Maharashtra

Nanded

CC/09/47

Namdev Kalaba Waghumare - Complainant(s)

Versus

New India Assurance Co.Limited,Nanded. - Opp.Party(s)

Adv.Nazeer Ali Quadri

08 Aug 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/47
1. Namdev Kalaba Waghumare R/oTelaki Tq.Loha Dist.Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. New India Assurance Co.Limited,Nanded. Through,Branch Manager,Nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,PRESIDING MEMBER
PRESENT :

Dated : 08 Aug 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2009/47             
                                       प्रकरण दाखल तारीख -   13/02/2009     
                    प्रकरण निकाल तारीख    08/07/2009
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
         मा.श्रीमती सुजाता पाटणकर              -  सदस्‍या
 
नामदेव पि. काळबा वाघमारे
वय, 35 वर्षे, धंदा व्‍यापार                                  अर्जदार
रा. टेलकी ता. लोहा जि. नांदेड.
      विरुध्‍द.
न्‍यू इंडिया एशोरन्‍स कंपनी लि.
मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक,                                गैरअर्जदार
शाखा नांदेड.
निकालपञ
(द्वारा-मा.श्री.सुजाता पाटणकर,सदस्‍या)
 
          गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केली त्‍यामूळे अर्जदार यांनी खालील प्रमाणे आपली तक्रार दाखल केलेली आहे.
          अर्जदार हा महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्‍पो क्र.एम.एच.526एच-2911 चा मालक आहे. त्‍यांने गैरअर्जदार यांचेकडून सदर वाहनाचा विमा उतरविला आहे ज्‍यांचा नंबर 16090/31/07/01/00003668 दि.7.09.2007 ते 6.9.2008 या कालावधीसाठी आहे. पॉलिसीचा हप्‍ता रु.14,906/- भरलेला आहे. दि.15.6.2008 रोजी अर्जदाराच्‍या वाहनाचे मागचेटायर फूटून अपघात झाल्‍यामूळे हे वाहन बारुळ नरसी रोडवर पलटी झाले. ज्‍यांची पोलिस स्‍टेशनमध्‍ये करण्‍यात आली त्‍यांचा गून्‍हा नंबर 48/2008 असा आहे. पोलिसांनी वाहनाचा पंचनामा केला. अपघाता बाबत गैरअर्जदार यांना अर्जदार यांनी कळविले. त्‍यानुसार गैरअर्जदार यांनी वाहनाचा सर्व्‍हेअर मार्फत सव्‍हे केला.अर्जदार यांनी सर्व कागदपञ सादर करुन गैरअर्जदार यांचेकडे क्‍लेम दाखल केला. पण गैरअर्जदार यांनी दि.10.10.2008 रोजी अर्जदाराचा क्‍लेम फेटाळला. क्‍लेम फेटाळल्‍याचे कारण हे अर्जदाराने आपले वाहन खाजगी प्रवासासाठी दिले होते असे दिले. अर्जदार यांनी पॉलिसीमधील कोणत्‍याही नियमाचे उल्‍लंघन केलेले नाही. गैरअर्जदार हे रक्‍कम देण्‍यास हेतूपुरस्‍कर विलंब करीत आहेत. त्‍यामूळे अर्जदारांची मागणी आहे की, गैरअर्जदार यांनी रु.1,00,000/- व त्‍यावर 12 टक्‍के व्‍याज दि.15.6.2008 पासून दयावेत तसेच अर्जाचा खर्चही दयावा.
              गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. सदरील तक्रार मूदतबाहय आहे.गैरअर्जदार यांनी सेवेमध्‍ये कोणतीही ञूटी केलेली नाही म्‍हणून अर्जदाराची तक्रार फेटाळावी. पोलिसांनी दिलेल्‍या वर्दी मध्‍ये अर्जदार यांनी सदर वाहनाचा उपयोग खाजगी वाहतूकीसाठी केलेला आहे त्‍यामूळे पॉलिसीच्‍या अटी प्रमाणे क्‍लेम हा नामंजूर केलेला आहे. गैरअर्जदार यांचे सर्व्‍हेअर यांनी सर्व्‍हे केला असता वाहनाचे रु.16,520/- चे नूकसान झालेले आहे असे नमूद केलेले आहे. तो अहवाल त्‍यांनी दि.25.6.2008 रोजी दिलेला आहे.  अर्जदाराने मागितलेली नूकसान भरपाई ही अवास्‍तव व पॉलिसी नियमाच्‍या विरुध्‍द आहे.सव्‍हेअर यांनी स्‍वतःचे शपथपञही दाखल केलेले आहे.अर्जदार हे कोणत्‍याही मावेजासाठी अथवा व्‍याजासाठी पाञ नाहीत. अर्जदाराला सदरची तक्रार दाखल करणेसाठी कोणतेही कारण घडलेले नाही. त्‍यामूळे अर्जदाराची तक्रार ही खर्चासह खारीज करण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
 
          अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेली कागदप तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे, शपथपत्र याचा विचार होता खालील मुद्ये उपस्थित होतात.
 
                 मुद्ये.                             उत्‍तर.
 
1.   अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय       होय
2.   गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये
     कमतरता केली आहे काय                       होय.
3.   काय आदेश                         अंतिम आदेशाप्रमाणे.
                   कारणे
मूददा क्र. 1 ः-
 
          अर्जदार यांनी महिंद्रा बोलेरो पीकअप टेम्‍पो नंबर एम.एच.-26-एच-2911  या वाहनाचा विमा गैरअर्जदार यांचेकडे घेतलेला आहे. सदर विमा पॉलिसी गैरअर्जदार यांनी त्‍याचे लेखी म्‍हणण्‍यासोबत या अर्जाचे कामी या मंचामध्‍ये दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी आपले लेखी म्‍हणणे व शपथपञामध्‍ये सदरची बाब नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ, गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मूददा क्र.1 चे उत्‍तर वरील प्रमाणे देण्‍यात आले.
मूददा क्र.2 ः-
          अर्जदार यांचे वाहन महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्‍पो नंबर एम.एच.-26-एच-2911 या वाहनाचा विमा दि.7.9.2007 ते 6.9.2008 या कालावधीसाठी गैरअर्जदार यांचेकडे घेतलेला होता व सदर वाहनाचा दि.15.6.2008 रोजी मागचे टायर फाटल्‍यामूळे अपघात झालेला आहे. सदर अपघातामध्‍ये वाहनाचे झालेल्‍या नूकसानीची रक्‍कम मिळण्‍यासाठी अर्जदार  यांनी गैरअर्जदार यांचेकडे मागणी केली असता  गैरअर्जदार यांनी अर्जदार यांनी पॉलिसीचा भंग् केल्‍यामूळे अर्जदार यांचे क्‍लेम नाकारल्‍याचे गैरअर्जदार यांनी दि.10.10.2008 रोजी पञाने कळवलेले आहे. अर्जदार यांनी सदर अर्जासोंबत गाडी दूरुस्‍तीसाठी झालेलया खर्चा बाबतचे इस्‍टीमेंट दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये अर्जदार यांना सदरचे वाहन हे  माल वाहतूकीसाठी असताना त्‍यांनी प्रवाशी वाहतूक केलेली आहे असे म्‍हटले आहे. गैरअर्जदार यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यासोबत श्री. प्रशांत व्‍ही. तांदळे  यांचे दि.21.7.2008 चा सर्व्‍हे रिपोर्ट दाखल केलेला आहे. सदर सर्व्‍हेअरचे शपथपञ या कामी दाखल केलेले आहे. तसेच बिल चेक रिपोर्ट ही या अर्जाचे कामी या मंचामध्‍ये दाखल आहे. वरील सर्व कागदपञे यांचे अवलोकन केले असता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना बिल चेक रिपोर्ट प्रमाणे रक्‍कम अदा करणे आवश्‍यक होते. परंतु गैरअज्रदार यांनी अर्जदार यांचे क्‍लेम नाकारुन अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केली आहे असे या मंचाचे मत आहे.
 
          अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी 1996 ऐसीजे 1178 Supreme Court of India, New Delhi, B.V. Nagaraju Vs. Oriental Insurance Co. Ltd. या वरिष्‍ठ कोर्टाचे निकाल पञ दाखल केलेले आहे.
सदर निकाल पञामध्‍ये
 
Motor vehicle Act, 1988, section 147—Motor Insurance—Policy—Breach of—Complainant regarding repudiation of a claim in respect of damagae to a vehicle in accident—Insurance Company contended that complainant violated terms of the policy by carrying passengers in the good vehicle—Whether breach of carrying persons in agood vehicle moe than the number permitted in terms of the insurance policy is so fundamental a breach so as to afford ground to the insurer to eschew liability altogether—Held: no. (1994 CCJ 217 (karanataka) confirmed).
 
Motor insurance—Policy—Exclusion clause—Construction of—Complaint regarding repudiation of a claim in respect of damage to an insured vehicle in accident—Insurance Company contended that complainant violated terms of the policy by carrying passengers in the goods vehicle—Whether the terms of the policy of insurance need not be construed strictly but be read down to advance the main purpose of the contract—Held: yes.
 
असे म्‍हटले आले. सदर निकाल पञाप्रमाणे अर्जदार यांचा विमा क्‍लेम  बिल चेक रिपोर्ट प्रमाणे मंजूर करणे योग्‍य व न्‍याय ठरणारे असे आहे.
 
          गैरअर्जदार यांनी त्‍यांचे लेखी यूक्‍तीवादासोबत Superm Court & National Commission Consumer Law Cases (2005-2008)
 
 The oriental Insurance Co.Ltd. Vs. Pabindra Narayan Uzir     हे निकाल पञ दाखल केलेले आहे. सदर निकालपञामध्‍ये,
(i)                Insurance Claim- Motor Vehicle- could not be used for carrying passengers except employees (not exceeding 6) – More than 60 passengers were being carried- Vehicle met withd accident- Death of 20 persons- Not a case where the complainant- respondent was not aware of carrying passengers-No deficiency in repudiating the claim- Order allowing complaint set aside –
(ii)              Insurance claim – Repudiation – Supposing, There could be two different perspective to repudiate or not to repudiate the claim but on facts and circumstances if an unbiased and honest view could be taken in proper perspective to repudiate the claim. The repudiation of the claim would not amount to deficiency in rendering service. 
 
असे म्‍हटले आहे. त्‍यामूळे सदर अर्जाचे कामी या निकालपञाचा विचार करता अर्जदार यांचा क्‍लेम विमा कंपनीने प्रामाणीकपणे नाकारल्‍याचे दिसून येत नाही.
          अर्जदार यांचा विमा क्‍लेम गैरअर्जदार यांनी नाकारलेला आहे.  अर्जदार यांना प्रस्‍तूतची विमा क्‍लेमची रक्‍कम मिळण्‍यासाठी या मंचामध्‍ये अर्ज करावा लागला आहे व त्‍या अनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून मानसिक ञासाबददल व अर्जाचे खर्चाबददल रक्‍कम वसूल होऊन मिळण्‍यास पाञ आहेत.
          गैरअर्जदार यांनी दाखल केलेला सर्व्‍हे रिपोर्ट, शपथपञ, बिल चेक रिपोर्ट यांचा विचार होता अर्जदार यांनी बिल चेकरिपोर्ट प्रमाणे रक्‍कम मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित ठरणार आहे असे या मंचाचे मत आहे. सदर मंजूर रक्‍कमेवर अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून क्‍लेम नाकारल्‍याचे दिनांकापासून नूकसान भरपाई पोटी 9 टक्‍के व्‍याजासह होणारी रक्‍कम देणे योग्‍य ठरणार आहे असे या मंचाचे मत आहे.
       अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र, अर्जदार यांचे वकीलांचा युक्‍तीवाद तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे, शपथपत्र, गैरअर्जदार यांचे वकीलांचा युक्‍तीवाद, तसेच दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले वरिष्‍ठ कोर्टाच्‍या निकालपत्राचा विचार होऊन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
                            आदेश.
 
अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजुर करण्‍यात येतो.
आज पासुन 30 दिवसांच्‍या आंत गैरअर्जदार यांनी अर्जदार क्र. 1 यांना खालील प्रमाणे रक्‍कमा द्याव्‍यात.
1.                 बिल चेक रिपोर्ट प्रमाणे रक्‍कम रु.16,520.50 पैसे दयावेत, सदर रक्‍कमेवर क्‍लेम नाकारल्‍याचे दि.10.10.2008 पासून प्रत्‍यक्ष रक्‍कम पदरीपडेपर्यत 9 टक्‍के व्‍याजासहीत होणारी रक्‍कम दयाव.
2.                 अर्जदार यांची मानसिक त्रासाबाबतची मागणी नसलेने त्‍याबाबत आदेश नाही.
3.                 अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- मिळावेत.
4.                 4पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे पाटील)                (श्रीमती.सुजाता पाटणकर)                   
       अध्‍यक्ष                                                सदस्‍या
 
 
जे.यू.पारवेकर,लघूलेखक.

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] PRESIDING MEMBER