// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 259/2014
दाखल दिनांक : 02/12/2014
निर्णय दिनांक : 26/02/2015
पंचफुला सुधाकर भुरे
वय - वयस्वक, व्यवसाय – गृहीणी
रा. खरवाडी, ता. चांदुर बाजार
जि. अमरावती : तक्रारकर्ती
// विरुध्द //
न्यु इंडिया इंन्शुरन्स कं.लि.
तर्फे विभागीय अधिकारी
वालकट कॅम्पाऊंड, अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. मेश्राम
विरुध्दपक्ष तर्फे : अॅड. मुंदडा
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 26/02/2015)
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
ग्राहक तक्रार क्रमांकः 259/2014
..2..
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे मय्यत सुधाकर हे तिचे पती होते. सुधाकर यांची मौजे खरवाडी येथील शेत सर्व्हे नं. 44, 2 हेक्टर 86 आर ही शेत जमीन होती. दि. २३.१०.२०१२ रोजी सुधाकर याचा मोटर अपघातात मृत्यु झाला. याबद्दल गुन्हा क्र. २७९/१२ पोलिस स्टेशन चांदुर बाजार येथे ज्या वाहनाने धडक दिली त्या नावाने नोंदविण्यात आला.
3. तक्रारदाराचे कथना प्रमाणे शेतकी जनता अपघात विमा योजना अंतर्गत मय्यत सुधाकर यांनी विमा रक्कम भरलेली होती व सुधाकर यांचा अपघात मृत्यु झाल्याने या योजने अंतर्गत तिला रु. १,००,०००/- नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष यांची होती. यासाठी तिने विरुध्दपक्षाकडे तालुका कृषि अधिकारी चांदुर बाजार मार्फत नुकसान भरपाई मिळण्याचा अर्ज केला होता. विरुध्दपक्षाने त्यांच्या दि २१.७.२०१४ च्या पत्रा प्रमाणे तिचा अर्ज हा सुधाकर याच्या नावात फरक असल्याने नामंजूर केला. त्यानंतर तिने दि. २९.९.२०१४ रोजी विरुध्दपक्ष यांना नोटीस पाठविली जी दि. ३०.९.२०१४ रोजी त्यांना मिळाली, परंतु त्यानंतरही विरुध्दपक्षाने योग्य तो निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे तिने हा तक्रार अर्ज दाखल केला.
ग्राहक तक्रार क्रमांकः 259/2014
..3..
4. विरुध्दपक्ष यांनी निशाणी 11 ला त्यांचा लेखी जबाब दाखल करुन तक्रारीतील सर्व मजकुर हा नाकारला. त्यांनी हे देखील नाकारले की, मय्यत सुधाकर यांचा अपघाती मृत्यु झाला होता. तक्रारदाराने केलेली मागणी विरुध्दपक्षाने नाकारली. विरुध्दपक्षाच्या कथना प्रमाणे तक्रारदार ही ग्राहक होत नाही. मय्यत सुधाकर यांच्या मिळत्या जुळत्या नावाचा उल्लेख करुन तक्रारदाराने हा तक्रार अर्ज कोणत्याही सबळ पुरावा न देता खोटा व लबाडीने दाखल केला, त्यामुळे तो रद्द करण्यात यावा अशी विनंती केली.
6. तक्रारदाराने निशाणी 12 ला प्रतिउत्तर दाखल दाखल केले.
7. तक्रार अर्ज, लेखी जबाब, दाखल केलेले दस्त तसेच तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. मेश्राम त्यांचा युक्तीवाद ऐकला. विरुध्दपक्षा तर्फे लेखी युक्तीवाद दाखल केला नसुन तोंडी युक्तीवाद करण्यात आला नाही, यावरुन खालील मुद्दे विचारात घेण्यात आले.
मुद्दे उत्तरे
- तक्रारदार ही शेतकी जनता अपघात
विमा योजने अंतर्गत नुकसान
भरपाई मिळण्यास पात्र आहे का ? .. होय
ग्राहक तक्रार क्रमांकः 259/2014
..4..
