Maharashtra

Nagpur

CC/10/272

M/s. Khandelwal Earth Moovers - Complainant(s)

Versus

New India Assurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv. Kaushik Mandal

14 Oct 2010

ORDER


DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR.District Consumer Forum, 5th Floor, New Administrative Building, Civil Lines, Nagpur-440 001
Complaint Case No. CC/10/272
1. M/s. Khandelwal Earth MooversNagpur ...........Appellant(s)

Versus.
1. New India Assurance Co.Ltd.Nagpur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :Adv. Kaushik Mandal, Advocate for Complainant

Dated : 14 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर.
                                    तक्रार दाखल दिनांक :03/05/2010                                        आदेश पारित दिनांक :14/10/2010
 
 
 
 
 
 
तक्रार क्रमांक           :-    272/2010
 
तक्रारकर्ता         :    मेसर्स खंडेलवाल अर्थ मुव्‍हर्स,
                     177, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर-440010.
                        तर्फे त्‍यांचे भागीदार,
                        राजीवकुमार विमलकुमार खंडेलवाल.
 
                                
                        -// वि रु ध्‍द //-
 
 
गैरअर्जदार         :    न्‍यू इंडिया एश्‍युरन्‍स कंपनी लिमिटेड,
                     विभागीय कार्यालय क्र.1, श्रीराम श्‍याम टॉवर्स,
                        एस.व्‍ही. पटेल रोड, किंग्‍जवे, नागपूर-01.
 
 
तक्रारकर्त्‍याचे वकील      :    श्री. कौशिक मंडल.
गैरअर्जदाराचे वकील :    श्री. एस.एम. पाळधीकर.
 
 
गणपूर्ती           :    1. श्री. विजयसिंह राणे   - अध्‍यक्ष
                     2. श्री. मिलींद केदार    - सदस्‍य
                                               
                                          
                                         
           (मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)
                        -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 14/10/2010)
 
1.           प्रस्‍तुत तक्रार ही तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्‍द मंचात दिनांक 03.05.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          तक्रारकर्ता हा MH-29/M-302 नोंदणी क्रमांक असलेल्‍या टिप्‍परचा मालक आहे. सदर वाहन हे गैरअर्जदारांकडे रु.9,10,000/- इतक्‍या मुल्‍याकरता दि.16.05.2008 ते 15.05.2009 या कालावधीकरीता विमाकृत करण्‍यांत आले होते व त्‍याकरीता त्‍याने गैरअर्जदाराला रु.9,072/- विमा प्रिमियम दिला होता. सदर वाहनाचा दिनांक 06.05.2009 रोजी अपघात झाल्‍यामुळे ते क्षतिग्रस्‍त झाले, याबाबतची माहिती गैरअर्जदारांना देण्‍यांत आली होती व त्‍यांनी स्‍पॉट सर्व्‍हेअरने घटनास्‍थळाचा सर्वे केला. स्‍पॉट सर्व्‍हेअरने क्षतिग्रस्‍त वाहनाची संपूर्ण तपासणी केली व फोटोग्राफ घेतले व तक्रारकर्त्‍याला कोणतीही संधी न देता त्‍याचा रिपोर्ट गैरअर्जदारांकडे सादर केल्‍याचे तक्रारीत नमुद केला आहे. तक्रारकर्त्‍याने तकारीत नमुद केले आहे की, त्‍याने गैरअर्जदार व स्‍पॉट सर्व्‍हेअरची परवानगी घेऊन सदर वाहन भोलासिंग बॉडी वर्क्‍स, कामठी रोड, नागपूर येथे आणले व त्‍याकरीता रु.7,500/- इतका खर्च आला. त्‍यानंतर गैरअर्जदाराने श्री. के.टी. थॉमस यांना अंतिम सर्व्‍हेअर म्‍हणून नियुक्‍त केले. अंतिम सर्व्‍हेअरने वाहन Dismantle करण्‍यापूर्वी व Dismantle केल्‍यानंतर क्षतीग्रस्‍त वाहनाचे निरीक्षण केले. तसेच सर्व कागदपत्रांचे व दुरुस्‍तीच्‍या अंदाज पत्रकाची तपासनी करुन आपले मत दिले. तक्रारकर्त्‍याने पुढे नमुद केले आहे की, त्‍याला सदर वाहनाच्‍या दुरुस्‍ती करता लेबर चार्जेस पोटी रु.65,050/- व वाहनाच्‍या सुटया भागांकरता रु.21,900/- सहन करावे लागले.
 
3.          तक्रारकर्त्‍याने दावा निकाली काढण्‍याकरता आवश्‍यक सर्व दस्‍तावेज गैरअर्जदारांना दिल्‍यानंतर त्‍यांनी विमा दावा निकाली काढला नाही म्‍हणून तक्रारकर्त्‍याने दि.09.10.2009 रोजी नोटीस पाठविली, तसेच वकीला मार्फत प्रादेशिक व्‍यवस्‍थापक यांना दि.17.12.2009 रोजी नोटीस पाठविली. परंतु त्‍यावर कोणतीही कारवाई करण्‍यांत आली नाही म्‍हणून त्‍यानंतर दि.09.10.2009 रोजी चेअरमन-कम-मॅनेजिंग डायरेक्‍टर यांना आणि दि.19.02.2010 रोजी विभागीय व्‍यवस्‍थापक आणि मुख्‍य प्रादेशिक व्‍यवस्‍थापक, नागपूर यांना नोटीस पाठविली. दि. 16.02.2010 व 20.02.2010 रोजी गैरअर्जदारांकडून तक्रारकर्त्‍यास पत्र प्राप्‍त झाले व त्‍यामध्‍ये No Claim म्‍हणून सदर प्रकरण बंद करण्‍यांत आल्‍याचे कळविले. सदर No Claim, IMT 47 चा आधार घेऊन बंद करण्‍यांत आल्‍याचे पत्रात नमुद होते, तक्रारकर्त्‍यानुसार IMT 47 हा पॉलिसीचा भाग नव्‍हता. तक्रारकर्त्‍याने नमुद केले आहे की, गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी दिलेली आहे व गैरकायदेशिररित्‍या त्‍यांचा विमा दावा नाकारल्‍यामुळे त्‍यांनी सदर तक्रार दाखल केली आहे.
 
4.          सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावल्‍यानंतर त्‍यांनी आपल्‍या परिच्‍छेदनिहाय उत्‍तरात तक्रारकर्त्‍याचे बहुतांश म्‍हणणे नाकारले असुन तक्रारकर्त्‍याचे वाहनाला गाडी खाली करीत असतांना बॅलेन्‍स गेल्‍यामुळे वाहन पलटी झाले, त्‍यामुळे विम्‍याच्‍या अटी व शर्तींनुसार विमा दावा देय नाही. अशा अटी व शर्तींमध्‍ये अंतर्भाव नसल्‍यामुळे विमा दावा नाकारल्‍याचे म्‍हटले आहे.
5.          मंचाने दोन्‍ही पक्षांचा युक्तिवाद त्‍यांचे वकीलांमार्फत ऐकूण घेतला, तसेच मंचापुढे दाखल दस्‍तावेज व दोन्‍ही पक्षांचे कथन यांचे सुक्ष्‍म निरीक्षण करता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
                        -// नि ष्‍क र्ष //-
 
6.          तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराकडे त्‍याचे टिप्‍पर वाहन क्रमांक MH-29/M-302 विमाकृत केले होते हे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तावेजांवरुन स्‍पष्‍ट होत असल्‍यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ‘ग्राहक’ ठरतो असे मंचाचे मत आहे.
7.          तक्रारकर्त्‍याचे वाहनाला दि.06.05.2009 रोजी अपघात झाला होता ही बाब सुध्‍दा दस्‍तावेजांवरुन स्‍पष्‍ट होते व गैरअर्जदाराने दाखल केलेल्‍या श्री. व्‍ही.ए. थॉमस यांच्‍या निरीक्षण अहवालावरुन स्‍पष्‍ट होते. तसेच सदर वाहनात स्‍पॉट सर्व्‍हेअरने निरीक्षण केल्‍याची बाब सुध्‍दा स्‍पष्‍ट होते.
 
8.          तक्रारकर्त्‍याला सदर वाहनाचे दुरुस्‍ती करीता लेबर चार्जेस म्‍हणून रु.62,050/- व सुट्या भागांचा खर्च म्‍हणून रु.21,900/- इतका खर्च आल्‍याची बाब त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तावेज क्र.3, पान क्र.8 व 9 वरुन स्‍पष्‍ट होते.
 
9.          गैरअर्जदाराने आपल्‍या उत्‍तरात श्री. व्‍ही.ए. थॉमस यांचा अंतिम निरीक्षण अहवाल दाखल केलेला आहे, त्‍यानुसार त्‍यांनी रु.58,075/- एवढया नुकसानीचे मुल्‍यांकन केले. परंतु गैरअर्जदाराने निरीक्षकाचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही. तेव्‍हा नमुद कारणाकरीता मा. राष्‍ट्रीय आयोग व मा. राज्‍य आयोग यांनी अनेक न्‍याय निवाडयांमध्‍ये सर्वे रिपोर्ट ग्राह्य धरण्‍याकरता सर्व्‍हेअरचे प्रतिज्ञापत्र दाखल करणे आवश्‍यक आहे, ते गैरअर्जदारांनी दाखल केलेले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तावेजांवरुन हे खोटे समजता येत नाही व सदर वाहनाचे दुरुस्‍ती करता तक्रारकर्त्‍यास रु.83,950/- व वाहन दुरुस्‍ती करता आणण्‍याचा खर्च रु.7,500/- ग्राह्य धरण्‍यांत येतो. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास गैरअर्जदाराने रु.91,450/- एवढी रक्‍कम वाहनाच्‍या दुरुस्‍ती करता द्यावयास पाहिजे असे मंचाचे मत आहे.
 
10.         तक्रारकर्त्‍याने तक्रारीमध्‍ये त्‍याला पॉलिसीच्‍या अटी व शर्ती देण्‍यांत आल्‍या नव्‍हत्‍या असे नमुद केले आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांना वकीला मार्फत वारंवार नोटीस दिले असुन त्‍याला उत्‍तर दिल्‍याचा कोणताही दस्‍तावेज गैरअर्जदारांनी दाखल केलेला नाही. यावरुन तक्रारकर्त्‍याने नोटीस दिल्‍यानंतरच गैरअर्जदारांनी विमा दावा निकाली काढण्‍याकरीता कारवाई केली. तसेच हेतुपूरस्‍सर तक्रारकर्त्‍याचा विमा दावा No Claim म्‍हणून नाकारल्‍याचे मंचाचे मत आहे.
            ग्राहकांनी दिलेल्‍या नोटीसला उत्‍तर न देणे व त्‍यांना सेवा योग्‍य रितीने न पुरवीणे ही गैरअर्जदारांचे सेवेतील त्रुटी असल्‍याचे मंचाचे मत आहे.
 
11.          गैरअर्जदारांचे वकीलांनी तक्रारकर्त्‍यास पॉलिसी सोबत अटी व शर्ती पुरविल्‍या होत्‍या असे म्‍हटले आहे, परंतु सदर बाब सिध्‍द करणारा कोणताही दस्‍तावेज त्‍यांनी मंचासमक्ष दाखल केलेला नाही. त्‍यामुळे गैरअर्जदारानी पॉलिसी देत असतांना तक्रारकर्त्‍याला अटी व शर्ती दिल्‍या होत्‍या ही बाब सिध्‍द होत नाही.
12.         गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा IMT 47 अंतर्गत नाकारल्‍याचे म्‍हटले आहे, परंतु IMT 47 मध्‍ये MOBILE CRANES/DRILLING RIGS/MOBILE PLANTS/EXCAVATORS/NAVVIES/SHOVELS/GRABS/RIPPERSइत्‍यादींचा समावेश आहे. यामध्‍ये टिप्‍परचा समावेश नाही, गैरअर्जदारानी टिप्‍पर हे EXCAVATORSमध्‍ये मोडत असल्‍याचे म्‍हटले आहे. EXCAVATORSचा अर्थटिप्‍पर हाच निघतो ही बाब स्‍पष्‍ट करणारा कोणताही दस्‍तावेज दाखल केला नाही व टिप्‍परचा उल्‍लेख IMT 47 मध्‍ये नाही. तसेच पॉलिसीमध्‍ये त्‍यातील अट क्र.10 मध्‍ये By Land Sliding, Rock Sliding चा उल्‍लेख आहे व सदर वाहनाला अपघात हा माती घसरल्‍यामुळे झाला ही बाब सुध्‍दा गैरअर्जदारानेच दाखल केलेल्‍या निरीक्षण अहवालावरुन स्‍पष्‍ट होत असल्‍यामुळे गैरअर्जदारांची विमा दावा नाकारण्‍याची क्रीया योग्‍य नसुन बेकायदेशिर आहे व सेवेतील त्रुटी असल्‍याचे मंचाचे मत आहे.
13.         तक्रारकर्त्‍याने आपल्‍या तक्रारीमध्‍ये दावा निकाली काढण्‍याकरता विमा नियामक आयोगाच्‍या नियमांचे उल्‍लंघन केल्‍याचे म्‍हटले आहे. तकारकर्त्‍याचे वाहनाला अपघात हा दि.06.05.2009 रोजी झाला व अंतिम सर्वे दि.29.05.2009 रोजी केले व विमा दावा नाकारल्‍याबद्दल दि.16.02.2010 रोजी कळविण्‍यांत आले यावरुन गैरअर्जदारांनी विमा दावा निकाली काढत असतांना विमा नियामक आयोगाने घालून दिलेल्‍या नियमांचे उल्‍लंघन केल्‍याचे स्‍पष्‍ट होते.
14.         तक्रारकर्त्‍याने तक्रारीमध्‍ये मानसिक व शारीरिक त्रासाकरीता रु.50,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्‍तव वाटत असल्‍यामुळे तक्रारकर्ता हा रु.15,000/- मिळण्‍यांस पात्र ठरतो. तसेच तक्रारीचा खर्चाचे रु.3,000/- मिळण्‍यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे.
            प्रस्‍तुत प्रकरणात दाखल दस्‍तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्‍कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करण्‍यांत येते.
 
            -// अं ति म आ दे श //-
 
1.     तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदारांना आदेश देण्‍यांत येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे वाहनाच्‍या दुरुस्‍तीचा पूर्ण खर्च रु.91,450/- तक्रार दाखल केल्‍याचा दिनांक 03.05.2010 पासुन       द.सा.द.शे.9% व्‍याजासह द्यावा. सदर रक्‍कम आदेश प्राप्‍त झाल्‍यापासुन 30      दिवसात न दिल्‍यास त्‍यावर दंडनिय व्‍याज द.सा.द.शे.12% देय राहील.
3.    गैरअर्जदारांना आदेश देण्‍यांत येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला शारीरिक व मानसिक      त्रासाकरीता रु.15,000/- व तकारीच्‍या खर्चाचे रु.3,000/- अदा करावे.
 
 
 
            (मिलींद केदार)                         (विजयसिंह राणे)
               सदस्‍य                                अध्‍यक्ष
     
 
 
 
 
 
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT