Maharashtra

Satara

CC/10/162

Dr.sanjeev ramchandra deshpande - Complainant(s)

Versus

national insunce co. Ltd - Opp.Party(s)

pisal

28 Oct 2010

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 10 of 162
1. Dr.sanjeev ramchandra deshpandeshniwar phet satarasataramaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. national insunce co. Ltdpovai naka satarasataramaharashtra ...........Respondent(s)


For the Appellant :pisal, Advocate for
For the Respondent :

Dated : 28 Oct 2010
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.23
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 162/2010
                                          नोंदणी तारीख – 06/7/2010
                                          निकाल तारीख – 28/10/2010
                                          निकाल कालावधी - 102 दिवस
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
                        श्री सुनिल कापसे, सदस्‍य
 
(श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
श्री संजीव रामचंद्र देशपांडे
रा.सुखदा मॅटर्निटी नर्सिंग होम, 816,
शनिवार पेठ, न्‍यू इंग्लिश स्‍कूलजवळ,
सातारा                                           ----- अर्जदार
                                           (अभियोक्‍ता श्री जितेंद्र पिसाळ)
      विरुध्‍द
शाखाधिकारी, श्री किरण ब.भोपे
नॅशनल इन्‍शुरन्‍स कं.लि.
पोवई नाका, सातारा                                ----- जाबदार
                                           (अभियोक्‍ता श्री एन.डी.फडके)
 
 
न्‍यायनिर्णय
 
1.     अर्जदार यांचे सुखदा मॅटर्निटी व नर्सिंग होम या नावाने हॉस्‍पीटल आहे. गरोदर स्‍त्रीयांना व त्‍यांचे होणा-या बाळाची चांगल्‍या प्रकारे काळजी घेता यावी म्‍हणून अर्जदार यांनी विप्रो जी.ई.मेडीकल सिस्‍टीम या कंपनीकडून अल्‍ट्रा साऊंड स्‍कॅनर सिस्‍टीम हे मशिन रक्‍कम रु.12,00,000/- या किंमतीस खरेदी केले. सदर मशिनची एक वर्षाची वॉरंटी संपलेनंतर अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे सदर मशिनचा विमा उतरविला आहे. अर्जदार यांनी सदर मशिनसाठी वार्षिक देखभालीचा करारनामा केला आहे व सदर मशिनची नियमितपणे अधिकृत अभियंत्‍याकडून तपासणी केली जाते. दि.1/9/09 रोजी रुग्‍णाची तपासणी करीत असताना रुग्‍णाला अचानक खूप वेदना झाल्‍यामुळे त्‍याने जोरात हालचाल केली त्‍यामुळे सदर मशिनचा TV/TR Probe फेकला गेला व त्‍यामुळे तो खरा‍ब झाला. त्‍यामुळे सदरचा भाग बदलण्‍याचे अर्जदार यांनी ठरविले व त्‍यानुसार त्‍यांनी अधिकृत कंपनीकडून कोटेशन घेवून जाबदार यांना याबाबत कळविले. त्‍यानंतर जाबदार कंपनीचे सर्व्‍हेअर श्री नवले यांनी मशिनची तपासणी केली. त्‍यानंतर अर्जदार यांनी आवश्‍यक त्‍या कागदपत्रांची पूर्तता करुन जाबदार यांचेकडून विमा रकमेची मागणी केली. परंतु जाबदार यांचेकडे वारंवार पाठपुरावा करुनही जाबदार यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तदनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना रक्‍कम रु.82,000/- चा चेक दिला. वास्‍तविक अर्जदार यांचे रु.2,25,000/- चे नुकसान झालेले असतानाही जाबदार यांनी कमी रकमेचा दावा मंजूर केला. म्‍हणून अर्जदार यांनी नुकसान भरपाई मंजूर करण्‍याची नियमावली जाबदार यांचेकडे मागितली असता जाबदार यांनी ती दिलेली नाही. सबब, जाबदारकडून नुकसान भरपाई पोटी रु.1,73,858/- मिळावेत व अर्जाचा खर्च मिळावा म्‍हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे.
2.    जाबदार यांनी नि. 13 कडे म्‍हणणे देऊन तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार श्री नवले सर्व्‍हेअरचे अहवालानुसार TV/TR Probe चे आयुष्‍य हे 6 वर्षाचे असते व अर्जदारने याचा वापर 3 वर्षे 7 महिने केला आहे. सदरच्‍या वापरलेल्‍या काळाचा घसारा 58 टक्‍के इतका येत आहे. म्‍हणून सदरचे घसा-याची किंमत व पॉलिसीचे अटी व शर्तीप्रमाणे क्‍लेम एक्‍सेसचे 5 टक्‍के अशी रक्‍कम वजा करता उर्वरीत रक्‍कम रु.83,250/- एवढी देय रक्‍कम दर्शविली आहे. त्‍यानंतर उर्वरीत काळासाठीच्‍या विम्‍याच्‍या प्रिमियमची रक्‍कम रु.438/- वजा जाता रु.82,812/- रक्‍कम जाबदार यांनी अर्जदार यांना दिलेली आहे. सदरची रक्‍कम स्‍वीकारताना अर्जदारने कोणतीही हरकत नोंदविलेली नाही. जाबदारकडून कोणत्‍या स्‍वरुपात त्रुटी झाली याबाबत कोणताही उल्‍लेख तक्रारअर्जात नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे.
 
3.    अर्जदार व जाबदारतर्फे युक्तिवाद ऐकणेत आला तसेच दाखल कागदपत्रे पाहणेत आली.
 
4.    अर्जदारची तक्रार पाहता अर्जदारने अल्‍ट्रा साऊंड स्‍कॅनर सिस्‍टीम हे मशीन रक्‍कम रु.12,00,000/- (बारा लाख) एवढया किंमतीस खरेदी केले व रक्‍कम रु.12,00,000/- चा विमा जाबदारकडे संरक्षीत केला. त्‍याचा हप्‍ता रक्‍कम रु.9,927/- ठरला. सदर हप्‍ता जाबदारकडे अर्जदारने वेळोवेळी भरणा केला आहे. सदर मशीनची वार्षिक देखभाल विप्रो जा.ई.हेल्‍थ केअर प्रा.लि. यांचेकडे प्रतिवर्षी रक्‍कम रु.36,000/- भरणा करुन अर्जदार करुन घेतात. दि.1/9/09 रोजी जाबदार Probe द्वारे तपासत असताना रुग्‍णाला वेदना झालेने रुग्‍णाने जोरात हालचाल केली व TV/TR Probe फेकला गेला व त्‍यामुळे तो खराब झाला. त्‍यामुळे त्‍याचे वापर थांबवावा लागला व त्‍यामुळे मशीनचा वापर थांबला गेला. Probe ची किंमत रु.2,25,000/- आहे. सबब सदरबाबतच्‍या क्‍लेमची मागणी जाबदारकडे केली परंतु जाबदारने रक्‍कम रु.2,25,000/- ऐवजी रु.82,812/- मंजूर केले आहे व उर्वरीत रकमेचा क्‍लेम खोटे कारण सांगून नामंजूर केला अशी तक्रार दिसते.
5.    जाबदार यांनी नि.13 कडे म्‍हणणे तसेच कैफियत देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. परंतु जाबदारला पॉलिसी मान्‍य असून संपूर्ण मशिनसाठी रक्‍कम रु.12 लाखाचा विमा आहे. Probe या पार्टचा स्‍वतंत्र विमा नाही किंवा Probe साठी स्‍वतंत्र जादा विम्‍याचा हप्‍ता नाही. सबब अर्जदारला दिलेली रक्‍कम रु.82,812/- विमा दाव्‍याची रक्‍कम ही योग्‍य आहे. सर्व्‍हे रिपोर्टनुसार Probe चा वापर 3 वर्षे 7 महिने झाला आहे, सबब घसारा 58 टक्‍के तसेच क्‍लेम एक्‍सेस 5 टक्‍के व उर्वरीत कालावधीसाठीचा हप्‍ता असे वजा जाता रक्‍कम रु.82,812/- योग्‍य आहेत असे कथन केले आहे.
 
