Maharashtra

Nashik

CC/207/2011

Smt Anjanabai barve - Complainant(s)

Versus

New India Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

Shri Sandip Kadam

31 Jan 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/207/2011
 
1. Smt Anjanabai barve
R/o Gobapur, Tal. kalwan,
Nashik
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. New India Insurance Co. Ltd.
Mandal Office 130800,17 A 7th Floor Kuprej Rd. New india centre Mumbai 400039
Mumbai
Maharashtra
2. Manager Kabal Jenral Insurance Servises Pvt.Ltd
4/A Dehmandir Co Opp Hsg Society
Nashik
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:Shri Sandip Kadam, Advocate for the Complainant 1
 
ORDER

(मा.सदस्‍या अँड.सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)

 

                      नि  का      त्र

      अर्जदार यांचे पती कै.पंडीत रामु ऊर्फ राम बर्डे यांचे दि.13/10/2010 रोजी मेन रोडने पायी चालत असतांना मालट्रकने ठोस दिल्‍याने अपघात होवून निधन झाले.  अर्जदार यांना शेतकरी अपघात विमा योजनेप्रमाणे सामनेवाले यांनी लाभ दिल्याने सदरचा अर्ज दाखल करावा लागलेला आहे. सबब अर्जदार यांना सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/- दि.08/04/2011 पासून 15% व्याजदराने मिळावे, तसेच मानसिक,शारिरीक आर्थिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावेत या मागणीसाठी सदर अर्ज दाखल केलेला आहे.

 सामनेवाले क्र.2 तर्फे पोष्टाने प्राप् जबाब पान क्र.14 लगत दाखल आहे. सामनेवाला क्र.1 यांचा जबाब पान क्र.19 लगत  व प्रतिज्ञापत्र पान क्र.21 लगत दाखल केलेले आहे.

अर्जदार यांचा अर्ज प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणे तसेच सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्‍हणणे व प्रतिज्ञापत्र   त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः

 

मुद्देः

1.    अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय

2.    सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय? -- होय.

     सामनेवाले क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे.

3.    अर्जदार हे सामनेवाले क्र.1 यांचेकडून विमा क्लेमची रक्कम व्याजासह मिळण्यास

     पात्र आहेत काय? -- होय

4.    अर्जदार हे सामनेवाले क्र.1 कडून मानसिक त्रासापोटी अर्जाचे खर्चाची रक्कम

     मिळणेस पात्र आहेत काय? -- होय

5.    अंतीम आदेश?  -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज  सामनेवाले क्र.2 विरुध्द नामंजूर

     करणेत येत आहे सामनेवाले क्र.1 विरुध् अंशतः मंजूर करण्यात येत आहे.

 

विवेचनः

याकामी अर्जदार सामनेवाले यांचा युक्तीवाद ऐकला.         

      महाराष्ट्र शासनाने शेतक-यांकरीता दि.5/8/2010 चे परिपत्रकाप्रमाणे शेतकरी व्यक्तीगत अपघात संरक्षण विमा योजना सुरु केलेली आहे. त्याचा कालावधी दि.15/8/2010 ते दि.14/8/2011 असा होता.  सामनेवाले यांनी शेतकरी अपघात विमा योजना प्रस्ताव स्विकारलेला आहे.  

सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे पोष्टामार्फत दाखल केले आहे. सदर जबाब पाहता त्यामध्ये सामनेवालेची भूमिका अत्यंत जुजबी आहे, यामध्ये शेतक-यांचा विमा दावा अर्ज तहसिलदारांमार्फत आल्यावर दावा अर्ज योग्यपणे भरलेला आहे काय?

   सोबत जोडलेली कागदपत्रे मागणीप्रमाणे आहेत काय? नसल्यास तहसिलदार यांना कळवून त्यांची पूर्तता करवून घेणे, त्यानंतर विमा कंपनीकडे पाठविणे, विमा कंपनीकडे दावा मंजूर होऊन आलेला धनादेश संबंधीत वारसांना देणे ही कामे आहेत. यासाठी सामनेवाले हे राज् शासन वा शेतकरी यांचेकडून कोणताही मोबदला घेत नाही असे नमूद  आहे. याचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 विरुध् नामंजूर करणेत यावा असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे लेखी जबाबात सदर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना नाकारलेली नाही. सदर पॉलिसी ही  शेतक-यांकरीता विमा योजनेंतर्गत घेतलेली होती ही बाब मान् केलेली आहे. अर्जदार हया मयत कै.पंडीत रामु ऊर्फ राम बर्डे यांच्‍या पत्‍नी आहेत ही बाब सामनेवालेंनी नाकारलेली नाही. सामनेवाले यांचे लेखी म्हणणे त्यामधील कथनावरुन अर्जदार हे मयत कै.पंडीत रामु ऊर्फ राम बर्डे यांचे वारस म्हणून सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे

सामनेवाले क्र.1 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये घेतलेल्‍या बचावामध्‍ये, अर्जदार हे सामनेवालेंचे ग्राहक नाहीत. मयत कै.पंडीत रामु ऊर्फ राम बर्डे हे शेतकरी नव्‍हते. अर्जदार यांनी तलाठी यांचा दाखला, बँक पास बुक, वयाचा दाखला व मृत्‍युचे प्रमाणपत्र या कागदपत्रांची मागणी केली परंतु अर्जदार यांनी ते सादर केलेले नाहीत. त्‍यामुळे सामनेवाला यांचे सेवेत त्रुटी नाहीत. या कारणाने पॉलिसीच्‍या करारनाम्‍यातील शर्थीचा भंग झालेला आहे. सबब अर्जदाराचा अर्ज रद्द करावा, असे नमूद केलेले आहे.

अर्जदार यांनी अपघाताचेबाबत पोलिसांकडील कागदपत्रे दाखल केलेली आहेत. या कागदपत्रांमध्‍ये पान क्र.5 लगत फिर्याद मध्‍ये दि.13/10/2010 रोजी मयत कै.पंडीत रामु ऊर्फ राम बर्डे यांचा पायी चालत असतांना मालट्रकने ठोस मारुन झालेल्‍या अपघातात मृत्‍यु झाला असल्‍याचे नमूद आहे. मयताचा पोष्‍ट मार्टेम रिपोर्ट पान क्र.8 लगत  दाखल केलेला आहे. सदर कागदपत्रे पहाता मयताचा मृत्‍यु अपघाताने झालेला आहे असे दिसत आहे.

सामनेवाला यांनी असा बचाव घेतला आहे की, अर्जदार यांनी तलाठी यांचा दाखला, बँक पास बुक, वयाचा दाखला व मृत्‍युचे प्रमाणपत्र या कागदपत्रांची मागणी केली परंतु अर्जदार यांनी ते सादर केलेले नाहीत. त्‍यामुळे सामनेवाला यांचे सेवेत त्रुटी नाहीत.

 

 सदर अपघाताबाबत अर्जदार यांनी तालुका कृषी अधिकारी, कळवण यांचेकडे कागदपत्रांची पूर्तता करुन प्रस्‍ताव दाखल केला आहे. सदर प्रस्‍ताव कृषी अधिकारी, नाशिक यांनी सामनेवाले यांना पाठविलेला आहे. यावरुन अर्जदार यांनी विमा क्‍लेमची पूर्तता केलेली दिसत आहे. याबाबत शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रकानुसार शासन निर्णयासोबत नमूद केलेली कागदपत्र शेतक-याने स्‍वतंत्रपणे सादर करण्‍याची आवश्‍यकता नाही. तसेच विमा प्रस्‍तावासंदर्भात काही अपवादात्‍मक परिस्थितीमध्‍ये काही कागदपत्रे सादर करावयाची राहिल्‍यास पर्यायी कागदपत्रे किंवा चौकशीच्‍या आधारे प्रस्‍तावाचा निर्णय घेण्‍यात यावा असे नमूद केलेले आहे. याचा विचार होता सामनेवाला यांनी सदर अर्जामध्‍ये दाखल केलेले कागदपत्रे विचारात घेवून क्‍लेम मंजूर करणे आवश्‍यक होते परंतु तसे सामनेवाला यांनी केलेले दिसत नाही. यावरुन सामनेवाला यांनी केवळ तांत्रीक बाबीचा विचार केलेला दिसत आहे. सबब सामनेवाला यांचे सेवेत कमतरता स्‍पष्‍ट होत आहे.

अर्जदाराने पान क्र.9 लगत खाते उतारा, 7/12 उतारा व पान क्र.10 लगत 6 ड ची प्रत  दाखल केलेली आहे. यावरील नोंद पाहता मयत  हे अपघाताचेवेळी व विमा कराराचेवेळी शेतकरी होते असे स्‍पष्‍ट होत आहे.

याबाबत शासन परिपत्रकानुसार महाराष्‍ट्र शासनाने शेतक-यांचा शेती व्‍यवसाय करतांना होणारे रस्‍त्‍यावरील अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश इ. नैसर्गिक आपत्‍तीमुळे होणारे अपघात किंवा अन्‍य कोणतेही अपघात यामुळे शेतक-यांना मृत्‍यू किंवा अपंगत्‍व ओढवल्‍यास अपघातग्रस्‍त कुटुंबास आर्थिक लाभ देण्‍याकरीता सदरची विमा योजना केलेली आहे. याचा विचार होता अर्जदार यांना सदर विमा पॉलिसीचा आर्थिक लाभ होणेस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. पोलिस कागदपत्रांप्रमाणे व परिपत्रकातील कलमाप्रमाणे सामनेवाले यांच्‍या विमा करारातील अटी शर्थींचा भंग होत नाही असे मंचाचे मत आहे.

सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्‍हणणे तसेच अर्जदार यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे विचारात घेतली असता शेतकरी अपघात विमा योजनेनुसार शेतक-याचा मृत्‍यू झाल्‍यास रु.1,00,000/-ची विमा जोखीम घेण्‍यात आली,  दावा रकमेवर व्‍याज मिळणेस अर्जदार हे पात्र आहेत. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.1 कडून विमा क्‍लेमपोटी रक्‍कम रु.1,00,000/- व या रकमेवर तक्रार अर्ज दाखल तारखेपासून म्‍हणजेच

 

 

                                                       तक्रार क्र.207/2011

दि.08/09/2011 पासून संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्‍याज अशी एकूण रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

अर्जदार यांनी सामनेवालेकडून मानसिक त्रासापोटी व खर्चाचे रकमेची मागणी केलेली आहे.  वास्‍तविक वर उल्‍लेख केलेल्‍या महाराष्‍ट्र शासनाच्‍या परिपत्रकानुसार सामनेवाले यांनी कोणत्‍याही तांत्रिक बाबींचा आधार न घेता अर्जदाराचा विमा क्‍लेम त्‍या वेळेत मंजूर करणे गरजेचे होते.  विमा क्‍लेमची रु.1,00,000/- इतकी मोठी रक्‍कम अर्जदार यांना योग्‍य वेळेत मिळालेली नाही.  विमा क्‍लेमची रक्‍कम मिळावी म्‍हणून अर्जदार यांना सामनेवालेकडून या मंचात दाद मागावी लागलेली आहे. वरील कारणांमुळे निश्चितपणे अर्जदारास मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्‍यास खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र. 1 कडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

याकामी मंचाचेवतीने पुढीलप्रमाणे वरिष्‍ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेणेत आलेला आहेः

     1. (2010(2)Mh.L.J.) पान नं.880 मा. उच्‍च न्‍यायालय, मुंबई, शकुंतला धोंडीराम

        मुंडे वि. स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र व इतर

 2. 2008(2) सीपीआर महाराष्‍ट्र आयोग पान 203 आय.सी.आय.सी.आय 

    लोंबार्ड  वि. सिंधुताई खैरनार

 3. 2(2008) ए.सी.सी. मुंबई  उच्‍च न्‍यायालय पान 888 निर्मलाबाई विरुध्‍द 

   महाराष्‍ट्र सरकार.

वरील निकालपत्रांत शेतकरी अपघात विमा योजनेबाबत विचार करुन निर्णय देण्‍यात आलेला आहे.  यामुळे या निकालपत्राचा आधार घेतलेला आहे.

अर्जदाराचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्‍तीवाद तसेच सामनेवाले क्र.1 यांचे लेखी म्‍हणणे, दाखल केलेली कागदपत्रे, वर उल्‍लेख केलेली व आधार घेतलेली वरिष्‍ठ कोर्टाची निकालपत्रे व वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेः

                                           आ दे श

1)     अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र. 2 विरुध्‍द नामंजूर करण्‍यात येत आहे.

                   2)     अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.1 यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.   

3)     आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाले क्र. 1 यांनी अर्जदारास खालीलप्रमाणे     

रक्‍कम दयावीः

अ.          विमा क्‍लेमपोटी रक्‍कम रु.1,00,000/-व या रकमेवर दि.08/09/2011

    पासून द.सा.द.शे. 12% दराने संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत व्‍याज दयावे.

ब.  मानसिक त्रासापोटी रु.5,000/- दयावेत.

क.  अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- दयावेत.

 

 

                    

 

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.