- आदेश ? ... अंतीम आदेशा प्रमाणे
कारणमिमांसा ः-
8. रेकॉर्डवर दाखल दस्तावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारदार हीने शेतकी जनता अपघात विमा योजने अंतर्गत तिच्या पतीचे अपघाती निधन झाल्याने नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज केला होता जो दि. २१.७.२०१४ च्या पत्रा प्रमाणे विरुध्दपक्षाने नाकारला व नाकारण्याचे कारण जे देण्यात आले ते असे आहे की, मयताच्या नावात फरक असल्याचे आढळून आले.
9. तक्रारदार हिने दाखल केलेले दस्त क्र. 2/1, 2/2 वरुन हे सिध्द होते की, मय्यत सुधाकर हा मौजे खरवाडी येथील शेत सर्व्हे नं. 44, 2 हेक्टर 86 आर हया शेत जमीनीचा मालक होता व त्यामुळे तो शेतकरी होता.
10. तक्रारदार हिने दाखल केलेल्या मृत्यु प्रमाणपत्र मरणोत्तर पंचनामा, शव विच्छेदन अहवाल, फीर्याद यावरुन हे शाबीत होते की, मय्यत सुधाकर याचा मृत्यु हा चार चाकी वाहनाने धडक दिल्याने झालेला आहे. या विमा योजने अंतर्गत शेतक-याचा अपघाती मृत्यु झाल्यास रु. १,००,०००/- नुकसान भरपाई मयताच्या वारसास मिळण्याची तरतुद त्यात आहे.
11. विरुध्दपक्षाने मयताच्या नावात फरक आहे या कारणावरुन तक्रारदाराचा अर्ज नामंजूर केलेला आहे. तो फरक
ग्राहक तक्रार क्रमांकः 259/2014
..5..
कसा आहे यासाठी विरुध्दपक्षाने कोणतेही दस्त दाखल केलेले नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या निशाणी 2/10 च्या फीर्यादी वरुन, जी मयताचा भाऊ देवराव याने दिलेला आहे, यावरुन हे शाबीत होते की, मयताचे नाव सुधाकर शेषराव भुरे असे होते. मृत्यु प्रमाणपत्र, रेशन कार्ड, 7/12 उतारा व फेरफार याबद्दल जे दस्त तक्रारदार हिने निशाणी 2 सोबत दाखल केले त्यावरुन हे शाबीत होते की, मयताचे नाव सुधाकर शेषराव भुरे असे होते अशा परिस्थितीत मयताच्या नावात कसा फरक आहे हे शाबीत करण्याची जबाबदारी विरुध्दपक्षाची होती परंतु ती त्यांनी पूर्ण केली नाही. या कारणावरुन मयताचा विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याचा अर्ज नामंजूर करण्यात आला ते कारण आधारहिन असून योग्य नाही असा निष्कर्ष काढण्यात येतो.
12. विरुध्दपक्षाने त्यांच्या लेखी जबाबात असे कथन केले की, तक्रारदार हिने मृतक सुधाकर यांच्या मिळत्या जुळत्या नावाचा उल्लेख करुन सदर तक्रार अर्ज दाखल केला. परंतु या कथनात तथ्य आढळून येत नाही. तक्रारदार हिने ग्राम पंचायत खरवाडीच्या सचिवांचे पत्र निशाणी 2/4 ला दाखल केले त्यावरुन असे दिसते की, ती मयताची विधवा असून मयतांचे इतरही वारसदार आहे. असे जरी असले तरी तक्रारदार हिने योग्य त्या अधिका-या कडून वारस दाखला घेतला असता तर ते जास्त योग्य
ग्राहक तक्रार क्रमांकः 259/2014
..6..
झाले असते. अशा परिस्थितीत वर नमुद केल्या प्रमाणे तक्रारदार ही विमा योजने अंतर्गत रु. १,००,०००/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र होते व ती देण्याची जबाबदारी विरुध्दपक्षाची आहे. सबब मुद्दा क्र. 1 ला होकारार्थी उत्तर देण्यात येऊन खालील प्रमाणे तक्रार अर्ज हा मंजूर करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रारदाराने योग्य त्या अधिका-याने निर्गमीत केलेले वारस प्रमाणपत्र विरुध्दपक्षा कडे सादर केल्यावर, विरुध्दपक्ष यांनी शेतकी जनता अपघात विमा योजने अंतर्गत रु. १,००,०००/- तक्रारदार हिला द्यावे.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारीचा खर्च रु. १,०००/- तक्रारदार हिला द्यावे. व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्याव्यात.
दि. 26/02/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष