Maharashtra

Nagpur

CC/10/503

Smt. Kausalyabai Jagdish Likhitkar - Complainant(s)

Versus

New India Assurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv. Pritish Bansod

30 Aug 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/503
 
1. Smt. Kausalyabai Jagdish Likhitkar
R/o. Omnagari Colony, Near Lalguda Lack, Wani, Dist. Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. New India Assurance Co.Ltd.
Office No.2, Shri Ganesh Chambers, Laxminagar Chowk, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)
                           -// आ दे श //-
                  (पारित दिनांक : 30/08/2011)
 
 
1.          प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्‍द मंचात दिनांक 13.08.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
                       
2.          यातील तक्रारकर्तीचे म्‍हणणे आहे की, तिचे पती जगदीश रघुनाथ लिखीतकर हे गैरअर्जदार क्र.2 कडे नोकरीस होते आणि गैरअर्जदार क्र.2 ने गैरअर्जदार क्र.1 कडे आपल्‍या कामगारांसाठी विमा पॉलिसी काढली होती व त्‍यामध्‍ये अपघाती मृत्‍यू झाल्‍यास रु.5,00,000/- एवढी नुकसान भरपाई मिळण्‍याची सोय होती.
 
3.          यातील तक्रारकर्तीचे पतीचा दि.08.01.2003 रोजी जमीनीवर पडले व डोक्‍यास मार लागला व त्‍यात त्‍यांचा मृत्‍यू झाला म्‍हणून त्‍यासंबंधीचे दस्‍तावेजासह तिने विम्‍याची मागणी गैरअर्जदार क्र.2 कडे नोंदविलेली. गैरअर्जदार क्र.1 ने सदर प्रकरणात तक्रारकर्तीस ‘व्हिसेरा रिपोर्ट’, जमा करण्‍यांस सांगितले. तक्रारकर्तीचे असे म्‍हणणे आहे की, प्रत्‍यक्षात व्हिसेरा ठेवलाच नव्‍ह‍ता, त्‍यामुळे तो पाठविण्‍याचा किंवा अहवाल येण्‍याचा संबंधच नव्‍हता. तसेच गैरअर्जदार क्र.1 यांची मागणी चुकीची होती, ही बाब त्‍याने गैरअर्जदार क्र.1 ला वारंवार सांगितली, शिवाय दि.26.04.2010 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठविली ती त्‍यांना मिळाल्‍यानंतरही त्‍यांनी कोणतेही उत्‍तर दिले नाही. त्‍यामुळे तक्रारीर्तीने ही तक्रार मंचात दाखल केली व ती व्‍दारे रु.5,00,000/- रक्‍कम मिळवी व त्‍यावर द. सा.द.शे. 12% व्‍याज मिळावे, तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावा व मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.3,00,000/- मिळावे अश्‍या मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
4.           गैरअर्जदारांना नोटीस देण्‍यांत आले असता त्‍यांना नोटीस प्राप्‍त होऊन त्‍यांनी खालिल प्रमाणे आपला जबाब दाखल केलेला आहे.
           गैरअर्जदार क्र.1 ने आपला जबाबाव्‍दारे सर्व विपरीत विधाने नाकबुल केली, पॉलिसीबाबतचे म्‍हणणे मान्‍य केले. मात्र डॉ. मानकर यांचे पत्र हे लेटरहेडवर नाही ‘व्हिसेरा रिपोर्ट’, नाही असा आक्षेप घेतला आहे. तसेच गैरअर्जदार क्र.1 ने सदर तक्रार चुकीची विधाने करुन दाखल केलेली असुन ती खारिज करण्‍यांत यावी असे नमुद केले आहे.
5.          गैरअर्जदार क्र.2 यांनी आपला जबाब दाखल करुन त्‍या व्‍दारे तक्रारकर्तीचा विमा दावा गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पाठविला आणि दस्‍तावेज दिले यात त्‍यांचा कोणताही दोष नाही असा उजर घेतलेला आहे.
 
6.         तक्रारकर्तीनी प्रस्‍तुत तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्‍तावेजांची यादी जोडलेली असुन त्‍यात अनुक्रमांक 1 ते 11 वर विमा प्रमाणपत्र, मर्ग सुचना, घटनास्‍थळ पंचनामा, पोस्‍ट मार्रटम रिपोर्ट मृत्‍यू प्रमाणपत्र कायदेशिर नोटीस, पोष्‍टाच्‍या पावत्‍या इत्‍यादी दस्‍तावेजांच्‍या छायांकित प्रती जोडलेल्‍या आहेत.
 
 
 
 
 
7.          प्रस्‍तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.18.08.2011 रोजी आली असता तक्रारकर्त्‍यांचे व गैरअर्जदार हजर त्‍यांचा युक्तिवाद ऐकूण प्रकरण निकालाकरीता ठेवण्‍यांत आले. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्‍तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
 
                 -// नि ष्‍क र्ष //-
 
8.          यातील गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचा विमा दावा कधीही नाकारला नाही, त्‍यामुळे मुदतीचा प्रश्‍न निर्माण होत नाही. जोपर्यंत मृतकाचे मृत्‍यूचा संबंध आहे, यातील पोस्‍ट मार्रटम रिपोर्टचे कलम 17 मध्‍ये एकूण 6 जखमांचे विवरण असुन त्‍या जखमा मृत्‍यूपूर्व असल्‍याची नोंद त्‍या ठिकाणी आहे. तसेच मृत्‍यूच्‍या कारणा संबंधीची नोंद खालिल प्रमाणे आहे...
                        “Cardio - respiratory assert due to head injury”.
                        यासंबंधाने डॉक्‍टरांनी मृत्‍यूचे कारणाचे प्रमाणपत्र सुध्‍दा दिलेले आहे. या बाबी लक्षात घेता मृतकाचे डोक्‍याला जखमा होऊन झालेल्‍या मृत्‍यू संबंधी शंका घेण्‍याचे कोणतेही कारण दिसुन येत नाही.
9.          वरील परिस्थिचा विचार करता गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने विमा दावा न देऊन आपल्‍या सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेली आहे. करीता आम्‍ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
                  -// अं ति म आ दे श //-
 
1.    तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदार क्र.1 यांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला विमा दाव्‍याचे      रकमेपोटी रु.5,00,000/- वकीला मार्फत पाठविलेल्‍या नोटीसचे दि.30.04.2010     रोजीपासुन द.सा.द.शे.12% येणारी रक्‍कम अदा होईपर्यंत व्‍याजासह अदा करावी.
3.    गैरअर्जदार क्र. 1 यांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीस मानसिक,  शारीरिक त्रासाकरीता रु.10,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.5,000/- अदा करावे.
4.    गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्‍दची तक्रार खारिज करण्‍यांत येते.
5.    वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र.1 यांनी आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
 
     
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.