Maharashtra

Nagpur

CC/12/100

M/s. Mal Construction Engineer And Contractor, Through Partner/Manager - Complainant(s)

Versus

New India Assurance Co.Ltd., Through Divisional Manager - Opp.Party(s)

Adv. P.D.Naukerkar

06 Feb 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/12/100
 
1. M/s. Mal Construction Engineer And Contractor, Through Partner/Manager
Suryakiran Building Block No. 305/6, 3rd floor, Bajaj Nagar,
Nagpur 440 010
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. New India Assurance Co.Ltd., Through Divisional Manager
Divisional Office- Dr. Baba saheb Ambedkar Bhawan, 4th floor, Seminary Hills,
Nagpur 440 001
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
For the Complainant:Adv. P.D.Naukerkar , Advocate
For the Opp. Party: Adv.C.B.Pande, Advocate
ORDER
  • आ दे श

(पारित दिनांक – 06 फेब्रुवारी, 2015)

               

श्री. मनोहर चिलबुले, मा. अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये.

1.               तक्रारकर्त्‍याने श्री भगवान बजरंग कहार  या कामगाराचे अपघाती मृत्‍यूबाबत दिलेल्‍या  नुकसान भरपाईची  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडून प्रतिपुर्ती मिळावी व इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी  प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 अन्‍वये  दाखल केली आहे.

 

                  तक्रारकर्त्‍याचे तक्रारीचा थोडक्‍यात आशय असा की,       तक्रारकर्त्‍याचा बांधकाम व्‍यवसाय आहे. तक्रारकर्त्‍याने सहारा सिटी येथे नऊ ते दहा मजली इमारतींच्‍या बांधकामाचे कंत्राट घेतले होते व सदर बांधकामासाठी आवश्‍यक मजूर नियुक्‍त केले होते. कामगारांना कामावर असतांना अपघात झाला व त्‍यांत त्‍यांना अपंगत्‍व आले किंवा मृत्‍यू झाला तर कामगार कायद्याप्रमाणे द्याव्‍या लागलेल्‍या नुकसान भरपाईची प्रतिपुर्ती मिळावी, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने वि.प. विमा कंपनीकडे कामगार नुकसान भरपाई पॉलीसी क्र.160200/36/09/01/00000/212 अन्‍वये दि.26.02.2010 ते 25.02.2011 या कालावधीसाठी रु.26,472/- प्रिमियम देऊन कामगारांचा विमा काढला होता.  कामगार कायद्यांतर्गत कलम-4 नुसार नुकसान भरपाई देण्‍याची जबाबदारी तक्रारकर्त्‍याची आहे व ती नुकसान भरपाईची रक्‍कम परत करण्‍याची जोखीम वि.प.विमा कंपनीने विम्‍याव्‍दारे स्विकारली होती.

 

                  दि.12.03.2010 रोजी तक्रारकर्त्‍याचा कामगार भगवान बजरंग काहार हा बांधकाम मिस्त्री म्‍हणून सहारा सिटी येथे इमारत क्र. सी-7 येथे 9 व्‍या मजल्‍यावर स्‍लॅबची ढलाईचे  काम करीत होता.  त्‍यादिवशी अधूनमधुन पाऊस येत होता व दिवसभराच्‍या कामाने थकल्‍यामुळे भगवान  बजरंग कहार याने सायंकाळी सुट्टी मागितली व तो आपल्‍या घरी जाण्‍याकरीता निघतांना लघवीला जात असता पाय घसरुन इमारतीच्‍या खाली पडला व मरण पावला. तो नेमका किती वाजता पडला हे कोणालाही माहित नाही. दुस-या दिवशी दि.13.03.2010 रोजी सी-7 इमारतीच्‍या मागील बाजूला त्‍याचे प्रेत पडलेले आढळून आले, तेंव्‍हाच तो इमारतीवरुन पाय घसरुन पडल्‍याचे समजले. प्रेत मिळाले तेंव्‍हा बजरंग कहार याच्‍या अंगावर कामाचे वेळी घातलेला सदरा आणि पायात गम बुटसुध्‍दा होते, यावरुन सदर कामगाराचा मृत्‍यू तो कामावरुन घरी परतत असतांना कामाचे ठिकाणी  झाला हे स्‍पष्‍ट होते व म्‍हणून सदर अपघात हा कामगार अपघात नुकसान भरपाई कायद्याच्‍या कलम 3 अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र ठरतो.

                  अपघाताबाबतची सुचना लगेच हिंगणा पोलीस स्‍टेशनला आणि वि.प. विमा कंपनीला देण्‍यांत आली. आवश्‍यक सर्व दस्‍तावेजांसह विमा प्रपत्र भरुन वि.प.कडे देण्‍यांत आले. दि.18.05.2010 रोजी  कामगार आयुक्‍त यांचे कार्यालयात तक्रारकर्त्‍याने कलम-4 अनुसार नुकसान भरपाईची रक्‍कम रु.3,63,576/- पावती क्र.1581 नुसार जमा केली व  किरकोळ अर्ज–डब्‍ल्‍यु.सी.ए.क्रं-ए-37/2010 मधील न्‍यायालयीन आदेशानुसार सदर रक्‍कम दि.05.08.2010 रोजी मयत कामगार भगवान बजरंग काहार यांचे अवलंबितांना  वाटप करण्‍यात आली.

                  तक्रारकर्त्‍याने कामगार आयुक्‍त कार्यालयात जमा केलेल्‍या अपघात नुकसान भरपाई रकमेची प्रतिपुर्ती मिळावी, म्‍हणून वि.प.विमा कंपनी कडे विनंती केली. दि.17.05.2010 रोजीच्‍या पत्राप्रमाणे वि.प.ने तक्रारकर्त्‍यास कांही दस्‍तावेजांची मागणी केली व ते सर्व कागदपत्र तक्रारकर्त्‍याने वि.प.ला पुरविले. परंतु वि.प.विमा कंपनीने दि.01.12.2010  रोजीचे पत्रान्‍वये तक्रारकर्त्‍यास कळविले कि, भगवान बजरंग काहार यांचा अपघाती मृत्‍यू प्रत्‍यक्ष कामावर नसतांना झाला असल्‍यामुळे व त्‍याचा अपघाती मृत्‍यू झाला तेंव्‍हा त्‍याचे काम संपलेले होते, म्‍हणून तक्रारकर्ता अपघात नुकसान भरपाई रकमेची प्रतिपुर्ती मिळण्‍यास पात्र नाही.

तक्रारकर्त्‍याने आपल्‍या तक्रारीत कामगार नुकसान भरपाई कायदा कलम-3 (1) ची  तरतुद उदघृत केली आहे ती खालीलप्रमाणे -

 

“3(1)- If personal Injury is caused to (an employee)by accident arising ourt of and  in the cours4e of his employment, his employer shall be liable to pay Compensation in accordance with the provisions of this Chapter.”

 

सदरचे तरतुदीप्रमाणे जर कामगाराला कामावर असतांना अपघात झाल्‍यास नुकसान भरपाईस पात्र ठरतो. कामगार अपघात नुकसान भरपाई कायद्याच्‍या तरतुदीनुसार कामगार कामावर आल्‍यापासून घरी जाईपर्यंत कामावरच असतो व म्‍हणून कामावरुन घरी जाईपर्यंत अपघात होऊन मृत्‍यू झाल्‍यास (During the Course of Employment) अपघात कामगार नुकसान भरपाई कायद्याच्‍या कलम 3(1) अंतर्गत नुकसान भरपाईस पात्र ठरतो.  तक्रारकर्त्‍याने भगवान बजरंग काहार याच्‍या मृत्‍युबाबत दिलेल्‍या नुकसान भरपाईच्‍या रकमेबाबत प्रतिपुर्तीचा विमा दावा नामंजूर करण्‍याची वि.प.ची कृती ही सेवेतील न्‍युनता आणि अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.

1) तक्रारकर्त्‍याने भगवान बजरंग काहार याच्‍या अपघाती मृत्‍यूबाबत भरणा केलेली कामगार अपघात नुकसान भरपाईची रक्‍कम रु.3,63,576/- दि.18.10.2010 पासून प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे 12 टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्त्‍यास देण्‍याचा वि.प.विरुध्‍द आदेश व्‍हावा.

2) तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या मानसिक, आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रु.50,000/- देण्‍याचा वि.प. विरुध्‍द आदेश व्‍हावा.

3) तक्रारीचा खर्च रु.20,000/- देण्‍याचा  वि.प. विमा कंपनी विरुध्‍द आदेश व्‍हावा.

तक्रारकर्त्‍याने तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ इंशूरंस पॉलिसी, दावा सादर केल्‍याचे अर्ज, क्‍लेम फॉर्म, इंशूरंस कंपनीला दिलेली पत्रे, इंशूरंस कंपनीच्‍या पत्राचे उत्‍तर, केमिकल्‍स एनालिसीस रीपोर्ट, कोर्टात पैसे भरल्‍याची पावती, फॉर्म ‘ए’, आकस्‍मीक मृत्‍यु खबर, आकस्‍मीक मृत्‍यु समरी, घटनास्‍थळ पंचनामा, मरणोन्‍वेषण प्रतिवृत्‍त, शववि‍च्‍छेदन अहवाल, मृत्‍यु प्रमाणपत्र, कायदेशीर नोटीसची प्रत, डाकची रसिद व पोचपावती इ. दस्‍तऐवज दाखल केले आहेत.

 

2.                विरुध्‍द पक्ष न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी यांनी लेखी जबाबाव्‍दारे तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे. वि.प.विमा कंपनीने त्‍यांचे लेखी जबाबात   तक्रारकर्त्‍याने कामगार नुकसान भरपाई  विमा पॉलिसी काढल्‍याची बाब मान्‍य केली आहे. मात्र सदरची विमा पॉलीसी व्‍यावसायिक व्‍यवहारातील दायीत्‍व करारपुर्तीसाठी घेतली असल्‍याने तक्रारकर्ता ग्राहक संरक्षण अधिनियमाचे तरतुदीप्रमाणे ‘’ग्राहक’’ या परीभाषेत येत नाही व म्‍हणून सदर तक्रार ग्राहक तक्रार नसल्‍याने ती दाखल करुन घेण्‍याची व त्‍यावर निर्णय देण्‍याची मंचाला अधिकारकक्षा नसल्‍याने तक्रार खारीज होण्‍यास पात्र असल्‍याचा प्राथमिक आक्षेप घेतला आहे.

 

                  वि.प.चे  पुढे म्‍हणणे असे कि, तक्रारकर्त्‍याचा दावा विमापत्रातील शर्ती व अटी प्रमाणे देय नाही, म्‍हणून दि.01.12.2010 चे पत्रान्‍वये “The accident has not occurred during the course of employment i.e. accident has not occurred while the deceased workman was working as a meason, as he had already left the duties.”  असे कारण देवून नामंजूर केला आहे.

                  वि.प.चे म्‍हणणे असे कि, मृतक कामगार काम पूर्ण झाल्‍यावर कामावरुन घरी जाण्‍याच्‍या वेळेस कोणताही अपघात झाला असेल तर असा अपघात कामगार नुकसान भरपाई कायद्याच्‍या कलम  3 (1) प्रमाणे “during the course of employment  and arising out of employment” होत नसल्‍यामुळे कामगार नुकसान भरपाई कायदा 1923 च्‍या तरतुदींप्रमाणे नुकसान भरपाई देण्‍याची जबाबदारी मालकाची नाही व ती त्‍याने दिली असेल तर त्‍याची प्रतिपुर्ती देण्‍यास विमा कंपनी जबाबदार नाही. त्‍यामुळे सदरची बाब सेवेतील न्‍युनता किंवा अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब ठरत नसल्‍याने तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.               

