Maharashtra

Nagpur

CC/12/678

Harisingh Harbansingh Siddhu - Complainant(s)

Versus

New India Assurance Company Ltd. - Opp.Party(s)

Adv. Sitani

07 Oct 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/12/678
 
1. Harisingh Harbansingh Siddhu
Chapru Nagar, Nagpur
...........Complainant(s)
Versus
1. New India Assurance Company Ltd.
Office at Udyam Building, WHC Road, Near Shankar Nagar Sq., Dharampeth, Nagpur.
2. New India Assurance Company Ltd.
Regd. Office New India Assuracne Bldg., 87, M.G.Road, Fort, Mumabai 400 001
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
For the Complainant:Adv. Sitani , Advocate
For the Opp. Party:
ORDER

सौ.मंजुश्री खनके, सदस्‍या यांचे कथनांन्‍वये.

 

 

 

- आदेश -

 (पारित दिनांक  - 07/10/2014)

 

 

1.                                 तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात असा  आहे की, तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या मालकीच्‍या ट्रकचा विमा ज्‍याचा क्र. एम एच 40-6103, मॉडेल 2006, इंजिन क्र. 697 टीसीएस, 7एमटीझेड 926755, चेसिस क्र. 444026 एमटीझेड 762706 असा आहे. वि.प.क्र. 1 यांचेकडे कॉम्‍प्रेसिंव्‍ह विमा म्‍हणून थर्ड पाटी विमा म्‍हणजे जर का वाहनाला अपघात झाल्‍यास दुरुस्‍तीकरीता येणारा खर्च हा विमा कंपनी उचलेल. त्‍याचप्रमाणे जर वाहन चोरी गेले किंवा आग लागली किंवा कोणत्‍याही कारणास्‍तव वाहनाला विमा कंपनी त्‍याची भरपाई विमा धारकाला देईल आणि त्‍यासाठी विमा धारकाकडून प्रीमीयम वसुल करतात. जेणेकरुन, वाहनाला अपघात झाल्‍यास त्‍याची नुकसान भरपाई विमा धारकास देता येईल.

 

                  या सर्व बाबींचा खुलासा झाल्‍यानंतरच तक्रारकर्त्‍याने वि.प.यांचेकडे 16.12.2010 ते 15.12.2011 या कालावधीकरीता रु.8,50,000/- विमामुल्‍याकरीता  काढला. त्‍यासाठी रु.15,950/- प्रीमीयम तक्रारकर्त्‍याने वि.प.कडे भरले. त्‍यावेळी वि.प.ने आवर्जून तक्रारकर्त्‍यास सांगितले की, सदर वाहनास 15.12.2011 पर्यंत काही नुकसान झाल्‍यास त्‍याच्‍या नुकसान भरपाईची जबाबदारी वि.प.वर राहील.

 

                  तक्रारकर्ते यापुढे कथन करतो की, प्रस्‍तुत ट्रक ड्रायव्‍हरने दि.13.08.2011 रोजी त्‍याच्‍या कामठी नाका येथील घरासमोर व्‍यवस्थित पार्क करुन ठेवला होता. परंतू त्‍याला तो घरासमोरुन चोरी गेल्‍याचे आढळून आले. बरीच शोधशोध केली, परंतू वाहन सापडले नाही. ही बाब ड्रायव्‍हरने तक्रारकर्त्‍यास ताबडतोब कळविली. तक्रारकर्त्‍याने त्‍याचवेळी ही बाब जरीपटका पोलिस स्‍टेशन येथे कळवून वाहन चोरी झाल्‍याबाबत दि.13.08.2011 रोजी एफ.आय.आर.क्र. 263/11 दाखल केला. तसेच वि.प. यांनासुध्‍दा वाहन चोरीची घटना कळविली, परंतू वि.प. यांनी आजपर्यंत तक्रारकर्त्‍याची वाहनाची नुकसान भरपाई दिलेली नाही आणि देण्‍यास टाळाटाळ करीत आहेत. तक्रारकर्त्‍याने त्‍याबाबत वि.प.ला कायदेशीर नोटीस दि.25.06.2012 रोजी पाठविली. म्‍हणून वि.प. यांनी सेवेत त्रुटी व अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास नाईलाजाने प्रस्‍तुत तक्रार मंचासमोर दाखल करावी लागली. तसेच तक्रार दाखल करतांना तक्रारकर्त्‍याने शारिरीक,  आर्थिक व मानसिक त्रास, तसेच विमामुल्‍य रु.8,50,000/- व्‍याजासह मिळावे, तक्रारीचा खर्च व नोटीस खर्च मिळावा अशी प्रार्थना केलेली आहे. सदर तक्रारीसोबत तक्रारकर्त्‍याने पॉलिसीची प्रत, एफआयआर प्रत, कायदेशीर नोटीस व पोचपावती इ. दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत.

 

2.                सदर प्रकरणाची नोटीस वि.प.वर बजावण्‍यात आली असता वि.प.क्र. 1 व 2  यांनी हजर होऊन तक्रारीस संयुक्‍तपणे लेखी उत्‍तर व प्राथमिक आक्षेप दाखल केले.

 

3.                वि.प.क्र. 1 व 2 यांनी आपल्‍या प्राथमिक आक्षेपात, तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍या मार्गदर्शीकेप्रमाणे दस्‍तऐवज दाखल केलेले नाहीत, वि.प.ने तक्रारकर्त्‍याला विम्‍याचा अंतिम व पूर्ण मोबदला दि.29.11.2012 रोजी दिलेला आहे, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची सदर तक्रार ही विचार करण्‍यायोग्‍य नसून ती खर्चासह खारीज करण्‍यात यावी.

 

                  आपल्‍या परिच्‍छेदनिहाय उत्‍तरात वि.प.ने तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनावर काढलेला विमा, त्‍याचा कालावधी व प्रीमीयम ही बाब मान्‍य करुन, तक्रारकर्त्‍याने वारंवार मागणी करुनही आवश्‍यक दस्‍तऐवजांची वि.प.कडे पूर्तता केली नाही. म्‍हणून शेवटी त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा ‘नॉन स्‍टँडर्ड बेसिसवर’ मान्‍य करुन, तक्रारकर्त्‍याला विमा घोषित मुल्‍याची 75 टक्‍के रक्‍कम रु.5,80,270/- ही तक्रारकर्त्‍याच्‍या दि.11.07.2012 च्‍या पत्रांन्‍वये आलेल्‍या संमतीनुसार दि.29.11.2012 रोजी वि.प.ने अदा केली.

 

                  वि.प.च्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने वाहन हे रस्‍त्‍यावर काहीही काळजी न घेता उभे केले होते, त्‍यामुळे पॉलिसीचे क्र. 4 चा भंग त्‍याने केलेला आहे. तक्रारकर्त्‍याने सदर वाहन चोरीची सुचना वि.प.ला घटना घडल्‍यापासून तब्‍बल 17 दिवसाने उशिरा दिलेली आहे. तक्रारकर्त्‍याला वाहनाचे मुळ दस्‍तऐवज रजिस्‍ट्रेशन बुक, टॅक्‍स बुक, परवाना, फिटनेस सर्टिफिकेट इ. दाखल करण्‍यास सांगितले असता त्‍याने असमर्थता दर्शविली. तसेच पत्रसुध्‍दा वि.प.ला पाठविले. वि.प.ने तक्रारकर्त्‍याला विमा रक्‍कम दिलेली असल्‍याने त्‍यांच्‍या सेवेत कुठलीही त्रुटी नाही, त्‍यामुळे सदर तक्रार खारिज होण्‍यास पात्र आहे असे वि.प.ने नमूद केले आहे. तक्रारकर्त्‍याची सदर तक्रार ही खोटी असल्‍याने ती खर्चासह खारिज करण्‍याची मागणी वि.प.ने लेखी उत्‍तरात केलेली आहे. वि.प.ने आपले म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ पेमेंट व्‍हाऊचर, तक्रारकर्त्‍याचा खाते उतारा, रीलाएंस जनरल इंशूरंस यांना दिलेले पत्र, तक्रारकर्त्‍याचे संमती पत्र व मुळ दस्‍तऐवज दाखल करण्‍यास असमथ असल्‍याबाबतचे पत्र, एफआयआर, क्राईम डिटेल फॉर्म इ. दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत.

 

4.                तक्रारकर्त्‍याने वि.प.यांचे लेखी उत्‍तरावर प्रतिउत्‍तर दाखल करुन रु.5,80,270/- ही रक्‍कम वि.प.ने तक्रारकर्त्‍याचे संमतीशिवाय व विमा दावा पूर्ण आणि अंतिम निकाली काढल्‍याशिवाय दिलेली असल्‍यामुळे ती तक्रारकर्त्‍यास मान्‍य नाही व त्‍यासाठी वि.प.ने दिलेले स्‍पष्‍टीकरण खोटे आणि तक्रारकर्त्‍याच्‍या हक्‍काची रक्‍कम हडपण्‍याचे उद्देशाने दिलेले आहे. ते तक्रारकर्त्‍यास मान्‍य नाही.

 

5.                उभय पक्षांचा तोंडी युक्‍तीवाद त्‍यांचे वकिलांमार्फत ऐकला. तसेच त्‍यांनी दाखल केलेली शपथपत्रे, दस्‍तऐवज व लेखी युक्‍तीवाद यांचे अवलोकन केले असता मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे, निष्‍कर्ष व त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे.

 

            मुद्दे                                                   निष्‍कर्ष

1) वि.प.च्‍या सेवेतील न्‍यूनता व अनुचित व्‍यापार प्रथा अवलंबिल्‍याचे

   दिसून येते काय                                                  होय.

2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मागण्‍यास पात्र आहे काय                         होय.

3) आदेश                                              तक्रार अंशतः मंजूर.

 

 

-कारणमिमांसा-

 

6.          मुद्दा क्र. 1 – वास्‍तविकतः तक्रारकर्त्‍याने वि.प.कडे वाहनाच्‍या नुकसान भरपाईसाठी विमा काढलेला होता आणि तो विमा कालावधीत असतांना तक्रारकर्त्‍याचे वाहन चोरीस गेले होते. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने पोलिस स्‍टेशनला व वि.प.कडे रीतसर कळवून वि.प.कडे विमा दावा दाखल केला होता आणि विमा दाव्‍याची रक्‍कम दाव्‍यातील रकमेनुसार रु.8,50,000/- या संपूर्ण रकमेची मागणी केली होती. तसेच त्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने आवश्‍यक ते कागदपत्र जोडले होते. परंतू वि.प.ने दाखल केलेल्‍या व प्राथमिक आक्षेप व लेखी उत्‍तर यांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता मंचास असे दिसून येते की, वि.प.ने मागणी केल्‍यावरही तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍या मार्गदर्शीकेप्रमाणे दस्‍तऐवज दाखल केलेले नाहीत, वि.प.ने तक्रारकर्त्‍याला विम्‍याचा अंतिम व पूर्ण मोबदला दि.29.11.2012 रोजी दिलेला आहे, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार ही विचार करण्‍यायोग्‍य नाही व ती खारीज करण्‍यात यावी असेही वि.प.ने लेखी उत्‍तरात नमूद केले आहे. यापुढे वि.प.ने आपल्‍या लेखी उत्‍तरात असेही नमूद केले आहे की, तक्रारकर्त्‍याने विमा दावा निकाली काढण्‍यासाठी आवश्‍यक असलेले कागदपत्रांच्‍या मुळ प्रती दाखल करण्‍यास सांगितले असता तक्रारकर्त्‍याने त्‍या दाखल करण्‍यास असमर्थ असल्‍याचे कळविल्‍याने व तसे पत्र तक्रारकर्त्‍याने वि.प.ला दिलेले आहे, त्‍याची प्रत लेखी उत्‍तरासोबत वि.प.ने दाखल केलेली आहे आणि त्‍यामुळे वि.प. तक्रारकर्त्‍याचा विमा दावा त्‍याने नमूद केलेल्‍या संपूर्ण रकमेवर मंजूर करु शकत नसल्‍यामुळे तो ‘नॉन स्‍टँडर्ड बेसिसवर’ मान्‍य करुन, विमा घोषित मुल्‍याच्‍या 75 टक्‍के या रक्‍कमेतून रु.1,500/- ही रक्‍कम कंपलसरी पॉलिसी एक्‍सेस कपात करुन दिली. त्‍यामुळे ती वि.प.च्‍या सेवेतील न्‍यूनता नाही. परंतू तक्रारकर्त्‍याने प्रतिउत्‍तरात असे नमूद केले आहे की,  वि.प.ने त्‍याला दिलेली रक्‍कम ही विमा घोषित मुल्‍याच्‍या 75 टक्‍के रक्‍कम नाही व ती वि.प.ने त्‍याचे संमतीशिवाय खात्‍यात जमा केलेली आहे, म्‍हणून मंच या निष्‍कर्षाप्रत पोहोचले आहे की, तक्रारकर्त्‍याच्‍या विमा दाव्‍यातील रक्‍कम रु.8,50,000/- याची 75 टक्‍के राशी रु.6,37,500/- यामधून रु.1,500/- ही रक्‍कम कंपलसरी पॉलिसी एक्‍सेस कपात करुन रु.6,36,000/- ही रक्‍कम वि.प. तक्रारकर्त्‍याला देणे लागत होते. परंतू प्रत्‍यक्षात वि.प.ने रु.5,80,270/- ही रक्‍कम तक्रारकर्त्‍यास देऊन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे व हीच सेवेत न्‍यूनता आहे असे मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.

 

7.          मुद्दा क्र. 2 –  तसेच तक्रारकर्त्‍याने प्रत्‍यक्षात मंचासमोर दाखल केलेल्‍या तक्रारीत असे कुठेही नमूद केले नाही की, वि.प.ने आवश्‍यक कागदपत्र मागितले असता काही कागदपत्रांच्‍या मुळ प्रती तक्रारकर्ता वि.प.ला पुरवू शकला नाही आणि त्‍यामुळे त्‍याला विमा रकमेची संपूर्ण रक्‍कम मिळू शकेल किंवा नाही. तसेच अभिलेखावर दाखल असलेले तक्रारकर्त्‍याचे कागदपत्रे व वि.प.ने दाखल केलेले कागदपत्रे यांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता मंचाचे असे लक्षात आले की, तक्रारकर्त्‍याने वि.प.ला पाठविलेले दि.11.07.2012 चे पत्र यातील मजकुरावरुन असे स्‍पष्‍ट होत आहे की, तक्रारकर्त्‍याने स्‍वतः विमा घोषीत मुल्‍याचे 75 टक्‍के रक्‍कम घेण्‍यास मंजूरी दिलेली आहे. तसेच 28.02.2012 चे तक्रारकर्त्‍याचे पत्रावरुन असे स्‍पष्‍ट होत आहे की, नमूद कागदपत्रांच्‍या मुळ प्रती या वाहनासोबत चोरी झाल्‍याने त्‍या दाखल करण्‍यास तक्रारकर्ता असमर्थ आहे आणि म्‍हणूनच मंचाचे असे स्‍पष्‍ट मत आहे की, तक्रारकर्ता हा तक्रारीतील त्‍याच्‍या मागणीप्रमाणे फक्‍त अंशतः स्‍वरुपात मागणी पूर्ण होण्‍यास पात्र आहे. वि.प.ने आधीच तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात रु.5,80,270/- जमा केलेले आहेत आणि तक्रारकर्त्‍याने मान्‍य केले आहेत, परंतू दावा रकमेच्‍या 75 टक्‍के रक्‍कम ही रु.1,500/- वजा जाता रु.6,36,000/- इतकी येते व या रकमांच्‍या फरकातील रक्‍कम रु.45,730/- तक्रारकर्त्‍याला वि.प. देणे लागतात. म्‍हणून वि.प.ने सदर रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी. तसेच वि.प.च्‍या या सेवेतील न्‍युनतेमुळे तक्रारकर्ता सदर रक्‍कम द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याजासह दि.5,80,270/- रक्‍कम दिल्‍याचे तारखेपासून म्‍हणजेच दि.29.11.2012 पासून तर प्रत्‍यक्ष रकमेच्‍या अदाएगीपर्यंत द्यावे. तसेच मुद्दा क्र. 1 नुसार वि.प.चे सेवेतील न्‍यूनतेमुळे तक्रारकर्ता त्‍याला झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसानाची भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्‍यास पात्र आहे.  करिता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

-आदेश-

 

1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अशंतः मंजूर करण्‍यात येते.

2)    वि.प.ला आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला रु.45,730/- ही रक्‍कम   दि.29.11.2012 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्‍के    व्‍याजाने द्यावी.

3)    तक्रारकर्त्‍याला शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसानाची भरपाई म्‍हणून रु.5,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रु.4,000/- वि.प.ने द्यावे.

4)    सदर आदेशाचे पालन वि.प.क्र. 1 व 2 यांनी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून   एक महिन्‍याचे आत करावे.

 

    

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.