्‍यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यात उपस्थित केलेल्‍या आक्षेपांना खोडून काढत तक्रारदारांनी तक्रार क्र.40/2010 मध्‍ये नि.31 वर काऊंटर ऍफिडेव्‍हीट दाखल केले. तर तक्रार क्र.41/2010 मध्‍ये काऊंटर ऍफिडेव्‍हीट नि.43 वर दाखल केले. तसेच तक्रार क्र.40/2010 मधील विमा कंपनीने त्‍यांचे लेखी युक्तिवाद नि.41 वर दाखल केले. तर तक्रारदाराचे वकिलांनी त्‍यांचे लेखी युक्तिवाद नि.44 वर दाखल केले व त्‍यासोबत न्‍यायनिवाडयांच्‍या झेरॉक्‍सप्रती दाखल केल्‍या. तर तक्रार क्र.41/2010 मध्‍ये तक्रारदाराचे वकिलांनी त्‍यांचे लेखी युक्तिवाद नि.49 वर दाखल केले व त्‍यासोबत न्‍यायनिवाडयांच्‍या झेरॉक्‍सप्रती दाखल केल्‍या. त्‍याचप्रमाणे उभय पक्षकारांचे वकिलांनी मंचासमोर विस्‍तृत स्‍वरुपात तोंडी युक्तिवाददेखील केला. सदरची दोन्‍ही प्रकरणे एकाच विमाधारक व्‍यक्तिच्‍या अपघाती मृत्‍युमुळे त्‍यांच्‍या विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी तक्रारदारांनी दाखल केली असून दोन्‍ही तक्रार प्रकरणांतील तक्रारदार हे सारखेच असल्‍यामुळे सदरची दोन्‍ही प्रकरणे एकत्रित निकालपत्रासाठी घेण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून मंचाने नि.1 वर आदेश पारीत केले व सदरची दोन्‍ही तक्रार प्रकरणे एकत्रित निकालासाठी घेतली. त्‍यानुसार खालील मुद्दे निष्‍कर्षासाठी निघतात.  

अ.क्र.
मुद्दे
उत्‍तरे
1.
तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या दोन्‍ही तक्रारी मुदतबाहय आहेत काय ? व करारात नमूद केलेल्‍या मुदतीच्‍या अटीची बाधा सदर तक्रार प्रकरणांना लागू होते काय ?
नाही.
2.
ग्राहकाला देण्‍यात येणा-या सेवेत उपनिर्देशीत दोन्‍ही तक्रार प्रकरणांतील विमा कंपन्‍यानी त्रुटी केली आहे काय ?
होय.
3.
तक्रारदारांच्‍या दोन्‍ही तक्रारी मंजूर होण्‍यास पात्र आहेत काय ?
होय/अंशतः
4.
काय आदेश ?
अंतिम आदेशाप्रमाणे.

 
विवेचन
6.    मुद्दा क्र.1 - I. तक्रारदार क्र.1 ते 3 यांनी मयत विमाधारक अरुण दत्‍तात्रय शिर्के यांच्‍या मृत्‍युनंतर विमाधारकाच्‍या अपघात विमा पॉलिसीची रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यासाठी विद्यमान मंचासमोर उपनिर्देशीत दोन्‍ही तक्रारी दि.17/08/2010 रोजी दाखल केल्‍या आहेत. तक्रार क्र.40/2010 मधील विरुध्‍द पक्षकार विमा कंपनी नामे युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कं.लि. यांनी दि.18/08/2008 चे पत्राव्‍दारे तक्रारदारांचा विमा दावा फेटाळला. तर तक्रार क्र.41/2010 मधील विरुध्‍द पक्षकार विमा कंपनी नामे न्‍यू इंडिया ऍश्‍युरन्‍स कं.लि. यांनी दि.17/07/2008 चे पत्राव्‍दारे विमा दावा फाईल कागदपत्रांच्‍या अभावी बंद करत असल्‍याचे कळविले. युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कं.लि. यांनी विलंबाबाबत आक्षेप घेताना विमा करारातील कलम 8 मध्‍ये नमूद अटीकडे मंचाचे लक्ष वेधले. यामध्‍ये नमूद केल्‍यानुसार क्‍लेम नाकारल्‍याच्‍या तारखेपासून 12 महिन्‍यांचा आत तक्रार दाखल करण्‍याचे प्रावधान असल्‍याचे स्‍पष्‍ट केले व तक्रारदारांनी दोन वर्षांनंतर तक्रार दाखल केल्‍यामुळे तक्रार फेटाळण्‍याची विनंती केली. तर तक्रार क्र.41/2010 मधील विमा कंपनीने दि.17/07/2008 ला पाठविलेल्‍या पत्रात कोठेही विमा दावा फेटाळण्‍याचे नमूद केलेले नसून त्‍यांनी त्‍यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यात उल्‍लेख केलेले दि.31/03/2008 चे पत्र मंचासमोर दाखल केले नाही त्‍यामुळे दि.31/03/2008 ला विमा दावा फेटाळला हे स्‍पष्‍ट झाले नाही. त्‍यामुळे तक्रार क्र.41/2010 ही मुदतीत दाखल केली आहे असे स्‍पष्‍ट होते. त्‍याचप्रमाणे तक्रार क्र.40/2010 मध्‍ये केलेल्‍या आक्षेपाचा विचार करता ग्राहक संरक्षण कायद्यात तक्रार दाखल करण्‍याची निहीत मुदत कलम 24 (अ) नुसार दोन वर्षे दिलेली आहे व तक्रारदारांनी ही तक्रार विद्यमान मंचासमोर दोन वर्षांच्‍या आत दाखल केली आहे त्‍यामुळे करारामध्‍ये नमूद असलेली मुदतीची अट या तक्रार प्रकरणाला अजिबात लागू होत नाही. त्‍यामुळे उपनिर्देशीत दोन्‍ही तक्रार प्रकरणांतील विमा कंपनीने घेतलेले विलंबाबाबत व मुदतीबाबतचे आक्षेप फेटाळणेत येतात. 
II. मा.राष्‍ट्रीय आयोगाने Vishnu Carpets V/s. Mearsk India Ltd. (2010)(3) CPR 117 (NC) या प्रकरणातनिर्वाळा देताना खालील मुद्दा स्‍पष्‍ट केला आहे. 
“A contract between the parties cannot over ride or reduce the period of limitation during which the aggrieved party can approach for redressal of his grievance in accordance with law. ”
7.    मुद्दा क्र.2 - विमाधारक मयत अरुण शिर्केचे वारस या नात्‍याने तक्रारदारांनी उपनिर्देशीत दोन्‍ही तक्रार प्रकरणांतील विमा कंपन्‍यांना अपघात विम्‍याची रक्‍कम देण्‍याची विनंती विमा क्‍लेमव्‍दारे केली असून या क्‍लेमसोबत मयताचा मृत्‍युचा दाखला, डॉक्‍टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, सरपंच व पोलीस पाटलांचा दाखला जोडलेला होता. या दोन्‍ही तक्रार प्रकरणांतील नि.4 सोबत जोडलेल्‍या डॉ.जबले यांनी दिलेल्‍या वैद्यकीय प्रमाणपत्राचे व मेडिकल सुपरिंटेंडेंट सब-डिस्‍ट्रीक्‍ट हॉस्‍पीटल कामथे यांनी दिलेल्‍या प्रमाणपत्रांसह सरपंच व पोलीस पाटलांच्‍या प्रमाणपत्रांचे अवलोकन केल्‍यास विमाधारकाचा मृत्‍यु सर्पदंशाने झालेचे स्‍पष्‍ट होत असून सर्पदंशासारख्‍या अपघाताने मृत्‍यु झालेस पोलीसांना फिर्याद देणे व शवाचे विच्‍छेदन करणे या बाबी गौण   ठरणा-या असतानादेखील उपनिर्देशीत दोन्‍ही प्रकरणांतील विमा कंपन्‍यांनी निव्‍वळ आपणास पोलीस पंचनामा व शवविच्‍छेदन अहवालाची प्रत दिली नाही या कारणास्‍तव विमा दावा फेटाळणे किंवा विमा दाव्‍याचा निर्णय न करता आपल्‍याकडे पाडून ठेवणे ही ग्राहकाला देण्‍यात येणा-या सेवेतील त्रुटी आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.  
8. मुद्दा क्र.3 -    Revision Petition No.3329/2007 United India Insurance Co. Ltd., V/s. Pallamareddy Aruna या प्रकरणात निर्वाळा देताना व्‍यक्‍त केले आहे.  तसेच वैद्यकीय अधिका-याने दिलेल्‍या वैद्यकीय प्रमाणपत्रावरुन व गावातील प्रशासकीय अधिका-याकडून दिलेल्‍या प्रमाणपत्राव्‍दारेदेखील सर्पदंशाने झालेला मृत्‍यु सिध्‍द होतो असे मत मा.राष्‍ट्रीय आयोगाचे माजी अध्‍यक्ष, न्‍यायमूर्ती श्री.एम.बी.शहा यांनी Dharmisetty Srinivas Rao V/s. New India Assurance Co.Ltd. (2006) NCJ 795 (NC)  या प्रकरणात दिले आहे. त्‍याचे वर्णन खालीलप्रमाणे आहेः- निकालपत्राच्‍या मुद्दा क्र.2 मध्‍ये विश्‍लेषीत केल्‍यानुसार विमाधारकाचा सर्पदंशाने मृत्‍यु होवूनदेखील विमा कंपनीने तक्रारदारांचा विमा दावा मंजूर केला नाही ही ग्राहकाला देण्‍यात येणा-या सेवेतील निश्चितच त्रुटी आहे. मात्र या तक्रार प्रकरणांतील युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कं.लि. यांनी त्‍यांचे युक्तिवादाचेदरम्‍यान विमाधारकाच्‍या शवाचे शवविच्‍छेदन करण्‍यात आले नाही व पोलीस पंचनामा किंवा फिर्यादची प्रत सादर केली नाही हे कारण पुढे करुन विमा कंपनीने विमा दावा फेटाळल्‍याचे समर्थन केले. परंतु, एखाद्या व्‍यक्तिचा जेव्‍हा सर्पदंशाने मृत्‍यु होतो तेव्‍हा बहुधा ना पोलिसांकडे वर्दी केली जाते किंवा शवाचे विच्‍छेदनदेखील केले जात नाही व सर्पदंशाच्‍या मृत्‍युचे लक्षण सामान्‍य व्‍यक्तिदेखील सांगू शकतो असे मत मा.राष्‍ट्रीय आयोगाचे तात्‍कालीन अध्‍यक्ष, न्‍यायमूर्ती श्री.एम.बी.शहा यांनी
“Insurance Claim-Determination of - Appreciation of evidence -Janata Personal Accident Policy - Insured died due to snake bite - No Post Mortem – Snake bite proved by doctor certificate and village administration officer- Held – Usually post mortem not conducted in snake bite- Certificate of doctor is sufficient - Company is liable to pay the amount.” 
तसेच मा.राष्‍ट्रीय आयोगाने Gangotri Devi V/s. National Insurance Co.Ltd., (2009) NCJ 525 (NC) या प्रकरणात निर्वाळा देताना खालील मुद्दा स्‍पष्‍ट केला आहे. 
“Insurance Claim – Validity of repudiation – Held – Mere inability of family of deceased/ Insured to report insured’s death to local police is not such serious lapse on their part to disentitle them altogether to insurance claim.”
9. मुद्दा क्र.4 -    उपनिर्देशीत मुद्दा क्र.2 व 3 मध्‍ये विश्‍लेषीत केल्‍यानुसार तक्रारदार क्र.1 ते 3 हे विमाधारक श्री.अरुण दत्‍तात्रय शिर्के यांच्‍या अपघाती मृत्‍युच्‍या विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे. मात्र तक्रारदारांनी विमाधारकाच्‍या अपघाती मृत्‍युनंतर उपरोक्‍त दोन्‍ही तक्रार प्रकरणांतील विमा कंपन्‍यांकडे विमा दावा दाखल करण्‍यास विलंब केला असल्‍यामुळे तक्रारदार हे विमा रकमेवर व्‍याज मिळण्‍यास अजिबात पात्र नाहीत. तक्रार क्र.40/2010 मधील युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कं.लि. यांचेकडून काढण्‍यात आलेली विमा पॉलिसी ही रु.2,00,000/- ची असून तक्रार क्र.41/2010 मधील न्‍यू इंडिया ऍश्‍युरन्‍स कंपनीकडून काढण्‍यात आलेली विमा पॉलिसी ही रु.1,00,000/- ची असल्‍याचे नि.4/1 वरील विमा पॉलिसींच्‍या झेरॉक्‍सप्रतींवरुन स्‍पष्‍ट होते. परंतु, तक्रारदारांनी मागणी करताना पॉलिसीच्‍या मूळ रकमेपेक्षा जास्‍त रकमेची मागणी केली असल्‍यामुळे ही मागणी अजिबात मान्‍य करता येत नाही. त्‍यामुळे आम्‍ही तक्रारदारांच्‍या दोन्‍ही तक्रारी अंशतः मंजूर करीत असून त्‍यादृष्‍टीकोनातून खालील अंतिम आदेश पारीत करीत आहोत. 
                                                            अंतिम आदेश
1.     तक्रारदारांच्‍या दोन्‍ही तक्रारी अनुक्रमे 40/2010 व 41/2010 अंशतः मंजूर करण्‍यात
      येतात. 
2.    तक्रार क्र.40/2010 मधील युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कं.लि. ने तक्रारदार क्र.1 ते 3
      यांना अपघात विमा पॉलिसीची रक्‍कम रु.2,00,000/- (रु.दोन लाख मात्र) अदा करणेचे
      आदेश पारीत करण्‍यात येतात. 
3.    तसेच तक्रार क्र.41/2010 मधील दि न्‍यू इंडिया ऍश्‍युरन्‍स कं.लि. यांनी तक्रारदार क्र.1 ते
      3 यांना अपघात विमा पॉलिसीची रक्‍कम रु.1,00,000/- (रु.एक लाख मात्र) अदा
      करणेचे आदेश पारीत करण्‍यात येतात. 
4.    ग्राहकाला देण्‍यात येणा-या सेवेत त्रुटी केल्‍याबद्दल व तक्रारदारांना शारिरिक व मानसिक
      त्रास दिल्‍याबद्दल व प्रकरण खर्चाबद्दल एकत्रितपणे प्रत्‍येकी रु.5,000/- (रु.पाच हजार
      मात्र) दोन्‍ही तक्रार प्रकरणांतील दोन्‍ही विमा कंपन्‍यांनी तक्रारदारांना अदा करावेत.  
5.    उपनिर्देशीत आदेश क्र.2 ते 4 मधील आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्‍या तारखेपासून 45
      दिवसांचे आत करण्‍यात यावी. 
6.    उपनिर्देशीत आदेश क्र.2 व 3 मधील आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्‍या तारखेपासून 45
      दिवसांचे आत न केल्‍यास व विमा रकमेची अदायगी विहीत मुदतीत न केल्‍यास दोन्‍ही
      विमा कंपन्‍यांनी रकमेची पूर्ण परतफेड करेपर्यंत विमा रकमेवर 9% व्‍याज देण्‍याचे आदेश
      पारीत करण्‍यात येतात. 
7.    तक्रारदारांच्‍या दोन्‍ही तक्रारींतील व्‍याजाच्‍या मागणीसह इतर मागण्‍या फेटाळण्‍यात येतात. 
8.    सदर निकालपत्राच्‍या प्रती दोन्‍ही तक्रार प्रकरणे 40/2010 व 41/2010 मध्‍ये जोडण्‍यात
      याव्‍यात. 
 
रत्‍नागिरी                                                                                                 
दिनांक : 25/01/2011.                                                                                (महेंद्र म.गोस्‍वामी)
                                                                                                                           अध्‍यक्ष,
                                                                     ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,
                                                                                      रत्‍नागिरी जिल्‍हा.
 
 
 
 
(स्मिता देसाई)
सदस्‍या,
ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,
        रत्‍नागिरी जिल्‍हा.
 
प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्‍टाने
प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्‍टाने
 
 
 

[HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. M. M. Goswami] PRESIDENT