3.                तक्रारकर्ता व  वि.प. यांच्‍या परस्‍पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यांत आले.  त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष आणि त्‍याबाबतची कारणमिमांसा  खालीलप्रमाणे.

 

              मुद्दा                                           निष्‍कर्ष

 1)   ग्राहक संरक्षण अधिनियमाचे तरतुदीप्रमाणे तक्रारकर्ता

      वि.प.चा ग्राहक आहे काय?                                होय.

2)   वि.प.ने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारुन

      सेवेत न्‍युनतापूर्ण  व्‍यवहार केला आहे काय?                        होय.

 3)  तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यास पात्र आहे काय?         अंशतः.

 4)   अंतिम  आदेश काय ?                          तक्रार अंशतः मंजूर.

 - कारण मिमांसा -

4.                मु्द्दा क्र. 1 बाबत - सदरच्‍या प्रकरणातील तक्रारकर्ता बांधकाम व्‍यवसायी आहे व त्‍याने कामगार नुकसान भरपाई अधिनियम कायदा 1923 च्‍या तरतुदीप्रमाणे कामावरील कामगारास अपघात झाला तर त्‍यापोटी द्याव्‍या लागणा-या नुकसान भरपाईची प्रतिपुर्ती मिळावी, म्‍हणून त्‍याने वि.प.कडून  EMPLOYEE’s compensation insurance policy विमा पॉलीसी घेतली आहे. सदरची पॉलीसी कामगाराच्‍या अपघातामुळे तक्रारकर्त्‍यावर येणा-या कायदेशिर दायित्‍वापासून संरक्षण मिळविण्‍यासाठी असून त्‍यापासून   तक्रारकर्त्‍यास व्‍यवसायात कोणताही नफा मिळत नाही, म्‍हणून सदर पॉलीसी ही नफा मिळविण्‍याचे किंवा व्‍यवसायाचे  साधन म्‍हणून घेतलेली नसल्‍याने तक्रारकर्ता ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 2(1)(d) च्‍या परिभाषेप्रमाणे विमा कंपनीचा ग्राहक ठरतो. 2013 (1) CPR 221 (NC),  R.R. International vs. New India Assurance Co.  म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.

 

5.                मु्द्दा क्र. 2 व 3 बाबत - तक्रारकर्त्‍याने वि.प.कडून EMPLOYEE’s compensation insurance policy क्र.160200/36/09/01/00000/212 दि.26.02.2010 ते 25.02.2011 या कालावधीसाठी रु.26,472/- प्रिमियम देऊन घेतली होती व सदर पॉलीसी कालावधीत 12.03.010 रोजी तक्रारकर्त्‍याचा कामगार  भगवान  बजरंग कहार सायंकाळी सुट्टी मागून घरी जाण्‍याकरीता निघतांना लघवीला जात असता पाय घसरुन इमारतीच्‍या खाली पडला व मरण पावला. दुस-या दिवशी दि.13.03.2010 रोजी सी-7 इमारतीच्‍या मागील बाजूला त्‍याचे प्रेत पडलेले आढून आले, तेंव्‍हाच तो इमारतीवरुन पाय घसरुन पडल्‍याचे समजल्‍यामुळे हिंगणा पोलीस स्‍टेशनला माहिती देण्‍यांत आली. त्‍यावरुन पो.स्‍टे.मध्‍ये आकस्मिक मृत्‍यूची नोंद क्र. 18/10 कलम 174 फौ.प्र.सं. अन्‍वये घेण्‍यांत आली. त्‍याची प्रत तक्रारकर्त्‍याने दस्‍त क्र. 12 वर दाखल केली आहे. घटनास्‍थळ पंचनामा दस्‍त क्र.14 वर आणि मरणान्‍वेषण प्रतिवृत्‍त दस्‍त क्र. 15 वर आहे. वरील सर्व दस्‍तावेजांत मृतक भगवान बजरंग कहार याचे प्रेत सहारा सिटी  गवसी मानापूर येथील ईमारत क्र. सी-7 च्‍या बनत असलेल्‍या लिफ्ट आणि बाथरुमच्‍या मध्‍ये असलेल्‍या 14 x 14  फुट लांबी रुंदीच्‍या पोकळ भागात जमीनीवर उबडया स्थितीत पडलेले असून मृतकाचे अंगावर गडद निळया रंगाचे हॉफ बाहयाचे गळयाची टी शर्ट आणि निळया रंगाचा फुलपँट आणि दोन्‍ही पायात लॉंग गम बुट जे सिमेंटनी भरलेले आहेत असल्‍याचे दिसत असल्‍याचे नमुद आहे. ही माहिती वि.प. विमा कंपनीला देण्‍यांत आली. आवश्‍यक सर्व दस्‍तावेजांसह विमा प्रपत्र भरुन वि.प.कडे देण्‍यांत आले. दि.18.05.2010 रोजी  कामगार आयुक्‍त यांचे कार्यालयात तक्रारकर्त्‍याने कलम-4 अनुसार नुकसान भरपाईची रक्‍कम रु.3,63,576/- पावती क्र.1581 नुसार जमा केली व  किरकोळ अर्ज–डब्‍ल्‍यु.सी.ए.क्रं-ए-37/2010 मधील न्‍यायालयीन आदेशानुसार सदर रक्‍कम दि.05.08.2010 रोजी मृतक कामगार भगवान बजरंग काहार यांचे अवलंबितांना  वाटप करण्‍यात आली.

                  दस्‍तऐवज क्र. 16 वर मृतकाचा शव विच्‍छेदन अहवाल तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली आहे. त्‍यात मृत्‍युचे कारण “Injury to vital organs.” असे नमूद केले आहे. वि.प.चे वकिलांनी आपल्‍या युक्‍तीवादात असे प्रतिपादन केले की, मृतकाच्‍या शव विच्‍छेदन अहवालात न पचलेले अन्‍न आढळून आले व त्‍यास मद्यार्कचा वास येत होता. यावरुन मृतक मृत्‍युचे वेळेस अंमली पदार्थाचे प्रभावाखाली असल्‍याचे दिसून येते व त्‍यामुळे त्‍याला विमा संरक्षण लाभ देता येणार नाही. याउलट, तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी आपल्‍या युक्‍तीवादात असे सांगितले की, शव विच्‍छेदनाचे वेळी विसेराला मद्यार्काचा वास येत होता असे नमूद असले तरीही त्‍याबाबत निश्चित असा कोणताही अहवाल वि.प.ने दाखल केलेला आहे. म्‍हणून मृतक कामगार हा अपघाताच्‍यावेळी मद्यार्काच्‍या अंमलाखाली होता हे सिध्‍द होत नाही.

                  वरील सर्व दस्‍तऐवजावरुन हे स्‍पष्‍ट आहे की, मृतक कामगार भगवान बजरंग काहार 12.03.2010 रोजी तक्रारकर्त्‍याकडे बांधकाम मजूर म्‍हणून सहारा सिटी येथे चालू असलेल्‍या बांधकामावर कार्यरत होते आणि काम संपल्‍यानंतर सायंकाळी सुट्टी मागून घरी जात असतांना बांधकामाच्‍या ठिकाणीच लघवीस गेला असतांना पाय घसरल्‍याने पडला आणि त्‍यांचा मृत्‍यु झाला. तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी आपल्‍या युक्‍तीवादास असे सांगितले की, कामगार कामावर आल्‍यापासून घरी जाईपर्यंत जर अपघात झाला तर सदर अपघात हा कामगार नुकसान भरपाई अधिनियम 1923 च्‍या कलम 3 (1) प्रमाणे “during the course of employment  and arising out of employment”  ठरतो आणि म्‍हणून सदर कामगाराचा मालक म्‍हणून त्‍याबाबत नुकसान भरपाई देण्‍याची प्राथमिक जबाबदारी तक्रारकर्त्‍याची होती व त्‍याप्रमाणे त्‍यांनी कामगार न्‍यायालयाच्‍या आदेशाप्रमाणे दि.18.05.2010 रोजी रु.3,63,576/- आयुक्‍त, कामगार नुकसान भरपाई नागपूर यांचेकडे पावती क्र. 1581 प्रमाणे जमा केले आहे. सदर पावती दस्‍तऐवज क्र. 10 प्रमाणे दाखल केली आहे. तसेच सदर रक्‍कम जमा केली असल्‍याबाबतचे पत्र दस्‍तऐवज क्र. 11 वर दाखल केले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने वि.प.कडे काढलेल्‍या पॉलिसीनुसार तक्रारकर्ता सदर रकमेची प्रतिपूर्ती मिळण्‍यास पात्र आहे. तक्रारकर्त्‍याने वि.प.कडे विमा दावा सादर केला. तो वि.प.ने दि.01 डिसेंबर, 2010 च्‍या पत्रांन्‍वये खालील कारण देऊन नामंजूर केला. सदर पत्र दस्‍तऐवज क्र. 6 वर दाखल केले आहे. 

“The accident has not occurred during the course of employment i.e. accident has not occurred while the deceased workman was working as a meason, as he had already left the duties.”

 

वि.प.ची सदर कृती ही बेकायदेशीर असून विमा ग्राहकांप्रती सेवेतील न्‍यूनता आहे.

आपल्‍या युक्‍तीवादाचे पुष्‍टयर्थ तक्रारकर्त्‍याच्‍या अधिवक्‍त्यांनी खालील न्‍यायनिर्णयांचा दाखला दिला आहे.

1)    AIR 1964 Supreme Court 193, General Manager BEST Undertaking Vs. Mrs. Agnes

सदरच्‍या प्रकरणात मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने खालीलप्रमाणे अभिप्राय व्‍यक्‍त केला आहे.

“Driver meeting with accident while going home from depot, Accident held occurred during the course of employment.”

 

2)         2006 (110) FLR 989, Madhya Pradesh High Court, NTPC/VSTPP, Vindhya Nagar, Sidhi  vs. Smt Rajwati Panika & anr.

सदर प्रकरणात मा. उच्‍च न्‍यायालयाने खालीलप्रमाणे अभिप्राय व्‍यक्‍त केला आहे.

“(i)   Accident had taken place in premises of employer.

 (ii)  Accident occurred in course of employment; and (iii) the inference drawn by the Commissioner as regards the death of the workman is well founded. The inference so drawn really cannot be found fault with. If the liberate construction of pleadings is accepted the concept of pith and substance and understanding of the pleadings is understood and the purposive facet of the statute is appreciated, we are disposed to think that the basic spectrum of the Tribunal cannot be regard as perverse to attract the basic spectrum of substantial question of law as engrafted under section 30 of the Act warranting interference by this Court.”

 

3)         2004 II CLR 923 Karnataka High Court, Branch Manager, New India Assurance Co.Ltd. Daganagere  vs. Siddhappa & ors.

सदर प्रकरणात मा. उच्‍च न्‍यायालयाने खालीलप्रमाणे अभिप्राय व्‍यक्‍त केला आहे.

 

“Workman engaged in work in factory during night, going out to answer call of nature, accidentally fell into well within factory compound while attempting to draw water from. Death due to drowning.  An accident arising out of and in course of employment. Employer is liable to pay compensation u/s 3 (1), 30 of Workmen’s Compensation Act 1933 “

 

4)         2007 (115) FLR 266, Orissa High Court,  Divisional Manager, M/s. Oriental Insurance Co.Ltd.  vs. Subhashchandra Swain & anr.

सदर प्रकरणात मा. उच्‍च न्‍यायालयाने खालीलप्रमाणे अभिप्राय व्‍यक्‍त केला आहे.

8.         In the instant case the workman was engaged by his master to look after the repairing work and after discharging his duty while the workman was returning the accident took place. Therefore, the decision in Francis De Costa dies not apply to the facts of the present case.

 

9.         The aforesaid concept of “in the course of  and arising out of employment” has been very elaborately discussed by the Hon’ble Supreme Court in the judgement in Mackinnon Mackenzie and Co. (P) Ltd. V. Ibrahim Mahammed Issak”. The relevant observations by Justice Ramaswami, as His Lordship then was, while speaking for three Judge Bench of the Supreme Court, are as follows:

 

            “…The words ‘arising out of employment’ are understood to mean that ‘during the course of the employment, injury has resulted from some risk incidental to the duties of the service, which, unless engaged in the duty owing to the master, it is reasonable to believe the workman would not otherwise have suffered’. In other words, there must be a casual relationship between the accident and the employment. The expression ‘arising out of employment’ is again not confined to the mere nature of the employment. The expression applies to employment as such to its nature, its conditions, its obligations and its incidents. If by reason of any of those factors the workman is brought within the zone of special danger the injury would be one which arises “out of employment”. To put if differently if the accident had occurred on account of a risk which is an incident of the employment, the claim for compensation, must succeed, unless of course the workman has exposed himself to an added peril by his own imprudent act…” The aforesaid decision in Mackmom Mackensie’s case has also been followed by the Hon’ble Supreme Court in (2001) 9 SCC 395;(1995) Supp.(2) SCC 601 and (1991) 3 SCC 530.

 

10.       Apart from that there are judgements to the effect that when a workman is coming back after discharging his duties and has met with an accident, in such a case the accident has been construed to be covered within the sweep of expression of arising out of employment’. Reference in this connection be made to a Division Bench decision of the Calcutta High Court in the case of Naima Bibi v. Lodhne Colliery Co., (1920) Ltd. In that case the workman died as a result of assault sustained by him while going home after completion of duty. Of course the attack on the workman was inflicted in the factory premises while he was going after discharging his duties. The learned Judges held that such injuries are included within the expression ‘arising out of employment’. Same view has been expressed by Justice G.L.Oza, as His Lordship then was, in the case of E.S.I. Corporation, Indore v. Babulal and others. In that case also the workman was returning after his duty was over.”   

 

याऊलट वि.प.च्‍या अधिवक्‍त्यांनी आपल्या युक्‍तीवादात असे सांगितले की, तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तऐजांवरुन दि.12.03.2010 रोजी मृतक कामगार भगवान काहार हा आपले काम आटोपून सुट्टी मागून घरी जाण्‍यास निघाला असतांना लघवीला गेला आणि पाय घसरुन पडल्‍याने झालेल्‍या अपघातात मरण पावला. सदर अपघाताचा आणि बांधकाम मिस्‍त्री म्‍हणून असलेल्‍या मृतकाच्‍या कामाचा अर्थाअर्थी कोणताही संबंध नाही व म्‍हणून सदरचा अपघात हा वर्कमेन्‍स कंपंसेंशन ऍक्‍टचे कलम 3 (1) चे तरतूदीप्रमाणे “during the course of employment  and arising out of employment”  यात येत नाही व म्‍हणून अशा अपघाताबाबत नुकसान भरपाई देण्‍याची कायदेशीर जबाबदारी मालकावर नाही. सदरच्‍या प्रकरणात जरीही तक्रारकर्त्‍याने कामगार आयुक्‍ताकडे मृतक कामगाराचे वारसांनांना देण्‍यासाठी नुकसान भरपाईची रक्‍कम रु.3,63,576/- जमा केली असली तरीही अशी रक्‍कम जमा करण्‍यासाठी त्‍याच्‍यावर कोणतेही कायदेशीर दायित्‍व नव्‍हते. म्‍हणून कायदेशीर दायित्‍व नसलेल्‍या रकमेची प्रतिपूर्ती करण्‍यासाठी वि.प. विमा कंपनी जबाबदार नाही आणि अशी प्रतिपूर्ती केली नाही म्‍हणून विमा ग्राहकाप्रती वि.प.ने सेवेत कोणताही न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केलेला नाही.

                  कामगार क्षतीपूर्ती अधिनियम 1923 च्‍या कलम-3 (1) प्रमाणे मालक कामगारास क्षतीपूर्ती देण्‍यास केंव्‍हा जबाबदार असेल याबाबतची तरतुद खालीलप्रमाणे आहे-

3.        Employer’s liability for compensation

   (1)   If personal injury is caused to (an employee) by accident arising

             out  of and in the course of his employment, his employer shall

             be liable to pay compensation in accordance with the provisions

             of  this Chapter :

 

वरील तरतूदीप्रमाणे in the course of  employment जर अपघात झाला असेल तर सदर अपघाताबाबत नुकसान भरपाई देण्‍यास मालक जबाबदार आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या अधिवक्‍त्याने दाखल केलेल्‍या न्‍यायनिर्णयाप्रमाणे मृतक कामगार त्‍याचे काम आटोपून घरी जात असतांना तक्रारकर्त्‍याचे कंत्राटी बांधकाम सुरु होते, त्‍याच ठिकाणी अपघात होऊन मरण पावलेल्‍या कामगाराच्‍या वारसांनाना नुकसान भरपाई देण्‍याची जबाबदारी मालकाची ठरते. सदरच्‍या प्रकरणात तक्रारकर्त्‍याने कायद्याच्‍या वरील तरतुदीप्रमाणे कामगार आयुक्‍तांकडे रु.3,63,576/- इतकी नुकसान भरपाईची रक्‍कम भरली असून त्‍याबाबत वि.प.कडे विमा काढलेला असतांना तक्रारकर्त्‍याचा मृतक कामगार हा प्रत्‍यक्ष कामावर असतांना मरण पावला नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर करण्‍याची विमा कंपनीची कृती ही विमा ग्राहक असलेल्‍या तक्रारदाराप्रती अनुसरलेली सेवेतील न्‍युनता व अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब आहे.

 

                  वरीलप्रमाणे कामगार क्षतीपुर्ती कायद्याच्‍या तरतुदींप्रमाणे तक्रारकर्त्‍याने मृतक कामगाराच्‍या अपघाती निधनाबाबत कामगार नुकसान भरपाई आयुक्‍त यांच्‍याकडे जमा केलेली रक्‍कम रु.3,63,576/- विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारल्‍याच्‍या दि.01 डिसेंबर, 2010 पासून प्रत्‍यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे.9% व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहे.

                  याशिवाय तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाबाबत रु.10,000/- नुकसान भरपाई आणि तक्रार खर्चाबद्दल रु.5000/- मंजूर करणे योग्‍य होईल. म्‍हणून मुद्दा क्र. 2 व 3  वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविले आहेत.

   वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

               - आदेश -

 

1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2)    विरुध्‍दपक्ष  विमा कंपनीने तक्रारकर्त्‍यास कामगार अधिनियमांतर्गत श्री भगवान         बजरंग काहार या कामगाराचे अपघातासंबधाने विमा दावा रक्‍कम रु.3,63,576/-    विमा दावा नाकारल्‍याचा दि.01 डिसेंबर, 2010 पासून द.सा.द.शे.9% दराने व्‍याजासह

      द्यावी.

3)    वि. प. विमा कंपनीने, तक्रारकर्त्‍यास मानसिक व शारिरीक नुकसान भरपाईबाबत       रु.10,000/- व तक्रार खर्चाबाबत रु.5000/- द्यावे.

4)    सदर आदेशाचे पालन वि.प. विमा कंपनीने सदर आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30   दिवसांचे आत करावे.

5)    आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात यावी.

6)    तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.