Maharashtra

Satara

CC/11/165

Bharti Ramchandr Bansod - Complainant(s)

Versus

New India Assurance Co. Ltd Satara - Opp.Party(s)

Bhosale

27 Oct 2015

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. CC/11/165
 
1. Bharti Ramchandr Bansod
A/p 15/2 B, Raviwar Peth Satara
Satara
...........Complainant(s)
Versus
1. New India Assurance Co. Ltd Satara
513, SadarbZar Satara
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
  HON'BLE MRS.SUREKHA HAJARE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा.

         मा.सौ.सुरेखा हजारे,सदस्‍या

          मा. श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

 

                             तक्रार  क्र. 165/2011.

                             तक्रार दाखल दि.14-12-2011.

                             तक्रार निकाली दि.27-10-2015.                                                          

                    

श्रीमती भारती रामचंद्र बनसोड,

रा.15/2,ब, रविवार पेठ, जि.सातारा.                  ‍ ...  तक्रारदार.

  

         विरुध्‍द

 

मॅनेजर,

दि न्‍यू इंडिया अँश्‍यूरन्‍स कं.लि.,

मुख्‍य कार्यालय,

जिवनतारा, पहिला मजला,

कलेक्‍टर ऑफीस समोर,

513, सदरबझार, सातारा.                           ....  जाबदार.

 

 

                                   तक्रारदारातर्फे अँड.एस.डी.भोसले.

                                   जाबदारतर्फे अँड.आर.एन.कुलकर्णी.

                     

  न्‍यायनिर्णय

 

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला)

                                                                                      

1.   प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार दाखल केला आहे.  प्रस्‍तुत तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

     तक्रारदार हे सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवाशी असून ते  बांधकाम व्‍यावसायिक आहेत.  नोव्‍हेंबर,2010 मध्‍ये तक्रारदार यांनी श्री. विकास दत्‍तात्रय कदम यांच्‍याबरोबर करार करुन श्री. कदम यांची काळ्या रंगाची स्‍कार्पिओ गाडी रजि. नं.एम.एच.11-ए.के. 540 ही खरेदी करण्‍याचे ठरविले.  त्‍याप्रमाणे उभयतांनी जाबदार विमा कंपनीचे अधिकारी यांचेशी संपर्क साधून प्रस्‍तुत गाडीची संपत आलेली विमा पॉलीसी पुढे चालू ठेवणेसाठी व सदर पॉलीसी तक्रारदाराचे नावावर स्‍थलांतरीत करण्‍यासाठीची माहिती घेतली.  त्‍यावेळी विमा अधिका-यांनी प्रस्‍तुत विमा पॉलीसीवरील नाव बदलण्‍याची चिंता न करण्‍याचे आश्‍वासन दिले व प्रत्‍यक्ष गाडी विक्रीवेळी सदर विमा पॉलीसी बदलून देतील अशी हमी दिली.  त्‍यामुळे विमा पॉलीसी संपण्‍यापूर्वी ती चालू रहावी म्‍हणून तक्रारदाराकडून विमा हप्‍त्‍यापोटी रक्‍कम रु.15,008/- (रुपये पंधरा हजार आठ मात्र) दि.24/12/2010 चा चेक नं.026368 घेतला.  जाबदार कंपनीने सदर चेक वटवून रक्‍कम स्विकारली व विमा पॉलीसी पुढे चालू ठेवली. सदर पॉलीसीचा नंबर 15170131090100206926 असा आहे.  प्रस्‍तुत गाडी तक्रारदाराचे ताब्‍यात असल्‍याने तिचे संरक्षण व्‍हावे व इतरांना नुकसानीपासून संरक्षण मिळावे अशा विचाराने विमा हप्‍ता स्‍वतःच्‍या हिताच्‍या संरक्षणासाठी भरलेला होता.  प्रस्‍तुत गाडी प्रत्‍यक्षात दि. 5/2/2011 रोजी तक्रारदाराचे ताब्‍यात हस्‍तांतरीत झाली.  तक्रारदाराने लगेचच जाबदार विमा कंपनीचे अधिका-यांना भेटून विमा पॉलीसी तक्रारदाराचे नावे बदली करणेस सांगीतले.  त्‍यावेळी विमा कंपनीचे अधिका-यांनी विमा पॉलीसी बदली करुन देणेचे आश्‍वासन दिले व विमा हस्‍तांतरीत होऊन त्‍याचे कागदपत्रे मिळणेस उशीर होईल म्‍हणून सांगितले.  तक्रारदाराने जाबदारांवर विश्‍वास ठेवला.  पुढे दि. 15/5/2011 रोजी प्रस्‍तुत गाडीस दुरुस्‍तीचा अंदाजीत खर्च रक्‍कम रु.1,17,000/- (रुपये एक लाख सतरा हजार मात्र) येईल असे सहयाद्री मोटर्स, सातारा यांनी सांगीतले.  प्रस्‍तुतचे सहयाद्री मोटर्स हे जाबदार कंपनीचे मान्‍यताप्राप्‍त गॅरेज आहे. तक्रारदाराने पस्‍तुत खर्चाचे अंदाजपत्रक जाबदार विमा कंपनीकडे पाठविले असता जाबदाराने कोणतीही रक्‍कम प्रस्‍तुत गॅरेजकडे पाठविली नाही.  त्‍यामुळे पैशाअभावी सहयाद्री मोटर्स यांनी दुरुस्‍तीचे काम थांबविले व तक्रारदारकडून रक्‍कम रु.20,000/- चा भरणा करुन घेतला.  परंतू जाबदाराचे दुरुस्‍ती खर्च न देणेच्‍या आडमुठेपणामुळे व तक्रारदाराकडून पुढील खर्चाची व्‍यवस्‍था झाली नसलेने गाडी बराच काळ दुरुस्‍तीशिवाय पडून होती.  त्‍यामुळे तक्रारदाराला खूप त्रास सहन करावा लागला व आर्थिक नुकसान झाले.  तक्रारदाराची प्रस्‍तुत गाडी सहयाद्री गॅरेजमध्‍ये दि. 15/5/2011 ते दि.28/8/2011 पर्यंत म्‍हणजेच साधारण साडेतीन महिने दुरुस्‍ती विना पडून राहीली व त्‍या कालावधीत बँक कर्जाचा हप्‍ता रक्‍कम रु.8,000/- (रुपये आठ हजार फक्‍त) तक्रारदाराला भरावा लागला.  तक्रारदाराला बँकेचे अनावश्‍यक व हप्‍त्‍यापोटी रक्‍कम रु.30,000/- सहन करावे लागले. तसेच महिन्‍यात उद्योगधंद्यातील आर्थिक नुकसानी म्‍हणून रक्‍कम रु.30,000/- सहन करावे लागले, दरम्‍यानचे काळात प्रवासासाठी दरमहा रक्‍कम रु. 10,000/- देऊन खाजगी वाहन भाडयाने घ्‍यावे लागले त्‍यास एकूण रक्‍कम रु.35,000/- तक्रारदारास खर्च करावा लागला, जाबदाराने दुरुस्‍तीचा खर्च दिला नाही म्‍हणून तक्रारदाराने रक्‍कम रु.85,000/- भरुन गाडी दुरुस्‍त करुन घेतली व जाबदार यांना वकीलांमार्फत दि.21/9/2011 रोजी नोटीस पाठविली.  प्रस्‍तुत नोटीस मिळूनसुध्‍दा जाबदाराने नोटीस कालावधीत रक्‍कम अदा केली नाही अथवा नोटीसला उत्‍तरही दिलेले नाही.  प्रत्‍यक्षात तक्रारदाराकडून विमा हप्‍ता स्विकारुनदेखील कायद्याप्रमाणे येणारी जबाबदारी जाबदार विमा कंपनीने स्विकारलेली नाही तर जबाबदारी झटकून सेवेत त्रुटी निर्माण केली.  त्‍यामुळे जाबदारविरुध्‍द तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज दाखल केला आहे.

2.  तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी गाडी दुरुस्‍तीस आलेला खर्च रक्‍कम रु.85,000/- (रुपये पंच्‍याऐंशी हजार मात्र) जाबदारांकडून वसूल होऊन मिळावा, मानसिक त्रासापोटी जाबदारांकडून रक्‍कम रु.30,000/- मिळावेत, तक्रारदाराला खाजगी गाडीसाठी आले खर्चासाठी रक्‍कम रु.35,000/- तक्रार अर्ज व नोटीस खर्च म्‍हणून रक्‍कम रु.10,000/- जाबदार यांचेकडून वसूल होऊन मिळावा व वरील सर्व रकमेवर रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्‍के व्‍याज जाबदारांकडून मिळावे अशी विनंती केली आहे.  

3.  प्रस्‍तुत कामी तक्रारदार यांनी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते नि.5/3 कडे अनुक्रमे नि. 5/1 कडे विमा पॉलीसी, जाबदाराला नोटीस, नोटीसची पोहोचपावती, नि. 9 चे कागदयादीसोबत नि.9/1 ते नि.9/7 कडे अनुक्रमे गाडीची आर.सी.बुक (तक्रारदाराचे नावचे), विक्रम कदम यांचे नावचे गाडीचे आर.सी.बुक, गाडी दुरुस्‍तीचे टॅक्‍स इनव्‍हाईस, सहयाद्री मोटर्सला रक्‍कम रु.45,000/-, रु.20,000/- व रु.20,000/- चा भरणा केल्‍याच्‍या पावत्‍या, विक्रम कदम यांचे नावची विमा पॉलीसी, नि. 30 कडे पुराव्‍याचे शपथपत्र वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.

4.  जाबदाराने प्रस्‍तुत कामी नि. 12 कडे म्‍हणणे/कैफियत, नि. 13 कडे म्‍हणण्‍याचे अँफीडेव्‍हीट, नि.14 चे कागदयादीसोबत नि.14/1 ते 14/8 कडे अनुक्रमे विमा प्रपोजल फॉर्म, कलेक्‍शन रिसीट (चेक मिळालेची पावती), विमा पॉलीसी, मोटार क्‍लेम फॉर्म, ड्रायव्‍हींग लायसन, सर्व्‍हे रिपोर्ट, तक्रारदाराचे नावची विमा पॉलीसी, नि. 18 चे कागदयादीसोबत नि. 18/1 ते नि. 18/4 कडे अनुक्रमे एंडॉर्समेंट ऑन पॉलीसी, जाबदाराचे शपथपत्र, विमा प्रतिनिधीचे अँफीडेव्‍हीट, सर्व्‍हेअरचे अँफीडेव्‍हीट, नि. 24 कडे पुराव्‍याचे शपथपत्रासाठी पुरसीस, नि. 26 कडे लेखी युक्‍तीवाद वगैरे कागदपत्रे जाबदार यांनी याकामी दाखल केली आहेत.

    जाबदाराने त्‍यांचे म्‍हणणे/कैफीयतीमध्‍ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.  त्‍यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप घेतले आहेत.

i  तक्रारदाराला तक्रार अर्ज व त्‍यातील कथने मान्‍य व कबूल नाहीत.
ii  तक्रारदाराने जाबदार यांचेकडे विमा रकमेपोटी कोणतीही रक्‍कम दिलेली नाही. त्‍यामुळे तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक नाहीत व जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा देण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाती तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक या संज्ञेत येत नाहीत.  त्‍यामुळे तक्रारदार जाबदाराचे ग्राहक नसलेने तक्रार अर्ज फेटाळणेस पात्र आहे. 

iii   तक्रारदार हे सदरची खोटी तक्रार घेऊन मे मंचात आले आहेत ते स्‍वच्‍छ हाताने मे. मंचात आलेले नाहीत.  तक्रारदाराने fally and frivolous अशी तक्रार केली असलेने ग्राहक कायदा कलम 26 प्रमाणे केली असलेने जाबदारांकडून भली मोठी रक्‍कम उकळण्‍यासाठी केली असून विनाकारणच जाबदाराला खर्चात पाडलेने जाबदार यांना तक्रारदारकडून रक्‍कम रु.10,000/- देणेबाबत हुकूम व्‍हावेत.  जाबदारकडून फायदा मिळविण्‍यासाठी तक्रारदाराने बनावट प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत.  तक्रारदार जाबद ाराचे ग्राहक असलेबाबत कोणताही पुरावा मे. मंचात दाखल नाही.

iv  श्री. विक्रम दत्‍तात्रय कदम यांनी त्‍यांच्‍या स्‍कॉर्फिओ नं. एम.ए.च.11.ए.के.540  या गाडीचा विमा काढण्‍यासाठी त्‍यांनी जाबदार कंपनीकडे दि. 24/12/2010 रोजी विमा प्रपोजल फॉर्म जाबदाराचे नियमाप्रमाणे भरुन दिला.  त्‍यामध्‍ये विक्रम कदम यांचे स्‍वतःचे नाव, गाडी नंबर, राहण्‍याचा पत्‍ता, विमा कालावधी म्‍हणजे दि.24/12/2010 ते दि.23/12/2011, गाडी खरेदीची तारीख, इंजिन नंबर, चेसीस नंबर, इ. माहीती देवून पॅकेज पॉलीसी काढणेस सांगीतले. त्‍यावेळी गाडीची किंमत म्‍हणजे I.D.V.  4,50,000/- केली.  सदर प्रपोजल फॉर्म सातारा येथे भरलेनंतर नियमाप्रमाणे जाबदार यांनी प्रस्‍तुत गाडी त्‍याचदिवशी दि. 24/12/2010 रोजी सकाळी 10.00 वाजता प्रत्‍यक्ष तपासणी केली त्‍यावेळी गाडीचे रनिंग 74120 कि.मी. झाले होते.  श्री. विक्रम कदम यांनी रक्‍क्‍म रु.15,008/- चा कॉसमॉस को-ऑप. बँक लि., चा सातारा शाखेचा चेक नं. 026368 हा जाबदाराला दिला.  प्रस्‍तुत विमा पॉलीसीचा नं. 15170031100100014994 असून प्रस्‍तुत पॉलीसीचा कालावधी दि.24/12/2010 ते दि.13/12/2011 असा होता.  त्‍यामुळे विक्रम कदम व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते निर्माण झाले होते.

v   दि.15/5/2011 रोजी तक्रारदाराने सदर वाहनास अपघात झालेचे सांगितलेने जाबदाराने मोटर क्‍लेम फॉर्म दिला.  त्‍यांनी तो सविस्‍तर भरुन दि.30/5/2011 रोजी जाबदाराकडे सादर केला.  प्रस्‍तुत अपघातावेळी सदर गाडी संभाजी शिवाजी जाधव हा ड्रायव्‍हर चालवत असून त्‍याचेकडे (LMV–(IR)) Light Motor Vehicle T.R. चे लायसन्‍स असून त्‍याची मुदत दि.3/8/2011 पर्यंत वैध होती.  मोटार क्‍लेम फॉर्मवर तक्रारदाराने इंग्रजीमध्‍ये सही केली आहे.

vi   प्रस्‍तुत वादातीत अपघातग्रस्‍त वाहनाचा सर्व्‍हे, सर्व्‍हेअर नितीन खोले यांचेमार्फत जाबदाराने करुन घेतला.  या सर्व्‍हे रिपोर्टप्रमाणे रक्‍कम रु.58,300/- (रुपये अठ्ठावन्‍न हजार तीनशे मात्र) चे गाडीचे नुकसान झालेची नोंद आहे.  परंतू प्रस्‍तुत रक्‍कम जाबदार तक्रारदार यांना देणे लागत नाहीत असा सर्व्‍हे रिपोर्ट सादर केला आहे.  प्रस्‍तुत सर्व्‍हे रिपोर्ट व बील, चेक रिपोर्टमध्‍ये फायनान्‍सर म्‍हणून मायणी अर्बन को-ऑप. बँ‍क लि., या बँकेचा उल्‍लेख आहे.

vi   मोटार वाहन कायद्याप्रमाणे व पॉलीसीच्‍या अटीप्रमाणे तक्रारदार ही जाबदाराची ग्राहक नसलेने जाबदार यांचेकडून सेवा मागणचा हक्‍क प्राप्‍त होत नाही.  त्‍यामुळे जाबदाराने सेवा त्रुटी केली म्‍हणता येत नाही व तक्रारदाराला तसा अधिकार नाही.

vii  मोटार वाहन कायद्याप्रमाणे व पॉलीसीच्‍या अटीप्रमाणे तक्रारदार ही जाबदाराचे ग्राहक नसलेने जाबदार यांचेकडून सेवा मागणेचा हक्‍क प्राप्‍त हो नाही त्‍यामुळे जाबदाराने सेवात्रुटी केली म्‍हणता येत नाही.

viii  अपघात दि.15/05/2011 रोजी झाला आहे त्‍या तारखेस श्री. विक्रम कदम हेच गाडीचे मालक होते.  तसेच गाडीचा विमा दि.29/7/2011 चे दुपारी विमा ट्रान्‍स्‍फर करुन तक्रारदाराचे नावे झाला असून अपघाताचेदिवशी म्‍हणजेच दि.15/05/2011 रोजी तक्रारदार हे प्रस्‍तुत गाडीचे विमाधारक नव्‍हते तसेच प्रस्‍तुत नवीन पॉलीसीवर H.P.A. म्‍हणून मायणी अर्बन को-ऑप.बँक लि. ब्रँच साताराचा उल्‍लेख आहे.  त्‍यामुळे तक्रारदार यांना प्रस्‍तुत जाबदार यांचेकडून विमाक्‍लेम मागणेचा अधिकार प्राप्‍त होत नाही त्‍यांना Insurable Interest नाही.  त्‍यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळणेत यावा.  तसेच प्रस्‍तुत वाहनास ड्रायव्‍हींग करणारे ड्रायव्‍हरचे डायव्‍हींग लायसन्‍स हे LMV (NT) असे असणे आवश्‍यक होते.  परंतू ते LMV (TR)  असे आहे.  त्‍यामुळे तक्रारदाराने पॉलीसीतील अटी व शर्थींचा भंग केला आहे. सबब तक्रार अर्ज फेटाळणेत यावा असे म्‍हणणे जाबदाराने दाखल केले आहे.

5.  वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्‍तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ मे मंचाने पुढील मुद्दे विचारात घेतले.

अ.क्र.           मुद्दा                          उत्‍तर

1. तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत काय?              होय.

2. तक्रारदार यांना प्रस्‍तुत तक्रार अर्ज दाखल करणेचे

   Insurable Interest  काय?                           नाही.

3. अंतिम आदेश?                                   खालील आदेशात  

                                                  नमूद केलेप्रमाणे     

 

विवेचन-

6.    वर नमूद मुद्दा क्र.1  चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण-तक्रारदाराने श्री. विक्रम कदम यांची वादातीत स्‍कॉर्फिओ गाडी खरेदी केली व दि. 29/7/2011 रोजी प्रस्‍तुत वाहनाचा विमा विक्रम कदम यांचे नावावरुन तक्रारदाराचे नावावर झाला.  तसेच तक्रारदाराचे नाव आ.सी.बुकात नोंद झाले.  त्‍यामुळे तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत.  परंतू प्रस्‍तुत कामी सदर स्‍कॉर्फीओ गाडी नं. एम.एच.11 ए.के. 540 चा अपघात दि. 15/5/2011 रोजी झाला व सदर अपघात तारखेस प्रस्‍तुत वाहनाची विमापॉलीसी तक्रारदाराचे नावावर ट्रान्‍स्‍फर झालेली नाही हे स्‍पष्‍ट दिसते आहे.  तर सदरचा विमा तक्रारदाराचे नावावर दि. 24/12/2010 रोजी तक्रारदाराचे नावावर विमा ट्रान्‍स्‍फर झालेली नाही हे स्‍पष्‍ट दिसते आहे. तर सदरचा विमा तक्रारदाराचे नावावर दि.24/12/2010 रोजी तक्रारदाराचे नावावर विमा ट्रान्‍स्‍फर झाला आहे.  त्‍यामुळे अपघात तारखेस दि.15/5/2011 रोजी प्रस्‍तुत वादातीत स्‍कॉर्फीओ गाडी एम.एच.-11-ए.के.-540 चा विमा तक्रारदाराचे नावावर ट्रान्‍स्‍फर झालेला नसलेमुळे तक्रारदार यांना  जाबदार यांचेकडून विमा क्‍लेम मागणेचा अधिकार प्राप्‍त होत नाही. तक्रारदाराला (Insurable Interest) नाही असे स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे जाबदाराने सेवात्रुटी देणेचा प्रश्‍नच उद्भवत नाही.  तक्रारदार यांना प्रस्‍तुत तक्रार अर्ज दाखल करणेचे अधिकार नाहीत.  सबब जाबदार यांनी तक्रारदाराला सेवात्रुटी दिलेली नाही व तक्रारदाराला तक्रार अर्ज दाखल करणेस व जाबदार यांचेकडून विमा क्‍लेमची रक्‍कम मागणेस (Insurable Interest) नाही असे यामध्‍ये स्‍पष्‍ट मत आहे.  सदर कामी आम्‍ही पुढील न्‍यायनिवाडा विचारात घेतला आहे.

N.Gopal V/s. National Insurane Co.Ltd.,  National C.D.R.C. 275

Head Note-  Insurable interest- Accident of vehicle – petitioner neither registered- owner nor had the policy been transferred to his name as per provisions of M.V.Act- Repudiation justified.

Consumer Protection Act 1986 Sec 2 (1)(g)-Motor Vehicle Act.1988- Sec.50,157-Insurance-Accident of vehicle-Insurable interest-Surveyor appointed-claim repudiated-alleged deficiency in service- District Forum partly allowed complaint- state commission allowed appeal- Hence revision-At the time of Accident neither was the petitioner registered owner of vehicle nor had the policy been transferred to his name as per provisions of M.V.Act-Petitioner has no insurable interest in said vehicle and also there is no privity  of contract between petitioner with respondent-Repudiation Justified.

     सबब सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांना प्रस्‍तुत जाबदार यांचेकडून विमा क्‍लेम मागणी करणेचा व या मे. मंचात तक्रार अर्ज दाखल करणेचा अधिकार नाही हे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेस पात्र आहे असे या मे. मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. 

8.  सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.   

आदेश

1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत येतो/नामंजूर करणेत येतो.

2. सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

3. सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

 

ठिकाण- सातारा.

दि. 27-10-2015.

 

           (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

             सदस्‍या          सदस्‍य           अध्‍यक्षा

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[ HON'BLE MRS.SUREKHA HAJARE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.