Complaint Case No. CC/16/289 |
| | 1. Nidhi Vijay Goenka Behalf Vijay Purushottam Goenka | C/o, O.P. Goenka, Beside Agrasen Bhavan Goenka Nagar, Akola | Akola | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Navjeevan Constructions, A partnership firm, through partner Simranjeetsingh Jaspalsingh Nagra | Gaddam plots, Akola | Akola | Maharashtra | 2. Simranjeetsingh Jaspalsingh Nagra Being Prtner of Navjeevan Constructions, | R/o, Nagra House, Near Hegdewar Blood Bank, Jatherpeth Akola C/o, Hotel Jasnagra, Near Railway Station, Ramdaspeth Akola | Akola | Maharashtra | 3. Dashmeshsingh Paramjitsingh Sethi Being Partner Of Navjeevan Constructions, | R/o, Near Gurudwara, Near Railway station Akola | Akola | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | ::: आ दे श ::: ( पारीत दिनांक :03.04.2017 ) आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार सदर प्रकरणात तिनही विरुध्दपक्षांना सुचना प्राप्त होऊनही ते मंचासमारे हजर न झाल्याने, त्यांचे विरुध्द हे प्रकरण एकतर्फी चालविण्याचे आदेश दि. 2/3/2017 रोजी पारीत करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील तक्रारकर्तीची तक्रार व तक्रारकर्तीतर्फे दाखल करण्यात आलेले संपुर्ण कागदपत्रे, यांचे आधारे सदर तक्रार निकाली काढण्यात आली. - दाखल दस्तांवरुन तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांची ग्राहक असल्याचे स्पष्ट होत असल्याने, तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांची ग्राहक असल्याचे ग्राह्य धरण्यात येत आहे.
- तक्रारकर्तीच्या तक्रारीनुसार, तक्रारकर्तीच्या वतीने तिचे वडील विजय गोयनका यांनी दि. 31/10/2014 रोजी विरुध्दपक्ष यांचेकडे रक्कम रु. 1,00,000/- चेक क्र. 000002, दि अकोला जनता कमर्शिअल को ऑप बँक लि., अकोला, अन्वये ठेव म्हणून 18 महिन्यांकरिता ब्रोकर खुशी इन्व्हेस्टमेंट मार्फत जमा केले होते. सदरहु रक्कम तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडे जमा केली, त्यावेळेस विरुध्दपक्ष क्र. 2 ने विरुध्दपक्ष क्र. 1 चा भागीदार म्हणून, तसेच सर्व विरुध्दपक्ष यांच्या वतीने तक्रारकर्तीकडून सदरहु रक्कम मिळाल्याबद्दल दि. 31/10/2014 रोजीची तक्रारकर्तीच्या हक्कात ठेव पावती सुध्दा करुन दिली होती. विरुध्दपक्षाने सदरहु ठेव रक्कमेवर, 1.40 द.म.द.शे. प्रमाणे, व्याज देण्याचे सुध्दा कबुल केले होते. सदरहु रक्कम तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडे, विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 ने विरुध्दपक्ष क्र. 1 चे भागीदार म्हणून तक्रारकर्तीच्या हक्कात ठेव रक्कम परतफेडीपोटी दिलेल्या पोस्ट डेटेट चेक क्र. 459397 दि. 30/04/2016 रोजीचा अकोला अर्बन को-ऑप बँक लि., मुख्य शाखा अकोला च्या आधारे ठेव म्हणून दिले होते. सदरहु चेक तक्रारकर्तीने तिच्या खात्यात बँकेत वटविण्याकरिता लावला असता सदरहु चेक न वटविता दि. 20/7/2016 रोजी तक्रारकर्तीला बँकेने, फन्डस् इनसफीशीयन्ट, अश्या शे-यासह परत केला. त्यामुळे तक्रारकर्तीने दि. 17/08/2016 रोजी विरुध्दपक्ष यांना रजिस्टर नोटीस पाठवून चेकच्या रकमेची मागणी केली. परंतु विरुध्दपक्ष यांनी आज पर्यंत तक्रारकर्तीचे पैसे परत केले नाहीत, तसेच नोटीसला उत्तर सुध्दा पाठविले नाही. अशा प्रकारे विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करुन सेवा देण्यामध्ये न्युनता दर्शविला आहे. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष यांचे विरुध्द कलम 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट अंतर्गत तक्रार सुध्दा दाखल केलेली आहे व ती विद्यमान कोर्टात प्रलंबित आहे. म्हणून तक्रारकर्तीने ही तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विरुध्दपक्षाकडून ठेवीची रक्कम रु. 1,00,000/- वर 1.40 द.म.द.शे. प्रमाणे दि. 1/10/2015 पासून दि. 10/12/2016 पर्यंत न दिलेले व्याज रक्कम रु. 20,067/- तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु. 25,000/- या शिवाय तक्रारीचा खर्च म्हणून रु. 10,000/- असे एकूण रु. 1,55,067/- विरुध्दपक्षाकडून मिळावे तसेच न्यायिक खर्च मिळावा.
- विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 प्रकरणात गैरहजर असल्याने व त्यांचे विरोधात एकतर्फी प्रकरण चालविण्याचा आदेश पारीत झाला असल्याने, विरुध्दपक्षातर्फे तक्रारकर्तीच्या तक्रारीस विरोधी विधान प्राप्त झाले नाही. सबब तक्रारकर्तीच्या तक्रारीत तथ्य असल्याचे ग्राह्य धरुन, हे मंच तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करीत आहे.
- सबब अंतीम आदेश येणे प्रमाणे...
-
- तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे, तक्रारकर्तीने गुंतवलेली रक्कम रु. 1,00,000/- ( रुपये एक लाख फक्त ) शेवटचे व्याज मिळालेल्या तारखेपासून म्हणजे दि. 30/9/2015 पासून प्रत्यक्ष अदाई तारखेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने, व्याजासह द्यावे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे, तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- ( रुपये पांच हजार ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 3000/- ( रुपये तिन हजार ) द्यावे.
- सदर आदेशाचे पालन, निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत करावे.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या. | |