Maharashtra

Akola

CC/16/28

Sau.Seema Gaurishanka Parma - Complainant(s)

Versus

National Seeds Corporation - Opp.Party(s)

Solanki

12 Jan 2017

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/16/28
 
1. Sau.Seema Gaurishanka Parma
At.Nimbha, Post.Mohari, Tq.Mangarulpir
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. National Seeds Corporation
through Area Manager,Infront of Birla Gate,Tapdiya Nagar, Akola
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'BLE MR. Kailas Wankhade MEMBER
 HON'BLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 
For the Complainant:Solanki, Advocate
For the Opp. Party: R B Somani, Advocate
Dated : 12 Jan 2017
Final Order / Judgement

::: आ दे श :::

( पारीत दिनांक : 12.01.2017 )

आदरणीय अध्यक्षा श्रीमती एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार

1.         तक्रारदार यांनी सदरहु तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या  कलम 12 अन्‍वये, विरुध्‍दपक्षाने द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला, म्‍हणून नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी   दाखल केली आहे.            

       तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍दपक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्‍तऐवज, उभय पक्षांचा पुरावा व लेखी युक्‍तीवाद तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्‍तीवाद व उभय पक्षांतर्फे दाखल न्‍यायनिवाडे, यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्‍कर्ष कारणे देवून नमुद केला.

          तक्रारदाराचा युक्‍तीवाद असा आहे की, त्‍यांनी त्यांच्‍या  शेतामध्‍ये विरुध्‍दपक्षाकडून, विरुध्‍दपक्ष निर्मित सोयाबीन फाउंडेशन सिड्स विकत घेऊन बिजोत्‍पादनाचा कार्यक्रम घेतला.  सदर बियाण्‍यांची पेरणी केली व त्‍यापुर्वी उन्‍हाळवाही किस्‍तकारी केली, शेणखत, रासायनिक खत व किटकनाशकांची फवारणी केली, त्‍यासाठी तक्रारकर्त्‍यास खर्च आला होता.  विरुध्‍दपक्षाने विक्री केलेले बियाणे पेरल्‍यानंतर, मोठया प्रमाणात भेसळयुक्‍त झाडे आढळले, त्‍यामुळे अधिक्षक / प्रमुख जिल्‍हास्‍तरीय तक्रार निवारण समीती, वाशिम इथे तक्रार दाखल केली. त्‍यानुसार तक्रारदाराच्‍या  शेताची पाहणी झाली व समीतीने असा अहवाल दिला की, विरुध्‍दपक्षाने विक्री केलेल्‍या जे.एस. 335 फाउंडेशन सिड्स बियाण्‍यामध्‍ये 25 ते 27 टक्‍के एवढे भेसळयुक्‍त बियाणे आढळले.  त्‍यामुळे तक्रारदरास नुकसान झाले आहे.  वास्‍तविक विरुध्‍दपक्षाने विकलेल्‍या या बियाण्‍याच्‍या  प्रमाणपत्रावर भौतिक शुध्‍दता 98 टक्‍के व अनुवंशीक शुध्‍दता 98 टक्‍के  दर्शविलेली आहे. तक्रारदार यांच्‍या शेताची बिजप्रमाणीकरण यंत्रणा, अकोला मार्फत सुध्‍दा पाहणी झाली आहे व त्‍या अहवालानुसार 25 ते 27 टक्‍के  भेसळयुक्‍त झाडे आढळले आहे.  सदर भेसळयुक्‍त बियाण्‍यामुळे तक्रारदाराचे सिड प्‍लॉट्स विरुध्‍दपक्षातर्फे नामंजुर करण्‍यात आले व प्रमाणीकरणास अपात्र ठरविल्‍या गेले, त्‍यामुळे प्रार्थनेनुसार तक्रार मंजुर करावी.

     तक्रारदारातर्फे रेकॉर्डवर खालील न्‍यायनिवाडा दाखल करण्‍यात आला.

National Seeds Corporation Ltd. Vs. M. Madhusudhan Reddya & another (SC)

         यावर, विरुध्‍दपक्षाने असा युक्‍तीवाद केला की, उभय पक्षात करार झाला आहे व त्‍यातील अटीनुसार उभय पक्षांना काही देणे घेणे निघाल्‍यास किंवा कोणताही वाद उपस्थित झाल्‍यास दिल्‍ली येथील न्‍यायालय किंवा इतर न्‍यायालय किंवा प्राधिकरण यांचे समक्षच सदर वाद उपस्थित करण्‍यात येईल, असे लिखीत स्‍वरुपात ठरले आहे, त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार मा. मंचासमक्ष चालु शकत नाही. 

      तसेच विरुध्‍दपक्षाने दिलेला बियाणे उत्‍पादन प्रोग्राम हा मा. वाशिम ग्राहक मंचाच्‍या कार्यक्षेत्रात घेतलेला आहे व तक्रारदार यांची शेत जमीन मा. वाशिम मंचाचे कार्यक्षेत्रात येते, त्‍यामुळे या मंचाला तक्रार तपासण्‍याचे कार्यक्षेत्र नाही.  तक्रारदाराने विरुध्‍दपक्षाकडून सिड प्‍लॉट  प्रोग्राम हा व्‍यापारीक फायद्यासाठी घेतला, म्‍हणून तक्रारदार विरुध्‍दपक्षाचे ग्राहक होवु शकत नाही.  तक्रारदाराने बीज उत्‍पादन कार्यक्रम एकूण 10 हेक्‍टर क्षेत्रावर घेतला आहे व विरुध्‍दपक्षाने सदर फाउंडेशन बियाणे, जे.एस. 335 चे उत्‍पादन करुन, योग्य ते प्रमाणपत्र दिलेले आहे व या प्रमाणपत्रातील जर्मीनेशन, भौतीक शुध्‍दता, अनुवंशीक शुध्‍दता, उगवण शक्‍ती या बाबींची टक्‍केवारी राज्‍य बीज प्रमाणीकरण यंत्रणा महाराष्‍ट्र यांनी प्रमाणीत केलेली आहे व तपासली आहे,  तसेच याच लॉट मधील बियाणे इतर अनेक लोकांना पुरविलेले आहे,  परंतु बियाण्‍यांत भेसळ आहे, अशी त्‍यांची एकही तक्रार नाही.  विरुध्‍दपक्षाने तक्रारदाराच्‍या  शेताची पाहणी केली त्‍यावेळेस उगविलेले ऑफ टाईपचे झाडे काढून टाकावी, अशी विनंती विरुध्‍दपक्षाच्‍या अधिका-यांनी तक्रारदाराला केली होती.  तक्रारदाराने पक्‍व झालेले सोयाबीनचे इतर जातीचे झाडे वेगळी करुन त्‍याची प्रक्रिया करुन विक्री केली असती व जे.एस. 335 बियाणे जे विरुध्‍दपक्षाने पुरविले, ते स्‍वतंत्ररित्‍या प्रक्रिया करुन विरुध्‍दपक्षाला सादर करण्यास हरकत नव्‍हती.  परंतु तक्रारदाराने स्‍वतः काळजी न घेता पेरणी केलेली आहे व विरुध्‍दपक्षाच्‍या सुचनांचे पालन केलेले नाही.  तसेच स्‍वतः जातीने पेरणी केलेली नसावी, कारण पिकामध्‍ये इतर वाणाची एवढया मोठया प्रमाणात उगवण अशक्‍य आहे.  इतर बियाण्‍याच्‍या थैल्‍या  तक्रारदाराच्‍या शेतीच्‍या पेरेणीच्‍या वेळी मिक्‍स झाल्‍या असतील, म्हणून ऑफ टाईपचे बियाणे उगविले असावे.  त्‍यामुळे तक्रारदाराने या ऑफ टाईप झाडांचे व विरुध्‍दपक्षाने पुरविलेल्‍या मालाचे पिक एकत्रित प्रक्रिया केल्‍यामुळे, तक्रारदारचा लॉट नापास झाला.  तसेच पर्जन्‍यमान हा घटक देखील जबाबदार आहे.  या बिजोत्‍पादनाच्‍या कार्यक्रमात सहभागी          शेतक-यांना प्रोत्‍साहनपर रक्‍कम देण्‍यात येते, म्‍हणजे बीज उत्‍पादन करुन घेतांना शेतक-यांकडून उगवलेल्‍या बिजाचे ग्रेडेशन करण्‍यात येते.  त्‍याची उगवण शक्‍ती, अनुवंशीक शुध्‍दता, त्‍याची भौतीक शुध्‍दता व इतर बाबी तपासल्‍यानंतर प्रतिक्विंटल प्रमाणे माल घेतला जातो व या मालाचे बाजारातील अॅव्‍हरेज भाव काढले जातात, तसेच पास झालेल्‍या सिडस् ला या अॅव्‍हरेज भावाच्‍या 20 टक्‍के जास्‍त, या प्रमाणे भाव दिल्‍या जातो.  ही प्रक्रिया केल्‍यानंतर फक्‍त 70 ते 80 टक्‍के बियाणेच कसोटीला उतरतात व ते स्विकारले जातात.   त्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार चुकीच्‍या अंदाजावर आधारीत आहे, म्‍हणून खारीज करावी.

     विरुध्‍दपक्षाने खालील न्‍यायनिवाडे दाखल केले आहे.

  1. III (2015) CPJ 120 (Maharashtra)
  2. III (2015) CPJ 46 (UP)

     अशा प्रकारे उभय पक्षांचा युक्‍तीवाद व दाखल सर्व दस्‍तऐवज काळजीपुर्वक तपासल्‍यानंतर मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या न्‍यायनिवाड्यातील निर्देशांनुसार तक्रारदार हे प्रकरणातील या परिस्थितीत विरुध्‍दपक्षाचे ग्राहक होतात, त्‍यामुळे तक्रारदार हे विरुध्‍दपक्षाचे ग्राहक आहे, या निष्‍कर्षाप्रत सदर मंच आले आहे.  तसेच उभय पक्षात करार झालेला आहे,  त्‍यामुळे सुध्‍दा तक्रारदाराचे स्‍टेटस् ग्राहक या संज्ञेत मोडते.  सदर करारातील अटीनुसार हा वाद दिल्‍ली येथील न्‍यायालयातच चालेल, हा विरुध्‍दपक्षाचा आक्षेप प्रतिपालनीय नाही, कारण तक्रारदाराने दाखल केलेल्‍या न्‍यायनिवाडयातील निर्देशांनुसार, तसेच तक्रारदाराने हे प्रकरण ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल केल्‍यामुळे, या कायद्याच्‍या  तरतुदीनुसार कार्यक्षेत्र  निश्चित होईल व त्‍यानुसार विरुध्‍दपक्षाचे कार्यालय हे अकोला ग्राहक मंचाच्‍या कार्यक्षेत्रात स्थित आहे,  म्हणून अकोला मंचाला ही तक्रार तपासता येईल, असे मंचाचे मत आहे. 

       उभय पक्षात मान्‍य असलेल्‍या बाबी अशा आहेत की, तक्रारदाराने त्‍यांच्‍या मालकीच्‍या शेतात बिजोत्‍पादनाचा कार्यक्रम घेण्‍यासाठी विरुध्‍दपक्ष निर्मीत सोयाबीन फाऊन्‍डेशन बियाणे जे. एस. 335 खरेदी करुन त्‍याची पेरणी केली होती.  पेरणीनंतर त्‍यात भेसळयुक्‍त झाडे आढळली, अशी तक्रार, तक्रारदाराने जिल्‍हा स्‍तरीय तक्रार निवारण समीतीकडे केली केली असता, विरुध्‍दपक्षाच्‍या उपस्थितीसह समीतीचे इतर अधिका-यांनी तक्रारदाराच्‍या शेताचे स्‍थळ निरीक्षण केले व असा अभिप्राय दिला की, तक्रारदाराच्‍या सिड प्‍लॉटमध्‍ये, त्‍यांच्‍या शेतात असलेल्‍या पिकात भेसळयुक्‍त झाडांचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्‍त असल्‍याने तक्रारदार यांनी त्‍यांचे शेतामध्‍ये घेतलेल्‍या सिड प्‍लॉटस् मधील बियाणे प्रमाणीकरणास अपात्र ठरविण्‍यात येत आहे व तक्रारदार यांचे शेतामध्‍ये 25 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत भेसळ आढळली. विरुध्‍दपक्षाला ही बाब कबुल आहे की, त्यांनी तक्रारदाराच्‍या सदर शेताची तपासणी स्‍वतः केली होती व त्‍यानुसार तक्रारदारास खालील प्रमाणपत्र दिले होते.

 

 

To whom so it may concern

    This is to certify that Sau. Seema Gaurishankar Parma and Shri Chandrakant Rachappa Parma take foundation seed of Soyabean JS-335 from NSC, Akola for producing certified seed under seed multiplication programme during Kharif – 2015 on an area of 10 hect. each.  During field inspection of the Seed Plots by NSC officers / Seed certification Agency Officer it is observed that the seed plot is not meeting desired seed standard and having admixture of other verity plants ranging from 25 to 29 %.  Hence both the seed plots are rejected.

  तक्रारदाराने दाखल केलेले सदर बियाण्‍याचे टॅग विरुध्‍दपक्षास मान्‍य दिसतात.  तसेच विरुध्‍दपक्षाने असे कथन केले आहे की, त्‍यांनी तक्रारदार यांच्‍या  शेताचा क्षेत्र तपासणी अहवाल देवून, तक्रारदारास त्‍यांच्‍या शेतात उगविलेले ऑफ टाईपचे झाडे काढून टाकावी, असे सांगितले होते.  अशा रितीने विरुध्‍दपक्षास हे मान्‍य दिसते की, तक्रारदाराच्‍या शेतात विरुध्‍दपक्षाचे बियाणे पेरल्‍यानंतर त्‍यात भेसळयुक्‍त झाडे आढळली होती.  मात्र विरुध्‍दपक्षाच्‍या मते तक्रारदाराने स्‍वतः पेरणी केली नाही व पेरणी करतांना तक्रारदाराच्‍या हातुन निष्‍काळजीपणा झाला. विरुध्‍दपक्षाच्‍या मते, भेसळ उगविण्‍यास इतर घटक कारणीभुत असू शकतात.  विरुध्‍दपक्षाने दाखल केलेल्‍या न्‍यायनिवाडयात देखील वरील प्रमाणे निर्देश आहेत,  परंतु विरुध्‍दपक्षाने हा त्‍यांचा बचाव सिध्‍द केला नाही.  तसेच तक्रारदाराने देखील जर तर ची भाषा वापरुन नुकसान भरपाई मागीतली आहे.  तक्रारदाराने असे कथन केले की, त्‍यांना त्‍यांच्‍या शेतात 75 क्विंटल सोयाबीन झाले, पण भेसळीमुळे ते त्‍यांना रु. 2000/- प्रती क्विंटल ह्या दराने विकावे लागले व त्‍यापासून त्‍यांना रु. 1,50,000/- एवढे उत्‍पादन मिळाले,  परंतु ह्या बद्दलचा कोणताही दस्‍त तक्रारदाराने  रेकॉर्डवर दाखल केला नाही.  तक्रारदार यांची तक्रार विरुध्‍दपक्षाचे बियाणे बोगस निघाले, अशी नाही.  ती त्‍यात निघालेल्‍या भेसळ झाडांमुळे संपुर्ण बियाणे हे एकाच वाणाचे निघाले नाही, अशी तक्रार आहे.  विरुध्‍दपक्षाच्‍या  युक्‍तीवादावरुन असे समजते की, तक्रारदाराला भेसळीचे बियाणे तयार झाल्‍याने विरुध्‍दपक्षाने ते बियाणे नाकारले, परंतु तक्रारदाराच्‍या या मालाला बाजारात योग्‍य तो भाव मिळाला नाही, असे म्‍हणता येणार नाही.  जर बियाणे शुध्‍द स्‍वरुपात असते तर विरुध्‍दपक्षाने ते स्विकारुन, बाजारभावापेक्षा 20 टक्‍के जास्‍त रक्‍कम तक्रारदारास प्रति क्विंटल दिली असती व एका क्विंटल बियाण्‍यातुन प्रोसेसींग केल्‍यावर 80 किलो सोयाबीन बियाणे म्‍हणून स्विकारले असते व उर्वरित 20 किलो          शेतक-यांस परत केले असते, जे तक्रारदार योग्‍य बाजार भावाने नंतर विकु  शकले असते.  म्‍हणुन मंचाच्‍या मते असे आहे की, तक्रारदाराला झालेले 75 क्विंटल सोयाबीन बियाणे विरुध्‍दपक्षाने स्विकारले असते तरी प्रोसेसींग नंतर 80 टक्‍के  सोयाबीनच स्विकारले असते व त्यावर बाजारभावापेक्षा 20 टक्‍के अधिक रक्‍कम तक्रारदाराला दिली असती, त्‍यामुळे विरुध्‍दपक्षाने तक्रारदाराचे उत्‍पादन भेसळ असल्‍याने नाकारल्‍यामुळे तक्रारदाराने जी नुकसान भरपाई प्रार्थनेत मागीतली, ती मंचाला योग्‍य वाटत नाही.  विरुध्‍दपक्षाने वादग्रस्‍त काळातील सोयाबीनच्‍या बाजार भावाचा तक्‍ता  मंचात दाखल केला आहे.  त्‍यावरुन त्‍या वर्षीचा सरासरीभाव 3500/- रुपये प्रति क्विंटल दिसून येतो.  तक्रारदाराला झालेल्‍या 75 क्विंटल  सोयाबीन पैकी विरुध्‍दपक्षाने जर 80 टक्‍के उत्‍पादन स्विकारले असते तर ते 60 क्विंटल स्विकारले असते व 60 क्विंटलला विरुध्‍दपक्षाकडून 20 टक्‍के रक्‍कम जास्‍त म्‍हणजे रु. 42,000/- जास्‍त मिळाले असते, म्‍हणजे विरुध्‍दपक्षाने तक्रारदाराचे बियाणे नाकारल्‍याने तक्रारदाराचे रु. 42,000/- इतक्‍या रकमेचे नुकसान झाल्‍याचे मंचाने ग्राह्य धरले.  सबब सदर नुकसान भरपाई रक्‍कम सव्‍याज, तसेच इतर शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- व प्रकरणाचा न्‍याईक खर्च रु. 3000/- इतकी रक्कम विरुध्‍दपक्षाने तक्रारदाराला दिल्‍यास ते न्‍यायोचित होईल, या निष्‍कर्षाप्रत मंच एकमताने आले आहे.  म्हणून अंतीम आदेश खालील प्रमाणे पारीत केला.

                                   ::: अं ति म  आ दे श  :::

 

  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍दपक्षाने तक्रारदारास नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम         रु. 42,000/- ( रुपये बेचाळीस हजार फक्‍त ) द.सा.द.शे. 8 टक्‍के  व्‍याज दराने दि. 23/12/2015 पासून ( सिडस् प्‍लॉट नाकारल्‍याचे तारखेपासून ) प्रत्‍यक्ष रक्‍कम अदाई पर्यंत व्‍याजासहीत द्यावी. तसेच शारीरीक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- ( रुपये पांच हजार फक्‍त ) व न्‍याईक खर्चापोटी रक्‍कम रु. 3000/- ( रुपये तिन हजार फक्‍त ) द्यावी.
  3. सदर आदेशाची पुर्तता, निकालाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसांच्‍या आंत करावी.
  4. सदर आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना नि:शुल्‍क देण्‍यात याव्‍या. 
 
 
[HON'BLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Kailas Wankhade]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.