जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/287. प्रकरण दाखल तारीख - 30/12/2009 प्रकरण निकाल तारीख – 06/04/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, - सदस्या. 1. सुमनबाई भ्र. माधवराव शिंदे वय 43 वर्षे, धंदा शेती 2. सुरेश पि. माधवराव शिंदे वय 25 वर्षे, धंदा शेती अर्जदार 3. यशवंत पि. माधवराव शिंदे वय 22 वर्षे, धंदा शेती रा. सर्व राहणार मौजे पाठनुर ता.अर्धापूर जि. नांदेड विरुध्द. नॅशनल इन्शुरन्स कंपनी मर्यादित गैरअर्जदार मार्फत शाखा अधिकारी, गुरु गोविंदसिंग मार्के, नगिना घाट रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.शे.वहिद अहेमद गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.एस.ऐ.पाठक. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार नॅशनल इन्शूरन्स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, महादेव उर्फ माधव देवराव शिंदे हे अर्जदार क्र.1 यांचे पती व अर्जदार क्र.2 व 3 यांचे वडील होते. महादेव ऊर्फ माधव शिंदे हे एकच व्यक्ती होते. महादेव ऊर्फ माधव हे शेती आणि दुग्ध विक्रीचा व्यवसाय करीत होते. मयत महादेव ऊर्फ माधव यांनी गैरअर्जदार यांचेकडून अपघाती विमा पॉलिसी क्र.272000/42/05/8200000071 द्वारे दि.12.01.2006 ते 11.01.2007 पर्यत घेतली होती. दि.31.1.2006 रोजी मयत महादेव ऊर्फ माधव हे दूध विक्री करिता गेले असता घरी परत आलेच नाहीत, त्यांचा शोध घेतला असता दि.7.2.2006 रोजी मयत महादेव ऊर्फ माधव हे डोरली शिवरातील विहीरीत पडून मरण पावले आहेत. पोलिस स्टेशन अर्धापूर यांना कळविले असता त्यांनी पंचनामा करुन प्रेत विहीरी बाहेर काढले. प्रेताचा इन्क्वेस्ट पंचनामा आणि पोस्ट मार्टेम दि.08.02.2006 रोजी केला. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी भोकर यांनी मरण्याचे कारण बूडून मेले असा अहवाल दिला तो अहवाल तक्रारी मध्ये दाखल आहे. अर्जदाराने महादेव ऊर्फ माधव यांच्या पॉलिसीबददल विम्याची रक्कम मिळावी असा अर्ज केला, त्यानंतर कार्यकारी संचालक भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना यांना पञ देऊन अर्जदारास विम्याची रक्कम मिळावी अशी विनंती केली. अर्जदार हे गैरअर्जदार यांना विमा रक्कमेबददल दूरध्वनी वरुन विचारणा केली असता त्यांनी अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात आला असे तोंडी दि.10.11.2009 रोजी सांगितले. मयत महादेव ऊर्फ माधव ही एकच व्यक्ती असल्याचे प्रमाणपञ उपसरपंच आणि ग्रामसेवक ग्राम पंचायत पाठनुर ता. अर्धापूर यांनी दिले आहे. त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, विमा रक्कम रु.1,00,000/- व त्यावर 18 टक्के व्याजासह मिळावेत. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी खोटी व चूकीची तक्रार दाखल केलेली आहे त्यामूळे ती फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. मयत महादेव ऊर्फ माधव यापैकी नेमके कोण अपघाती मृत्यू पावले या बददल सांगितलेले नाही. अर्जदार यांनी विमा दावा मागितलेला नाही व त्या बाबत कोणताही पञव्यवहार केलेला नाही. अर्जदार यांनी तक्रार ही मयत माधवराव यांचे नांवाने दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी विमा दावा हा मयत माधवराव यांचे नांवाने दाखल केलेला आहे, पण महादेव ऊर्फ माधव हे वेगवेगळे व्यक्ती आहेत. अर्जदार यांनी मयत महादेव ऊर्फ माधव हे एकच असल्याबददल जे प्रमाणपञ दाखल केलेले आहे ते खोटे आहे. अर्जदार यांनी कोणताही कागदोपञी पूरावा दाखल केलेला नाही. गैरअर्जदार यांचे म्हणण्यानुसार महादेव ऊर्फ माधव ही एकच व्यक्ती नसून, या वेगवेगळया व्यक्ती आहेत. मराठवाडा ग्रामीण बँकेचे पासबूक दाखल केलेले आहे त्यात देखील महादेव देवराव शिंदे हे नांव दिलेले आहे, माधव नाही.अर्जदार यांनी मयत महादेव ऊर्फ माधव यांचे नीधनाची निश्चित तारीख दिलेली नाही. विमा कंपनीच्या अटीनुसार अर्जदाराचा मृत्यू हा नैसर्गिक नाही, त्यांचा मृत्यू हा विहीरीत पडल्यामूळे झालेला आहे,त्यामूळे अर्जदार हे विम्याची रक्कम मिळण्यास पाञ नाहीत. अर्जदार यांनी विमा कंपनीच्या अटी व शर्तीनुसार योग्य कागदपञ दाखल केलेले नाहीत त्यामूळे त्यांचा विमा दावा खर्चासह नामंजूर करण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी दि.4.3.2006 रोजीचे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना यांनी गैरअर्जदार यांना विमाधारक मयत महादेवराव देवराव शिंदे यांचा दि.7.2.2006 रोजी विहीरीत पडून मृत्यू झाले बाबत व विमा दावा देण्या बाबत पञ दिलेले आहे, ते गैरअर्जदार यांना मिळाल्याबाबत नोंद आहे.अर्जदाराने विमा क्लेम फॉर्म भरलेला दाखल केलेला आहे, त्यात सूध्दा माधवराव (महादेव) देवराव शिंदे असाच उल्लेख आहे, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना यांचे हंगाम 2004-5 यात ऊस उत्पादक म्हणून महादेव देवराव शिंदे रा. पाटनूर यांचा उल्लेख आहे. पोलिस स्टेशन अर्धापूर यांचा अहवाल यात देखील पाण्यात पडून बूडून मृत्यू असे म्हटलेले आहे. पोलिस स्टेशन भोकर यांचे अकस्मात मृत्यू रिपोर्ट मध्ये विहीरीत पडून मृत्यू असे म्हटलेले आहे.पोस्ट मार्टेम रिपोर्ट मध्ये सूध्दा The opnion to cause of death is death due drowning. असे म्हटलेले आहे. वारसा हक्काचे संरपंच ग्रामपंचायत पाटनूर यांचे प्रमाणपञ दाखल आहे. गैरअर्जदार यांना मयत महादेव ऊर्फ माधव यांच्या मृत्यू बददल वाद नाही, त्यांना आक्षेप हा मयताच्या नांवाबददल आहे. त्यांचे म्हणणे की, महादेव ऊर्फ माधव ही एकच व्यक्ती नसून त्या दोन वेगवेगळया व्यक्ती आहेत. त्यामूळे अर्जदार हे सिध्द करु शकलेले नाहीत की ती एकच व्यक्ती आहे म्हणून त्यांचा विमा दावा नामंजूर केलेला आहे. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारीसोबत मराठवाडा ग्रामीण बँकेचे पासबूक दाखल आहे यात देखील महादेव देवराव शिंदे असाच मयताचा उल्लेख आहे. ग्रामसेवक, पाटनूर व उपसरपंच ग्रामपचायंत पाटनूर यांनी प्रमाणपञ दिलेले आहेत यात देखील महादेव देवराव शिंदे व माधवराव देवराव शिंदे या नांवाची एकच व्यक्ती असून मौजे पाटनूर ता. अर्धापूर मध्ये या दोन्ही नांवाची एकच व्यक्ती असल्या बाबतचे प्रमाणपञ दिलेले आहे. म्हणजे अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपञावरुन हे सिध्द होते की मयत महादेव ऊर्फ माधव ही एकच व्यक्ती आहे या नीर्णयावर हे मंच आलेले आहे. अर्जदार यांनी दिलेले पूरावे हे विमा दावा देण्यास पूरेशे असताना देखील गैरअर्जदार यांनी मूददामहून अर्जदार यांचा विमा दावा देण्यास टाळाटाळ केलेली आहे असे करुन त्यांनी सेवेत ञूटी केलेली आहे. त्यामूळे आधीच अर्जदार हीस पतीच्या मृत्यूनंतर अनेक यातना सहन कराव्या लागलेल्या आहेत,तसेच अर्जदार क्र.2 व 3 ची जबाबदारी ही तीच्यावर पडलेली आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा दावा न देऊन मानसिक ञास दिलेला आहे व मंचात येण्यास भाग पाडलेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून एक महिन्याचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- व त्यावर दि.07.02.2006 पासून 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम वसूल होईपर्यत दयावे. 3. मानसिक ञासाबददल व दाव्या खर्चाबददल आदेश नाही. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |