Maharashtra

Nagpur

CC/10/693

Shri Tribhuvandas Sarvadin Yadav and other - Complainant(s)

Versus

New India Assurance Co.Ltd. and others Through Branch Manager - Opp.Party(s)

Adv. N.K. Ambilwade

17 May 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/693
 
1. Shri Tribhuvandas Sarvadin Yadav and other
Yadav Pan Bhandara, Near Hanuman Mandir, Telangkhedi, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Shri Akbar Ali Khan
Dattawadi, Amravati Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. New India Assurance Co.Ltd. and others Through Branch Manager
MECL Building, Div. Office Dr. Babasaheb Ambedkar Bhavan, 4th floor, High Land Drive, Seminary Hills, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Branch Manager, Indian Bull Finanance Service Ltd.
F-1 and F-2, Indu-Yash-II, 186. Cement Road, Dharampeth Extn. Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

श्री नरेश बनसोड, सदस्‍य यांचे कथनांन्‍वये.
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 17/05/2012)
1.           सदर संयुक्‍त तक्रार तक्रारकर्त्‍याने ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत वि.प.विरुध्‍द दाखल करुन, मागणी केली की, विम्‍याची रक्‍कम रु.5,60,842/- 18 टक्‍के व्‍याजासह द्यावी व वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्‍यांना त्रास देऊ नये, मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.50,000/- व तक्रारीच्‍या खर्चाची मागणी केली.
2.          तक्रारकर्ते दहा चाकी वाहनाचे मालक असून त्‍याचा नोंदणी क्र. एम एच 31 ए पी 3224, चेसिस क्र. 426010 ईएक्‍स 2711317, इंजिन क्र. 20 डी 62223869 आहे. तक्रारकर्त्‍याने सदर वाहन इंडियन बुल्‍स फायनांशियल सर्विसेस लि./वि.प.क्र.2 यांचेकडून वित्‍त पुरवठा घेऊन खरेदी केला होता. तक्रारकर्ता कर्जाची परतफेड नियमितपणे वेळोवेळी करीत होता. सदर वाहनाचा विमा वि.प.क्र. 1 यांचेकडून काढला असून, पॉलिसी क्र. 160200/31/08/01/00000611 मध्‍ये असून पॉलिसी 17.05.2008 ते 16.05.2009 या कालावधीकरीता होता. त.क्र.1 नुसार त्‍याचे वाहन त्‍याने त्‍याचे मित्र अकबर खान वली निसार खान/त.क्र.2 यांना विकला होता. त्‍या दोन्‍ही तक्रारकर्त्‍यांमधील संबंध अत्‍यंत चांगले असल्‍यामुळे सदर वाहन त.क्र. 2 ला विकल्‍यानंतर त.क्र.1 वाहनाचे पैश्‍याची देवाण घेवाण त.क्र. 2 करीत होते. सदर वाहन जकात नाका अमरावती रोड वाडी येथून 17.01.2009 रोजी चोरी झाला, त्‍याची पोलिस स्‍टेशनला तक्रार नोंदविली. त्‍याचे मुळ कागदपत्रे तक्रारीसोबत जोडलेली आहेत. वाहन चोरीबाबत वि.प.क्र. 1 विमा कंपनीस ताबडतोब सुचना दिली होती. परंतू विमा कंपनीने तक्रारकर्त्‍यांना आजपर्यंत कोणतीही नुकसान भरपाई न देता 14.05.2010 ला लिहिलेल्‍या पत्रानुसार विमा पॉलिसी रद्द झाल्‍याचे कळविले होते. त.क्र. 1 ने वि.प.क्र. 2 यांना घटनेबाबत 16.06.2010 रोजी माहिती दिली. तक्रारकर्त्‍याने म्‍हटले की, वाहन चोरी गेल्‍यामुळे त.क्र.2 यांची उपजिविका पूर्णपणे वाहनाचे उत्‍पनावर निर्भर असल्‍यामुळे त.क्र. 1 व 2 यांना वित्‍त संस्‍थेचे कर्जाची परतफेड करण्‍याबाबत वि.प.क्र. 2 तगादा लावत असल्‍यामुळे मानसिक त्रास होत होता. तक्रारकर्ते वि.प.क्र. 1 चा पॉलिसीधारक असल्‍याने ग्राहक आहे. तक्रारकर्त्‍याने वेळोवेळी मागणी करुनसुध्‍दा वि.प.ने त्‍यास उत्‍तर दिले नाही, ही त्‍याच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे म्‍हटले. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत एकूण 5 दस्‍तऐवज दाखल केले, त्‍यामध्‍ये त.क्र.1 व 2 मध्‍ये झालेल्‍या कराराचे शपथपत्र, एफ आय आरची प्रत, विमा पॉलिसी, पॉलिसी फेटाळल्‍याचे पत्र व वित्‍त संस्‍थेला दिलेले पत्र अनुक्रमे पृष्‍ठ क्र. 6 ते 19 वर आहे.
 
2.          मंचाने सदर तक्रारीची नोटीस वि.प.ना पाठविली. वि.प.क्र. 1 चे म्‍हणणे खालीलप्रमाणे.
3.          वि.प.क्र. 1 ने म्‍हटले की, त.क्र.1 ने त.क्र. 2 ला वाहन विकल्‍याचे कागदपत्राद्वारे सिध्‍द झाले आहे व त.क्र. 1 ने त.क्र. 2 ला वाहन विकल्‍यामुळे दावा दाखल करण्‍याचा प्रश्‍न उद्भवत नाही व परिच्‍छेद क्र. 1 ते 4 मधील म्‍हणणे नाकारले. परिच्‍छेद क्र. 5 ते 11 च्‍या उत्‍तरात म्‍हटले की, तक्रारकर्त्‍याने वाहन विकल्‍यानंतर स्‍वतःच्‍या नावे वाहनाचा विमा घेतला नाही. त.क्र. 2 व वि.प.क्र. 1 यांच्‍यामध्‍ये विमा करार नसल्‍यामुळे विम्‍याची रक्‍कम प्राप्‍त करण्‍यास लायक नाही असे म्‍हटले व वि.प.क्र. 2 वि.प.क्र. 1 चे ग्राहक नसल्‍यामुळे दावा दाखल करण्‍याचा अधिकार नाही व इतर बाबी नाकारल्‍या. तसेच सदर तक्रार मंचासमोर चालविण्‍यायोग्‍य नसून तक्रारकर्त्‍याच्‍या मागण्‍या नाकारल्‍या. वि.प.क्र. 1 ने आपल्‍या विशेष बयानात मोटर वाहन कायदा कलम 157 – ब तसेच इंडियन मोटर टेरीफ कलम जी आर 17 प्रमाणे वाहनाची विक्री केल्‍यानंतर 14 दिवसाचे आत विमापत्र हे खरेदीदारांचे नावे स्‍थानांतरीत करण्‍याकरीता विक्री करणारा व खरेदीदार यांचेवर बंधनकारक आहे. परंतू दोघांनीही वाहन खरेदी व विक्रीनंतर वि.प.क्र. 1 ला सुचना दिली नाही व विमापत्र स्‍थानांतरीत करण्‍यास सांगितले नाही व विमा करार अस्थित्‍वात नाही. त.क्र. 1 ने वाहन विकल्‍यामुळे कोणताही संबंध वाहनाशी व वि.प.सोबत नाही. वाहन विक्रीनंतर जुन्‍या मालकाचे नावाने वाहनाचा विमा काढणे गैरकायदेशीर असून तक्रार चुकीच्‍या आधारावर मंचासमोर चालू शकत नाही. तक्रारकर्त्‍यांनी तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे वस्‍तूस्थिती शपथपत्रावर प्रतिउत्‍तरात विषद केले.
4.          मंचाने उभय पक्षांचा युक्‍तीवाद ऐकला व कागदपत्रांचे अवलोकन केले. वि.पक्र. 1 ने युक्‍तीवादा दरम्‍यान सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निकालपत्र दाखल केले.
 
5.          मंचाने वि.प.क्र. 2 ला पाठविलेला नोटीस “refused” म्‍हणून परत आल्‍याने वि.प.क्र. 2 विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित केला.
 
-निष्‍कर्ष-
 
6.          तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 2 कडून वित्‍त सहाय घेऊन वाहन खरेदी केल्‍याने व वि.प.क्र. 1 कडून सुरुवातीस उपरोक्‍त विमा पॉलिसी घेतल्‍याने त्‍यांचा तो ग्राहक ठरतो. त.क्र. 2 वाहन खरेदीदार यांचा प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्षरीत्‍या वि.प.क्र. 1 व 2 सोबत कुठलाही संबंध नाही, कारण तक्रारकर्ता क्र. 2 ने तक्रारकर्ता क्र. 1 तर्फे वाहन खरेदीनंतर सदर वाहनाचा विमा त्‍याचे नावाने स्‍थानांतरीत करण्‍याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. तसेच वि.प.क्र. 2 वित्‍त संस्‍थेला त.क्र. 1 ने 16.01.2009 ला उपरोक्‍त वाहनाची चोरी झाल्‍यानंतर तब्‍बल 18 महिन्‍यानंतर 16.06.2010 ला कळविल्‍याचे पृष्‍ठ क्र. 11 वरुन स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने सदर वाहन त.क्र.2 ला विकल्‍यानंतर, त्‍या वाहनावर तक्रारकर्ता क्र. 1 चा कुठल्‍याही प्रकारे इंशुरेबल इंटरेस्‍ट राहिलेला नाही, या विरुध्‍द पक्षाच्‍या म्‍हणण्‍याशी मंच सहमत आहे. तसेच वाहनाचा ताबा त.क्र. 1 ने त.क्र.2 ला दिल्‍यानंतर त्‍याचा वाहनाशी संबंध राहत नाही. तसेच वाहन विक्रीनंतर खरेदीदाराने जुन्‍या मालकाचे नावाने विमा काढणे बेकायदेशीर आहे हे वि.प.चे म्‍हणणे मंचास संयुक्‍तीक वाटते. सदर वाहन हे 16.01.2009 ला चोरी गेलेले होते हे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होते. पुन्‍हा प्रश्‍न उपस्थित होतो की, वाहन चोरी गेल्‍यानंतर त.क्र. 2 ने 5 दिवसाचे विलंबाने 21.01.2009 ला एफ आय आर दाखल केली होती हे पृ.क्र.10 वरुन स्‍पष्‍ट होते. परंतू त.क्र. 2 ने एफ आय आर पाच दिवसाचे विलंबाने का दाखल केली, त्‍याची कारणमिमांसा तक्रारीत केली नाही. जेव्‍हा की, वाहन चोरी झाल्‍याबद्दल लगेच सुचना देणे बंधनकारक होते. वि.प.ने 14.05.2010 च्‍या पत्रांन्‍वये तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारला व त्‍यात त्‍यांनी स्‍पष्‍ट केले की, सदर वाहन हे त.क्र. 1 ने त.क्र. 2 ला विक्री केले व त्‍याचा ताबा दिला, हे सिध्‍द झाले असूनसुध्‍दा वि.प.क्र. 2 चे नावाने वाहन स्‍थानांतरीत केले नाही. तसेच त.क्र. 1 चा वि.प.क्र. 1 सोबत कुठलाही पॉलिसी करार नाही, त.क्र. 2 चा वि.प.क्र. 1 सोबत विमा करार अस्थित्‍वात न आल्‍यामुळे व त्‍या दोघांचा इंशुरेबल इंटरेस्‍ट नाही. त्‍यामुळे त्‍याबाबत वि.प.क्र. 1 ने 14.05.2010 च्‍या पत्राद्वारे दावा नाकारण्‍याची कारणे विषद केली. वि.पक्र. 1 ने आपले म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ सर्वोच्‍च न्‍यायालयाचे व राष्‍ट्रीय आयोगाचे खालील निकालपत्रास आधारभूत मानले.
 
1) Supreme Court of India 1996 ACJ 65 Complete Insulations (P) Ltd. Vs. The New India Assurance Co. Ltd.
2) Supreme Court of India 1999 (II) TAC 244 (SC) G Govindan Vs. The New India Assurance Co. Ltd.
3) National Commission R.P.4387 of 2009 decided on 11/03/2010 The New India Assurance Co. Ltd. Vs. Chandrakant Bhujangrao Jogdand
 
उपरोक्‍त तिनही निकालपत्रातील वस्‍तूस्थिती व सदर तक्रारीतील वस्‍तूस्थितीत साम्‍य असल्‍यामुळे सदर निकालपत्रे या तक्रारीस लागू आहेत व निकालपत्रात प्रमाणित केल्‍यानुसार चोरी गेलेल्‍या वाहनाकरीता तक्रारकर्ते विमा दावा मिळण्‍यास पात्र नाही हे मोटर व्‍हेईकल एक्‍टच्‍या कलम 157 (ब) प्रमाणे व उपरोक्‍त सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निकालपत्रानुसार तक्रारकर्ता चोरी गेलेल्‍या विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व वि.प.क्र. 1 ने नाकारलेला दावा हा कायदेशीर असून त्‍यांचे सेवेत त्रुटी नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे सदर तक्रार खारीज करण्‍यात येते.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
2)    उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्‍वतः सहन करावा.
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.