6.    निर्विवादीतपणे जाबदारला मशिनसाठीचा रक्‍कम रु.12 लाखचा विमा संरक्षीत केला आहे हे मान्‍य आहे हप्‍ते भरलेचे मान्‍य आहे.  Probe खराब झाला हे मान्‍य आहे. सबब सर्व्‍हेअर यांचे अहवालानुसार जाबदार रक्‍कम रु.83,250/- मिळणेस पात्र आहेत. सबब अर्जदार यास रक्‍कम रु.82,812/- दिलेले आहेत व ते त्‍यांनी full and final स्‍वीकारले आहेत, सबब आता त्‍यांना तक्रार करता येणार नाही असा युक्तिवाद केला. अर्जदारने नि.5/14 कडे रक्‍कम रु.82,812/- स्‍वीकारलेची पावती दाखल केली आहे त्‍याचे अवलोकन करता अर्जदारने विमा दाव्‍याची रक्‍कम full and final स्‍वीकारली नाही हे दिसते. जाबदारने युक्तिवादामध्‍ये Probe चे आयुष्‍य 6 वर्षांचे असते व 3 वर्षे 7 महिने Probe चा वापर झाला होता, सबब घसारा depreciation 58 टक्‍के वजा केले आहेत व यासाठी गाडीचे (वाहनाचे) उदाहरण दिले. निर्विवादीतपणे वाहन व electronic equipment हे समान नाहीत.  निर्विवादीतपणे अर्जदारने नि.5/15 कडे APT Medical System (P) Ltd. यांचे कोटेशन दाखल केले असून Probe ची किंमत रु.2,25,000/- आहे हे दिसते. तसेच जाबदारचेच सर्व्‍हेअर यांचा अहवाल पाहता त्‍यांनी we confirmed the facts of observation of damages sustained to the probe and are of the opinion that replacement of the said probe is essential असे नमूद आहे.
7.    या खेरीज अर्जदारची पॉलिसी पाहता पॉलिसी ही Electronic Equipment Insurance policy अशी आहे. म्‍हणजे केवळ electronic वस्‍तूसाठीची वेगळी पॉलिसी आहे. सदर पॉलिसीतील कलम 2 पाहता No deduction shall be made for depreciation in respect of parts replaced except those with limited life but any salvage will be taken into account ------------- असे नमूद आहे. तसेच अर्जदारने नि.22 सोबत विप्रो जी.ई.हेल्‍थकेअर यांनी अर्जदार यांना दिलेले पत्र दाखल केले आहे ते पाहता ----------- Ultrasound probe is an electronic item. Hence, the definite lifetime of the probe cannot be defined in number of years or months असे सर्व्हिस सेल्‍स मॅनेजर शाहुद हमीद यांनी नमूद केले आहे हे दिसते. सबब जाबदारचेच पॉलिसीनुसार जाबदारने 58 टक्‍के घसारा हा Probe च्‍या नवीन किंमतीतून म्‍हणजे रु.2,25,000/- वरती घसारा रु.1,30,500/- वजा केला आहे हे चुकीचे आहे. 
 
8.    जाबदारने युक्तिवादामध्‍ये Probe ची वाढलेली किंमत अर्जदारला मागणेचा अधिकार नाही, Probe साठी वेगळा हप्‍ता अर्जदारने भरलेला नाही असे कथन केले.   निर्विवादीतपणे संपूर्ण मशिनचा एकूण 12 लाखाचा विमा संरक्षित केला आहे व 12 लाखावरती हप्‍ता अर्जदार भरणा करत आहे व पॉलिसी पाहता वेगवेगळया पार्टसाठी वेगळा हप्‍ता असला पाहिजे अशी तरतूद दिसून येत नाही. तसेच electronic parts ची actual value दिली पाहिजे असे पॉलिसीमध्‍ये नमूद असलेचे दिसून येते. सबब जाबदारचे वरील कथनात तथ्‍य दिसून येत नाही. सबब अर्जदार Probe चे किंमतीवरती म्‍हणजे रक्‍कम रु.2,25,000/- वरती केवळ सॅल्‍व्‍हेज वजा जाता उर्वरीत रक्‍कम मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सबब जाबदारने अर्जदारास विमा दाव्‍याची संपूर्ण रक्‍कम देण्‍याचे नाकारुन सदोष सेवा दिली आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे.
 
9.    सबब आदेश.
 
आदेश
1. अर्जदारचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2. जाबदारने अर्जदार यास विमा दाव्‍याची रक्‍कम रु.2,25,000/- मधून केवळ
    साल्‍व्‍हेज वजा जाता होणारी उर्वरीत रक्‍कम द्यावी तसेच सदर रकमेतून अर्जदारास
    अदा केलेली रक्‍कम रु.82,812/- वजा करावी.
3. जाबदारने अर्जदार यास मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम
    रु. 5,000/-(पाच हजार) द्यावी.
4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्‍यांना या न्‍यायनिर्णयाची सत्‍यप्रत
    मिळाल्‍यापासून 30 दिवसात करावे.
5. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा
दि. 28/10/2010
 
 
 
 
(सुनिल कापसे)           (सुचेता मलवाडे)           (विजयसिंह दि. देशमुख)
   सदस्‍य                   सदस्‍या                     अध्‍यक्ष
 
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER