जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/264 प्रकरण दाखल तारीख - 19/09/2009 प्रकरण निकाल तारीख – 15/02/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य शंकर विरभद्र कौरवार, वय वर्षे 79, रा.मुखेड जि.नांदेड. अर्जदार. विरुध्द. 1. शाखाधिकारी, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गैरअर्जदार. शाखा – मुखेड. 2. सरव्यवस्थापक, रिजर्व बँक ऑफ इंडिया आर.पी.सी.डी विभाग, वरळी,मुंबई. 3. मा.जिल्हाधिकारी, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - अड.एस.डी.भोसले. गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील - स्वतः निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, त्यांचे रु.99,000/- ही रक्कम 2004 पासुन जमा आहेत तसेच व्याज रु.40,630/- जमा आहेत. अर्जदाराच्या मुलांचे नातू व नातीचे लग्न ठरल्यामुळे पैशाची अत्यंत गरज आहे ते व्याजासहीत द्यावेत म्हणुन गैरअर्जदाराकडे मागणी केली असता, त्यांनी रक्कम दिली नाही. त्यांचे नातू व नातीचे लग्नासाठी पैशाची अत्यंत गरज आहे सदरील रक्कम गैरअर्जदारांना मागणी करुन ही दिली नाही म्हणुन त्यांचे सेवेत त्रुटी झाली म्हणुन ही तक्रार दाखल करुन अर्जदाराने अशी मागणी केली की, त्यांची रक्कम रु.99,000/- व व्याज रक्कम रु.40,630/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत तसेच मानसिक त्रासाबद्यल रु.10,000/- व दावा खर्च म्हणुन रु.5,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत. गैरअर्जदार क्र. 1 हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. रिझर्व बँकेने ग्राहकाच्या सुरक्षेसाठी व बँकेच्या हितासाठी दि.20/10/2005 रोजी बँकेच्या आर्थीक पहाणी करुन बँक रेग्युलेशन अक्ट चे कलम 35 ए लादण्यात आले. त्यामुळे गैरअर्जदारास भारतीय रिझर्व बॅकेच्या पुर्व परवानगी शिवाय रु.1,000/- पेक्षा जास्त रक्कम देता येत नाही. जर अर्जदारास रक्कम उचलायची असेल तर विहीत नमुन्यातील हार्डशिप ग्राऊंडवर रक्कम मागु शकतात. यापुर्वी अर्जदारास रु.40,000/- देण्यात आले आहे व दि.22/08/2009 रोजी बळीराजा खाते बंद करुन रु.15,728/- जमा करुन त्या पैकी 3,000/- उचल देण्यात आले आहे. ठेव म्हणुन जमा केलेली रक्कम खाते क्र.13031 मध्ये जमा आहे. अर्जदारास जर पुन्हा रक्कम पाहीजे असल्यास तर त्यांनी पुन्हा हार्डशिप ग्राऊंडवर प्रस्ताव पाठवावा व मंजुरी आल्यास रक्कम देण्यास गैरअर्जदार तयार आहेत. वरील सर्व परिस्थिती पाहुन अर्जदाराची तक्रार खर्चासहीत नामंजुर करावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 2 हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार ही गैरअर्जदार क्र. 1 यांचे विरुध्द आहे गैरअर्जदार क्र. 2 विरुध्द नाही, ही तक्रार गैरअर्जदार क्र. 2 विरुध्द चालु शकत नाही. अर्जदाराच्या कोणत्याही बँकेच्या व्यवहारात त्यांचा सहभाग नाही. फक्त गैरअर्जदार क्र. 2 यांनी दिलेल्या निर्देशानुसार गैरअर्जदार क्र. 1 बँक ही चालत असते. गैरअर्जदार क्र. 2 ने दिलेले निर्देश गैरअर्जदार क्र. 1 यांना पाळावेच लागतात. गैरअर्जदार क्र. 2 व अर्जदार यांचे मध्ये कोणताही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 2 यांचा ग्राहक नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार फेटाळावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदार यांना कोणतीही सेवा दिलेली नाही. अर्जदार यांच्या तक्रारीवरुन हे स्पष्ट होते की, त्यांची मुख्य तक्रार ही गैरअर्जदार क्र. 1 यांचे विरुध्द आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांचा या तक्रारीशी काहीही संबंध येत नाही. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाप्रमाणे तक्रार त्यांचे विरुध्द फेटाळण्यात यावी. त्याबद्यल त्यांनी नॅशनल कमीशन न्यु.दिल्ली यांचे पिटीशन नंबर 2/1990 विरेंद्र प्रसाद विरुध्द आर.बी.आय. वइतर यांचे (1991) (5) सी.पी.आर. पान क्र. 661) चा आधार घेतला आहे. याप्रमाणे आर.बी.आय.यांनी अर्जदार यांना कोणतीही सेवा दिलेली नाही तसेच थेट त्यांचा व अर्जदाराचा संबंध येत नाही. म्हणुन सदर तक्रार फेटाळावी असे म्हटले आहे. आर.बी.आय. यांनी एक परिपत्रक 18 नोंव्हेंबर 2004 रोजी काढुन अर्जदार यांना हार्डशिप ग्राऊंडवर रक्कम घेता येईल असे कळविले आहे. त्यामुळे असे करुन गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही. म्हणुन त्यांचे विरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदारांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासुन व केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील त्रुटी सिध्द होते काय? नाही. 2. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 अर्जदार यांनी फिक्स डिपॉझिट म्हणुन रु.99,000/- गैरअर्जदाराकडे ठेवले होते हे कागदपत्र पाहीले असता सिध्द होते. पण अर्जदार यांना रक्कमेची आवश्यकता पडली असेल ही बाब सुध्दा नाकारता येणारनाही. परंतु गैरअर्जदार क्र. 1 बँकेवर आर.बी.आय. गैरअर्जदार क्र. 2 ने कलम (35) (ए) लावून बँकेच्या आर्थीक व्यवहारावर निर्बंध लादले असल्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 हे गैरअर्जदार क्र. 2 आर.बी.आय. च्या परवानगी शिवाय रक्कम देऊ शकत नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 यांच्या सेवेतील त्रुटी होत नाही. या आधी अर्जदार यांनी पहिल्यांदा हार्डशिप ग्राऊंडवर रु.40,000/- उचलले आहेत. अर्जदार यांना नातु,नातीच्या लग्नासाठी रक्कम हवी असेल तर परत एकदा दुसरा प्रस्ताव हार्डशिप ग्राऊंडवर आवश्यक त्या कागदपत्रासह पाठवावा. अर्जदाराला जर रक्कमेची आवश्यकता असेल तर अर्जदार हे हार्डशिपच्या ग्राऊंडवर आर.बी.आय.ने ठरवून दिलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज, कागदपत्र दाखल करुन रक्कमे बाबतचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र. 1 बँकेकडे दुस-यांदा सादर करावा व तो प्रस्ताव बँकेने ताबडतोब गैरअर्जदार क्र. 2 आर.बी.आय.कडे पाठवून देणे बाबत कारवाई करणे आवश्यक आहे व आर.बी.आय.ने मंजुर केलेली रक्कम अर्जदार यांना देणे हे गैरअर्जदार क्र. 1 यांचेवर बंधनकारक राहील. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजुर करण्यात येतो. 2. अर्जदार यांनी योग्य कागदपत्रासह रक्कमे बाबतचा दुसरा प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रासह आर.बी.आय.ने ठरवून दिलेल्या विहीत नमुन्यात गैरअर्जदार क्र. 1 बँकेकडे सादर करावा व बँकेने तो प्रस्ताव त्यांचे मार्फत आर.बी.आय.कडे सादर करावा व आर.बी.आय.ने मंजुर केलेली रक्कम ताबडतोब अर्जदार यांना द्यावी. 3. मानसिक त्रासाबद्यल आदेश नाही. 4. गैरअर्जदार क्र.2 बद्यल आदेश नाही. 5. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 6. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार,लघुलेखक. |